विक्रीच्या संदर्भात म्हणावयाचे झाल्यास, असे म्हटले जाते की, ज्यावेळेस आपण १० ग्राहकांच्या ठिकाणी खडा मारतो, त्यावेळेस त्यातील फक्त एकच खडा योग्य ठिकाणी लागतो ……….
January 1, 2011

२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या गळचेपीला विरोध कसा करायचा यावर संपादक आणि वृत्तपत्र मालकांमध्ये सखोल विचारमंथन झाले. त्यातून वेगवेगळे पर्याय समोर आले. वृत्तपत्रातील सर्वात महत्त्वाचे पान मानले जाते ते म्हणजे संपादकीय पान. त्या पानावर संपादकीय व विविध विषयांवर मते मांडणारे लेख व स्तंभ प्रकाशित होतात. त्या पानातून संबंधित वृत्तपत्राची विचारसरणी आणि भूमिका स्पष्ट होत असते.
आणीबाणी लागू झाल्यावर या संपादकीय पानांतून वृत्तपत्रांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. काही वृत्तपत्रांनी माध्यमांची ही मुस्कटदाबी निमूटपणे मान्य केली.कारण त्यांना त्यांचे वृत्तपत्र चालवायचे होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. मात्र इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन, मराठवाडा यासारख्या काही मोजक्या दैनिकांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून बाणेदारपणा दाखविला. आमच्या विचारांवर तुम्ही बंधने घातली म्हणून आम्ही आमचे विचार ज्या जागेवर मांडतो ती जागाच कोरी सोडत आहोत अशी ती अव्यक्त निषेधाची भूमिका होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. हा एकच प्रसंग वृत्तपत्रांच्या आयुष्यात ‘अग्रेलखा’ चे महत्त्व किती आहे सांगण्यास पुरेसा ठरावा. या अनोख्या निषेधाची नोंद जगाने घेतली. अग्रलेखाची ती कोरी जागा, आणीबाणीच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोशाची अभिव्यक्ती ठरली.
July 3, 2025
धायरी, पुणे येथील पर्याय डी. स्कूल एक वेगळा विचार घेऊन सुरू झालेली मुक्त शाळा आहे. इव्हान आलीच यांनी युरोपमध्ये डी-स्कुलिंग ही चळवळ सुरू केली होती. स्कूलमध्ये जे आपण कप्पे केलेत, विषयांचे असो, वर्गांचे असो, वयांचे असो, स्कूल ड्रेसचे असो, यांच्यापलीकडचं जे आहे ते सर्व डी.स्कुलिंग मध्ये येतं. स्कुलिंग पुसून त्याच्या पलीकडचं, जे जे आहे, पुस्तकांच्या पलीकडचं तसेच व्यवहारातलं जीवन जगण्यासाठी जे जे लागतं ते, थोडक्यात जीवनशिक्षणच.
२०११ पासून ही शाळा सुरू झाली. २०२३ मध्ये दहावीची पहिली बॅच या शाळेच्याबाहेर पडली. शाळेच्या पलीकडे मुलांना काय येतं व काय करायचंय, काय शिकायचंय हा या शाळेत देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा गाभा आहे. वेगळ्या विचाराने प्रेरित झालेल्या अनेक शाळा आज आकाराला येत आहेत. पूर्वी खरोखर ज्यांना शिक्षणाच्या कार्यात व प्रसारात तळमळ होती त्यांनी समर्पित होऊन शैक्षणिक संस्था काढल्या ज्या पुढे नावाजल्या गेल्या.
June 30, 2026
तत्त्व पटवून देताना तत्त्वज्ञाने तर्क लढवले नाहीत, तर ते तत्त्वज्ञान रटाळ होतं. तत्त्वज्ञान अंगिकारण्यास लोक तयार होत नाहीत.
January 4, 2024
एखाद्या व्यत्त*ीचे निधन झाल्यावर त्याच्या आप्तस्वकीयांना दु:ख होणे स्वाभाविक असते. डोळ््यांतील अश्रूंची वाट मोकळी करून हे दु:ख व्यत्त* केले जाते. दु:खाचा तो स्वाभाविक उद्रेक असतो परंतु बरेचदा असेही आढळून येते की, मृत व्यत्त*ीशी कुठलेही भावनिक संबंध नसलेली माणसेही आपल्या न झालेल्या दु:खाचे अतिरेकी प्रदर्शन करीत असतात.
June 25, 2006
काही मराठी दैनिक मालिकांना हल्ली विरोधाचा सामना करावा लागत आहे, सध्याच्या मालिका हया वास्तवापासून कोसो दूर असतात. त्यामुळे त्या मालिकांतील कथानकांना आणि कथेतील पात्रांना आणि मुळात कथेला किती गंभीरपणे घ्यायचं याचा विचार करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे कारण आता मालिकांतील कथानकांचा संबंध थेट समाजाशी, जातीशी आणि धर्माशी लावला जावू लागला आहे. हा मालिकांना विरोध करण्याच्या नावाखाली आता राजकारणही सुरू झालेले दिसते.
सध्या मालिकांची निर्मिती समाज हितासाठी केली जाते हा गोड गैरसमज कोण बाळगत असेल तर तो वेळीच दूर व्हायला हवा !
मालिका निर्मिती हा व्यावसाय आहे लोकांच मनोरंजन करण हाच त्याचा उद्देश आहे. सामाजिक बांधिलकी म्ह्णून जर मालिकांची निर्मिती झाली असती तर चांगले कथानक असणार्या पण टी.आर.पी. नसणार्या मालिका बंद झाल्या नसत्या नाही का ? मालिकेतील कथानक मला पटलं नाही म्ह्णून ती मालिका बंद व्हावी असा आग्रह होत राहिला तर सर्वच मालिका बंद कराव्या लागतील आता काही पुरुषांना नाही आवडत पुरुषांनी साड्या नेसलेल्या म्ह्णून ते जर म्हणाले,’ ‘ज्या मालिकांत साड्या नेसलेले पुरुष आहेत त्या मालिका बंद कराव्या तर ते शक्य आहे का ?’ एका मालिकेत एक मराठी मुलगी एका हिंदी भाषिक तरुणाच्या प्रेमात पडताना दाखवली म्ह्णून मालिका बंद करावी अथवा त्यामुळे मराठी अस्मितेला धोका पोहचला हे कसं शक्य आहे त्या मालिकांतील ती एक काल्पनिक तरूणी करोडो मराठी मुलींची प्रतिनिधी होऊच कशी शकते ?
हया मालिका पाहतोय कोण मराठी प्रेक्षकच ना ? याचा अर्थ त्यांना या कथानकात काहीच चुकीच वाटत नाही का ? त्या मालिका पाह्णार्यांना त्यात काही चुकीच वाटत नसेल तर इतरांनी उगाच आदला - आपट करून काही उपयोग आहे का ? मालिकांची कथा कधीही पूर्ण लिहलेली नसते त्यामुळे त्यात कधीही कोणताही बदल करण शक्य असतं. त्यामुळे अशा मालिकांना फक्त विरोधासाठी विरोध करणारे तोंडघशी पडण्याची शक्यताच अधिक असते.
आता काही दिवसापुर्वी भुताखेतावरील एका मालिकेला विरोध झाला होता त्याच काय झालं आता कथानकाने अचानक जे वळ्ण घेतल त्यामुळे अचानक विरोध मावळला उलट त्यामुळे कदाचित त्या मालिकेचा टी.आर.पी. वाढायलाही मदत झाली असेल.
ज्या मालिकेतील कथानक आपल्या आवडत नसेल ती मालिका आपण पाहावीच का ? आणि ती इतरांनी पाहू नये असं आपल्याला वाटत असल्यास ते का करावे हे पटवून देण्याची क्षमताही आपल्यात असायला हवी नाही का ? या मालिकांत काम करणारे कलाकारही मराठीच आहेत ना ? त्यांना भान नसेल का आपण काय करत आहोत याचे ? विरोधासाठी विरोध करण्याची समाजाची मानसिकता आता या बाबतीतही बदलायला हवी. न आवडणार्या मालिका आता आपोआप बंद होतात कारण टी.आर.पी. या मालिकांना आवर घालण्याचे हत्यार आहे. मालिका बंद करण्याचे आवाहन करण्यापेक्षा मालिका पाहू नका असे आवाह्न करणे सोप्पे आहे नाही का ? त्यामुळे कोणाचेच काही नुकसान होणार नाही आणि आपला उद्देश जर योग्य असेल तर तो साध्य ही होईल नाही का ? फक्त विरोधासाठी विरोध केल्याने या मालिकांचा टी.आर.पी. वाढण्यास मदतच होते. म्ह्णजे विरोधकांचा विरोध फक्त विरोधासाठी असेल तर याचा त्या मालिकेला फायदाच होतो आणि मग चुकीचे पायंडे पडायला सुरुवात होते.
टी.आर.पी. जास्त असणार्या सर्वच मालिका पाहण्यासारख्या असतातच असं नाही त्यांच्यातही बर्याचदा कल्पनातीत आणि अशक्यप्राय असणार्या गोष्टी दाखविण्याचा अट्ट्हास केलेला असतो. या मालिकांना विरोध करणार्यांची भुमिका बरोबर असेल पण तो व्यक्त करण्याची पद्धत बदलायला हवी ! विरोधासाठी म्ह्णून विरोध न करता आपला विरोध या मालिका डोळे फाडून पाहणार्यांना पटवून देत राहायला हवं तोपर्यत जोपर्यत ते त्यांना पटत नाही. या अशा मालिकांमुळे समाजमनावर फार मोठा परिणाम वगैरे होईल असं कोणाला वाटत असेल तर तसं काही होत नाही. कारण मालिका आवडते म्ह्णून पाहणारे जितके असतात तितकेच आवडत नसतानाही पाहणारे असतात. मालिकेला टी.आर.पी. मिळतोय म्ह्णजे त्या मालिकेला समाजमान्यता मिळतेय असं ही या मालिकांची निर्मिती करणार्यांनी समजू नये.
आज समाजातील एक गट या मालिकांच्या विरोधात बोलतोय. भविष्यात संपुर्ण समाज बोलू लागला तर मालिकांची निर्मिती करणे अवघड होऊन बसेल याच भानही मालिकांची निर्मिती करणार्यांनी ठेवायला हवं आज जरी फक्त विरोधासाठी विरोध होत असला तरी तो तसाच राहील याची खात्री देता येत नाही...
-- लेखक – निलेश बामणे
मो. 8652065375
गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
दिनांक – 15 मे 2016
May 16, 2016
लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित धक्कादायक पराभवाने सध्या भाजपमध्ये प्रचंड निराशा पसरलेली दिसते. पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाच्या सिद्धांतांना, पक्षाच्या वैचारिक धोरणाला आव्हान देणाऱ्यांची वाढती संख्या पाहता ही निराशा आता असंतोषातून व्यत्त* होऊ लागली आहे, असेच म्हणावे लागेल. एका छोट्या चकमकीत झालेला पराभव म्हणजे महायुद्धातला अंतिम पराभव नसतो, हे लक्षात घ्यायला भाजपमध्ये कुणी तयार नाही.
August 30, 2009
भारतीय शिक्षण व्यवस्थेत भूतकाळाचा विचार केला असता भारतीय विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण देण्यात येत असे.आयुर्वेद आणि अन्य वेदांगे यांचे शिक्षण उपलब्ध होते अभियांत्रिकी शिक्षण तर उत्तम प्रकारचे होते. याची साक्ष द्यायची झाल्यास ताजमहल, गोल घुमट,तसेच संपूर्ण भारतभर बांधण्यात आलेली अनेक प्रकारची देवतांची देवालये पुरेशी आहेत.तसेच वेगवेगळ्या नद्यांवर बांधण्यातआलेले घाट आणि अनेक ठिकाणी केलेली पाणीपुरवठ्याची व्यवस्था बारवा,तळी इत्यादी गोष्टी पाहिल्या म्हणजे तेव्हा जलव्यवस्थापन किती उच्च दर्जाचे होते , याची कल्पना येते . उत्तम प्रकारचे वाड.मय त्या काळात निर्माण होत असे.
October 26, 2020
लोकशाही व्यवस्थेत सरकारचे काम विश्वस्तांचे असते. राज्याचे खरे मालक राज्याचे नागरिक असतात या नागरिकांच्या वतीने सरकार राज्याचा कारभार पाहत असते. त्यामुळे सरकारची जबाबदारी केवळ संरक्षण आणि संवर्धनापुरतीच मर्यादित आहे; परंतु आपल्या या मर्यादेचा सरकारला विसर पडला की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे.
February 5, 2006
आज समाज, संस्कृती यात अमुलाग्र बदल झाला आहे. असे असले तरी समाजातील लोकांच्या मानसिक, भावनिक गरजा या जशाच्या तशाच आहेत. त्या समजून घेतल्या तरी आपले नाते संबंध सुधरायला मदत होते. प्रत्येक पदोनपदी आपला लोकांशी संबंध येतोच. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायच झालं तरी कुटुंबीयांच्या, नातेवाईकांच्या, समाजातील लोकांच्या मदतीची गरज लागतेच
April 22, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti