लाट उसळतां ती क्रोधाची, बळी घेतले कित्येकाचे
हिंसाचाराच्या लाटेमध्यें, सर्वस्व गमविले कांहींचे...१,
फार पूरातन काळीं आम्हीं, चालत होतो एक दिशेनें
कुणीतरी फोडून वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने...२,
त्याच क्षणाला बिज रूजले, धर्मामधल्या विषमतेचे
ईश्वराकडे त्या जाण्याकरितां, मार्ग पडती विविधतेचे....३,
विविधतेनें संघर्ष आणिला, भेदभावाची भिंत उभारूनी
विवेकाला गाडून टाकले, उफाळणाऱ्या भावनांनी,
चूक कुणाची सजा कुणाला, कालचक्राची रीत न्यारी
धर्म पंथांचे मार्ग आखूनी, सलोख्यात निर्मिली एक दरी
कमी न होईल अंतर हे, केवळ दुजा धर्म जाणतां
एकत्र येवूं तेव्हांच सारे, ईश्वरास तो एक समजतां
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 27, 2021
विसरलास तू मानव पुत्रा,
नीतिमूल्ये सगळी,
काय दुर्दशा झाली तुझी, काय दुर्दशा झाली....।। धृ ।।
स्वप्नामध्ये दिले वचन,
पाळीले ते राज्य घालवून,
हरिश्चद्रांची कथा आजही
करीते मान ताठ आपुली....१,
विसरला तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
राजा साठी देई प्राण,
दुजासाठी होते जीवन,
‘सिंहगड’ तो घेई जिंकूनी
शिवरायाची शान राखली....२,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
काळ असो तो पुरातन,
वा आधुनिक शिवकालीन,
पूर्वज सारे महान असता,
आज पुण्याई अशी का आटली?....३,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,
विश्वासाचे नाते गेले,
स्वार्थीपणाचे बीज अंकुरले,
लुटतो मानव एकमेका,
हीच चित्रे आज उमटली.....४,
विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी
November 13, 2019
कडाक्याची थंडी, दात कुडकडुती,
हात-पाय गार, काटे अंगी येती
नकोसा वाटतो, मजला हिवाळा,
वाट मी बघतो, येण्या तो उन्हाळा
सुकूनची जाते, हिरवे ते रान
शरिर राहते, घाम निथळून
लाही लाही होता, त्रस्त होई जीव,
शोधण्या ते ढग, मन घेई धाव
थांबवितो कामे, वादळी तो वारा,
पर्जन्याचा मारा, पडताती गारा
पाणी चहूकडे, वाटते सुकावे,
वर्षा ती जावूनी, सुक्यात खेळावे
आपल्या जे हातीं मन नसे त्यांत
सुख त्यांच्यांत पाही, नसे जे हातात
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 14, 2019
February 27, 2014
नदी वाहे झुळझुळ झुळ,
पाणी तिचे थंडगार.
कचरा टाकू नका कुणी,
नदी रडते वारंवार.
नदी देते पाणी गोड,
झाडे, शेती, फुले फुलती.
नदी जर झाली स्वच्छ सुंदर,
पक्षी आनंदाने गाती.
चला मिळून वचन देऊ,
नदी नेहमी स्वच्छ ठेवू.
नदी हसली, आपण हसू,
आनंदी भारत घडवू.
पावसाचे थेंब पडती,
नदी आनंदाने हसते.
स्वच्छ नदी, सुंदर धरती,
सारे मिळून तिला जपू.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 12, 2026
November 10, 2021
स्पंदनात जाणवेल माझ्या
तूझ्या विरहाची किनार..
सोबतीला आठवणीत
वेगळीच मजला हूरहूर..
तु वेगळा नाहीस ह्याची
स्पंदने साक्ष देत राहतात..
पाठमोरे होण्या अगोदर
पावले तरी कोठे साथ देतात..
पांघरताना सावली पुन्हा
उन्हाच्या झळा करपून जातात..
तरीही तुझ्या स्पर्शाची भाषा
स्पंदनाना अशी वळते आहे..
माझ्या मनातल्या भावनांची
रूप रेषा तुला जशी कळते आहे..
गजरा माळताना पुन्हा दोन
फुले चुकून ओघळली..
ओंजळीत घेताना पुन्हा
तीच गंधाळली..
रंग गाली चढतो हळूहळू प्रीतीचा
ओळखीचा तो स्वभाव स्पंदनांचा
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
June 3, 2026
नियोजनाच्या लागून मागें, भविष्याची आखतो चौकट
कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट....१,
अनेक वाटा दिसूनी येती, भविष्यामधळ्या कल्पकतेला
वर्तमान त्या काळाकरिता, जावे लागते एकाच दिशेला...२,
उठूनी करा त्याच क्षणीं ते, वृत्ति असावी अशीच सदा
उद्यांवरती कार्य टाकतां, मनीं उमटती विचार द्विधा...३,
वर्तमान हा निश्चीत असता, यश लाभते अनेकदा
केवळ तुमची बघुनी धडपड, साथ देईल ईश्वर सदा....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 5, 2017
मधूर आवाज मिळूनी,
उपकार झाले तिजवर,
सुंदर गाणे गाऊनी,
आनंदीत करी इतर ।।१।।
हातपाय दुबळे होते,
दृष्टी नव्हती तिजला,
कष्ट करण्या शक्ति नव्हती,
कसा मिळेल घास तिला ।।२।।
परि ती होती आनंदी,
गाण्याच्या ओघांत,
उचलित होती पैसे,
पडता तिच्या पदरांत ।।३।।
जरी झाला देह दुर्बल,
जगण्याची होती आंस मनी,
मिळालेल्या आवाजाला,
समजे ती ऋणी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 11, 2016
लक्षच लागेना कृतीत, करतोहे म्हणुन चुका !
मनस्थिती जाणा, ‘कामातुन गेला’ म्हणूं नका ।।
खिन्नपणा असुनही स्मिताचा यत्न स्तुत्य नच कां ?
राखा रे सन्मान ज़रा, ‘रडवेला’ म्हणूं नका ।।
नयनांचा ओलसर असे पडदा, तो नुरे सुका
तरि या विरहार्ता, ‘डोळे भरलेला’ म्हणूं नका ।।
अश्रूंचा पाझर हलकासा, दिसत नसे इतुका
पण, हळव्याला, ‘धीर मनी धरलेला’ म्हणूं नका ।।
संध्येच्या समयीं बुडली माझी कुटुंब-नौका
‘त्या’ वेळेला कोणी ‘पावन-वेला’ म्हणूं नका ।।
सखि गेल्यावर, टापटिपीच्या घर मुकलेंच सुखा
तरिही घर तें घर !, त्याला ‘तबेला’ म्हणूं नका ।।
मधुर घोट लावतात मजला विसराया दु:खा
अमृतास या, कुणि ‘मदिरेचा पेला’ म्हणूं नका ।।
ती गेली म्हणुनी आला मज वेडाचा झटका
तिची चूक ना, ‘दोषी’ प्राणप्रियेला म्हणू नका ।।
कॅन्सरग्रस्त सखी मम; तुम्हां यमाचाच पुळका !!
त्यानें तिजवर ‘उपाय योग्यच केला’ म्हणूं नका ।।
‘मृत्युस जाणें सामोरें’, मम सखीकडून शिका
मान्य, भले कुणि स्वत:ला ‘तिचा चेला’ म्हणूं नका ।।
नाहीं ठेवायचा मला कोणांवरही ठपका
उंच दोन-वच बोलल्यास, ‘चिडलेला’ म्हणूं नका ।।
हल्ली मज प्रत्येकच माणुस वाटे जरि परका,
मला ‘जगापासुनी पूर्ण तुटलेला’ म्हणूं नका ।।
‘जायचेंच मज आतां इथुनी’, विचार मनिं पक्का
परी, त्यामुळे, कुणिहि मला ‘हरलेला’ म्हणूं नका ।।
‘जीवित-प्रेत’च झालो मी, बसतां असह्य धक्का
तरिही जोवर श्वास, मढ्या या, ‘मेला’ म्हणुं नका ।।
शब्द उमटती, म्हणून, ‘कवि मी’ ही उठली भुमका
हृदयातिल रक्ता, ‘शब्दांचा झेला’ म्हणूं नका ।।
( दिवंगत पत्नी डॉ. स्नेहलता हिच्या आठवणीत )
मम : माझा / माझी / माझें / माझ्या
वच : बोल
भुमका : आवई , अफवा
- सुभाष स. नाईक .
M- 9869002126.
April 23, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti