शहद जीने का मिला
करता हैं थोडा थोडा
जानेवालो के लिये
दिल नही तोड़ा करते
आपल्यापैकी अनेकांनी ही गझल ऐकली असेल.जीवनाचे तत्त्वज्ञान सहज सोप्या साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे यात.यातील शब्द फक्त प्रियकर/प्रेयसी(मितवा) साठी नाही.थोडे बारकाई ने पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की ही गोष्ट जीवनात प्रत्येक ठिकाणी लागू पडते.
जे हातचे गमावले त्याबद्दल माणसाला हुरहुर नि हळहळ वाटावी आणि जे हातात आहे त्याचे योग्य मोल मात्र त्याला करता येऊ नये.हा निसर्गाचा मनुष्याला एकप्रकारचा शापच आहे.
बस एक परिक्षा,नाही आले अपेक्षित मार्क्स,नाही आलो आपण मेरिट लिस्ट मध्ये,सोबतच्या मित्रांसोबत नाही झालो आपण क्लास वन.म्हणून काय प्रयत्न सोडून द्यायचे?एवढ्याशा गोष्टीने माघार घ्यायची?बस हरलो आता आपण,आपली लायकी नाही नाही ही परिक्षा पास होयची असा न्यूनगंड करुन घ्यायचा?
आशाभंगासारखे जगात दुसरे दु:ख नाही हे जरी खरे असले तरी जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंदही आहे आणि स्वप्नभंगामुळे होणारा विषादही आहे.पण भावनांवर ताबा नसेल तर आपण कधीच सुखी होणार नाहीत.
रॉबर्ट केनडी म्हणतात,ज्यांच्या अंगी मोठ्यात मोठे अपयश पचविण्याची ताकद असते, त्यांनाच मोठ्यात मोठे यश मिळविता येते.आणि तुमचा दृष्टीकोण तर चांगला आहे.समाजसेवेसाठी तुम्ही या क्षेत्राकडे वळला आहात.थॉमस जेफरसन नेहमी म्हणत,"योग्य मानसिक दृष्टीकोण असलेल्या मनुष्याला त्याच्या ध्येयापासून कोणीही रोखू शकणार नाही.
त्यामुळे विद्यार्थी मित्रहो,या दु:खातून बाहेर या.अजून खुप काही करण्यासारखे आहे आयुष्यात.आनंदाने जीवन गाणे गात-गात पुढे-पुढे जा.मनुष्य जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही.
शेवटी एकच सांगेल,ना तर मी तुम्हांला पेटून उठायला सांगणार आहे,ना लढायला सांगत आहे.बस्स तुम्ही जे स्वप्न पाहिले आहे.त्यासाठी जगा.स्वत:वर प्रेम करा. आपल्या स्वप्नांवर प्रेम करा.मग बघा तुम्ही कसे कामाला लागतात..
नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास करु नका.ती तर अशिक्षित मुलांना ही मिळते.गरज म्हणून अभ्यास करा,आवड आहे म्हणून नको.आपली आवड तर नेहमी बदलत राहते.आज पूजा तो कल कोई और दूजा.जसे शरीराला रोज अन्नाची गरज आहे.तसे आपल्याला अभ्यासाची गरज आहे.
महान विचारवंत सॉक्रेटिस म्हणतात," जेव्हा तुम्हांला एखाद्या गोष्टीची नितांत गरज असते.तेव्हा ती मिळविण्यासाठी तुम्ही काहीही करु शकतात.आयुष्यात कोणतेही ध्येय असू दे,ते मिळविण्यासाठी दुर्दम्य इच्छा असेल तर ते ध्येय कितीही कठिण असले तरी अप्राप्य कधीच नसते..
आपल्या अभ्यासांच्या पुस्तकांवर आजच लिहून ठेवा,'Im your Big Fan',पहा मग ते पुस्तक तुमच्यावर किती प्रेम करते.
धन्यवाद..
-- दीपक गायकवाड
January 5, 2017
जग झपाट्याने बदलत आहे. या स्थित्यंतराचा वेग अतिप्रचंड आहे. आपले अस्तित्व टिकवून प्रगती साधायची असेल तर या वेगाशी आपल्याला जुळवून घेणे भाग आहे.
January 14, 2007
देवाला फूल चढ़वल जात
तेव्हा तुम्ही रागवता!
मग मेणबत्ती पेटवतेवेळी,
चौथरयावरील चादर चढ़वतेवेळी तुम्ही गप्प्प का?
दाभोळकर......
माझा गणपती घरी येतो
तेव्हा तुम्ही टिका करता!
त्यांचा शांताक्लॉज येतो तेव्हा,
त्याचा मसीहा येतो त्यावेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर...
माझ्या मुलांच जावळ उतरवण तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत!
त्यांच मेरीच्या माडीवर देतेवेळी
त्यांची सुंता होते त्यावेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर.......
आमचे व्रत उपवास सण
तुम्हाला नकोसे होतात!
पण त्यांचा रोजाच्या वेळी,
यांचा गुडफ्रायडे वेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर.......
माझ्या शिक्षणात धर्माला जागा नाही
त्यांच मात्र धर्मावर शिक्षण बंधनकारक
ख्रिस्ती शाळेत येशु मूर्ती रूपान हज़र, त्यावेळी
तुम्ही गप्प का?
दाभोळकर......
स्री शिक्षणातली हिंदू सावित्री कधी तुम्ही समजूनच घेतली नाही...
कारण मुस्लिम बुरख्यातुन तुम्हाला पाश्चमात्य नग्नता चांगली वाटली.....
आमचा एकपत्नी राम व त्याच कुटुंबनियोजन तुम्ही जगासमोर मांडलच नाही...
कारण एकाच पुरुषाच्या चार बायका व त्याची विस पोर तसेच दर सिजनला बायका बदलनारे पाश्चिमात्य तुमच्या मनाला जास्त भावले........
विचार करा दाभोळकर अन मग सांगा तेव्हा तुम्ही गप्प का?.............
माझी अंधश्रद्धा जगासमोर मांडली जरा चांगल्या गोष्टीपण मांडा!
म्हणजे देव न मानणारयां मधल देवपण मला कळेल
Whats Apps वरुन साभार....
-- विवेक जोशी
March 8, 2016
दरवर्षी आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून सर्वाना वाटतो. मित्रानो हे लक्ष्यात घेणे जरुरी आहे कि सोने म्हणून ही पाने का वाटावी याचा शास्त्रीय आधार नाही.
या मुळे झाडाचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. पाने हि झाडांचा श्वास आहेत, पानातून फोटोसिंथसीसद्वारे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडतात व हवेतील विषारी कार्बन डाय ऑक्साईड झाडात शोषून घेतात.
नुकतीच या झाडांना पालवी फुटून, हि कोवळी पाने तयार झाली आहेत, या पानांचे काम खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. हि पाने या झाडांसाठी अन्न बनविण्याचे एक प्रमुख काम करतात. या सर्व गोष्टींचा विचार करता, या पुढे झाडाची पाने कृपया सोने म्हणून वाटू नका.
लोकांना भेटायला जाऊन हात जोडून नमस्कार करा, व आशीर्वाद द्या व घ्या. जमल्यास सुवासिक फुले भेट द्या व घ्या, कारण बीज तयार होणार नसेल तर फुलाचा झाडाला काही उपयोग होत नाही. जाई, जुई, चमेली, मोगरा, गुलाब, चाफा वगैरे पुष्कळ सुवासिक फुले बाजारात उपलब्ध असतात.
याची आणखी एक बाजू सांगतो, हि पाने जनावरे दुसऱ्या दिवशी खात नाहीत. म्हणजे त्या पानांचा मोठया प्रमाणात कचराच होतो. बाजारात सर्वसाधारण असे चित्र दिसते कि विक्रेते भरमसाठ पाने तोडून आणतात, त्यातील आर्धी विकली जातात, उरलेली पाने तिथेच टाकून हे विक्रेते संध्याकाळी निघून जातात. अश्या तर्हेने बाजारात कचरा होण्यास आपणच कारणीभूत होतो. नगरपालिकेचे लोक कचरा साफ करत नाहीत म्हणून आपण ओरडतो, मुळात कचरा केलाच नाही, तर साफ करण्याचा विषय तयार होणार नाही, याची आपल्यासारख्या सुजाण, सुसंकृत, शिक्षित, लोकांनी विचार करण्याची व अमलात आणण्याची वेळ आली आहे.
प्रथा बंद करणे कठीण असते, पण कधीतरी तो बदल घडणे जरुरी आहे, चला या दसऱ्यापासूनच त्याची सुरवात करू, व एक आदर्श विचार समाजात घेऊन जाऊ. मी मागील काही वर्षापासून सोने म्हणून पाने देणे घेणे बंद केले आहे.
सर्व बंधू भगिनींना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
-- विजय लिमये
(9326040204)
October 10, 2016
"एकदा जरूर वाचा"
जाट आंदोलन, हरियाणा:
जवळपास ७०० कोटींच शासकीय नुकसान,
सरकारचा २०००० करोडचा महसूल बुडाला,
शेकडो ने मृत्यू, जवळपास ३ राज्यांत भीषण दंगल.
पटेल आंदोलन, गुजरात:
२५० कोटींच शासकीय नुकसान,
८००० कोटींचा महसूल बुडाला,
१२ मृत्यू, २७ लोकांसोबत २०० पोलीस गंभीररीत्या जखमी,
६५० च्या वर अटक.
गुज्जर आंदोलन, राजस्थान:
४०० कोटींच शासकीय नुकसान,
६००० कोटींचा महसूल बुडाला,
४० च्या वर मृत्यू,
लष्कर पाचारण.
आणि मग, आमचा
मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र:
एकही रुपयाचं नुकसान नाही,
बहुसंख्य असूनसुद्धा, अन्याय सहन करूनसुद्धा सामाजिक स्वास्थ्य राखायचे आहे.
पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही,
दंगल आणि जाळपोळीचा तर प्रश्नच नाही.
कारण शिकवण आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची.."रयतेच्या काडीला पण धक्का लागला नाही पाहिजे"...
September 28, 2016
सध्या जगभरच्या मोठमोठ्या शहरात अुंचच अुंच इमारती…टॉवर्स बांधले जात आहेत. त्यांचे आयुष्य किती असावे? दोनशे.. तीनशे…हजार वर्षे? आपल्या हयातीत हे टॉवर्स कोसळणार नाहीत याची खात्री असल्यामुळे, सध्या या अिमारती वापरात आहेत.
May 23, 2015
सरकारने दाखविलेल्या ‘कापूस ते कापड’ या सोनेरी स्वप्नात हरवून गेलेला विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी जेव्हा वास्तवात परतला तेव्हा फार उशीर झाला होता. त्या स्वप्नाच्या धुंदीत त्याने खूप काही गमावले होते आणि नंतर गमाविण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही तेव्हा तो आपला जीव गमावू लागला. रोजच्या आत्महत्या सुरू आहेत.
May 28, 2006
सरकार तुम्हाला मारायला उठले असेल तर तुम्ही कुत्र्या-मांजरासारखे न मरता प्रतिहल्ला करायला का घाबरता? जीवावर उदार झालेल्या लोकांनी या जगात अनेक क्रांत्या घडवून आणल्या आहेत, अनेक सिंहासने पालथी केली आहेत. तुम्ही जीवावर उदार होतच असाल तर जाताना असा दणका देऊन जा, की पुन्हा शेतकर्यांच्या वाटेला जाण्याची हिंमत कुणी करू शकणार नाही!
July 3, 2011
शिक्षणावर शहरी माणूस सर्वात जास्ती खर्च करतो, शिक्षणाचा रोजचा माणशी खर्च दीडशे रुपयांच्या आसपास जातो. स्पेशल ट्युशन्स लावल्या, काही कला किंवा खेळाचे प्रशिक्षण घेतले तर तो खर्च कितीही वाढू शकतो. यामध्ये चार जणांचे कुटुंब गृहीत धरलेले आहे.माणशी रोजचा खर्च पावणे पाचशे ते साडेसहाशे इतका येतो.याच्या पुढचे उत्पन्न हे गुंतवणूक म्हणून वापरता येऊ शकते.
October 28, 2023
‘वन्दे मातरम्’ ज्या ‘आनंदमठ’ कांदबरीचा भाग आहे, ती एका ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित कादंबरी आहे. ती ऐतिहासिक घटना ‘संन्याशांचा उठाव’ म्हणून भारतीय इतिहासात प्रसिद्ध आहे. हा उठाव वर्ष १७६२ ते १७७४ या काळात बंगालमध्ये झाला होता.
September 20, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti