सकाळी गारवा थंडीचा
किलबिलाट घुमतो पक्षांचा
सखी गुथलेली कामात
रुणुझुणुतो ताल पावलांचा
@ शरद शहारे
वेलतूर
January 30, 2020
नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं
विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी //
चार पुस्तके वाचूनी त्याचे, तर्कज्ञान वाढले
दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले //
नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी
समजूनी ह्याला "अंध विश्वास" , देई फेटाळूनी //
आधुनिक होते विचार त्याचे, कलाकार तो होता
पृथ्वीवरील घटणाना परि , योग म्हणत होता //
काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति, देखील ती
नाव प्रभुचे त्या वातावरणी, कुणी न घेती //
प्रेमळ त्याचा स्वभाव असूनी, चित्त तयाचे स्वछंदी
रहात होता सुंदर बंगलीं, अतिशय आनंदी //
छंद तयाला फुलझाडांचा, बाग केली छान
विविधतेची झाडे झुडपे, दिसे शोभावान //
दिवसभराचे कष्ट करुनी, फुलवित असे बाग
सुवास सारा दरवळूनी, डोलती तेथे नाग //
पक्षी आणि प्राणी जमवूनी, संग्रहालय दिसले
आवाजांचे सूर निघूनी मग, मधूर ते भासले //
मोर नाचे थुई थुई तेथे, नभी येता ढग
आनंदाला सिमा पडेल, कशी तेथे मग //
सारे होते नयन मनोहर, त्या वातावरणीं
संबोधित होता त्या वास्तूला "निसर्ग " तो म्हणूनी //
वेड लागुनी तन्मय झाला, सौंदर्याच्या ठायीं
निसर्गातील रस सदैव, शोषित तो राही //
नास्तिक तो अन् ईश्रर नसे, ही त्याची धारणा
परि तोच भासला खरा आस्तिक समरस होतांना //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 31, 2017
त्याची ऐकूनी करूण कहाणी, डोळे भरून आले पाणी
हृदय येता उंचबळूनी, निराश झाले मन ।।१।।
आघात होता त्याच्या जीवनी, तो तर नव्हता माझा कुणी
तरी का आले प्रेम दाटूनी, उमजेना काही ।।२।।
दु:ख दुजाचे समोर आले, मनास ज्याने कंपीत केले
दोन जीवांच्या हृदयामधले, अदृष्य हे धागे ।।३।।
मानव धर्म एक बिजाचा, वाढत गेला गुंता त्याचा
ओढत असता धागा टोकाचा, दुजा हळहळतो ।।४।।
राग लोभ वा प्रेम भावना, बांधूनी ठेवते एकमेकाना
हिच असे निसर्ग योजना, जीवन म्हणती याला ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 14, 2017
रिक्त प्रेमाचा घट
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट //
भावंडाचे संगोपन
रमवूनी त्यांचे मन
आईच्या कामी मदत देऊन
आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट //१//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
लक्ष्य संसारी
प्रेम पतीवरी
मुलांची जोपासना करी
संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
होता मुले मोठी
संसार त्यांचा थाटी
राहुनी त्यांचे पाठी
सुखासाठी त्यांच्या, करी देहकष्ट //३//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
ईच्छा उरली नसे मनी
लक्ष्य सारे प्रभू चरणी
सर्वस्वी त्यासी अर्पुनी
विनवी ईश्वारासी, डोळे आता मिट //४//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 12, 2017
जेंव्हा ठरले गावी जाणे
हूर हूर होती मनी
बराच काळ गेला होता
आयुष्यातील निघुनी
काय तेथे असेल आता
सारे गेले बदलूनी
काळाच्या प्रवाहामध्ये
राहिलं कसे टिकूनी
चकित झालो बघुनी
सारे जेथल्या तेथे
उणीवता न जाणली
क्षणभर देखील मानते
बालपणातील सवंगडी
जमली अवती भवती
गतकाळातील आनंदी क्षण
पुनरपि उजळती
आंबे चिंचा पाडीत होतो
झाडावरती चढुनी
आज मिळाला तोच आनंद
झाडा खालती बसूनी
मळ्यामधली मजा लुटली
नाचूनी गाऊनी
विहिरीमधल्या पाण्यात
मनसोक्त ते डुबूनी
ऐकल्या होत्या कथा परींच्या
तन्मयतेने बसूनी
आज सांगे त्याच कथा मी
काका मुलांचे बनुनी
वाडा सांगे इतिहास सारा
पूर्वज जगले कसे
भव्य खिंडारी उमटले होते
कर्तृत्वाचे ठसे
बापू, आबा, मामा, काका,
मामी वाहिनी जमती
कमी न पडली तसूभरही
प्रेमामधली नाती
मीही बदललो, गांवहीं बदलले
काळाच्या ओघांत
आनंद मात्र तो तसाच होता
पूर्णेच्या परिसरांत
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 29, 2020
नाती- गोती कसली,?करती कशी रक्तबंबाळ,
जीव'च नाही, आत्माही,
होती सारेच घायाळ,--!!!
कुठले मित्र,कसले सखे,
कशाशी खातात मित्रत्व,
स्वार्थ भांडणे वाद ,---
एवढीच जगण्याची तत्वं,--!!!
कसली नीती कशाची मत्ता,
एक दुसऱ्याचा गिरवी कित्ता, खरेपणाची बूंजच नसता, असत्याचीच इथे सर्व सत्ता,--!!!
माझी पोळी, तुझेच तूप,
नव्हे, तुझी पोळी तुझेच तूप,
झाले माझेच ते,तू कितीही खप,
तू खोटा, बाप खोटा,जरा जप,--!!
कोणता भाऊ कोण बहीण-?
कोण भार्या,कोण विहीण,
नणंद, जावा, भावजया,
हरेक भासे विषारी नागीण,--!!!
कसले घर अन् कसले घरपण,
परस्परांवर तुटून पडती,
विसरुन आपुले पुरते बालपण,
विसरुन सगळी नाती,--!!!
आखाडाच तो घर कसले,
करुन टाकती त्याचे रणांगण,
पैसा जोडी, पैसा तोडी,
सत्तालोलूप मानव खोडी,
कामना, लालसा, ईर्ष्या
घालती माणुसकीला बेडी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
April 11, 2019
राधेचं श्रीकृष्णावरील निखळ प्रेम
आजच्या तरुण प्रेमिकांत दिसत नाही !
असा प्रश्न सामान्य जनांच्या मनात
आला तर काही चुकले नाही !
प्रेमी युगल एकमेकांवर अंधळ प्रेम करतात,
तर काही जण प्रेमात पडून अंधळे होतात !
कोणाचं प्रेम खरं कोणाचं खोटं,
ते आपापल्यापरीने पुढे रेटतात !
एकतर्फी प्रेमात अपयश आल्यावर
अॅसिड हल्ले, बलात्कार होतात,
बाह्य आकर्षणाला भुलून केलेलं प्रेम
काश्याची साक्ष देतात !
आंधळ्या प्रेमात केलेल्या चुका
गडद काळोखात वाकुल्या दाखवतात,
मुलांपेक्षा मुलींच्या कलंकांच्या
शृंखला भविष्यात सुरु होतात !
अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्यावर कळते
निर्णय चुकीचा होता,
प्रेम नव्हतेच
वासनांचा चक्क बाजार होता !
जगदीश पटवर्धन, दादर
February 19, 2015
जवळी येताच तू
जग नवे भेटले
स्वप्न जागेपणी पाहते वाटले ll
सुखाच्या सरी
झेलतांना खुले
पुन्हा ते तुझे रूप भासातले ll
का शहारा फुटेना
मनाला अता
पांघरुनी तुझा श्वास घेता ll
रंग माझा तुला
गंध माझा तुला
जिवलगा s s s s जिवलगा ll
भास ध्यानी मनीं
स्वप्नी जागेपणी
तूच तू तूच रे
जिवलगा s s s s जिवलगा ll
-- ...... मी मानसी
June 14, 2019
"मी कुणाला कळलो नाही"
मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही...
सुगंध सारा वाटीत गेलो
मी कधीच दरवळलो नाही..
ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..
केला सामना वादळाशी
त्याच्या पासून पळालो नाही..
सामोरा गेलो संकटाना
त्यांना पाहून वळलो नाही..
पचऊन टाकले दु:ख सारे
कधीच मी हळहळलो नाही..
आले जीवनी सुख जरी
कधीच मी हुरळलो नाही..
कधी ना सोडली कास सत्याची
खोट्यात कधीच मळलो नाही..
सोडून गेले माझेच मला
"मी कुणाला कळलोच नाही.."
"मी कुणाला कळलोच नाही"
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.
November 8, 2016
तूच माझी राधिका,तूच माझी प्रेमिका,
मोहिनी माझी तू ,
तूच माझी सारिका, --!!!
मुसमुसते प्रेम तू ,
सौंदर्य ओसंडून वाहे,
मदनाची रती तू ,
भित्र्या डोळ्यांनीच पाहे ,--!!!
कमनीय सिंहकटी तुझी,
बाहूत माझ्या सामावे,
लाल कोवळे ओष्ठद्वज,
डाळिंबीची जणू फुले,--!!!
मोहक बांधा तुझा,
जाता-येता खुणावे ,
कुंतलाचे मानेवर ओझे,
पाठीवरचा तीळ झाके, --!!!
आरस्पानी रंग-गोरा,
काळजां घायाळ करतो,
गोड गुलाबी कायेवर,
लज्जेचा गेंदा फुलतो,--!!!
मिटून घेशी शृंगारात,
संकोची तू कासवी,
मदनाची बाधा होता,
फुलून येते रातराणी,--!!!
*ऐहिक तू भोगिनी,
मजसाठी मात्र योगिनी,
भोग--योगाच्या संयोगी,
अलौकिक तू कामिनी*,--!!!
हिमगौरी कर्वे.©
April 9, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti