(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुवर्णप्राशन संस्कार

    आयुर्वेदातील ‘सुवर्णप्राशन संस्कार’ हा हिंदुस्थानच्या ‘राष्ट्रीय लसीकरण’ मोहिमेचा भाग व्हायला हवा. आयुर्वेद हे या राष्ट्राचे पर्यायी नव्हे तर प्रमुख वैद्यकशास्त्र आहे. उत्तम रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचाच आधार घ्यावा लागेल.

      August 23, 2016


  • भारतीय शेतीची नवी दिशा सेंद्रीय की जनुकीय?

    ीकाही वर्षे दाखविलेल्या चमत्कारानंतर आता हरितक्रांतीचे पितळ उघडे पडले आहे. गेल्या 5 वर्षांपासून अन्नधान्याच्या उत्पादनात कुठलीही वाढ दिसून येत नाही. विशेषत: ज्या भागात सिंचनाच्या सुविधेमुळे हरितक्रांती यशस्वी झाल्याचा दावा केल्या जात होता तिथेच जमिनीची उत्पादकता ढासळल्यामुळे आता हरितक्रांती वाढणाऱ्या लोकसंख्येला पोसू शकेल का, हा प्रश्न सर्व विचारवंतांना पडला आहे.

      October 16, 2005


  • चहा बनवण्याची सोपी व शात्रीय पद्धत

    चहाचे शास्त्रीय नाव कॅमेलिया सिनेन्सिस आहे. तसेच या वनस्पतीच्या पाने व पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून चहा हे पेय बनते.. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते.

    पाण्यानंतर हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा म्हणतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशीच नावे असल्याचे दिसते. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टी हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण, चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं, की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो.
    एकोणीशे चाळीस च्या दशका पर्यंत भारता मद्धे सकाळी चहा पिण्याची पद्धत नव्हती. त्याऐवजी लोक लिंबू पाणी प्यायचे. मित्रांना आमंत्रण देतानाही लिंबू पाणी पिण्यासाठी या असे असायचे.

    नंतरच्या काळात ब्रिटिश लोकांनी दक्षिण भारत व ईशान्ये कडे डोंगरउतारावर चहाची लागवड सुरु केली. तो चहा खपवण्या साठी त्यांनी लोकांना चांगल्या प्रकारे प्रलोभन दाखवून भारतीयांना चहाची सवय लावली. आमच्या लहान पणी आठवडे बाजारात लिप्टनचा चहाची टांग्यामधून जाहिरात करणारे एजंट यायचे व लोकांना फुकट चहा पावडर वाटायचे. अशा प्रकारे लोकांना सवय लावून नंतर विक्री करायचे.

    जगामद्धे नाही तरी भारतात चहाचे असंख्य प्रकार आहेत. त्यातील काही मुख्य प्रकार असे आहेत

    १. बदाम पिस्ता चहा, २. बिरयानी चहा, ३. गुलाबी चहा, ४. ईराणी चहा, ०५. आसाम चहा ०६. दार्जिलिंग चहा ०७. निलगिरी चहा ०८. तंदुरी चहा. ०९. कहवा काश्मिरी चहा.१० चॉकलेट चहा ११. कोल्हापूर कडील बासुंदी चहा १२. इराण्यांचा मस्का बन टी १३. ब्रिटिश लोकांचा हाय टी (खारी व बेकरी पदार्था बरोबर)

    अलीकडे कोविड महामारीत प्रसिद्धीस आलेले, मसाला टी, मालेगावचा काढा चहा, गवती चहाची पाने, तुळस वगैरे टाकून केलेला औषधी चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी इत्यादी.

    चहा तयार करण्याच्या पद्धती:

    चहाच्या पत्तीमद्धे टॅनिन नावाचे रसायन असते. पत्ती उकळत्या पाण्यात टाकली कि त्यातील टॅनिन पाण्यामद्धे उतरते.त्याची चव तुरट-तिखट असते. या रसायनामुळे मेंदूला तरतरी येते व त्याची सवय लागते. ब्रिटिश लोक चहा कोरा बिनदुधाचा घेतात. पण भारतीय लोकांना दूध व पत्ती घालून केलेला चहा आवडतो.

    चहाची चव हि पत्ती कितीवेळ उकळत्या पाण्यात आहे व त्यात किती प्रमाणात दूध घातले जाते यावर अवलंबून असते.काहींना कडक चहा आवडतो असा चहा उकळत्या पाण्यात बराच वेळ ठेवला जातो त्यामुळे त्यात ज्यास्त टॅनिन उतरते व चहा कडक बनतो.

    चहापत्तीची गुणवत्ता देखील चांगला चहा बनवण्यास कारणीभूत असते. त्यामुळेच बाजारात चहापत्तीचे विविध ब्रँड उपलब्ध आहेत. जो तो आपल्या आवडीप्रमाणे चहापत्ती वापरतो. सर्वात महाग व उत्कृष्ट चहा हा दार्जिलिंगचा मानला जातो.

    अनेकांना चहाशिवाय चैन पडत नाही. काही जण आळस घालवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी आवर्जून चहा पितात. तसंच बरेच जण दिवसाची सुरुवात चहाने करतात. विशेषतः विद्यार्थी वर्ग रात्री अभ्यास करताना हुशारी येण्यासाठी व झोप घालवण्या करता चहा घेतात. दिवसाची सुरुवात मनाजोग्या चहाने केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असाही काहींचा समज असतो; मात्र हाच चहा सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं चहा बनवतो. त्यामुळे चहाची चवसुद्धा वेगवेगळी असते.

    चहात केवळ चार गोष्टी वापरल्या जातात. प्रत्येक जण आवडीनुसार वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून चहा तयार करत असल्याने चव वेगवेगळी लागते. कोणी साखर वापरून, तर कोणी गुळाचा वापर करून चहा बनवतो. तसंच यामध्ये दूध टाकून किंवा बिनदुधाचाही चहा बनवला जातो.

    आपल्या, तसंच मित्र किंवा नातेवाईकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवला जातो; पण चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती, तो कसा बनवायचा याची खास माहिती/ पद्धत सांगणार आहे. चहा विविध प्रकारे तयार केला जातो. प्रत्येकाची चहा बनवण्याची एक खास पद्धत असते. तसंच प्रत्येकाची चहा उकळण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. दूध किंवा दुधाशिवायही चहा बनविला जातो. बिनदुधाचा चहा आरोग्यास चांगला असतो; मात्र आपल्याकडे दुध घालून बनवलेला चहा सर्वांत जास्त प्रमाणात प्यायला जातो.

    चहा बनविताना चुकीची पद्धत वापरणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे चहाची चव बिघडते. बरेच जण आधी दूध उकळून मग त्यामध्ये पाणी, चहा पावडर घालतात. ही चुकीची पद्धत आहे. यात बराच वेळ दूध उकळावं लागतं. गॅस जास्त लागतो. सर्वांत शेवटी चहा पावडर घालणंही चुकीचीच पद्धत आहे. चहा चांगला उकळावा लागतो. तसं केलं, तर कमी चहा पावडर वापरूनही चहाला चांगली चव आणि गंध मिळतो.

    ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशनने (BSI) वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने चहा करण्याची पद्धत सांगितली आहे. चहाचे भांडे हे नेहमी स्टीलचे किंवा पितळेचे असावे. या पद्धतीत एका स्टील किंवा पितळी भांड्यामध्ये फक्त दूध उकळवावं. चमच्याने ते ढवळत राहावं. दुसऱ्या भांड्यात चहासाठी पाणी गरम करायला ठेवावं. पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण एकसमान असावं. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये चहा पावडर घालावी. चहा पावडर साखरेच्या प्रमाणापेक्षा थोडी कमी असावी. त्यानंतर चहाला चांगली उकळी येऊ द्यावी. साखर चवीनुसार घालावी. कांही लोक चहा पाण्यामध्ये न उकळवता मुरवत ठेवतात. त्यानंतर आवडीनुसार चहात आलं, लवंग, मिरपूड यांपैकी काही घालायचं असेल तर घालू शकता. चहात आले कुटून घालताना चहाचे तापमान थोडे कमी होऊ द्यावे नाहीतर दूध नासते. त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये उकळायला ठेवलेलं दूध चहामध्ये घालावं. त्यानंतर मात्र चहा जास्त वेळ उकळू किंवा मुरुवू नये.
    अशी ही चहा बनवण्याची खास पद्धत आहे. विशेष म्हणजे जुन्या शहरांमध्ये बरीच वर्षं चहा विकणारे अमृततुल्य विक्रेतेसुद्धा चहा बनवण्यासाठी हीच पद्धत वापरतात. ही पद्धत तुम्हीही नक्की वापरून पाहा. ह्यात पण तुम्ही छोटा मोठा बदल करून तुम्हास आवडणाऱ्या चवीचा चहा बनवू शकता.
    चहा हे पृथ्वीवरील अमृत समजले जाते व ते प्राशन करण्यासाठी एवढा सोहळा केलाच पाहिजे ना?

    सध्या ह्या व्यवसायात उच्च शिक्षित तरुण पण उतरले आहेत. ते वेगवेगळे प्रयोग करून स्वतःचा चहाचा ब्रँड निर्माण करतात. त्यांचा व्यवसाय पण छान चालतो. जसे कि पुण्यात येवले टी ईत्यादी.

    सावधानता : चहा हा पित्तकारक गुणधर्माचा आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी जास्त चहा घेऊ नये. साधारण पणे दिवसातून २-३ कप चहा पुरेसा असतो.

    -- डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

      October 18, 2021


  • श्री गुरुदेव रानडे प्रणित श्रीरामदासांचे भक्तिशास्त्र

    श्रीगुरुदेव रानडे यांनी रामदास वचनामृत’ हा ग्रंथ संपादित/ संग्रहित करून त्यातील निवडक ओवीवेचे काढून त्यावर सूत्रभाष्य वजा शीर्षक देऊन, तसेच त्यास विवेचक प्रस्तावना लिहून निंबरगी संप्रदायाचा आध्यात्मिक दृष्टीकोनही उलगडून दाखविला आहे. त्यामुळे ‘श्रीरामदासांचे भक्तिशास्त्र’ कळून यायला मदत होते. दासबोधातील एक अध्यात्मानिरूपणाचा ओवीबंध विशद करून दाखविला.

      April 26, 2022


  • स्मरणगाथा : ५

    धन्य होण्याचे आणि कृतकृत्य होण्याचे, गुरू ऋण अंशतः फेडण्याचे योग आयुष्यात अपवादानेच येतात. असे योग माझ्याही आयुष्यात आले. ज्यांनी माझ्या वाङ्मयीन कारकिर्दीला आशीर्वाद दिला , त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी सेवा मंडळाकडून विचारणा झाली होती .

      March 25, 2026


  • फळांचा राजा आंबा

    फळांचा राजा म्हणजे आंबा. यालाच जास्त महत्त्वाचे आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातही आंब्याचे प्रमाण वाढत आहे. खुद्द अमेरिकेत १७व्या शतकात आंबा आला. एवढेच नाही तर संबंध युरोपातही आंब्याचा विस्तार झाला. आंब्याची चव, गोडी या कारणामुळे आंब्याला राजा म्हटले जाते.

      January 19, 2024


  • जागतिक संगीत-दिन(वर्ल्ड म्युझिक डे)

    जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने पाडली. तिथे या दिवसाला फेटे डे ला म्युसिक्यू असे संबोधितात. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती. ‘युनेस्को’च्या जगभर शांती प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टातून, संगीत विशारद लॉर्ड मेहुदी मेनुहीन यांनी १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत दिवसाचा प्रारंभ केला होता, त्याचाही हेतू सर्वसामान्यांना संगीताभिमुख करण्याचा होता. त्यानुसार, १ ऑक्टोबरला १९७५ रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय संगीत-दिन म्हणून साजरा झाला होता. जगभर ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, लुक्झेम्बर्ग, जर्मनी, स्वीत्झर्लंड, कोस्टा रिका, इस्त्रायल, चीन, भारत, लेबोनन, मलेशिया, मोरोक्को, पाकिस्तान, फिलिपिन्स, रोमानिया, कोलोम्बिया या १७ देशात संगीत-दिन साजरा होतो. अमेरिकेतदेखील २००७ पासून, त्याचा प्रारंभ झाला आहे. संगीताच्या माध्यमातून, जगभर शांती पसरावी हा या दिवशीच्या साजरीकरणाचा हेतू आहे. या सोहळ्यात जे उपक्रम हाती घेतले जातात त्यात, संगीतकारांची विविध प्रकारच्या संगीताची अंत:करणे उलगडवून दाखविणारी भाषणे, कलाकारांचे परिसंवाद, संगीत स्पर्धा व कोडी, संगीताचे रेकॉर्डिंग, संगीत वाद्यांचे प्रदर्शन तसेच तत्संबंधी पेन्टिंग्स्, फलक, शिल्प, व्यक्तीरेखा, छायाचित्रे यांची प्रदर्शने शिवाय विविध देशातल्या संगीततज्ज्ञांना आमंत्रणे देऊन त्यांचे कार्यक्रम आयोजित करणे यांचा समावेश असतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      June 21, 2018


  • कुष्मांडामाता – चौथीमाळ

    सुरासम्पुर्णकलशंरुधिराप्लुतमेवच।
    दधानाहस्तपद्माभ्यांकुष्मांडाशुभदास्तुमे।।
    पूर्वी अवकाशात अंधार होता. काहीच दिसत नव्हते. अशावेळी मंद, हलकं स्मितहास्य करित मातादेवीने ब्रह्मांडाची निर्मीती केली. म्हणून सृष्टीचे आदीस्वरुप दुर्गामातेला मानले जाते. कुष्मांडा या नावाने तिची पुजा करतात. दाहीदिशांवर मातेचा प्रभाव आहे. सूर्याप्रमाणे तिचे तेज असल्याने ब्रह्मांडातील सर्वजीवमात्रांबर, प्रत्येक वस्तुंवर कुष्मांडामातेचे तेज पडते. तिच्या पुजनाने रोगमुक्ती होते. यश,बळ,शोकमुक्तता,आरोग्य प्राप्त होते. या मातेच्या रुपात मातृत्व ओसंडून वाहते. म्हणूनच अत्यल्प साधनेतूनही कुष्मांडा माता प्रसन्न होते.

    आष्टभुजा धारण केलेल्या मातेने सातपैकी एका हातामध्ये कमंडलु,मगधनुष्य,बाण,अमृतपूर्णकलश,चक्र,गदा आणि आठव्या हातात जपमाळ आहे. शुक्रवारी चौथी माळ आली. अबोली,तेरडा,अशोक,तिळाची फुले या पासून बनविलेली माळही घटाला अर्पण केली जाते. वास्तविक शुक्राचा रंग तसा पांढरा आहे.पण हा रंग आपण सोमवारी ऊपयोगात आणतो. शुक्र हा प्रेमाचा आणि भोग-विलासाचा कारक असून शुक्राचा प्रभाव आपल्या जीवनसाथीवर असतो. प्रेमाचा रंग आणि शुक्राचा रंग अनुक्रमे लाल अधिक पांढरा यांपासून गुलाबी रंग बनतो. ह्यादिवशी हा रंग कपड्यांच्या माध्यमातून वापरल्यास शुक्राची कृपा होऊन माणसाचे जीवन ऐश-आरामात व्यतीत होते. संपत्तीची वृध्दी होते. गुप्तरोगादीसमस्या दूर होण्यास मदत होते.
    यादिवशी ५ वर्षाच्या कन्येच्या रुपात माता असते. तिला रोहिणी असे नामा भिदान आहे. अशा कन्येची देवी स्वरुप मानून पूजा केल्या सराज्य पदप्राप्ती होते. यादिवशी तिला लोण्याचा नैवेद्य दाखविला जातो.

    -शुभंभवतु
    -- प्रा.गजाननशेपाळ

      October 15, 2018


  • ’पुरुष’ मराठी नाटक

    ’पुरुष’ मराठी नाटक

    आजच्या दिवशी १९८२ रोजी कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित ’पुरुष’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला होता.

    जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि मराठी रंगभूमीवर गाजलेलं 'पुरुष' हे नाटकात पुरुषी मनोवृत्ती आणि त्या मनोवृत्तीला बळी पडलेल्या एका स्त्रीची कथा पुरुष या नाटकातून मांडण्यात आली आहे. मुळातच पुरुषांमध्ये असलेला अहंकार आणि त्याला बळी पडणाऱ्या स्त्रिया यावर य़ा नाटकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलंय. नाना पाटेकर, उषा नाडकर्णी, रिमा या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने एके काळी हे नाटक खुपच गाजवलं होतं.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      September 22, 2021


  • देवपूजेतील साधन – ताम्हण

    देवपूजा करण्यापूर्वी देवांना स्नान घालण्यासाठी तांबे किंवा पितळेचे जे पसरट भांडे वापरले जाते त्याला ताम्हण असे म्हणतात. ताम्हणाचा आकार गोल असल्यामुळे ते पृथ्वीचे प्रतीक समजले जाते.

    संध्येसाठी देखील ताम्हणाचा उपयोग केला जातो. कारण संध्या ही सुर्याची उपासना असून जी आचमने केली जातात त्याध्ये दैवी शक्ती निर्माण झालेली असते.

    ताम्हणात पडलेले शक्तिशाली जल पायदळी तुडवले जाऊ नये यासाठी ते झाडाच्या मुळाशी असलेल्या मातीत टाकले जाते कारण ते पवित्र मानले जाते.

      March 20, 2016