प्रकाशन दिनांक :- 09/05/2004
हिंदू संस्कृतीत पुनर्जन्माच्या सिद्धांताला मान्यता आहे. या जन्मातील बऱ्यावाईट कर्मानुसार मनुष्याला पुढील जन्म प्राप्त होत असतो. मागील जन्मात केलेली पापं फेडायची आणि शक्य झाल्यास काही पुण्य संचय करून पुढील जन्मातील जीवन अधिक सुखदायक व्हावे याची तरतूद करायची, असा ढोबळ हिशोब या सिद्धांतामागे आहे.
May 9, 2004
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू आणि राजकारणातील सावध व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. राज्य गहाण ठेवण्याच्या त्यांच्या वक्तव्यामागील उद्देश हा स्मारकासाठी निधी कमी न पडू देण्याबाबतचा असेलही. मात्र तो व्यक्त करत असताना योग्य शब्दांचा वापर केला जावा. नाहीतर टाळ्याखाऊ विधानं करण्याच्या नादात गफलत होऊन जायची. डॉ. आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून व्हायचे ते राजकारण आजवर खूप झाले. आता निधीच्या मुद्द्यांवर राजकारण केल्या जाऊ नये. एव्हडीच अपेक्षा..!
October 8, 2018
दोन समाजात तेढ निर्माण करणे, प्रसंगी दंगली घडवून आणणे किंवा दंगली होतील अशी परिस्थिती निर्माण करणे आणि त्यातून आपले राजकारण साधणे हा इथल्या राजकीय पक्षांचा धंदा झाला आहे. हा करतो म्हणून तो करतो किंवा तो करतो म्हणून हा करतो, असे तर्क दिले जात असले तरी, शेवटी सगळेच पक्ष कमी-अधिक प्रमाणात जातीचे, धर्माचे राजकारण करतात ही वस्तुस्थिती आहे.
September 8, 2012
चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ,समर्थशिवाय शिवाजी ला कोण विचारेल? असे एकेरी वक्त्यव्य राजे शिवाजी बद्दल कुणी माथेफिरूने केलं नसून राज्याचे घटनात्मक पदावर बसलेली व मागील काही वर्षां पासून महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जेष्ठांचे अनादर करणारे महामहिम राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी केले.
November 20, 2022
संपूर्ण समाजच बधीर झाला आहे नव्हे जणू मृतप्रायच झाला आहे. येणार्या संकटाची जाणीवच नसल्याने त्यावर विचार करून लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने काही उपाय योजणे, त्याचबरोबर मूलभूत गरजा भागविण्याच्या दृष्टीने नियोजनाला सुरूवात करणे याविषयी कोणी बोलतानादेखील दिसत नाही. म्हणूनच कबीराने म्हटल्याप्रमाणे ‘जागो ये मुर्दोंका गांव’ असे म्हणायची वेळ आली आहे.
January 6, 2010
*देवा वाचव या देशाला व समाजाला या...............पासुन*
सर्व पत्रकार बांधवांस,
सप्रेम नमस्कार
पत्रास कारण कि, कमाल वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला मंत्र्याने दिलेली उद्दाम वर्तणूक पाहिली. मंत्री चुकलेच,
पण माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्याची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.
संबंधित मंत्री जे काही बोलले तो प्रसंग चुकीचा असला तरी त्यांनी जे काही सांगितले ते मात्र अजिबात चुकीचे नाही. तुम्ही *टीआरपीसाठी* काहीही करू शकता असे मंत्रयांचेच नाही तर सामान्य माणसांचेही म्हणणे आहे.
26/11 च्या हल्ल्यात तुम्ही जे वागलात ते आम्ही पाहिले. कालच्या महाड दुर्घटनेत तुम्ही प्रतिक्रिया घेण्याच्या नावाखाली जी काही *धुडगूस* घालत होता तेही आम्ही पाहिले. तुम्ही बीबीसी वगैरे बघत नसाल कदाचित. त्यामुळे गांभीर्य वगैरे प्रकारांशी तुमचा काहीही संबंध आलेला नाही. पर्वा फ्रान्सच्या नाईस शहरात दहशतवादी हल्ला झाला. मी एकही *मृतदेह*माझ्या टीव्हीच्या पडद्यावर पहिला नाही, *रक्त*नाही आणि झीट आणणारा बूमधारी *सर्वज्ञांचा*कर्कश कोलाहलही नाही. तो मला *9/11*लाही दिसला नव्हता.
*एक लक्षात घ्या, तुम्ही पत्रकार आहात *न्यायाधीश*नाहीत.
तुमची बदललेली भाषा कळते आम्हाला.*याना शिक्षा करा*याना *फासावर लटकवा*" "यांची *चामडी सोला,*" "*यांचे राजीनामे घ्या* असले तुमचे मथळे. आणि भाषा अशी कि, सगळे ज्येष्ठ तुमच्यासोबत शाळेत गोट्या खेळत होते. अजून शेंबूड पुसता येत नाही अशी तुमची अँकर माजी* मुख्यमंत्र्यांना थेट नावाने हाक मारते. "जी", "सर" असली आदरार्थी विशेषणे फक्त तुमच्या संपादकांसाठी आहेत असा तुमचा समज असेल तर तसे एकदा जाहीरच करून टाका.
तुम्ही जनहितार्थ असाल तर तसेही काही नाही. पक्ष बघून तुमचा आवेश ठरतो. रोज उठून लोकांना ढुशा देणारा "*बोधामृतफेम* संपादक स्वतःच लिहिलेला अग्रलेख दुसऱ्या दिवशी चक्क मागे घेतो. डुकराचे कार्टून छापणार वृत्तपत्र जाहीर माफी मागत. एका वृत्तपत्राचा आणि वाहिनीचा मालक चार महिने जेलात आहे. दुसऱ्या वाहिनीचा मालक कोळसा घोटाळ्यात आहे. एक आमदार लाईव्ह टेलिकास्ट मध्ये संपादकाने कशी पाकिटे घेतली त्याचा उद्द्धार करतो. एक पत्रकार पत्रकारांवरच सेन्सॉरशिपची मागणी करतो, दुसरी पत्रकार त्याला शिव्या देते, एक दीड शहाणा गोमांस खातानाचा फोटो फेस बुक वर टाकतो, एका इंग्रजी दैनिकाचा पत्रकार फेसबुकवर हिंदुत्ववाद्यांची अर्वाच्च्य शब्दडांत आई बहीण काढतो, आणि गुन्हा दाखल होऊ नये म्हणून तुमच्या संघटना दबाव आणतात तेव्हा तुमची निषेधाची तोंडे का बंद होतात?? तेव्हा कुठे जातो तुमचा ताठ कणा आणि बाणा??
तुम्ही गप बसलात तरी सोशल मीडिया नावाचा तुमचा बाप जिवंत आहे हे लक्षात ठेवा.
मेहता चुकलेच. पण पत्रकाराचा प्रश्न काही फार बरोबर होता असेही नाही. "लोकांच्या मनात तुमच्याबद्दल रोष आहे" हा आपत्कालीन स्थितीतला प्रश्न आहे का? आपत्कालीन स्थिती प्रशासनाने हाताळायची आहे, त्यासाठी नियंत्रण कक्ष असतो. तिथे काय स्थिती आहे हे एकही चॅनेलने दाखवली नाही. एखाद्या माणसाला शोधायचे आणि त्याला ठोकून काढायचे, हे धंदे बंद करा. गांभीर्य ओळखा.
मंत्री आजपर्यंत खासगीत तुम्हाला शिव्या घालत होते, आज जाहीर घालू लागलेत.
खांडेकर म्हणाले "देवा, या देशाला नेत्यांपासून वाचव असे म्हणण्याची वेळ येणार आहे"
लोक म्हणातात, "देवा, या देशाला पत्रकारांपासून वाचव असे म्हणण्याची वेळ येऊन गेली आहे"
आणि हा प्रसंग तुम्ही तुमच्या कर्माने स्वतःवर आणला आहे, हे वेळीच लक्षात घ्या, नाहीतर जी काही छाटकभर इज्जत आणि विश्वासार्हता शिल्लक राहिली आहे तीपण गमावून बसाल.
*टीआरपी साठी देशाचे व समाजाचे नुकसान करू नका*
August 7, 2016
आपण जोवर सबुरीनें घेत आहोत, तोवर दहशतवादी ‘मऊ लागलें म्हणून कोपरानें खणणार’च ! . पण जर त्यांना दिसलें की आपण रिटॅलिएट करायला दृढसंकल्प आहोत, तर तें मोठें डिटरंट ठरेल. अशा वेळी, हा पत्रकार सबुरीनें घ्यायला सांगतो, हेंच अनाकलनीय आहे !
February 26, 2019
लाखोळी डाळीच्या विक्रीवर गेल्या 43 वर्षांपासून असलेली बंदी अखेर राज्य सरकारने संपुष्टात आणली. सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करावे की तब्बल 43 वर्षे चुकीचा निर्णय कायद्याच्या स्वरूपात लागू करून राबविल्याबद्दल सरकारला जाब विचारावा,असा प्रश्न पडला आहे. सरकार लोकनियुक्त असते.
July 4, 2004
परिसरातील सगळीच माणसं खूप चांगल्या स्वभावाची असतात, असा एक गोड गैरसमज करून घेऊन आपण स्वतःला घडवलं. तर त्यामुळे भांडण करणं आणि कुणाला पाण्यात पाहणं, उखाळ्या-पाखाळ्या काढणं हे आपल्या स्वधर्माच्या/स्वभावधर्माच्या विरुद्धच होऊन जातं.
December 8, 2019
आमच्या बॅंकेच्या लोन डिफॉल्टरच्या लिस्टवर दर तीन महिन्यानी सही करायचे काम फिल्ड ऑफिसर म्हणुन माझ्याकडेच आहे , सहसा मी या यादीवर नुसती नजर टाकतो , आणि सही करुन टाकतो . यात विशेष असे काहीच बघण्यासारखे नसते. ही लिस्ट आमच्या रिकव्हरी एजन्सीकडे जाते , आणि ती एजन्सी येन केन प्रकारेण लोनची रिकव्हरी करुन बॅंकेत भरते. याबद्दल काही पर्सेंटेज रिकव्हरी एजन्सीला मिळते . आज मात्र या यादीत गजानन बंडोपंत कुलकर्णी हे नाव बघुन माझा हात थबकला. या महाशयांनी तीन महिन्यांचा कार लोनचा हप्ता चुकवला होता .हे महाशय म्हणजे माझा परममित्र गजा . वर्षभरापुर्वीच हे कारलोन घेण्यासाठी मी गजाला मदत केली होती . तसे गजा आणि त्याची बायको स्नेहा चांगल्या नोकरीत आहेत . गजा इंजिनियरींग कॉलेजला प्रोफेसर आहे , तर बायको सॉफ्टवेअर ऍनालिस्ट . दोघांनाही अत्यंत चांगला पगार आहे. त्यावरच गजाने तीन वर्षापुर्वी साठ लाखांचे घर घेतले होते , आणि मागच्या वर्षी कारलोन घेऊन होंडा सिटी घेतली . तिचाच हप्ता आता थकला होता .कारण काही कळाले नव्हते . गजाची पण बर्याच दिवसात भेट नव्हती . संध्याकाळी मी गजाच्या घरी जायचे ठरवले , आणि त्या लिस्टवर सही केली . अर्थात त्या आधी गजाच्या नावापुढे फुली मारायला मी विसरलो नव्हतो . काही प्रतिष्ठित ग्राहकांना आमची बॅंक थोडा वेळ देते , आणि त्यांच्या अडचणीपण समजावुन घेते . फिल्ड ऑफिसर म्हणुन एवढा अधिकार माझ्याकडे आहे.
’ क्लाउड नाइन ‘ या गेटेड कम्युनिटीमधे गजाचे घर आहे. स्विमिंग पुलापासुन जॅकुजीपर्यंत सर्व सुविधा या अपार्टमेंटमधे आहेत. गाडी लावली आणि गजाच्या घराची बेल वाजवली . बागेकडे माझे लक्ष गेले , गजाने बागेत अत्यंत सुंदर झाडे लावली होती. मोगर्याचा फुलांचा घमघमाट सुटला होता. गजाने दार उघडले .
” अरे तू , ये बस बस . “ गजा लुंगी आणि बनियनवरच होता . कितीही मोठा झाला तरी माणसाच्या काही सवयी बदलत नाहीत .
” बर्याच दिवसात घरी आला नाहीस ? इकडे आलो होतो , म्हटलं जरा चक्कर टाकावी . कसा आहेस ? “
” मजेत . मधे तु काय आठ दिवस दिल्लीला होतास म्हणे . स्नेहा सांगत होती . तिची आणि वहिनींची मार्केटमधे भेट झाली होती. “
” हो , गौरी म्हणाली मला . ‘ कस्टमर सॅटिसफॅक्शनच ‘ ट्रेनिंग होतं दिल्लीला . नेमकं मला पाठवलं बॅंकेनी . तुला सांगतो गजा , या ट्रेनिंग म्हणजे नुसता वैताग बघ ! या एमबीए मुलांपेक्षा आपल्या शाळेतले शिक्षक बरे. ते रागवायचे , पण किमान त्यावेळेला त्यांच्या चेहेर्यावर रागवण्याचा अविर्भाव तरी असायचा . ही एमबीए मंडळी अत्यंत सुतकी चेहेर्याने प्रेझेंटेशन करतात . आपलच सॅटिसफॅक्शन होत नाही , कस्टमरचं काय होणार बोडख्याच ! ”
यावर मी आणि गजा खदाखदा हसलो.
” बरं काय घेणार चहा , की कॉफी ? “
” चहा चालेल .”
“ स्नेहा , दोन कप चहा टाक गं , सागर आलाय “.
मधुन जोरात भांडी आपटण्याचा आवाज आला , आणि नंतर चहासुध्दा गजाच जाउन घेउन आला , मी ओळखले , नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे . चहा पिला थोड्याफार गप्पा मारल्या , आणि मी निघालो. गेटचे दार लावताना गजाला विचारले ,
” गजा , इज एव्हरीथिंग ओके ? “
” सागर , एक्चुअली थोडा प्रॉब्लेम झालाय. ” गजाचा आवाज खोल गेला .
“ कॅन आय हेल्प यु ? “
” आपण उद्या दुपारी भेटु . मी बॅंकेत येतो “ . गजा म्हणाला .
” ओके . टेक केअर . “ मी गजाच्या खांद्यावर थोपटत म्हणालो.
दुसर्या दिवशी कामात लक्षच लागेना . दुपारची वाट बघत बसुन राहिलो . एक वाजता गजा आला .
” सागर आपण बाहेरच लंचलाच जाउ या . आर यु फ्री ? “
” या शुअर . जरा पाच मिनिट थांबतोस ? मी चाव्या साहेबांकडे देउन येतो. “
“ प्लीज कंटीन्यू .”
साहेबांना चाव्या दिल्या आणि बॅंकेसमोरच्याच एका चांगल्यापैकी हॉटेलात गेलो . ऑर्डर दिली .
” आता बोल गजा . काय प्रॉब्लेम ? “
” अरे एक्चुअली - काय झालय ? स्नेहाला त्यांच्या कंपनीने पिंक स्लिप दिलीये . “
“ मग ? “
” मग काय ? त्याचा अर्थ आपण रिझाइन करायच किंवा एक महिन्याने कंपनी आपल्याला काढुन टाकणार .”
” का ? “
” का काय बाबा, त्यांच्या कंपनीचे सर्व क्लायंटस युएसचे . त्यांच्याकडे आलय रिसेशन. त्याचा फटका बसतोय आम्हाला . “
” अरे पण एवढ काय त्यात ? “
” तुला कळणार नाही सागर , तु अजुन होमलोन घेतल नाहियेस ना , मी तीन वर्षांपुर्वी साठ लाखाच लोन काढुन घर घेतलय . त्याचा हप्ता मला पन्नास हजार येतोय . तो मी माझ्या पगारातुन भरतो. तोपण थोडाथोडका नाही वीस वर्ष भरायचाय . तो भरल्यानंतर दहा हजार रुपये उरतात . मागच्या वर्षी स्नेहाच्या सॅलरीवर कारलोन घेउन होंडासिटी घेतली. तिचा हप्ता वीस हजार रुपये जातो . तिच्या पगारातले पंधरा हजार उरतात , अशा पंचवीस हजारात आमचा महिना भागतो .”
” ओके .”
” तुला खरे वाटणार नाही , इतक्या वर्षांची सर्विस झाल्यावरपण पाच पैशाचीही सेव्हिंग माझ्याकडे नाही . सगळ काही क्रेडिटवर आहे . तुला माहित आहे , मागच्या तीन महिन्यापासुन कारलोनचा हप्ताही भरला नाहीये मी .”
मला ही गोष्ट माहित असल्याचे मी बोललो नाही . गजा अत्यंत भावनाविवश झाला होता .
” आणि आता या नविन लाइफस्टाइलची इतकी सवय झालीये , दर रविवारी कंपल्सरी मल्टीप्लेक्सला जातो , रविवारी घरी जेवण बनवत नाही , बाहेर साधं हॉटेल चालत नाही , थ्री स्टार लागतं , दरवर्षी हॉलिडेला जावच लागत , इव्हन सोनुलापण या सर्वांची सवय झालीये. माहितीये , काल शाळेत रिक्शातुन जा म्हणालो तर गेला नाही . गाडी नसेल तर शाळेत जाणार नाही म्हणाला . अजुन चार वर्षाचा झाला नाही आणि याचे नखरे बघा .”
” त्याच्यावर काय चिडतोयंस गजा ? ही सवय तुम्हीच लावली ना त्याला ? “
” होय रे बाबा , तेच चुकलेय . बर त्याचेच नाही , स्नेहाचेपण तसेच . महागड्या साड्या , मॉलमधे शॉपिंग , महागडी परफ्युम्स , आमच्या घरात ब्रॅंडेड वस्तुंना फार महत्व आलयं . सकाळच दुधपण साधं चालत नाही , ब्रॅंडेड लागतं .”
“गजा चिडु नकोस . हे बघ ,या सगळ्या सवयी तूच लावल्यांस ना त्याला . मग बदल . त्यात अवघड ते काय आहे ? “
” सागर ही वेळ तुझ्यावर आली नाहियेना , म्हणुन तु सल्ला देतोयस ,एकवेळ संपुर्ण माणुसच बदलणे शक्य आहे , पण त्याच्या सवयी , अशक्य ! “
” हे बघ, स्नेहाशी एकदा समोर बसुन बोल , तिला परिस्थितीची कल्पना दे . ती समजुतदार आहे , मला वाटतय ती समजावुन घेईल. “
“सगळे प्रकार झाले सागर , म्हणुनच मी म्हणालो ना , माणसाच्या सवयी बदलणे ,अशक्य ! ती बदलायला तयार नाही . मीच चुकलो , पुर्वी लहान घरात मी सुखी होतो , थोडाचा पैसा आला आणि मी वाहावत गेलो . या वर्षी ईन्क्रीमेंट मिळाले ,या एवढ्या गोष्टीवरच खुश राहिलो. पुढच्या आयुष्याचा काडीचाही विचार केला नाही , आणि स्वतःवर ही वेळ आणुन घेतली .”
“मला वाटतय , तु तिच्याशी एकदा मोकळेपणाने बोलावस . आणि सर्व परिस्थीती समजावुन सांगावीस . मी गजाच्या हातावर हात ठेवत म्हणालो .”
“ट्राय करतो .”
जेवण करुन गजा गेला . बिल देउन मी बॅंकेत आलो. फारफारतर दोन महिने मी गजाच्या कारलोनची रिकव्हरी थांबवू शकलो असतो. त्यानंतर मात्र काहीही माझ्या हातात नव्हते .
संध्याकाळी घरी आलो. फ्रेश झालो . पेपर हातात घेउन बसलो.गौरी म्हणाली
“उद्या आमीरचा थ्री इडियटस आयनॉक्सला लागतोय . मी तिकीट बुक करायला सांगितलीयेत . नंतर बाहेरच जेवण करुन घरी येउ.”
मी चरकलो .डोळ्यासमोर गजा उभा राहीला.
“माझा मुड नाहिये ग . आपण उद्या नको, पुढच्या आठवड्यात जाउ . एखाद्या आठवड्यात बाहेर पिक्चरला आणि जेवायला नाही गेलो तर काही बिघडत नाही .”
“ते काही नाही . मला शक्य नाही . मी उद्या स्वयंपाक करणार नाही . आणि रविवारी बाहेर जेवायला नेले नाही तर पिंटु रडुन गोंधळ घालतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा , मी जाणार म्हणजे जाणारच ..”
ताडताड पाय आपटत गौरी मधे निघुन गेली. मला गजाचे शब्द आठवले
‘ एकवेळ माणसेच बदलणे शक्य आहे पण त्यांना लागलेल्या सवयी ,अशक्य ! ‘
या बदलत्या जगाने माझेच घर कधी विळख्यात घेतले होते , माझे मलाच कळाले नव्हते !
-- निखिल मुदगलकर
March 26, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti