(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लेकीच्या अल्प मुक्कामाचा आनंद

    पाच दिवस माहेरपणाला राहून, आजच आमची लेक सासरी रवाना झाली, आणि लेकीच्या वास्तव्याने गजबजलेलं आमचं घर शांत झालं. तसे आम्ही घरात तिघं असतो. आणि उभयतां पती पत्नी, आणि आमचा लेक. पण तो असतो पाऊण दिवस त्याच्य कामात आणि त्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये अथवा वाचनात, ही स्वयंपाक, इतर कामं निपटून, तिच्या असंख्य मैत्रिणींच्या व्हॉट्सॲप समूहात आणि मी माझ्या लेखन वाचनात. आपापल्या कक्षेतून बाहेर येऊन थोड्याफार गप्पा होतात.

      September 9, 2022


  • दिवाळी आणि रांगोळी…

    दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला , कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी , लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली. कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली .

      November 14, 2023


  • डिजिटल कचरा

    कोणत्याही माध्यमांचा वापर योग्य रित्या झाला तर त्या विषयीची गोडी टिकून राहते.  प्रत्येकाने दिवसभरात आलेल्या संदेशांमधून एखादा चांगला संदेश निवडला आणि तोच फक्त पाठवला तर संदेशांची भाऊगर्दी आपोआप कमी होईल. शिवाय एकच संदेश पाठवायचा असल्याने त्याचे चिंतन आणि मनन होऊन तो पाठवला जाईल.

      November 29, 2018


  • अचूकतेची चाचणी

    गॅलिलिओनं सोळाव्या शतकाच्या अखेरीस, पिसा इथल्या झुकलेल्या मनोऱ्यावरून केलेला एक कथित प्रयोग सर्वपरिचित आहे. या प्रयोगात गॅलिलिओनं वेगवेगळ्या वजनाचे दोन गोळे पिसाच्या झुकलेल्या मनोऱ्यावरून खाली टाकले व हे गोळे जमिनीवर पोचायला लागणारा वेळ मोजला

      November 12, 2022


  • रेल्वेचे प्रवासी डबे

    ज्या रेल्वेनं आपण प्रवास करणार, त्या गाडीचा प्रवासी डबा हा प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आज सुखसोयींनी युक्त डबे सर्वत्र उपलब्ध आहेत, पण सुरुवातीच्या काळातले रेल्वेचे डबे फारसे आरामदायी नव्हते. अगदी इंग्लंडमध्येदेखील सुरुवातीला रेल्वेचा प्रवास अतिशय खडतर असाच होता. थंड हवामान, लवकर पडणारा अंधार, त्यांतच डब्यातील सोयी अगदीच जुजबी होत्या. थंडीने प्रवासी गारठून जात. काही प्रवाशांजवळ मेणबत्त्या असत. त्या मिणमिणत्या उजेडात प्रवास करणं हे एक दिव्यच असे. प्रवास संपल्यावर हालअपेष्टांतून सुटका झाल्याचा आनंद प्रवासी अनुभवत.

    भारतात रेल्वे प्रथम सुरू झाली तेव्हा आयताकृति लाकडी खोक्यांसारखे डबे चाकांवर बसविलेले असत. मधल्या भागात आडव्या, पाठ नसलेल्या लाकडी फळ्या बसण्यासाठी असत, काही डब्यांना छप्परही नसे; त्यामुळे ऊन, वारा, पाऊस, गारठून टाकणारी थंडी व गाडीला बसणारे प्रचंड धक्के हादरे, अशा दिव्यातून २४ ते ३६ तास प्रवास चाले. जवळजवळ पहिली ४० वर्षे तिसऱ्या वर्गाला स्वच्छतागृहांची सोय नव्हती. काही ठरवीक तासांनी उजाड प्रदेशात गाडी टॉयलेटसाठी थांबविण्यात येई. पुढे प्रवाशांची गर्दी इतकी वाढत चालली, की काही वेळा उघड्या ट्रकसारखे मालगाडीचे डबे प्रवाशांना नेण्या-आणण्यासाठी उपयोगात आणले गेले. काही गाड्यांना सन १८६२ मध्ये दोन मजली डबे जोडण्यात आले. असेच डबे मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस व बलसाड एक्सप्रेससाठी अगदी सन १९९० सालापर्यंत वापरले गेले. इ.स. १८७४ मध्ये तिसऱ्या वर्गाहून खालच्या दर्जाचे चौथ्या वर्गाचे डबे तयार करण्यात आले. या वर्गामध्ये बसण्यासाठी लाकडाचं फळकूटसुद्धा नसे. डब्यात खालीच उकिडवं बसून लोक प्रवास करीत. तरीही जनतेचं रेल्वेवरील प्रेम काकणभरही कमी झालं नव्हतं. पुढे सन १८८५ मध्ये टेकून बसता येईल असं बाक डब्यात आलं. चौथा वर्गच बाद झाला. पहिला, इंटर आणि तिसरा वर्ग अशी तीन वर्गात विभागणी झाली.

    सन १९२२ मध्ये इंग्लंडमधून लोकल गाडीकरता स्टीलच्या सांगाड्याचे डबे आयात करण्यात आले. पहिल्या वर्गाचे डबे मात्र प्रथमपासूनच इतके अलिशान होते, की अशा त-हेचे डबे इंग्लंड अमेरिकेतील गाड्यांनासुद्धा नव्हते. अशा डब्यांमधून बडे इंग्लिश राज्यकर्ते सोबत अनेक नोकरांना दिमतीला घेऊन प्रवास करत असत. डब्याला उत्तम आडव्या खिडक्या असत. आडवं झोपून बाहेरचं सौंदर्य आरामात पाहत त्यांचा प्रवास सुखकर होई. उन्हाळ्यात वाळ्याचे पडदे व मधल्या स्टेशनवर बर्फाच्या लाद्या डब्यात चढविल्या जात असत.

    पुढे सन १८७० पासून रात्रीच्या वेळी प्रवाशांबरोबर तेलाच्या चिमण्या असत. नंतरच्या काळात गॅस बत्त्यांची सोय करण्यात आली.

    सन १९०२ मध्ये जोधपूरच्या महाराजांनी आपल्या संस्थानातील रेल्वेच्या डब्यात विजेच्या दिव्यांची सोय केली. १९०७ सालापासून भारतातील प्रमुख मार्गांवरील गाड्यांच्या डब्यात विजेचे दिवे चमकू लागले. १९४७ सालापासून स्टीलची चौकट डब्यांना दिली गेली. त्याला 'सिल्व्हर अॅरो' या नावानं संबोधलं जाऊ लागलं. एका डब्यातून दुसऱ्या डब्यात अंतर्गत जाण्यासाठी Vestibule म्हणजे दोन डब्यांना जोडणारे चिंचोळे मार्ग आल्याने गाडी चालू असताना एका डब्यातून पलीकडच्या दुसऱ्या डब्यात जाणं शक्य झालं. सन १९३६ मध्ये पहिले वातानुकूलीत डबे अति-महत्त्वाच्या गाड्यांना लावण्यास सुरुवात झाली. हे डबे म्हणजे फिरते महालच होते. हळूहळू अशा डब्यांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. परिणामी, रेल्वेने ३ टायर, २ टायर व फर्स्ट क्लास वातानुकूलित डबे लावण्याचा निर्णय घेतला. स्लीपर कोचनं तर इतकी क्रांती केली, की सामान्य माणूसही साध्या स्लीपर कोचनं प्रवास करू लागला.

    'राजधानी', 'गरीब रथ', 'दुरांतो' यांसारख्या संपूर्ण वातानुकूलित डबे असलेल्या गाड्या सुरू झाल्या. ४ ते ५ तासांच्या प्रवासाकस्ता आरामात बसून जाता येईल अशा वातानुकूलित ‘शताब्दी', 'इंटरसिटी एक्सप्रेस' याही गाड्या आल्या. डब्यांची आकर्षक बांधणी व विविध रंगसंगती असलेल्या अनेक गाड्या दिमाखात धावू लागल्या.

    -डॉ. अविनाश वैद्य

      August 20, 2022


  • बागुलबुवा महागाईचा

    ध्या भारतात चर्चा केवळ महागाईची आहे. विरोधी पक्षांना महागाईच्या रूपाने आपल्या तलवारी पाजळण्यासाठी चांगला मुद्दा मिळाला आहे आणि तिकडे सरकारही प्रचंड अस्वस्थ आहे. महागाई सध्या राष्ट्रीय संकट ठरले आहे.

      April 13, 2008


  • पुष्पक विमान – कर्नुल परिसर – आंध्र प्रदेश

    हे निसर्ग निर्मित पुष्पक विमान इथे गेली शेकडो हजारो वर्ष आहे …. दक्खनच्या पठारावर किती पावसाळे … वादळं आली आणि गेली. पण हे नैसर्गिक पाषाणशिल्प मात्र आहे तसंच आहे … इकडे येणाऱ्या प्रवाश्यांची नजर गेली आणि त्यांना या पाषाणशिल्पातलं दैवी अप्रूप दिसलं तर मात्र ते दिग्मूढ होऊन जातात

      September 9, 2018


  • रंग चिकित्सा – लेखांक ८ वा – पूर्वा भाद्रपदा नक्षत्र

    रंग चिकित्सेत पूर्वाभाद्रपदा या नक्षत्र विषयी आपण माहिती घेऊ. नक्षत्र मालेतील २५ वीनक्षत्र जागा पूर्वाभाद्रपदा ची आहे. या नक्षत्राचे आकाशात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रात्री नऊ ते अकरा या वेळेत दर्शन होते. डोक्यावर दिसते आपल्या या नक्षत्राचे पहिले तीन चरण कुंभ राशीत आहेत तर पुढील एक चरण मीन राशीत आहे. म्हणजे कुंभ आणि मीन या दोन्ही राशींसाठी शीतरंग योजलेले आहेत.

      December 30, 2018


  • कारगिल विजय दिवस

    कारगिल विजय दिवस

    आजचा दिवस हा सच्च्या भारतीयांच्या कधीही विस्मृतीत जाणार नाही. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस अभिमानास्पद ठरला आहे. आज दिनांक २६ जुलै २०२०! २१ वर्षं पूर्ण झाली त्या विजयश्रीला मिळवून. म्हणा ती विजयश्री मिळवणं सोपं नव्हतं , त्यासाठी शेकडो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली समर यज्ञात!

      July 26, 2020


  • जागतिक गुलाबजाम दिवस

    मुघल बादशहा शहाजहानच्या दरबारी असलेल्या एका शाही आचाऱ्याने पारशी आणि तुर्की मिष्ठानांच्या आधारावर काही स्थानिक हलवाईंच्या मदतीने गुलाबजामची निर्मिती केली होती.

      October 10, 2021