वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
२६ मार्च १९६३ या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी मंदारमाला हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते.
March 26, 2021
आपल्यापेक्षा उच्च पातळीवर असलेल्या कशाहीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा नैसर्गिकपणे आपण गृहीत धरलेले असते- ते काहीतरी गुह्य,गूढ असते आणि कदाचित अज्ञातात (आपल्या आकलनाच्या परिघापलीकडे) अस्तित्वात असू शकेल, जेथे आपले विचार पोहोचू शकत नाहीत. कदाचित म्हणूनच आपल्याला अध्यात्माचे आकर्षण वाटत असेल.
March 9, 2023
या ओळी निव्वळ वाचल्या तरी समजतात. कारण ते शब्द समाजाच्या भट्टीतून आले आहेत. कोठेही आढेवेढे, जड शब्द, गूढ भाव असं काही काहीच त्यात नाही. व्यसनांनी ‘बहकलेल्या’ समाजाला त्या गर्तेतून बाहेर काढून देवघराकडे ओढत नेणारा आध्यात्मिक भाव सामान्यांना सहज कळावा, त्या भावांमध्ये तो लोटपोट व्हावा म्हणून शब्द सहज सुचतात. ते वाचा आणि सुधारणा करा…
May 9, 2024
कालच ‘दै. महाराष्ट्र टाईम्सचे’ संपादक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक गोविंदराव तळवलकर यांचे अमेरिकेत निधन झाले. ‘मटा’चे ते माजी संपादक असले तरी माझ्या मनात मटा म्हणजे गोविंदराव हे समिकरण पक्क बसलंय व म्हणून मी सुरूवातीला त्यांचा उल्लेख ‘मटाचे संपादक’ असाच केलाय.
March 24, 2017
हा चित्रपट काढण्यास राजकपूर यांना प्रवृत होण्यास एक कॉमिक जबाबदार आहे. राजकपूर नेहमी आर्ची कॉमिक्स वाचत असत, एक दिवस ते कॉमिक वाचत असताना त्यांतील एक संवाद त्यांना वाचण्यास मिळाला तो होता ‘यू आर टू यंग टू फॉल इन लव’ – ये उम्र नहीं है प्यार की. हा संवाद वाचून त्यांच्या डोक्यात वीज चमकल्या सारखे झाले व बॉबीची कल्पना आली.
September 28, 2021

मडगाव (गोवा) येथून, ‘गोमन्त कालिका’ नावाचं मासिक प्रसिध्द होतं. त्यात दैवज्ञ ब्राम्हण समाजाची खूप माहिती प्रसिध्द होत असते. जगन्नाथ अुर्फ नाना शंकरशेट आणि नाथमाधव (द्वारकानाथ माधव पितळे, १८८२ ते १९२८ .. केवळ ४६ वर्षे) या दोन व्यक्ती, दैवज्ञ ब्राम्हण समाजातल्या सुप्रसिध्द व्यक्ती समजल्या जातात. या मासिकात मला, खूप मराठी ‘कर’ भावी आडनावं आढळली. तसेच मुलांमुलींचीही, नादमधूर नावं आढळली. दैवज्ञ म्हणजे दैव-ज्ञ … दैव .. नशीब जाणणारे असा अर्थ होतो.
August 23, 2025
हे फळ जरी भारतीय नसले तरी त्याने आपल्या स्वयंपाक घरात एक महत्त्वाचे स्थान त्याने प्राप्त केले.असा कुठलाही पदार्थ नाही ज्या मध्ये आपण ह्याचा वापर करत नाही भाजी असो,आमटी असो,उसळ असो किंवा भाजी असो टाॅमेटो घातला की त्या पदार्थांची चव भलताच वाढते.
तसेच आता टाॅमेटो चटणी,सलाड,साॅस,केचअप तसेच बरेच चाटचे पदार्थ ह्यात हा हमखास वापरला जातो.तर असे लाल बुंद टोमॅटो सुप करायला देखील वापरतात.
खरोखरच ही भाजी दिसायला फारच आकर्षक असते.तो कच्चा खायला देखील छान लागतो.आणी मुख्य म्हणजे आपण ह्याची लागवड आपल्या बागेत करू शकतो.कारण ह्याचे झुडूप असते व त्याला हि फळे लागतात.
कच्चा टोमॅटो हिरव्या रंगांचा असतो चवीला आंबट असून थंड गुणाचा व तिन्ही दोष दुषित करणारा असतो.तर पिकलेला टोमॅटो हा लाल रंगांचा व थंड गुणाचा असून वातपित्तनाशक व कफकर असतो.
चला आता ह्याचे औषधी गुणधर्म पाहूयात:
१)मांसाहार केल्यावर त्या सोबत पिकलेला टोमॅटो खावा म्हणजे छातीत होणारी जळजळ,तहान लागणे,पोटातील जड पणा कमी होतो.
२)नीट पथ्य पाळून ज्या व्यक्तीला शरीरातील अनावश्यक चरबी कमी करायची असेल त्यांनी रोज पिकलेला टोमॅटो १००-२०० ग्राम खावा.
३)कोरडा खोकला,दम,थकवा,छातीत दुखणे ह्यात १ कप टोमॅटोचा रस+१ चमचा हळद पुड+ २ चमचे खडीसाखर हे मिश्रण रोज सकाळी प्यावे.
४)अजीर्ण,पोटफुगणे,चिकट पातळ संडास होणे,भुक न लागणे ह्यात १ कप टोमॅटो रस+१/४ चमचा मिरपुड+४ चिमूट हिंग+१/४ चमचा काळे मीठ हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे व दुपारी हलके जेवावे व रात्री उपवास करावा.असे १-३ आठवडे करावे फायदा होतो.
५)मन व शरीराचा थकवा,झोप शांत न येणे,तोंड कडू होणे,उल्टी होईल असे वाटणे ह्यात १ ग्लास टोमॅटो रस त्यात २ चमचे खडी साखर घालून रोज संध्याकाळी ४-५ च्या दरम्यान प्यावा ह्याने शरीर व मन ताजे तवाने व्हायला मदत होते.
६)गर्भवती स्त्रीने रोज खडीसाखर घालून टोमॅटोचा रस प्यावा त्यामुळे पोट साफ रहाते,थकवा कमी होतो व बाळंतपणा नंतर दुध चांगले सुटते.
कच्चा टोमॅटो कधीच खाऊ नये तसेच टोमॅटो वापरावा पण बिया काढुन.कारण जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर तो टोमॅटोच्या बियांनी वाढतो.
अतिमात्रेत टोमॅटो खाल्ल्याने पोट बिघडते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
द के. डी. सिंग बाजू स्टेडियम हे भारतातील लखनौ शहरात आहे. हे मैदान हॉकीचे मैदान म्हणूनही ओळखले जाते. प्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू के. डी. सिंग यांचे नाव या मैदानाला देण्यात आलेले आहे.
July 17, 2023
गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांची एक गोष्ट
July 9, 2017
कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा.
January 10, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti