(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नाविन्य शोधणं म्हणजेच ‘जगणं’

    वाढत्या वयाबरोबर जीवनातील अनेक झंझाटांत आपण इतके गुरफटून जातो की नविनाचा शोध घ्यायला आणि रोजच्या झालेल्या गोष्टीतलं नावीन्य जाणवून घयायला आपल्या डोळ्यांना आणि कानांना फुरसदच नसते..

      November 27, 2016


  • विविध क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला

    कर्तृत्व गाथा

    १. इंदिरा गांधी
    भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला

    २. विजयालक्ष्मी पंडीत
    संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)

    ३. सी. बी. मुथम्मा
    पहिली महिला राजदूत

    ४ . सरोजिनी नायडू
    पहिली महिला राज्यपाल. (उत्तरप्रदेश)

    ५. सुचेता कृपलानी
    पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)

    ६. राजकुमारी अमृत कौर
    पहिली महिला केंद्रीय मंत्री

    ७ . सुलोचना मोदी
    पहिली भारतीय महिला महापौर

    ८. सावित्रीबाई फुले
    पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका

    ९. फातिमाबिबी मिरासाहेब
    भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)

    १०. कार्नेलिया सोराबजी
    पहिली भारतीय महिला बॅरिस्टर

    ११ . हंसाबेन मेहता
    भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)

    १२. मदर टेरेसा
    नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)

    १३. अरूंधती रॉय
    बुकर पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)

    १४. भानू अथय्या
    ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला

    १५. मंजुळा पद्मनाभन
    पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)

    १६. डॉ. आनंदी गोपाळ जोशी
    विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर

    १७. कमला सोहोनी
    केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ

    १८. किरण बेदी
    पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)

    १९ . कल्पना चावला
    अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)

    २० . बच्चेंद्री पाल
    एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)

    २१. संतोष यादव
    दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक

    २२ . करनाम मल्लेश्वरी
    ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल

    २३ . आरती साहा
    इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू

    २४ . कॅप्टन चंद्रा
    पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला

    २५. संगीता गुजून सक्सेना
    युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर

    २६. उज्ज्वला पाटील-धर
    शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला

    २७. डॉ. अदिती पंत
    अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ

    २८ . सुरेखा यादव-भोसले
    आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर

    २९. देविकाराणी रौरिच
    दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)

    ३०. रिटा फारिया
    पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)

    ३१ . सुष्मिता सेन
    पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)

    ३२ . डॉ. इंदिरा हिंदुजा
    टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर

    ३३ . इंदिरा चावडा
    भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी

    ३४. शीतल महाजन
    पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला

    -- मराठीसृष्टी टिम

      April 21, 2016


  • दिवाळीत जपू या सामाजिक भान

    दिवाळी म्हणजे अक्षय्य आनंदाचा सण. असा सण जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये आढळत नाही. कालपरत्वे हा सण साजरा करण्यात काही बदल होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न सुरू झाल्याने दिवाळीचा सण हळूहळू का होईना नवे रूप धारण करत आहे. फटाके फोडणे कमी करून, खरेदीप्रसंगी गरजूंना मदत करून आणि खाद्यपदार्थांऐवजी दिवाळी अंकांची देवाणघेवाण करून आपण नव्या प्रथांना जन्म दिला पाहिजे.

      November 8, 2018


  • डिक्शनरी आणि डिरेक्टरी

    डिक्शनरी आणि डिरेक्टरी आता नामशेष होण्यातच जमा आहेत. आजची e -पिढी गुगल वरच त्यांचे अर्थ सर्च करेल. पण आमचे हे संपर्क आणि शब्दांचे ब्राउझर आठवणींच्या ट्रंकेतला एक कोपरा व्यापुन विराजमान राहतील.

      August 24, 2023


  • वणीची सप्तशृंगी

    महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणी गावानजीक सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. या गडाला म्हणजे डोंगराला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तशृंग अथवा वणीचा डोंगर म्हणतात. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी वृक्षाने बहरलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणीत असता त्यातला एक शिलाखंड जिथे पडला तोच हा सप्तशृंगीचा डोंगर आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.

      June 6, 2025


  • आयपॅड

    आयपॅड हा प्रकार अमेरिकेत अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. आयपॅड याचा अर्थ टॅबलेट कॉम्प्युटर असा आहे. ‘टाइम’ मासिकाने आयपॅडची निवड २०१० या वर्षातील पन्नास सर्वोत्तम शोधात केली आहे.

      September 21, 2023


  • शिंका येणे

    सकाळ उगवते तीच मुळी शिंकांनी. सटासट. उसंतही घेऊ न देता शिंका येतात. दहा-बारा शिंका येऊन पुरते बेजार व्हायला होते. ही वेळ कधीही येऊ शकते. एखादी महत्त्वाची बैठक सुरू आहे, तेवढ्यात शिंका सुरू. या शिंका येतात, ऍलर्जीमुळे.

    ऍलर्जीमुळे "सायनस‘चा त्रास कसा सुरू होतो?

    सायनस म्हणजे नाकाभोवतीच्या हाडांमध्ये असणारी पोकळ जागा. या पोकळीचे तोंड नाकात उघडते. नाकामधील आंतरत्वचेला ओलावा आणण्यास "सायनसेस‘ एक ते दीड लिटर स्राव तयार करतात; परंतु सायनसची वाट किंवा तोंड (नाकात सूज आल्यामुळे) बंद झाल्यास सायनसमधील स्राव बाहेर पडू शकत नाही. स्राव साठल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन सायनसचे "इन्फेक्शसन‘ होते. ही सूज मूलतः ऍलर्जीमुळे येते, त्यामुळे डोके दुखणे, चेहेरा व डोके जड होणे, थकवा येणे, दिवसभर निरुत्साही वाटणे, कामावरील तसेच अभ्यासातील एकाग्रता कमी होणे व शारीरिक चलनवलन कमी होणे ही लक्षणे आढळतात.

    अनेक वर्षांचा त्रास असल्यास त्याचे परिवर्तन परत परत होणाऱ्या अथवा ऱ्हिनोसायन सिटीस मध्ये होऊ शकते. काही लोकांमध्ये सर्दी दाटून पोलिप तयार होतात व सर्व प्रकारचे वास येणे बंद होते, औषधांमुळे सायनस इन्फेक्श न दूर न झाल्यास दुर्बिणीद्वारा अगदी अलगदपणे ही सायनसची तोंडे उघडता येतात; पण काही कालावधीनंतर ऍलर्जीचा कायम स्वरूपी उपचार न केल्याने ती पुन्हा बंद होऊ शकतात. सर्दीच्या योग्य उपायांमुळे सायनस मोकळे राहते व परत परत सायनसच्या इन्फेक्शतनची शक्यचता कमी होते.

    ऍलर्जी म्हणजे काय?

    प्रतिकारशक्तीचे मुख्य काम म्हणजे विविध जंतूविरुद्ध शरीराचे संरक्षण करणे. याकरिता आपल्या प्रतिकारशक्तीने शरीराला धोका निर्माण करणाऱ्या व धोका न निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. ऍलर्जी म्हणजे निसर्गामधील घटकांना शरीराने दिलेला अनैसर्गिक प्रतिसाद होय. हा असा प्रतिसाद शरीराला घातक ठरू शकतो. कारण या घटकांना प्रतिपिंड (antibody) तयार होऊन हिस्टामाईन नावाचे द्रव्य तयार होते.

    ते कसे शोधून काढायचे?

    तपासणीसाठी त्वचा सर्वांत उपयोगी पडते. ऍलर्जीची औषधे चालू नसल्यास त्वचेची चाचणी रक्ताच्या तापसणीपेक्षा चांगले निष्कर्ष देते. ऍलर्जी वरील कायमस्वरूपी उपचाराला "इम्युनोथेरपी‘ असे म्हणतात.

    इम्युनोथेरपी म्हणजे काय?

    या उपायांमध्ये ऍलर्जीच्या प्रतिपिंडांना प्रतिबंध केला जातो. हिस्टामाईन हे द्रव्य ऍलर्जीचे माध्यम समजले जाते. हिस्टामाईन विरुद्ध काम करणारी औषधे फक्त ऍलर्जीची लक्षणे थांबवतात. ऍलर्जी होण्याकरता झालेल्या परिणामांचा प्रादुर्भाव थांबवू शकत नाहीत.

    इम्युनोथेरपीमध्ये ऍलर्जीचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाते. मग शरीराचा बाह्य ऍलर्जीनिक द्रव्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक ते पाच वर्षे ज्या रुग्णांनी हा उपचार केलेला आहे, त्या रुग्णांमध्ये याचे दीर्घकाळ फायदे आढळून येतात. प्रत्येक रुग्णामध्ये हा उपाय पूर्णतः लागू होईलच असे नाही; पण हा उपचार केल्यास ऍलर्जीमुळे होणारा त्रास कमी होतो किंवा औषधाची गरज कमी भासते. जे रुग्ण ठराविक द्रव्याची ऍलर्जी असूनसुद्धा त्यांना टाळू शकत नाहीत किंवा ज्यांना औषध घेऊनसुद्धा ऍलर्जीचा त्रास होत आहे. त्यांनी हा उपचार अवलंबावा यामुळे ते दैनंदिन जीवन सुखाने जगू शकतील. खाद्य पदार्थांच्या किंवा औषधांच्या ऍलर्जीसाठी मात्र हा उपाय अतिशय अवघड आहे. ऍलर्जीवर काम करणारा प्रतिबंधात्मक उपाय हा विशष उपचार केंद्रात (स्पेशल क्लिननिक)मध्ये केला जातो. नाक, सायनस, श्वारसनलिकेच्या ऍलर्जीमध्ये हा नक्कीच उपयोगी ठरतो. जिभेच्या खाली याची लस देता येते. हळूहळू लसीचे प्रमाण वाढवले की ऍलर्जीचा त्रास कमी होतो. त्रास देणारी द्रव्ये शरीरात असूनसुद्धा प्रतिपिंड निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ (antigen) व प्रतिपिंड यांचा त्रास होत नाही. हिस्टामिन हे द्रव्य तयार न झाल्याने ऍलर्जीचे परिणाम दिसत नाहीत.

    संजीव वेलणकर पुणे.
    9422301733
    संदर्भ:- सकाळ / डॉ. विनया चितळे

      January 2, 2017


  • गुरू एक जगी त्राता

    आमच्या गोपुजकर बाईंना या जगातून जाऊन साडेतीन महिने उलटले. कोरोना येण्याच्या आधी एक वर्षापूर्वी झालेली त्यांची पुनर्भेट अगदी आजही विसरली जात नाही.

      September 7, 2022


  • फेसबुक, अश्लीलता आणि माझं ब्लाॅक केलं गेलेलं फेसबुक खातं !

    घट्ट स्लॅक आणि टाईट कुर्ता घातलेली, चालती-फिरती आधुनिक जिवंत ‘शिल्पं’, त्या प्राचिन दगडी शिल्पांचीच आठवण करून देतात. अश्या समाजमान्य कपड्यांत, हाफ आणि क्वार्टर पॅन्टीत किंवा बिकीनीत काढलेले फोटो बिनधास्त फेसबुकवर शेअर केले जातात, त्यात कुणाला वावगं, अशिष्ट, अश्लील असं काहीच वाटत नाही. फेसबुकलाही वाटत नाही.

      July 21, 2017


  • साउथ आफ्रिका – भाग ५

    कालपर्यंत, मी व्हाईट लोकांच्या एका विशिष्ट राहणीबद्दल लिहिले. वास्तविक सगळे गोरे काही श्रीमंत नसतात. मी तर किती तरी गोरे लोक, रस्त्यावर भीक मांगताना पहिले आहेत. एक गोष्ट मात्र विशेषत्वाने लिहायची व ती म्हणजे, त्यांच्या रक्तातच गुण आहे की त्यांचे वेगळे रसायन आहे, ते कळणे अवघड आहे, पण एकूणच बहुतेक सर्व गोरे फार अभिमानी आणि गर्व राखणारे असतात.

      August 27, 2018