(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चैतन्य

    भास्करा हेच चैतन्य तुझे
    चराचराचाच श्वास आहे

    उदय,अस्त, प्राची, पश्चिमी
    कांचनकेशरी रंग तूच आहे

    सूर्यचंद्र, ग्रह, तारे, तारका
    तूच एक प्रकाशसत्ता आहे

    सारीच मनभावुक प्रसन्नता
    केवळ तुझीच देणगी आहे

    तूच सूर्य, सृष्टी जगविणारा
    देवत्वाचा साक्षात्कार आहे

    ब्रह्मांडी, कालचक्र अविरत
    जगण्यासाठी अनिवार्य आहे

    सुखनैव, मन:शांती जीवा
    तेजोमय प्रकाशमंडल आहे

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २२०

    ३०/८/२०२२

      September 28, 2022


  • कावळा म्हणाला.. माणसाला..

    माणूस म्हणाला..
    कावळ्याला’..

    एकदा माणूस म्हणाला..
    कावळ्याला’..

    कसे सांगायचे रे यांना,
    बाहेरचे खाऊ नका...

    पितृपक्ष चालू झाला,
    घरच्या शिवाय जेवू नका..

    ‘कावळा म्हणाला..
    माणसाला’..

    ‘कावळा म्हणाला..
    माणसाला’..

    अरे हे बुद्धीमान मनुष्या..

    पंधरवडाच फक्त आठवणीने,
    नैवद्य खिडकीवर असतो... !

    बाकीचे ३५० दिवस मात्र आम्ही,
    उकिरड्यावरचं बसतो रे .. !

    पुण्य मिळवायच्या आशेवर..
    ठेवलास तू घास छतावर..

    जिवंतपणीच सांभाळ रे बाळा..
    तुझ्या वृध्द पालकांना..

    जिवंतपणी त्यांची सेवा करून ..
    आणि त्यांचे आशिर्वाद घेऊन ..
    पुण्य मिळेल हमखास बाळा..!

    जातीपाती विसरून, गोरगरिबांना
    दान करून, गरजू ना मदत करून..
    गाठी पुण्य कमवशिल हमखास रे .!

    ‘कावळा म्हणाला..
    माणसाला’..

    जे का रंजले, गांजले..
    त्याशी म्हणा जो, आपुले...
    तोचि साधु ओळखावा..
    देव तेथे ची जाणावा...!

    -- गणेश उर्फ अभिजित कदम,
    कुडाळ सिंधूदुर्ग

      September 19, 2017


  • महाकवी कालिदास रचित ” रघु वंश “

    अन्तः पुरीचे जन तै नृपापरी /

    कुमार जन्मास अधी निरोपिती /

    श्रवोनिया अमृत तुल्य आकक्षरे /

    सर्व स्वेद वर्जुनी छत्र चामरे // १६ //

    निर्वातशा स्थानिय पंक जापारी /

    तटस्थ नेत्रे सुत पाहिल्यावरी /

    नृपास प्रेम न समाय अंतरी /

    विधू पाहता बहु पूर सागरी // १७ //

      April 22, 2011


  • यशासाठी प्रयत्नाची दिशा

    प्रयत्न करितां जीव तोडून, जेव्हां यश तुम्हा न येई
    सोडून देता त्याला तुम्हीं, नशिबास दोष देत राही..१

    दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे
    का न मिळाले यश तुम्हां, मूल्यमापन करा प्रयत्नाचे...२

    चूक दिशेने प्रयत्न होतां, वाहून जातो सदा आपण
    यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन...३

    पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले तुमचे हातीं
    प्रयत्नाची दिशा बदलतां, जुळून सहजच सारे येती...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 2, 2017


  • क्षण

    ‘क्षण’ दिसायला दोन अक्षरे

    चुकीच्या निर्णयाने क्षणात
    जीवन मातीमोल करे !

    चांगल्या बेरजा क्षणाच्या
    वजाबाक्या वाईटाच्या,
    कधी गुणाकार
    कधी भागाकार !

    क्षणाच्या विलंबाने चुकते प्लेन,
    चुकते ट्रेन,
    निसटते संधी,
    आयुष्यात येते आंधी !

    मनाच्या चलबिचलतेने
    क्षणार्धात सुटतो तोल,
    होत्याचे नव्हते करण्या
    उद्युक्त करतो क्षण !

    त्याच क्षणाला सावरायला हवे
    क्षणाक्षणाला मन भानावर हवे,
    जगण्याच्या चांगल्या उमेदीने
    जीवनाकडे बघायला हवे !

    जीवनात चांगला क्षण येतो
    आपण नकळत दूर सरतो !
    क्षणार्धात हातची संधी जाते
    पुढच्या क्षणाची हुरहूर लागते !

    जगदीश पटवर्धन

      June 24, 2015


  • समस्त दारू पिणार्‍यांना सादर अर्पण

    विषय जरी दारु असला तरी कविता सुंदर आहे. न घेणाऱ्यालाही हसवेल

      July 25, 2017


  • पिंडीतील ब्रह्मांड

    विज्ञानाने शोधली, अणुतील प्रचंड शक्ति
    प्रथमच जगाला कळली, अणूंतील उर्जा शक्ती

    सुक्ष्म असूनी अणु आकार, सुप्त शक्ति अंगीं
    प्रचंड उर्जा करी साकार, फोडतां अणु मध्यभागीं

    विचार मनीं येई , कोठून शक्ति ही आली
    निर्जीवातील अणूरेणूला, कशी उर्जा लाभली

    समजोनी घ्या एक, निसर्गाची श्रेष्ठता
    लहान असून देखील, प्रचंड त्याची योग्यता

    जीव देहाचे पिंड, जीवंततेतील सुक्ष्मता
    बाळगी ते ब्रह्मांड, हीच त्याची महानता

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      December 18, 2018


  • मुखवटा

    मुखवटे स्वतःचे
    चक्क फाडून द्यावे
    कि कुणाला तरी
    उधार जरा द्यावे
    जगाला, नात्याला
    चांगले ते दिसावे
    उरात दुःख बाळगून
    खोटे उगी हसावे
    चेहरा आर्त वेदनेचा
    न कुणाला दिसावा
    कृत्रिम रंगलेला
    रोज मुलामा चढवावा
    टांगते झुले ते
    भूत भविष्याचे
    सुरक्षित झापडांचा
    मुकुट मिरवावा
    नको नकोसे होते
    न सापडे खरा निवारा
    जेथे मिळे तेथे
    वारा स्वार्थाचा वाहणारा!!
    -- वर्षा कदम.

      November 11, 2021


  • श्रावण सरी….!!

    || हरी ॐ ||

    आल्या आल्या श्रावण सरी,
    अवचित करिती चिंब परी !

    उन पावसाच्या खेळ हा,
    सप्तरंगी पडदया आड हा !

    रत्यांवर हिरव्या पानांचा सडा,
    दिसतो जसा हिरवा सरडा !

    सख्या निघाल्या खेळाया ह्या,
    जमवून बाहुलीचे लग्न त्या !

    रानीवनी मुक्त हिंडती !
    लग्नासाठी जागा निवडती !

    जंगलातील रस्ता निसरडा !
    तरी नसे मना मुरडा !

    बाहुला आला, सर्व लवाजमा सजला,
    अंतरपाठ सप्तरंगी मिळाला !

    लग्न लागताच श्रावण सर आली,
    ऐतीच वाजंत्री वाजू लागली !

    वार्यानेही साथ दिली,
    वेणूनेही लाज राखली !

    रंगीबेरंगी फुलांच्या माळा,
    नवरा-नवरीच्या पडल्या गळा !

    घरी जाया बाहुली निघाली बाहुल्या,
    डोळ्यांच्या कडा पाणावल्या !

    अवचित येता श्रावण सरी,
    न दिसे डोळा पाणी परी !

    जगदीश पटवर्धन

      August 16, 2017


  • रचली जाते कविता

    मिळता मजला बाह्य एकांत, छळते गर्दी विचारांची
    मन गुंतविण्या कुणी नसता, चलबिचल होते भावनांची...१,

    शब्द वर्णांचा घेवून आधार, भावना काढी मार्ग आपला
    आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला...२,

    शब्दांना नटवी थटवी, ध्वनी लहरी नि सूर गेयता
    अलंकार मिळता अंगी, रचली जाते एक कविता...३

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००५०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 13, 2018