(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सार्वजनिक आणि गोपनीयतेमधे फरक हवाच!

    प्रकाशन दिनांक :- 12/12/2004
    असे म्हणतात की, संस्कृत ही देवाची भाषा आहे. त्यामुळेच पूजापाठ, होम- हवनात वा इतर धार्मिक कार्यांत संस्कृतचा वापर करत असावेत. वेद, गीता, रामायण आदी पौराणिक ठांथ वा शास्त्रग्रंथ हे संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत.

      December 12, 2004


  • भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका

    कालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे . काही पद्धतीत चांद्रमहिने विचारात घेतात . या महिन्यांची सुरुवातही कोणी पौर्णिमेला करतात तर कोणी अमावस्येला करतात . काही प्रांतात सौर महिने विचारात घेतात . आपले सणवार , धार्मिक उत्सव विशिष्ट तिथीला असतात , म्हणजेच ते चंद्रभ्रमणावर अवलंबून असतात .

      April 1, 2023


  • कलिंगडाचे डोहाळे

    बदलापूर स्टेशनवरून सोनावणे घाईघाईत घरी निघाले. आता घरी पोहोचायला उशीर करून चालणार नव्हते. कारण पत्नी प्रेग्नंट होती. तिसरा महिना चालू होता. सोनावणे भराभर घरी पोहोचले. स्नान करून पत्नीसमोर निवांत बसले. चहा पिताना तिच्याशी गप्पा सुरु झाल्या.
    पत्नी जुन्या आठवणीत रमून गेली. ती सांगू लागली ” आमच्या गावात नदी होती. माझे बाबा किनाऱ्यावर कलिंगड लावायचे. कलिंगडाला आम्ही दोरे बांधायचो. ते दोरे तोडून कलिंगड मोठं व्हायचं. मला आज खूप आठवण येतेय. असं वाटतं कलिंगड खावं ! “

      March 23, 2026


  • इथं काय महत्त्व राखतं..!

    ही धरा कुणाच्याही ‘बापाची जहागीर’ नाही… म्हणून इथं अमानवीयतेचा अंत महत्त्व राखतो… तर माणुसकीचा ‘नव्याने जन्म’ सुद्धा अधिक महत्त्व राखतो…

      June 13, 2020


  • ती अभागी…!

    जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात शाळेतील क ख ग तर तिच्या ओठीही नाही…! पुढाऱ्यांच्या बॅनर वरच्या मोठमोठ्या निर्जीव माणसांकडे पाहात पाहात, नशिबाचं गाणं गात गात ती गर्दीत कुठे आणि कधी हरवून जाते माहीत नाही…!

      November 24, 2019


  • सुधींद्र कुलकर्णींना अनावृत्त पत्र

    आज दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपला लेख “इस्राईल चे दोन चेहरे” वाचला. सदर लेख तुम्ही वस्तुनिष्ठ राहून न लिहिता, स्वतःची मते घुसडत, इस्राईल व पॅलेस्टाईन वादात ज्यांचा काडीमात्र संबंध नाही अशा हिंदू लोकांना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना, तुम्हाला हवे त्याप्रमाणे गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे, जो निंदनीय आहे, म्हणूनच तुमचा सदर लेख दुर्लक्ष करण्यायोग्य आहे. तथापी हा लेख दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला असून दै सकाळचा वाचकवर्ग हा बुद्धिजीवी व विचारवंत आहे, त्यांचे मत कलुषित होऊ नये यासाठी हा पत्रप्रपंच !

      May 25, 2021


  • कोण कोणाचे गुरु?

    अखेर ते दुकान बंद पडलं आणि त्याचं शटर नेहमीकरिता खाली ओढण्यात आलं.

    एका मराठी माणसाने ऐपतीबाहेर खर्च करून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं म्हणून अगदी मोजक्या लोकांना किंचित कौतुक वाटलं, तर स्वत: काहीही न करता इतरांचे व्यवसाय कसे व कधी बंद पडतील याची रात्रंदिवस काळजी वाहणाऱ्या बहुसंख्य रिकामटेकड्यांना ते दुकान लवकरच बंद पडणार, याबद्दल उद्घाटनाच्या दिवसापासूनच खात्री वाटू लागली ! दुकान तयार होऊन बरेच दिवस झाले तरी त्याचा शुभारंभ का होत नाही याबद्दल उत्सुकतेपोटी चौकशी केली तेव्हा कळलं की ‘गुरुमहाराज’ जे अक्षर ठरवतील त्या अक्षरापासूनच दुकानाचं नाव निश्चित होईल. व्यवसाय सुरू करण्यासाठी काढलेल्या कर्जावरील महागड्या व्याजाचं मीटर फिरू लागलं आणि तब्बल एक महिन्यानंतर दुकानावर पाटी झळकली. पण तरीही दुकान सुरू होण्याचं काहीही चिन्ह दिसेना. तोटा झाला तरी चालेल, पण गुरुमहाराजांनी मुहूर्त ठरवल्याशिवाय दुकान सुरू करायचं नाही असा निर्णय घेण्यात आल्याचं कळलं.

    अखेर महाराजांनी मुहूर्त पक्का केला आणि तब्बल तीन महिन्यांनंतर दुकानाचा शुभारंभ झाला. ग्राहकांच्या गरजांपेक्षा गुरूंच्या सल्ल्याला अतोनात महत्त्व प्राप्त झाल्यामुळे महाराजांच्या मठाकडे दुकानमालकाच्या चकरा वाढल्या व त्याचे दुकानाकडे दुर्लक्ष होऊ लागले. अनेक ‘हितचिंतकांच्या’ अपेक्षेनुसार हळूहळू आचके देत दुकानाने एक दिवस शेवटचा श्वास घेतला व त्याचे शटर खाली ओढण्यात आले.

    असे आम्ही कसे? वैचारिक स्पष्टतेला महत्त्व देण्याऐवजी भावना, प्रेम, विश्वास, श्रद्धा, व्यवहार या गोष्टींची सरमिसळ करत व वैचारिक गोंधळात गटांगळ्या खात आम्ही जाणूनबुजून आमच्या आयुष्याचं दिवाळं का काढतो? आयुष्यात प्रत्येकाची कशावर तरी श्रद्धा असणे आवश्यक आहे याबाबतीत दुमत असू शकत नाही. पण म्हणून आपल्या सगळ्यांसारख्या हाडामांसाच्या एखाद्या सामान्य माणसाला ‘महाराज’ ही उपाधी चिकटवून त्याच्या किती आहारी जायचं याला काही मर्यादा आहेत की नाही? ‘महाराजांच्या सल्ल्याशिवाय आमच्या घरातलं पानही हलत नाही,’ असे कौतुकाने ओथंबलेले शब्द अनेक घरांमधून जेव्हा ऐकू येतात तेव्हा मती गुंग होऊन जाते.अशा घरांमधील कर्त्या माणसांनी स्वत:च्या डोक्याचा, विचारशक्तीचा व निर्णयशक्तीचा वापर करणे कायमचे थांबवून टाकले असेल का? एखाद्याला देव्हाऱ्यात बसवून त्याच्याकडे आपली अक्कल आणि अख्खं आयुष्य गहाण टाकण्याइतकं कोणाचं आयुष्य स्वस्त असतं का? इतर कुणाहीपेक्षा आत्मपरीक्षणाला आपला खरा गुरू मानून व आत्मविश्वासात अफाट वाढ करून जर प्रगतिपथावर दमदार पावलं टाकण्यास सुरुवात केली तर घरोघरी विवेकानंद निर्माण होण्यास किती वेळ लागणार आहे?

    -- श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

      July 19, 2016


  • पटसंख्येवरील मुले शाळेत कधी दिसणार ?

    आयएसओ , प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळा सिध्दी, उपक्रमशील शाळा असे नविनच उच्चारण हल्लीच्या शिक्षण प्रक्रियेत ऐकायला मिळत आहेत. तसेच शाळा एक मंदीर आहे. शिक्षक हे पुजारी आहेत . विद्यार्थी हे दैवत आहे . असे काही सुविचार ऐकायला , पहायला मिळतात. एकंदरीत आजच्या शिक्षणप्रणालीचा विचार केल्यास ती विद्यार्थीकेंद्रित आणि कृतीयुक्त बनलेली आहे. तुला मोठा झाल्यावर काय व्हायचे ? या एका प्रश्नाच्या उत्तरावर विद्यार्थ्याचा लेखाजोखा आणि आलेख मांडला जातो. ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी मुक्तपणे शिक्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. ज्यास मुक्तपणे शिक्षण मिळत नाही म्हणून मग ते मानवतेच्या शिक्षणात मागे पडतात.

    खाजगी क्लासेस, शिकवणी यांचे वाढते पेव आर्थिक शोषणाचे केंद्रबिंदू होऊ पाहत आहेत. अशा काळात जी मुले गरीबीतील आहेत. आर्थिकदृष्टीने कमकुवत आहेत. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे काय ? कित्येक कुटुंब मागास आहेत. शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी बंद आहेत किंवा त्यांना ते दार सापडत नाही.अशा अधांतरी आणि दोलायमान अवस्थेत अनेक मुलं शिक्षण सोडून उदरनिर्वाहासाठी झगडतात. मग भारताचे सुजाण नागरिक बनविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. शालेय शिक्षणाची उपयोगिता लक्षात न आल्याने पिढ्यानपिढ्या परंपरागत अज्ञान, अडाणीपणा यामध्ये जात आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुले कुपोषणाची शिकार बनतात. त्यांना पुरक पोषण आहार न मिळाल्यास त्यांना मृत्यू ओढावतो. अपयश हे कुणी सांगत नसते.उघड झाले तरी सारवासारव होते.हा मानवी स्वभाव सोडला तर मुख्य प्रवाहापासून वंचित राहणारांची संख्या आजही मोठी आहे. शालाबाह्य मुल कळवा आणि हजार रूपये मिळवा अशा काही घोषणा समाजाकडून मिळणार्या सहानुभूतीसाठी केलेल्या असतात. याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. आजही कित्येक बालकांना सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण मिळत नाही. शालाबाह्य मुलांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी जे प्रयत्न केले जातात. त्यात शिक्षक एकाकी पडतात. समाजाचा आधार मिळत नाही. शाळेत मुल न पाठवणार्या पालकांना कोणतीही शास्ती अथवा सक्ती कायद्याने नाही. नोकरीसाठी शिक्षण एवढीच शिक्षणाची मर्यादित व्याख्या आज करून ठेवलेली आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे प्रयत्न कमी पडताहेत त्या ठिकाणी कित्येक मुलं शालाबाह्य ठरतात. अशी मुलं शाळेत दाखल असतात. परंतु वास्तव असे आहे की सतत भटकत असतात. आठवीपर्यंत गैरहजर असली तरीही त्यांना ढकलपास करून पुढे पाठवण्याची व्यवस्था या शिक्षण व्यवस्थेत आहे . त्यामुळे त्यांच्या दाखल्यावर स्पष्ट उल्लेख येतो सतत गैरहजर नाव कमी . असे नाव कमी झालेली बालके भरपूर पहायला मिळतील. ती सर्वच मुले अपयशी ठरतात असे नाही. तर ती मुलं समाजाच्या , निसर्गाच्या शाळेत शिकत असतात. पण सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शाळा जे कार्य करतात. त्याचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.

    उदरनिर्वाहासाठी जी कुटुंब स्थलांतरीत होतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने हाताळला पाहीजे. सध्याचा शिक्षणाचा बाजार हा थांबत नसेल तर मग गरीबांच्या लेकरांसाठी असणार्या शाळा प्रयत्नपुर्वक सुधारल्या पाहिजेत. शासन आणि समाज हे करू शकते.

    प्रकाशझोताचा झगमगाट सोडून खरे संस्कारक्षम शिक्षण त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचायला हवे. अच्छे दिनचे स्वप्न वास्तवात उतरावयाचे असेल तर त्याची सुरूवात शिक्षणापासूनच व्हायला हवी. कालपरवा एक विद्यार्थी भेटला . कितवीला आहेस ? असा सहज प्रश्न केला. तर आठवीला असल्याचे त्याने सांगितले. शाळेत जातोस का ? तर नाही म्हणाला. मग काय करतोस ? जेसीबी चालवतोय . शाळा का शिकत नाही. असं विचारल्यावर तो गप्प ... म्हणजे एकतर शाळेत नाही गेलं तरी पास होतय असा समज असावा किंवा

    उदरनिर्वाहासाठी जेसीबी चालविणे योग्य वाटले असेल.दुसरा एक त्याचाच मित्र सोबत होता . त्यालाही विचारले ' तू जातोस का शाळेत ? '

    तर त्यानेही नकारार्थी मान हलवली. ' तू पण जात नाहीस वाटतं शाळेत .'

    ' सर , त्याने साखर कारखान्यावर कोयता लावलाय. उचल घेतलीय. त्यो पण आठवीलाय.'

    ती दोन्ही मुलं मागास प्रवर्गातील होती. हे वास्तव चित्र आहे. शाळेऐवजी जेसीबी चालविणे किंवा मग कारखान्यावर ऊस तोडणे योग्य का वाटते? या प्रश्नावर विचारवंतांनी विचार करायला हवा.

    अशी कितीतरी मुलं आहेत की ती शाळेच्या पटावर आहेत पण शाळेत उपस्थित नाहीत. अशा कारणांचा शोध घ्यावा लागेल. तरच त्यावरच्या उपाययोजना सुचतील. स्वयंसेवी संस्था, उद्योजक, शासन, समाज आणि प्रशासन व्यवस्थेने हा प्रश्न समन्वयाने घेतला तरच मार्ग निघू शकतो नसता पुढील पिढी बरबाद करण्याचे काम चालूच राहील!

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, जि.बीड
    मो.9421442995

      May 16, 2017


  • डार्विन आणि माकड

    सद्या चार्लस् डार्विन आणि त्याचा माकड सगळीकडे धुमाकुळ घालतोय…. अनेकजण जणु काय डार्विनला आपण कोळून प्यालोय, अशा आविर्भावात बोलतायत…(जसं क्रिकेटबद्दल बोलताना प्रत्येकजण एक्सपर्ट कॉमेन्टेटर असल्यासारखा बोलतो, तसं..) खरंतर यापैकी कितीजणांना डार्विन, त्याचं ते जगप्रसिद्ध पुस्तक आणि क्रांतिकारक सिद्धांत याच्याबद्दल किती माहिती आहे, हे त्यांचं त्यांनाच माहित.

      January 24, 2018


  • संवाद

    संवाद हा नात्यातला श्वास आहे. जर हा श्वास थांबला तर नातं ही थांबतं. नवजात शिशु जेव्हा जेव्हा जन्म घेतो त्या दिवसापासून आई त्याच्या सोबत संवाद साधू लागते. या संवादामुळे त्याला या जगातील नाती, वस्तु, पदार्थ…. यांचे ज्ञान होऊ लागते. नात्यांशिवाय मनुष्य म्हणजे पानगळती झालेलं जीर्ण झाड! ज्यावर पक्षीदेखील आपलं घरटं बांधत नाहीत. ही पानगळती टाळण्यासाठी संवाद साधा व नात्यांना टवटवीत ठेवा.

      December 15, 2022