(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सम्राज्ञी

    तुझं असं येणं सोसवत नाही मला ...
    प्रारब्धाचे आसूड झेलत
    उन्मादाचा प्रपात कोसळत
    असतांना , तुझं माझ्यासाठी येणं...
    सोसवत नाही मला ...
    बेबंद समाजाचा माज
    उतरवताना तुझी
    होणारी तगमग,
    सोसवत नाही मला ....
    रूढी,परंपरा यांच्या शृखंला
    अलगद सोडवतांना
    रक्तबंबाळ झालेेली तुझी
    नाजूक पावलं पहावत
    नाहीत मला ....
    येशील कधी तरी तेंव्हा
    साम्राज्ञी सारखी ये ....
    माझ्या हृदयस्त सिंहासनाचा ताबा घे ...
    हळ्व्या नात्यांचा ,हळव्या शपथांचा
    हुंकार श्वासात भरून ये....
    मी देईन सौभाग्यांचं लेणं,
    दोन धगधगते नागमणी....
    जे तुझ्या समर्थथेची साक्ष देतील...
    तुझ्या अश्रुंचे माणिकमोती
    वेचणं आता सोसवत नाही मला....

    ©लीना राजीव.

      August 23, 2018


  • कृष्णमेघना

    झाकोळल्या नभांगणी
    कृष्णमेघना अनावर...

    जीवा, ध्यास श्रावणी
    सरसरसर धारा सुंदर...

    वर्षा ऋतू बरसणारा
    स्पर्श ओलेता मनोहर...

    शब्द गझला अर्थवाही
    भावगंधी ओंजळ सुंदर...

    चिंबचिंबली पानफुले
    झुळझुळतो नाद सुंदर...

    अतर्क्य रूप चैतन्याचे
    लावण्य रुपडेच मनोहर...

    नाचत नाचत येते वर्षा
    ओथंबलेले गगन सुंदर....

    रचना क्र. ७८
    २०/७/२०२३
    -वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908

      August 14, 2023


  • फ्रॉम शोभा डे..

    शोभा डे या आचरट बाईच्या बरळण्यावर केलेली ही टिप्पणी सध्या इंटरनेटवर फिरतेय...

    नाही मला विषयाचे वाव डे.
    घालीन पायात तंग डे
    असेना का रोज डे, हग डे किंवा नाग डे (नागपंचमी ला इंग्लिशमधे म्हणतात)
    चोंब डे बोल माझे का वाटती तुम्हा वाक डे?
    बसलीत जरी गालफ डे, अंग अजून तसेच...थोडेफार उघ डे
    ही बाकी सगळी माक डे, करती सदा झग डे
    काही त्यात बेव डे आणि काही दारू डे
    खाती सदा कोंब डे
    गुपचूप घालतात दरो डे फोडून, तुमचीच भिंता डे
    ठेवलं जर घट्ट चाम डे, तर मात्र देती रोक डे
    अन ते एक नेमा डे……. जर ते बोलले तर,
    बंद होतील थोबा डे.
    सैनिकच तेव्ह डे निध डे, पण हल्ली गाती नुसते पोवा डे
    लावी डोळा झाप डे....आणि देतात काय तर पाव वडे
    बसा मग तसेच……….हे असंच चालू राहील...डे बाय डे

    (क्रिएटीव्हीटीला काही लिमिट नसते, पण काही लफ डे व्हायला नको म्हणून ....... या पोस्टमध्ये अश्लील आणि वादग्रस्त "डे" जाणीवपूर्वक वापरलेले नाहीयेत ------

    होतकरू आणि बापू डे नवकवी - श्रीरंग चितळे

      September 19, 2016


  • तृप्तलो आता

    मालवुनी टाक रे, दीप तू आता
    मन शांत जाहले, तृप्तलो आता..

    उजळल्या अंतरी, नाना गतस्मृती
    थकलो स्मृतींचे, भार पेलता पेलता..

    कोवळी मध्यान्न, गेली सांजाळूनी
    सांजेसवे लपली, यामिनीच आता..

    निवता लोचने, हुरहुर स्पंदनांना
    चैतन्य सरता सरता जागे अंतरात्मा..

    मालवुनी टाक रे, दीप तू आता..
    मन शांत जाहले, तृप्तलो आता..

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२३९

    १८/९/ २०२२

      September 23, 2022


  • माझं पहिलं प्रेम

     

      January 4, 2014


  • मुंबईतील मराठी माणसांची व्यथा

    मुंबईतील मराठी माणसांची व्यथा व्यक्त करणारी कवी नायगावकरांची ही कविता प्रत्येकास विचार करायला भाग पाडते -

    'टिळक,तुम्ही चौपाटीवर इथे
    कशासाठी उभे आहात ?
    अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं
    हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे
    आणि आम्ही तो रोज मिळवणारच.....
    तुमचे डोके ठिकाणावर आहे काय टिळक ?
    तुम्ही डॉलर मिळवा
    लोक बघा किती आनंदात
    बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत
    तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा ..''
    हे फटकारे त्यांनी टिळकांचे नाव घेवून सर्वांवरच ओढले आहेत. या कवितेतले टिळक आपल्या अंगावर धावून येतात आणि आपली झाडाझडती घेतात.

      December 29, 2017


  • ज्ञान देणारे सर्वच गुरू

    अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले

    जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले ।।

    निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण

    आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून ।।

    उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी

    काही ना काही ज्ञान मिळते, वस्तूच्या त्या गुणापरी ।।

    सारे सजिव निर्जिव वस्तू, गुरू सारखे वाटावे

    तेच आहेत ईश्वरमय, तुम्हीच ते समजावे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 18, 2020


  • जेवणाच्या राशी

    थोडेसेच जेवण का असेना
    मेष आवडीने खाणार..
    गरम, चमचमीत पदार्थांवर
    यांची पहिली नजर जाणार.. ।।१।।

    वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे
    दाद देऊन जाते..
    लोणची-पापडासारखे पदार्थही
    अगदी चवीचवीने खाते.. ।।२।।

    कधी मारुनी मिटक्या,
    कधी नन्नाचा चाले पाढा..
    मिथुनाचे कौतुक मधाळ
    तर टीका कडवट काढा.. ।।३।।

    'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणत
    कर्केचे होते पूर्ण जेवण..
    रुचकर पण थंड अन्नही हे
    कसे पटकन करतात सेवन? ।।४।।

    राजस जेवणाच्या सिंहेचा
    केवढा राजेशाही थाट..
    थोड्याथोड्या सर्वच पदार्थांनी
    यांचे भरुन जाते ताट.. ।।५।।

    'कमी-जास्त नाही ना?'
    याची उगाच बाळगून भीती..
    इतरांकडे पाहून ठरते
    कन्येची जेवायची नीती.. ।।६।।

    भात-भाजी-आमटीबरोबर
    पचतील तेवढ्याच पोळ्या..
    अशा संतुलित आहारानंतर
    तूळ खाते पाचक गोळ्या.. ।।७।।

    काही Missing आहे का
    कधी कळतही नाही..
    साधे नेहमीचेच जेवण
    पण वृश्चिकेला रुचत नाही.. ।।८।।

    कधी पटपट-झटपट जेवण
    तर कधी अगदीच वेळकाढू..
    धनू काढत नाही जेवताना खोड्या
    पण वेळ मिळताच संधीसाधू.. ।।९।।

    ना कधी कौतुक
    ना कसली नकारघंटा..
    गपगुमानं जेवतो मकर
    करत नाही कधी थट्टा.. ।।१०।।

    निश्चित वेळ जेवणाची
    पार्टी असो वा एखादे लग्न..
    कुंभेची चिकित्सक वृत्ती
    नेहमी रेसिपी जाणण्यात मग्न.. ।।११।।

    कधी-कुठेही जमते
    मीनेची खाण्याशी गट्टी..
    पोटभर खाताना घेतात
    'डाएट' नावाशी कट्टी.. ।।१२।।

      September 12, 2016


  • क्षण मुक्तीचा

    तपसाधना करूनी मिळवी,
    सत्वगुणाची शक्ती अंगी ।
    त्याच शक्तीच्या जोरावरती,
    स्थान लाभे त्यांना स्वर्गी ।।

    शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा,
    सारे सुख आणि भोग भोंवतीं ।
    परिणामी तो फेकला जाऊनी,
    पुनरपी येई याच भूवरती ।।

    एक दया दाखवी ईश्वर,
    वातावरणी देऊनी संधी ।
    जन्म मिळे ते त्याच ठिकाणी,
    कमविले पुण्य ज्याने आधी ।।

    चक्र खेळ हा चाले सदैव,
    स्वर्ग मृत्यू या लोकी त्याचा ।
    अंतिम ध्येय तेच ठरते,
    मिळविणे क्षण तो मुक्तीचा ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 1, 2015


  • चालणे सुरु तर कर

    चालणे सुरु तर कर ....पोहोचणार नाही कशावरुन ?

    बोलणे सुरु तर कर ...टाळ्या पडणार नाही कशावरुन ?

    टिम्ब काढ रेषा होतील...रेषारेषांचे चित्र जाईलच बनून

    आवड तयार होईल ...कलाकृती छान घडणार नाही कशावरुन ?

    लिहिणे सुरु तर कर.. कविता होईल ओळी मिळून

    जमणार नक्की ...लाईक मिळणार नाही कशावरुन ?

    हे जमत नाही ते जमत नाही...सोड सांगणं( गाऱ्हाणं) फिरून फिरून

    गाणं सुरु तर कर ...सूर सापडणार नाही कशावरुन ?

    घाबरतो उगाच आपण...रुपडं बघून वरुन वरुन

    अंतरंगात बघ गुण शोधून ...जगणं जमणार नाही कशावरून ?

    # कौशल

    -- श्रीकांत पेटकर

      February 25, 2019