(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रश्न आणि ऊत्तर

    मन इतके चंचल आणि कोडगे असते की एकदा आलेला अनुभव किंवा अपमान विसरून जातो. परत तेच घडते तरी शहाणपण येत नाही. ते समर्थ आहेत प्रत्येक गोष्टीत कसे निभावून न्यायचे.

      December 24, 2021


  • कुटुंब नियोजन,सरकारी स्टाईल!

    शारीरिक स्वास्थ्याचा थेट संबंध आहार आणि आरोग्यविषयक सवयींशी आहे. आज आमच्या आहारात रासायनिक विषाचे प्रमाण
    इतके वाढले आहे की आजच्या पिढीची एकूणच शारीरिक क्षमता अगदी खालावत गेली आहे. आजारांचे, विकारांचे प्रमाण
    वाढले, रोगप्रतिकारक शत्त*ी कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या ‘पुरुषत्वावर’ आणि स्त्तियांच्या ‘मातृत्वावर’ झाला.

      June 8, 2008


  • कचर्‍यातून राष्ट्रनिर्मिती

    राखेतून फिनिक्स पक्ष्याचा जन्म होतो, असे म्हणतात. मात्र कचऱ्यातून एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते किंवा एखाद्या राष्ट्राचा उकीरडाही होऊ शकतो. आज भारतात अशीच परिस्थिती आहे.

      June 20, 2004


  • रक्षाबंधन व सामाजिक भान

    *मी अत्यंत भाग्यशाली आहे की मला अश्या भूमीत जन्म लाभला ज्या भूमीत बहिणींचे, स्त्रियांचे रक्षण** *करण्यास वचनबद्ध होण्यासाठी संपूर्ण एका दिवसाचा उत्सव साजरा केला जातो*.. *स्त्रियांना इतका मान-सन्मान देणारा संपूर्ण विश्वात भारत हाच एकमेव देश आणि हिंदू हाच एकमेव धर्म आहे. अर्थात काही नराधम आपल्या या संस्कृतीला गालबोट लागेल अशी कृत्ये करत असतात. आणि याला कमी अधिक प्रमाणात आपली चित्रपट सृष्टी कारणीभूत आहे. नेमके* *रक्षाबंधांच्याच दिवशी बहिणीवर होणारे अत्याचार तर कित्येक चित्रपटात चित्रित केले गेलेत. शिवाय शासनाची निष्क्रियता अश्या वासनांध नराधमांना जास्तच खतपाणी घालत असते. अन्यथा ज्या पवित्र भूमीत खास स्त्रियांसाठी सण,उत्सव साजरे केले जातात त्या भूमीत या गोष्टी घडल्याच नसत्या*..

    असो...

    *आज हा बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण भर हिंदुस्थानात साजरा होतोय.. आजच्या या पवित्र दिनी आपण सारे भाऊ मिळून शपथ घेऊ या की या देशातील प्रत्येक स्त्रिचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असेल. लव्ह जिहाद, धर्मांतरण या सारख्या विळख्यात अडकणाऱ्या प्रत्येक मुलीला,स्त्रीला आपलीच बहीण समजून तिला या विळख्यातून बाहेर काढण्याची शपथ आज घेऊ या.. त्या साठी ती या विळख्यात कशी अडकणार नाही या साठी तिचे प्रबोधन करू या. शाळा कॉलेज, नाते संबंधात, शेजारी-पाजारी, कार्यालयातील स्त्रियांना या विषयी जागृत करू या*..

    *आजची स्त्री खरे तर अबला नाहीच*. *ती खमकी आहे. शूर आहे. समजदार आहे*. *तडफदार आहे. कर्तबगार आहे. अश्या भगिनींना सोबत घेऊन इतर सर्व भगिनींना जागृत करू या*.

    *भाऊ बहिणीच्या या हिंदूंच्याच आणि हिंदुस्तानच्याच असणाऱ्या या पवित्र उत्सवाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा*...

    || जय हिंदूराष्ट्र ||

    *इवल्या इवल्या हाताने माझ्या राखी तुला बांधेल* !!
    *दादा दादा म्हणत तुझ्या मागे मी फिरेन* !!
    *गोड गोड खाऊ मी माझ्या हाताने तुला भरवेन* !!
    *आपल्या या नात्याला नव आयुष्य लाभेल* !!
    *या साठी दादा मला येऊ दे* !!
    *आई ला तू सांग ना मला जग पाहू दे*!!
    *केवळ परंपरेचा भाग म्हणून रक्षाबंधन साजरे करू नका* !!
    *तूमच्या मूलांच्या बहिणींना गर्भातच मारू नका*!!
    *कला सूसंगत परंपरांना आमचे नेहमीच वंदन आह*े !!
    *गर्भातल्या लेकी-बहिणी वाचवणे हेच आमूचे खरे रक्षाबंधन आहे* !!

      August 18, 2016


  • हिंदू राष्ट्राच्या ध्वजाला विनम्र अभिवादन 

    हिंदू राष्ट्राच्या वैभवशाली ध्वजा तुला विनम्र अभिवादन! कारण तू आमच्या अनेक शब्दातील भावनांची स्फुर्ती आहेस. तू आमच्या अनेक अव्यक्‍त कल्पनांची मुर्ती आहेस. आमच्या सहस्त्रावधी अस्फुट आकांक्षांची प्रतिकृती म्हणजे तुझे स्वरुप होय. या स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिनी तुझ्यासमोर नतमस्तक होताना आमच्या हृदयात अनेक भावनांचे तरंग गर्दी करुन सोडीत आहेत.

      August 15, 2006


  • मायेचा पाश!

    आपल्या देशाच्या लोकसंख्येने शंभर कोटीचा आकडा केव्हाच पार केला आहे. ही वाढती लोकसंख्या सरकारला संकट वाटत आहे. एका दृष्टीने पाहिले तर ते संकटच आहे.

      July 1, 2005


  • स्वच्छता

    स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण.

    साधी गोष्ट असते बसमधून उतरल्यावर लगेच तिकीट तेथे फेकणे. चणे-दाणे खाऊन कागद रस्त्यातच फेकणे. सिगारेट-विडी ओढून ती थोटके रस्त्यात फेकणे, वरच्या मजल्यावरून केसांचा गुंता टाकणे. अशा तऱ्हेने काम झाल्यावर त्या वस्तू निरुपयोगी होतात म्हणून त्या रस्त्यात फेकून जणूं तुम्ही तुमच्या अस्वच्छतेचा दाखलाच देत असता.

    आता आपण पाहतो, ४/५ मजली इमारती असतात. या आमच्या अशिक्षितच काय, पण सुशिक्षित बायकाही वरच्या मजल्यावरून केर खाली टाकतात. सकाळी फिरायला जाताना बघावे, गॅलऱ्या धुणे चालते. यातून आपला बचाव करत चालावे लागते. वरून खरकटे पाणी अंगावर कधी पडेल ते सांगता येत नाही. तुम्ही त्यांना काही बोलाल तर म्हणतात; त्यातले कण चिमण्या, उंदीर खातील. तुम्ही कशाला काळजी करता?

    अहो, परवा येथे थुंकू नका; येथे केर टाकू नका. अशी पाटी लावली होती, अहो, परवा येथे थुंकू नका; येथे केर टाकू नका. अशी पाटी लावली होती, पण आमचे चांगले सुशिक्षित गृहस्थ त्या पाटीवर थुंकून तिलाच रंगवून पुढे गेले. बायका पिशवीत किंवा कागदात केर भरत नाहीत. अंडी, मासळी इ. सर्व केर रस्त्यात टाकतात. त्यावर माशा बसतात. उंदीर, घुशी, कुत्री यांचा सुळसुळाट होतो. त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरून हवा दूषित होते.

    आमच्या भागात पोलीस कॉलनी आहे. येथे नेहमी पोलिसांच्या गाड्या उभ्या असतात. त्यांनी स्वच्छतेचे धडे लोकांना द्यावे असे म्हणावे तर हेच गाडीत बसून पान खाऊन रस्त्यावर थुंकत असतात. रस्त्यात पाण्याची बाटली घेऊन तोंड धुतात. तुम्हीच सांगा, ज्यांना स्वतःला शिस्त नाही ते दुसऱ्याला शिस्त काय लावणार?

    सर्वच पोलीस वाईट नसतात, त्यांतही काही आदर्श भेटतात. मध्यंतरी डोंबिवलीत राहणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर रूपाली आंबोरे यांनी स्वतःच्या बिल्डिंगचा आजूबाजूचा परिसर साफ करायला हातात झाडू घेतलेला पाहून थोरामोठ्यांनी हातात झाडू घेऊन ह्या स्वच्छतेत भाग घेतला. आता दर रविवारी सर्व जण स्वच्छता करून आपला परिसर स्वच्छ ठेवून मन प्रसन्न ठेवीत आहेत.

    अशा वेळी गाडगे महाराजांना आणि म. गांधींना विसरून चालणार नाही. स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते, संडाससुद्धा साफ करून लोकांना स्वच्छतेचे धडे दिले. आपल्या पंतप्रधानांनी स्वच्छता अभियान सुरू केले. स्वतः हातात झाडू घेऊन आपला परिसर साफ केला. बरेच मोठमोठे लोक त्यात सामील झाले. काही ठिकाणी स्वच्छता मोहिमेसाठी कोणी नेते येणार म्हटले की, आधीच स्वच्छता करून ठेवली जाते. २/४ कागद ठेवले जातात. चला, फोटो काढून पेपरात आला हे महत्त्वाचे.

    स्वच्छता राखण्यासाठी दर वेळी सांगितले जाते की ओला कचरा, सुका कचरा बाजूला ठेवा; पण किती जण असे करतात? काही गावांमध्ये कचरा न्यायला गाडी येते. घंटेचा टण् टण् आवाज आला की ताबडतोब लोक हातात कचऱ्याच्या बॅगा-डबे घेऊन तेथे हजर राहून कचरा गाडीत टाकतात. नोकरीवाले लोक कचऱ्याच्या बॅगा खाली आणून ठेवतात. तेव्हा तो गाडीतून नेला जातो. त्यामुळे ही गावे बरीच स्वच्छ दिसतात. बागेत, नाट्य-सिनेमागृहाबाहेर व काही रस्त्यावर 'माझा खाऊ मला द्या' असे लिहिलेले विशिष्ट आकाराचे डबे ठेवलेले असतात. त्यामुळे बरेच लोक त्यांत केर टाकून आपण शिस्तशीर आहोत असे दाखवतात. काही बायका रेल्वेच्या डब्यात कधी चॉकलेट, कधी फळं खातात, भाज्या निवडतात; पण तो केर प्लास्टिक पिशवीत साठवून केराच्या टोपलीत टाकतात. आता तर बगीचे, समुद्रकिनारे साफ राखण्यासाठी रोबोचा उपयोग केला जाणार आहे. अशा तऱ्हेने स्वच्छता दिसली तर आपली मान गर्वाने उंचावेल.

    अशा ह्या कचऱ्यामुळे रस्त्यातून कुत्री, मांजर, उंदीर, घुशी हिंडू लागले. त्यातून हल्ली प्लास्टिक पिशव्यांनी तर कहरच केला आहे. गटारे तुंबू लागली, ठिकठिकाणी पिशव्यांचे ढीग दिसू लागले. अशा अस्वच्छतेअभावी स्वाइन फ्ल्यू, मलेरिया, टायफाइड, काविळीसारखे महाभयंकर रोग होऊ लागले. आपल्या नद्या पाहा, सतत गाळाने भरलेल्या. त्यांत गिरण्यांमधून रासायनिक पदार्थ टाकले जातात. गणपती विसर्जनावेळी नदी, विहीर, समुद्रात विसर्जन करून पाणी दूषित केले जाते. नाट्यगृह, सिनेमागृहात खाद्यपदार्थ नेऊन तेथे सांडले की तेथे उंदीर व डासांची पैदास होते. मंदिरात देवावर दूध घालतात. स्वच्छतेअभावी दूध नासून हवा दूषित होते. अशी कितीतरी उदाहरणे द्यावी तेवढी थोडी आहेत.

    ही इतर स्वच्छता झाली. त्याबरोबर शारीरिक व मानसिक स्वच्छतेकडे पण लक्ष ठेवले पाहिजे. लहान मुलांना भूक नसताना बळे-बळे खायला घालणे. अखेर तो ओकला तर नीट न पुसणे. सगळ्या माशा तेथेच काय, मुलांच्या अंगावरही घोंगावत असतात. इतर पदार्थावर बसतात. आता मुले बाहेरून खेळून आली की हातपाय धुणे, रोज आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, बाहेरचे कपडे घरी आल्यावर बदलणे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन मुलांना घरीच स्वच्छतेचे धडे देऊन तिचे फायदे सांगितले पाहिजेत. म्हणजे औषधाला दूर ठेवले जाईल म्हणूनच म्हटलं आहे, स्वच्छता म्हणजे मेकअप करून अथवा परफ्युम लावून स्वच्छ होणे नव्हे.

    शरीराबरोबर मनाचीही स्वच्छता पाहिजे. खेळ म्हटले की, कोणीतरी जिंकणार; कोणीतरी हरणार. हारही स्वीकारायची तयारी पाहिजे. परीक्षेत गुण कमी मिळाले तर आपण कोठे चुकतो याचा विचार करावा. लोकांबद्दल वाईट विचार मनात येऊ देऊ नये. शिंक आली, खोकला आला तर रुमाल समोर धरावा. आपले मन स्वच्छ असेल तर वाईट विचार कधीच मनात येणार नाहीत.

    दुसऱ्या देशात गेल्यावर तिथली स्वच्छता बघितली की आपल्या देशाची लाज वाटते. तेथे दंड केला जातो. त्यामुळे लोक आपोआप सुधारले आहेत. त्यांच्याकडे स्वच्छता अभियान, स्वच्छता मोहीम असे शब्द वापरावे लागत नाहीत. आपल्याकडे दक्षिणेत गेले तर देवळे किती स्वच्छ असतात. मी पाँडेचेरीला गेले होते तेथील ऋषितुल्य, अरविंदबाबू आश्रम खूपच स्वच्छ होता. हे पाहून असे म्हणावेसे वाटते 'स्वच्छता द्यावी सदा मनाची, आरोग्य लाभो सदा शांतिसुखाचे.'

    शेखर आगासकर

      November 20, 2023


  • बंध : निशब्द भावना

    ‘नाती’ एक छोटासा शब्द. पण त्यात जगातला प्रत्येक माणूस सामावला जातो. आयुष्यात आल्यावर माणसाला प्रत्येक गोष्ट कळते अगदी माया, ममता, समता आणि बंधुता सुद्धा कळते. कोणत्याही नात्याच्या गाठी ह्या आधीपासूनच बांधलेल्या असतात. रक्ताने बांधला जाणारा कदाचित एखादाच असतो, पण मैत्री आणि प्रेम या दोन धाग्याने गुंफला जाणारा वर्ग मात्र मोठा असतो.

      August 21, 2019


  • प्रत्येक बाबतीत राजकारण : अरे, काय चाललंय् काय !

    महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी असें म्हटलें आहे की ते पूर्वी ‘संघा’चे स्वयंसेवक होते. या कारणावरून म्हणे, विरोधी पक्ष त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार आहे. अहो, बहिष्कार टाकायचाच असेल तर ज़रा चांगलें कारण तरी शोधा !

      February 26, 2019


  • सौंदर्य

    सौंदर्य कशात नाही, या भुतलावरील प्रत्येक व्यक्ती प्राणी, निसर्ग या प्रत्येक ठिकाणी सौंदर्य ओतप्रोत भरले आहे फक्त तुमच्याकडे ते सौंदर्य ओळखण्याची नजर असली पाहिजे. लहान बाळाच्या प्रत्येक हालचाली मधे सौंदर्य असते ते आपण सुध्दा अनुभवू शकतो फक्त त्या साठी आपल्याला त्याच्या आईची नजर असली पाहिजे. तिच्या नजरेतून जर आपण पाहिले तर आपल्याला त्या लहान बाळात सौंदर्य दिसून येईल.

      September 17, 2018