(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहे हिम्मत आता चले जाव म्हणण्याची!

    या देशाला परकीय आक्रमणांची तशी नवलाई नाही. अगदी शक, हुणांपासून ते इंठाजांपर्यंत ही परंपरा चालत आली आहे. त्यापैकी अनेक आक्रमक नंतर इथलेच होऊन राहिले.

      February 17, 2008


  • छत्रपतींच्या नावावर “अशाप्रकारे” कोटींच्या कोटी उड्डाणे नकोत.

    छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत व इथून पुढच्या काळात येत ही राहतील. पूर्वीच्या काळी पुस्तके, कादंबऱ्या, व्याख्याने ह्या माध्यमांद्वारे छत्रपती घराघरात पोहचवले गेलेत परंतु जसा काळ बदलला तशी ही माध्यमे देखील बदललीत, सध्या चित्रपट, वेब सिरीज, इंटरनेट या माध्यमांद्वारे छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित बरेच सिनेमे व मालिका आल्यात व घराघरात लोकप्रिय देखील झाल्यात.

    छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानातील असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान व तसेच भावनिक विषय आहे, त्याचमुळे छत्रपतींवरील आधारित चित्रपट हे तिकीट बारीवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास साऱ्या जगभरात पोहोचत असला तरी, ज्यांनी महाराजांचा इतिहास वाचला आहे त्यांना हे असे सिनेमे पाहताना अनेक गोष्टी खटकतात किंवा खटकू शकतात. सत्यघटनेवर बेतलेल्या या सिनेमांना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं योग्य आहे का हा मूळ मुद्दा आहे. कोणताही चित्रपट तयार करताना सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला तर त्यात काही गैर नाही, पण याच लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शक सत्य घटना, त्याची मांडणी कशी काय बदलू शकतो हाही प्रश्न पडतो.

    सध्या युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घेऊन पुढे येऊ घातलेल्या काही छत्रपती वरील आधारित चित्रपटावर काही गंभीर आक्षेप घेतलेत व माझ्या लेखी ते योग्य देखील आहेत. इतिहासावर कोण्या एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. त्यामुळे चित्रपटांच्या निमितानं पडद्यावर इतिहास जिवंत होणार असेल, तर चांगलंच आहे. परंतु, हा इतिहास सिनेमात मांडताना मूळ इतिहास दिग्दर्शक, लेखकानं जपणं महत्त्वाचं आहे. परंतु कोटींच्या कोटी उड्डाने घेण्यासाठी इतिहासात नसलेल्या गोष्टी किंवा आहेत त्या खूपच अतिरंजित करून अशा चित्रपटात दाखविल्या जातात. आपल्या इतिहासात भरपूर नाट्यमय घटना आहेत; त्यामुळे आपण त्यात आणखी चार गोष्टी घालून, त्याचा अतिरेक करण्याची गरज नाही. इतिहास हा आपल्यासाठी केवळ विषय नाही, तर भावभावनांशी जोडलेला आणि जगण्याचा मूळ पाया आहे. सध्याचे महाराष्ट्र सरकार व मा. राजसाहेब ठाकरे या सर्व चित्रपट सृष्टीच्या मागे भक्कम पणे उभे आहेत हे बऱ्याचदा दिसून आले आहे व ही खूपच उत्साहवर्धक बाब आहे, परंतु त्यांनी देखील या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहेत.

    माझं तर मत असे आहे की, हे दिग्दर्शक आणि निर्माते छत्रपती वर आधारित चित्रपटातून कोटींच्या कोटी कमावणार असतील तर त्यांनी खर्च व अपेक्षित फायदा झाल्यानंतर उरलेली रक्कम हे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी द्यावेत. आपण सर्व जन जाणतोच की छत्रपती हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतो व ती केलीच पाहिजे आणि चित्रपट सुपरहिट होतात, परंतु सध्या दिग्दर्शक आणि निर्मात्यानी छत्रपतींचे विषय हाती घेऊन चित्रपट बनवून पैसे कमावण्याचे सोपे माध्यम तर केले नाहीय ना अशी शंका घेण्यास वाव आहे.

    शेवटी एकच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज ही एक भावना आहे. ती "जपा" आणि "टिकवा". महाराष्ट्र धर्म घडवा...

    -- श्री. राहुल अविनाश कळंके
    वैजापूर, जि. संभाजीनगर

      November 7, 2022


  • विषाणू हटवा जिवाणू वाढवा

    सध्या पावसाळा सुरू आहे. डॉक्टर मंडळींच्या भरभराटीचा हा मोसम असल्याचे गंमतीने म्हटले जाते. अर्थात ते सत्यही आहे.

      July 15, 2007


  • आईला अग्नी द्या. पैसे पाठवतो

    माणूस जीवनभर धावपळ करतो, अमाप कष्ट करतो. खूप काही सोसतो. कशासाठी, तर शेवटचा दिवस गोड व्हावा !!
    अंतिम विसावा घेताना सगळ्यांची सोबत असावी, मनात समाधान असावं.
    पण धावपळ इतकी तीव्र झाली आहे की विसावा राहिलाच नाही. अंतिम विसाव्यालाही वेळ देता येत नाही. शेवटचा क्षण आला की नाही, हे पाहायलाही वेळ नाही.
    एकदा पाली ते खोपोली प्रवास करत होतो. अचानक बस पंक्चर झाली. ड्राइवर साहेबांनी आंबा नदीच्या पुलावर बस उभी केली आणि सर्वाना खाली उतरवलं. आसपास दाट झाडी होती. आंबे, गुलमोहर, मुरबाडी साग उभे होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. लक्ष वेधून घेत होती ती फक्त एक पाटी- कृष्ण वृद्धाश्रम !
    विचार केला, आपण खूप काही पाहायला जातो. हिमालय, सागर किनारे, वने, डोंगररांगा पाहायला निघतो, पण वृद्धाश्रम पाहायला कधी जात नाही.
    आज तोही पाहू.

      March 17, 2026


  • सावधान, श्रीकृष्ण जिवंत आहे.

    कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!

      August 19, 2025


  • मी येतोय… ५ सप्टेंबरला !!

    विज्या मी येतोय 5 सप्टेंबरला, या वेळेला जय्यत तयारी करशील, 10 दिवस रेलचेल राहिली पाहिजे, साल्या कुठेही काही कमी पडले असे व्हायला नको म्हणून हि आगाऊ सूचना.

    च्यायला, इकडे येण्यासाठी जीव कासावीस होत असतो, वर्षातील 355 दिवस मी कसे काढतो, माझे मलाच ठाऊक. बेचव, रटाळ या शिवाय दुसरे कुठलेच शब्द इकडच्या जीवनाला योग्य नाहीत. आमच्या जगात वर्षभर फार फार तर पंचवीस तीस लोकांचा सहवास, इथे मात्र 10 दिवस लोकांची मला भेटण्यासाठी नुसती झुंबड लागलेली असते. मज्जा म्हणजे काय ते फक्त या 10 दिवसात मला अनुभवायला मिळते.

    सर्वात महत्वाचे आमचे पिताश्री, व माय या दिवसात माझ्याकडे ढुंकूनही पहात नाहीत! काय पाहणार, जे दरवर्षी चालते तेच या वर्षी पण होणार.

    या वर्षी किती हप्ता गोळा केलास?, त्याची आकडेवारी दे, त्यात कट मारलेला मला चालणार नाही, धमकी वजा सूचना आली. मी कोणताच हिशोब कधीच दिला नाही, तरी याला कसे माझे कटींग किती आहे हे समजले ! आमच्या सानिध्यात राहून भलताच बेरकी झाला आहे. आता विचार करावाच लागेल, पार्टी बदलायचा, लवकरच याला बदलून नवीन कुणाची वर्णी लाऊन त्याच्या जीवावर मौज करायची, असा विचार मनात आला. याला डोईजड बनवून चालणार नाही, कारण आम्ही एकतर याच्या येण्याच्या आधी महिनाभर वसुलीला लागतो, त्यासाठी धमक्या द्याव्या लागतात, वेळ प्रसंगी जे शानपट्टी करतात त्यांना हाडांवर नंबर टाकून ठेवा, डाक्टरला जोडताना त्रास नको, असा पंटर मार्फत निरोप द्यावा लागतो, इतके करून बाचाबाची ( बा चा व बा ची) होतेच. हिशोब मागणे, हे मात्र जरा अतीच झाले.

    या वर्षी स्वारी जरा, जास्तच रंगात आली असे दिसते, चक्क म्हणाला, या वेळेस मी सर्व म्हणजे सर्व कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणार आहे. तुम्ही लोक माझ्या नावावर वसुली करता, मज्जा करता, मी काय नुसते पहात राहू?

    पूर्ण दहादिवस मी तुमच्यातील एक म्हणून राहणार आहे, जो गल्ला इथे गोळा होईल, त्यावर माझी करडी नजर राहील. दररोज रात्री समोरचा पडदा पडला की, स्टेज मागे आपली बैठक झालीच पाहिजे. या वेळेस ब्रँड चांगले हवेत, घेतल्यानंतर वास नको म्हणून भरपूर अगरबत्या लाऊन ठेवा. भाविकांचा प्रसाद मी चकणा म्हणून खाणार नाही, सांगून ठेवतो. काजू, बदाम, पिस्ता, जर्दाळू, हेच पाहिजेत, नाहीतर आणाल मसाला शेंगदाणे, बटाटा चिप्स, आणि फारसाण.

    या वर्षी पत्त्यांचे डाव मांडायचेच, मागीलवर्षी पैशावरून बराच वाद झाला, तसा या वर्षी होणार नाही याची दक्षता घे. रमी, तीनपत्ती, झालीच पाहिजे, मी यात सामील होणार नाही, कारण सर्व डाव मीच जिंकणार हे त्रिवार सत्य आहे, आणि काय सांगावे, तुमचा तो पप्या, बाल्या, बंटी, दादा लोक माझ्या पोटाला चाकू लाऊन शेवटच्या दिवशी मी मिळवलेले सर्व घेऊन पसार होतील. बाकी तुमचे हे चलन आमच्या राज्यात चालत नाही, आणि बदलून पण मिळत नाही, त्यामुळे तुमचा तमाशा पाहण्याचाच मी आनंद घेतो.

    यावर्षी मला निरोप देताना कोणती गाणी लावणार, जरा यादी देशील, डीजे जोरदार झाला पाहिजे सांगून ठेवतो, आर्ची परश्या ला बोलावशील, सैराटचा धुडगूस केलास तर गर्दी वाढेल, वसुलीतील सर्व अडका इथेच खर्च होउदे, नाहीतर त्या साक्षी- सिंधू सारख्याचे पोस्टर लाऊन बेरंग करशील. भाजनांचा, किर्तनांचा तर मला अगदी वीट आला आहे. वाजले कि बारा, चोली के पीछे, चुम्मा दे अशी गाणीच लावायची.

    आणि काय रे तुझ्या डोक्यात नसते विचार येऊ लागले आहेत, पोरीबाळी साठी वेगळ्या रांगा म्हणे, अरे येड्या, पोर उनाड असतातच, जरा मुलींची छेड काढली, गर्दीचा फायदा घेऊन, त्यांना हात लावला तर इतकं मनावर घ्यायचे नसते. अचकट विचकट हाव भाव करू देत, काही फरक पडत नाही, जरा नशापाणी केल्यावर असं होतेच, आदर्शवाद मी गेल्यानंतर.

    स्वच्छ पाण्याची मला ऍलर्जी आहे, दर वर्षी तुम्ही लोक मला गटारी सारख्या निर्मळ पाण्यात बुडवता, आता त्याचीच सवय झाली आहे. पर्यावरण वाद्यांचा आयचा घो, खूप माजले आहेत, प्रत्येक सणात काहीतरी दोष काढतातच, म्हणे मला पाण्यात बुडवल्याने मासे मरतात, अरे या विश्वाचा कर्ता करविता मीच आहे, दहा पंधरा हजार मासे मेले तर काय मोठा फरक पडणार आहे? तुम्ही सर्व कायदे झुगारून मला तलावात, नदीत, समुद्रात टाकाच.

    दुसऱ्या दिवशी मी हात पाय मोडलेल्या, तुटलेल्या अवस्थेत तीरावर, पडलेला दिसणार आहे, असुदे. सफाई कामगार मग माझे तुकडे त्यांच्या कचऱ्याच्या गाडीत भरून, घेऊन जातील, आणि गावाच्या बाहेर फेकतील. तसेही आपला धर्म सांगतोच, आत्मा गेल्यावर शरीर नश्वर आहेच, ते नष्ट करायलाच पाहिजे. पण थोडा हा पण विचार करा, तुम्हालाही मेल्यानंतर असेच कचऱ्यात टाकून दिलेले आवडेल का? कुत्री, मांजरे तुमच्या देहाचे लचके तोडतील तर तुमच्या घरच्यांना त्याचे काही दुःख होणार नाही, असे मी समजायचे का? माझी जी अवस्था तुम्ही करताय, तशीच तुमची नको का व्हायला?

    माझ्या उंचीवर बंधने आणणारे, उपदेश देणारे यांना मात्र उलटे टांगून मिरचीची धुरी द्या, या वर्षी माझी उंची किमान 30 फूट असली पाहिजे, आणि हो, वीज आकडा टाकून घ्यायची, वर्गणीतील पैशाने विजेचे बिल भरशील तर मी मुळीच खपवून घेणार नाही.

    तो लोकमान्य उर्फ केशव (बाळ) गंगाधर टिळक, त्याचा तिकडे गेल्यावर चांगलाच समाचार घेतो, लोकांना उगीचच आदर्शवाद, देशाभिमान, सुसंस्कृत, असले सुतकी विचार सुचवण्याचा, तसेच त्यांना सुधरवण्याचे, त्यांचे दुःसाहस यासाठी त्यांना चांगला धडा शिकवतो.

    -- विजय लिमये
    (9326040204)

      September 3, 2016


  • शहाणे व्हा!

    पावसाळ्याची चाहूल लागताच निसर्गात बदल दिसू लागतात. गेल्या काही वर्षात मृगासहित पावसाच्या साऱ्याच नक्षत्रांची महाराष्ट्रावर आणि त्यातही विशेषत: विदर्भ-मराठवाड्यावर अवकृपा झाली असली तरी यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, या वेड्या आशेवर बळीराजा पेरणीपूर्व कामाला दरवर्षी उत्साहाने सुरुवात करतो. जुन्या कर्जासोबतच गेल्या हंगामातले कर्जाचे ओझेही पाठीवर असतेच.

      May 29, 2005


  • शिक्षणातील क्रांतीचं पाऊल: ग्राममंगल

    कोणत्याही नवीन शैक्षणिक धोरणाची खूप चर्चा होते, त्याच्यावर लेख छापून येतात; पण आपल्या मुलांना कशां प्रकारचं शिक्षण कसं, केव्हा, कधी, कुठे द्यायचं याबाबतीत स्वातंत्र्य कुठे आहे? बहुतेक पालक शिक्षणप्रक्रियेबद्दल अनभिज्ञ असतात. मुलांना फक्त शाळेत घातलं की झालं, पालकांनी नुसती प्रगतीपुस्तकावर सही करणं आता अपेक्षित नाही. मुलं किती शिकली, काय शिकली, केव्हा शिकली हे पाहाणे आवश्यक झालं आहे. कोविडने ऑनलाईन, ऑफलाईन दोन रस्ते ठरवून दिले. दोन्हीचे टोल वेगवेगळे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. ज्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही, असले तरी ते वापरायचं ज्ञान नाही, त्यातही तंत्रज्ञानाला नेट नसेल तर ते धूळ खात पडतं आणि ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.

      July 4, 2026


  • नकारात्मक विचारांची चांगली माणसं !!!

    “नकारात्मक विचारांची माणसं मला आवडतात” हे वाक्य वाचून जर तुम्हाला मी विचित्र/विक्षिप्त वाटलो तर थोडं थांबा…… आता असा विचार करा, नकारात्मक विचारांचा सुद्धा कित्ती सकारात्मक पद्धतीने विचार केलाय या अवलीयाने…..

      September 10, 2018


  • विद्रोहाकडून विध्वंसाकडे!

    एकीकडे नक्षल्यांचे हल्ले यशस्वी होत असताना सरकारदेखील आपली नेहमीची सुरावट बदलायला तयार नाही. आम्ही नक्षल्यांचा कडक बंदोबस्त करू, मतदारांनी त्यांच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही, असे भरीव आश्वासन देणे सुरूच आहे. खरेतर सरकार आणि नक्षल्यांमध्ये सुरू असलेल्या या खेळात विनाकारण बळी जातो तो गरीब आदिवासींचा.

      October 11, 2009