आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला ते जगता यायला हवं. केवळ जगणं महत्त्वाचं नाही तर जगताना आस्वाद घेता यायला हवा. जगायला जनावरं सुद्धा जगतात पण आपल्या जगण्यात एखादी गोष्ट नीट समजून घेतली तर आनंदामध्ये कित्येक पटीने वाढ होते. केवळ गुणांची टक्केवारी करिअर, मोबाईल टास्क असल्या गोष्टीमुळे सगळ्यांचे गुंतणं वाढलं आहे इतकं की स्वतःचे भान त्यांना राहत नाही. होण्यासाठी व आनंद घेण्यासाठी स्वतःचे भान हवंच. स्वतःचं आयुष्य संपवण्या इतपत भान हरवलं तर आयुष्य आनंदी व सुंदर कसं लागेल..
June 9, 2026
मंडळी नमस्कार ....
आम्ही सांगितल्या प्रमाणे एक नविन ऊपक्रम सुरु करत आहोत... या ऊपक्रमात प्रत्येक परिवाराचा व परिवारातील प्रत्येकजणांचा सहभाग व्हावा हीच आमची मनापासुन नम्रपणे विनंती....
या ऊपक्रमाचे नाव आहे....
" एक बाटलीभर पाणी.... एका झाडासाठी...."
" One Bottle Water..... For one Tree ......"
मंडळींनौ... या ऊपक्रमात तुम्हाला तुमच्या घराच्या आजुबाजुला .... कार्यालयाच्या आजुबाजुला... व जाता... येता.... असलेल्या कोणत्याही लहान मोठ्या झाडांना किमान 2.5 लिटर च्या बाटलीने पाणी घालायचे आहे... थोड अजबच वाटेल... पण पहाना... आपल्या अवती भवती असलेल्या झाडांना जर भरपुर पाणी या ऊन्हाळ्यात मिळालच तर ही नामशेष होत चाललेली वृक्ष संपदा टीकुन राहीलच आणि आपल्या मार्फत होणाऱ्या प्रदुषणाच्या मोबदल्यात प्रत्येक झाड किमान बाटलीभर मिळालेल्या पाण्याने नक्कीच आपले प्रदुषण सोसुन भरभरून आपल्याला अगदी मोठ्या प्रमाणावर "स्वच्छ प्राणवायु" नक्कीच देईल... आपल्या सहकार्याने जर प्रत्येक वृक्षाला दररोज पाणी मिळाले तर येणाऱ्या पावसाळ्यात नक्कीच भरपुर पाऊस पडुन आपल्याच शेतकरी बांधवांना याचा मोबदला मिळेलच...
आपण आता हा ऊपक्रम हळुहळु वाढवण्यास प्रारंभ करुच.... व तुम्ही ईतरांनाही या ऊपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करावे... हीच मनापासुन नम्र व कळकळीची विनंती...... बळजबरी अजिबात नाहीच... पण हक्काची हाक....
आपले वृक्षमित्र.....
-- विवेक जोशी
अवधुत कुलकर्णी
March 10, 2016
आपल्या देशात हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढू लागलयं हा कित्येकांसाठी चिंतनाचा आणि चिंतेचा विषय ठरू लागलेला आहे.
आपल्या देशातील हे वाढतं घटस्फोटाचं प्रमाण दिवसेन- दिवस वाढतच जाणार आहे त्यामुळे भविष्यात आपल्या देशातील घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल या भ्रमात कोणीच राहाता कामा नये आणि ते प्रमाण कमी व्हाव म्ह्णून प्रयत्न करणे म्ह्णजे उंठावरून शेळ्या हाकण्यासारखे आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणामुळे भविष्यात उद्भवणार्या समस्यांना सामोर जाण्यासाठी समाजाची मानसिकता तयार व्हायला हवी.
प्रेमविवाहाचं वाढत प्रमाण आणि घटस्फोटाचं वाढत प्रमाण याचा परस्पराशी काहीही संबंध नाही तो संबंध विनाकारणच लावला जातो. स्त्री-परुष समानतेच वारं, स्त्रियांची झालेली सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती, पुरुषांची ढासळती नैतिकता, समाजातील वाढता स्वैराचार आणि होत चाललेला सांस्कृतिक र्हास या वाढत्या घटस्फोटाच्या मुळाशी आहे. आज आपल्या देशात घटस्फोट रोखण्यासाठी जो काही आटा - पिटा केला जातोय तो निरर्थकच म्हणावा लागेल.
आज आपल्या देशात समलैंगिक विवाहांना, लिव्ह-ईनला जवळ – जवळ स्वीकारलं आहे ना मग तसचं आज ना उद्या घटस्फोटांनाही स्वीकारावं लागणारचं आहे. पूर्वीच्या काळी फक्त शरीर सुखासाठी लग्न होत नसतं पण आता ती फक्त शरीर सुखासाठीच होतात हे मान्यच करावं लागेल कारण आज आपल्या देशात होणार्या घटस्फोटासाठी जोडीदार शरीरसुख देण्यास असमर्थ अथवा त्याचे असणारे विवाह बाहय संबंध अथवा त्याची व्यसनाधिनता अशी कारणेच पुढे केली जातात. ही सर्व कारणे पूर्वी अस्तित्वात नव्हती का ? होती ना ? पण त्यावेळी सामाजिक दबावामुळे सहसा कोणी घटस्फोट घेण्याच्या भानगडीत पडत नसे आणि तेंव्हा पत्नी – पतीकडून घटस्फोट मागण्याचे प्रमाण कमी होते. आज जर नवर्याने बायकोला घटस्फोट दिला तर तिला अबला म्हटले जाते. आणि बायकोने नवर्याला घटस्फोट दिला तर त्याला नामर्द समजले जाते.
आज आपल्या देशात घटस्फोटाचं प्रमाण वाढतय त्याला स्त्री- पुरूष दोघेही सारखेच जबाबदार आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे. वाढत्या घटस्फोटाला फक्त पुरूषांनाच दोष नाही देता येणार. स्त्रियांच्या व्यसनाधिनतेच आणि ढासळत्या नैतिकतेच प्रमाण समाजात मोठ्या प्रमाण वाढू लागलेल आहे सध्या समाजात घडणार्या गुन्हयात स्त्रियांचा सहभाग दखल घेण्याजोगा दिसू लागला आहे. घटस्फोट हे प्रकरण हल्ली कित्येकांच्या जीवावरही बेतू लागलेलं आहे.
विवाहसंस्था ज्या उद्देशाने अस्थित्वात आलेली होती आता तो उद्देशच नाहिसा झालेला आहे. समर्पण, त्याग, विश्वास, नात्याशी बांधिलकी हया गोष्टी लग्न संस्थेतून हद्दपार झालेल्या आहेत. आज काही लग्न बरीच वर्षे टिकतात तेंव्हा लोकांना आश्चर्य वाटत पण ती लग्न खरोखरचं टिकलेली असतात की टिकवलेली असतात हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करतो का ? पुर्वी जेंव्हा संस्कार शाबूत होते तेंव्हा नवरा- बायको दोघेही शेवटच्या श्वासापर्यत लग्न टिकविण्याचा प्रयत्न करत असत. नवरा – बायकोसारखे संबंध नसताना फक्त जगासाठी नवरा-बायको म्ह्णून एका छताखाली राहात असत फक्त आपल्या मुलांसाठी ! पण आता स्त्रियांची मुलांबाबतची ती बांधीलकी ही ढासळू लागली आहे.
पाश्चात्यांच वाढत अंधानुकरण या बाबतीत आपल्या गळ्याशी येणार आहे कारण पाश्चात्यांची घटस्फोट पचविण्याची मानसिकता कधीच तयार झालेली आहे पण आपल्याकडे ती मानसिकता तयार करण्याऐवजी आपण उगाच घटस्फोटाचं प्रमाण कमी करण्यासाठी झटतो आहोत.
नवरा बायको या दोघांपैकी एकाला जेंव्हा घटस्फोट हवा असतो तेंव्हा तो एकानं नाकारण म्ह्णजे मुर्खपणा आहे कारण त्यातून मनस्ताप आणि आयुष्यभराची फरफड याशिवाय काहीही साध्य होत नाही. पूर्वी पुरूषांना एकापेक्षा जास्त विवाह करण्यास समाज मान्यता होती त्यामुळे पूर्वी घटस्फोटाच प्रमाण कमी होत असं नाही म्ह्णता येणार कारण आपल्या संस्कृतीने घटस्फोट कधी मान्यच केलेला नव्हता. आता फक्त घटस्फोट घेऊन प्रश्न सुटत नाही कारण त्यानंतर घटस्फोट घेणारे वेगवेगळ्या जोडीदारांसोबत पुन्हा विवाह करतात त्यातून जन्माला येणारी मुलं आणि पूर्वीच्या विवाहातून जन्माला आलेली मुलं यामुळे अत्यंत गंतागुंतीचे नातेसंबंध निर्माण होतात त्यामुळे पुढची पिढी गुन्हेगारी प्रवृत्तीची म्ह्णून पुढे येण्यास हातभार लागतो.
आता आपल्या देशातील वाढत्या घटस्फोटाचं प्रमाण रोखण्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी प्रयत्न होण्याची अधिक आवश्यकता आहे नाही का ?
लेखक – निलेश बामणे.
मो. 8652065375 / 8692923310
March 15, 2016
एकीकडे नक्षल्यांचे हल्ले यशस्वी होत असताना सरकारदेखील आपली नेहमीची सुरावट बदलायला तयार नाही. आम्ही नक्षल्यांचा कडक बंदोबस्त करू, मतदारांनी त्यांच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही, असे भरीव आश्वासन देणे सुरूच आहे. खरेतर सरकार आणि नक्षल्यांमध्ये सुरू असलेल्या या खेळात विनाकारण बळी जातो तो गरीब आदिवासींचा.
October 11, 2009
जग झपाट्याने बदलत आहे. या स्थित्यंतराचा वेग अतिप्रचंड आहे. आपले अस्तित्व टिकवून प्रगती साधायची असेल तर या वेगाशी आपल्याला जुळवून घेणे भाग आहे.
January 14, 2007
पुन्हा बारावीत तो नापास झाला. जो मुलगा बारावी पास करू शकत नाही तो आयुष्यात काय करणार? फुकटचे किती दिवस खाऊ घालायचे तुला? तू जगला नि मेला काय, आम्हाला सारखेच. वडिलांचे कटु बोल राहून-राहून त्याला टोचत होते. मनात विचारांचे काहूर उठले होते. आपण एक साधी परीक्षा हि पास करू शकत नाही. व्यर्थ आहे असे जगणे. आपण मेलो तर निदान घरात एक खाणारा कमी होईल. भावनेच्या आवेशात त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला.
गावा जवळच्या डोंगराच्या कड्यावरून कधी-काळी कैद्यांना कडेलोट केले जायचे, त्या डोंगराच्या कड्यावर पोहचल्यावर त्याने कड्यावरून खाली बघितले. इथून उडी मारली तर आपण नक्की मरणार ना, खात्री करण्यासाठी त्याने खाली वाकून बघितले. पण हे काय, कड्याच्या थोड्या खालीच दोन दगडांच्या भेगेतून एक पिंपळाचे झाड डोकावात होते. झाडाच्या मुळांनी दूर पर्यंत दगडांना जखडून ठेवले होते. पिंपळाचे ते झाड गुरुत्वाकर्षणच्या नियमाला झुगारून वार्यासवे मस्त डोलत होते. च्यायला, इथून उडी मारली तर आपण कदाचित पिंपळाच्या झाडात अटकू. सहज त्याच्या मनात विचार आला, इथे न माती न पाणी, फक्त दगडाची एक भेग, तरी हि दगडांना धरून हे झाड जिवंत आहे.
आधारासाठी मातीच्या जागी दगड मिळाले तरी पिंपळाने तक्रार केली नाही. जगण्याशी आशा हि सोडली नाही. दगडातच त्याने जगण्याच्या मार्ग शोधला, दगडातूनच जीवनसत्व घेतले. आपल्या डोक्यावर तर छत आहे, घरात खायला हि मिळते. फक्त परीक्षेत नापास झालो म्हणून आत्महत्या? मनात विचारचक्र सुरु झाले. जर दगडाच्या आधारावर पिंपळ जगू शकू शकतो तर आपण हि स्वावलंबी होऊन जगू शकतो. आपण आत्महत्या केली तर आई वडिलांना किती दु:ख होईल. शाळेत नापास झालो तरी काय झाले, आपल्याला हि पिंपळाप्रमाणे जगण्याचा काही ना काही मार्ग निश्चित सापडेल. त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि घरी परतला. नव्या जोमाने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी.
-- विवेक पटाईत
July 1, 2018
‘जसे कराल तसे भराल ’ हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय-नीती-धर्माने वागत असतो, त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्म अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे, जीवनात मौज-मजा करत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते.
November 11, 2021
आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्यात बदल घडवण्यात म्हणजे स्वतःला आधी पेक्षा चांगले बनवण्यात करायला हवा म्हणून झालेले गेलेले सगळे विसरुन जा आणि आयुष्याच्या वाटेवर पुढे सकारात्मक वाटचाल करा.
May 26, 2019
आज भलेही आपण जागतिक महासत्ता बनण्याचा दावा करीत असलो तरी ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही की आजच्या घडीला या देशात मोबाईल फोनची संख्या स्वच्छतागृहांपेक्षाही अधिक आहे. मोबाईलची संख्या वाढत आहे म्हणजेच देशाचा विकास किंवा आधुनिकीकरण होत आहे, असा दावा आपले सरकार केल्याशिवाय राहणार नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने 2008 साली केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 54.5 कोटी मोबाईलधारकांची नोंद करण्यात आली होती. हे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत 45 टक्के होते. गेल्या दोन वर्षांत त्यात आणखी दहा टक्क्यांची भर नक्कीच पडली असेल. या तुलनेत स्वच्छतागृहे मात्र 36.6 कोटी, म्हणजे लोकसंख्येच्या मानाने फक्त 31 टक्के एवढीच आहेत! याचाच अर्थ स्वच्छतागृहाबाहेर जाणार्या लोकांचे प्रमाण आजदेखील खूप अधिक आहे. घरात स्वच्छतागृह नसले तरी चालेल, पण खिशात मोबाईल हवाच असे मानणार्यांचे प्रमाण प्रचंड आहे.
June 9, 2010
जिवन हे आनंददाई आहे त्याचा आनंद प्रत्येकाने भरभरुन घेणे अपेक्षित असते. याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःच्या घरापासुन केली तर सर्वच घर आनंदाने भरून जाईल. कुटुंबातील सर्व व्यक्ती आनंदात असल्याने सर्वांचे आपापसातील संबंध आपुलकीचे व जिव्हाळ्याचे राहतील. घरातील कौटुंबिक वातावरणाचा परीणाम संपुर्ण वास्तूवर होत असतो. घराची वास्तू सभोवतालचे वातावरण सर्वच आनंदी राहते.
July 30, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti