प्रकाशन दिनांक :- 10/10/2004
कोणत्याही मोठ्या घटनेची सुरुवात अगदी लहान कारणापासून होत असते. कधी-कधी ते कारण इतके लहान असते की त्याकडे सगळ्यांचेच हमखास दुलर्क्ष होते. या दुलर्क्षाची खरी किंमत मोजायची वेळ येते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो.
October 10, 2004
प्रकाशन दिनांक :- 13/06/2004
आपला देश विस्तार, लोकसंख्या आदींच्या बाबतीत जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेत प्रचंड मोठा आहे. स्वाभाविकच इतर अनेक बाबतीतसुध्दा आपण जगाच्या खूप पुढे आहोत. अर्थात आपण भारतवासी म्हणून अभिमान बाळगावा, अशा बाबी मात्र त्यामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत; किंबहुना नाहीतच असे म्हटले तरी चालेल.
June 13, 2004
“काश्मीर पर्यटना साठी नको!” अशी मागणी जर काश्मीर मधल्या नागरिकांनी केली तर..? ही चळवळ मला थोडी अशीच वाटली, कारण जे ‘गंगा’खेड गंगेवरच्या “विधी” साठी ओळखले जाते, गंगाखेडची ४०% इकॉनॉमी ही ‘गंगे वरच्या विधी’ वर अवलंबून आहे तिथेच देहदान चळवळ फोफावत आहे! एखादे देहदान झाले की त्या घरचे लोकं गंगेकडे फिरकणार सुद्धा नाहीत.!!!!
September 28, 2019
एकीकडे नक्षल्यांचे हल्ले यशस्वी होत असताना सरकारदेखील आपली नेहमीची सुरावट बदलायला तयार नाही. आम्ही नक्षल्यांचा कडक बंदोबस्त करू, मतदारांनी त्यांच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही, असे भरीव आश्वासन देणे सुरूच आहे. खरेतर सरकार आणि नक्षल्यांमध्ये सुरू असलेल्या या खेळात विनाकारण बळी जातो तो गरीब आदिवासींचा.
October 11, 2009
‘परम महासंगण’चे जनक म्हणून अवघ्या जगाला परिचित असलेल्या विजय भटकरांनी आयुर्वेदात विषद केलेले गो-पीयूषाचे महत्त्व समजून घेऊन त्यावर संशोधन केले आणि या जुन्या प्रभावी औषधाला नव्या स्वरूपात सादर करीत ‘इम्यूरिच’नामक कॅप्सूल तयार केली. स्वाईन फ्लूवर ही अतिशय प्रभावी आणि कुठलेही ‘साईड इफेक्ट’ नसलेली कॅप्सूल आहे.
भारतात उठलेले किंवा उठवल्या गेलेले स्वाईन फ्लू नावाचे वादळ आता शांत होत आहे.
August 23, 2009
कायद्याचा हात पकडून चालणारा व्यक्ति नेहमी निश्चिंत राहतो. त्याला कशाची भीती वाटू शकत नाही… .. कारण कायद्याची रेषा ओलांडली आहे ह्याची चिंता सतत सतावत राहते. म्हणून कोणत्या कर्माची निवड आपण करतोय हे तपसावे. जर व्यावहारिक जीवनामध्ये ही रेषा ओलांडली तर तन, मन, धन, जन,.. .. असेल अनेकानेक प्रकारचे नुकसान सोसावे लागेल ते समजून घ्या.म्हणून लक्षात ठेवा ‘कायदा आणि फायदा’
January 26, 2022
जन्मापासून दिल्लीत रहात असलो तरी महाराष्ट्रात जावेच लागतेच. एकदा नागपूरला गेलो असताना सहज नाक्यावर उभ्या काही तरुणांशी चर्चा केली. बहुतेक मराठी तरुण सरकारी परीक्षांची तैयारी करतच नाही. काही तरुण कालेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सरकारी नौकरीचा विचार करतात. फार्म भरल्यानंतर ३-४ महिन्यांच्या अर्धवट तैयारीवर, परीक्षा पास करण्याचे स्वप्न बघतात, जे संभव नाही. मग सुमार बुद्धीचे इतर भाषिक परीक्षा पास होतात आणि हुशार मराठी तरुण, पूर्ण व नियमित तैयारी नसल्यामुळे, असफल होतात.
August 25, 2018

कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
August 19, 2025
प्रकाशन दिनांक :- 11/04/2004
एखाद्या सरकारी खात्यात ‘सद्भावना सप्ताह’ दरम्यान जसे वातावरण असते तसे वातावरण सध्या संपूर्ण देशात दिसून येत आहे. विशेषत: राजकीय पक्षाशी संबंधित नेते आणि कार्यकर्ते चेहऱ्यावर विलक्षण माधुर्य ठेवून वावरत आहेत. अर्थात त्यामागे सद्भावनेचा भाव किती आणि स्वार्थाचा मुलामा किती, हा वेगळा विषय ठरतो.
April 11, 2004
प्रकाशन दिनांक :- 29/02/2004
ब्रह्यदेवाने ही सृष्टी निर्माण केली असे आम्ही मानतो. वृक्ष-वेली, पशु-पक्षी, वैविध्यपूर्ण जीवसृष्टी त्यानेच निर्माण केली. असे म्हणतात की, ही संपूर्ण जीवसृष्टी निर्माण केल्यावरही सर्वोत्तम निर्मितीचे समाधान ब्रह्यदेवाला झाले नाही.
February 29, 2004
Copyright © 2025 | Marathisrushti