वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
थोडक्यात अनुदान आणि मदतीच्या नावाखाली दलाल, एजंट, ठेकेदार, राजकीय कार्यकर्ते या सगळ्यांना पोसणारी एक प्रचंड यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या यंत्रणेत प्रशासकीय अधिकार्यांनाही सामील करून घेतले जाते आणि त्यात भरडला जातो तो ज्याच्या नावाखाली हा सगळा व्याप उभा झालेला असतो
May 6, 2013
अंकशास्त्रानुसार, तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्म घेता त्या जन्मतारखेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. अंकशास्त्रात १ ते ९ अंक आहेत आणि या प्रत्येक अंकाचा स्वामी एक विशिष्ट ग्रह आहे. अंकशास्त्रात (Numerology) ५ हा अंक खूप खास मानला जातो.
February 28, 2026
२०१९ च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे.
August 21, 2017
एकंदरीत भविष्य काळात अंतराळ ही देखील प्रमुख युद्धभूमी असेल हे लक्षात घेऊन भारताने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक बैठकीत देशाच्या स्वसंरक्षणासाठी ‘डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी’च्या (डीएसआरए) स्थापनेचा खूप चांगला निर्णय घेतला. ही यंत्रणा अंतराळ युद्धासाठी आवश्यक असलेली शस्त्रात्रे व त्यासंबंधीचे तंत्रज्ञान विकसित करील. या संशोधनाच्या माध्यमातून ‘डिफेन्स स्पेस एजन्सी’ला सहाय्य करण्याचे काम (डीएसआरए) द्वारे केले जाईल. आणि भारताने घेतलेला निर्णय खरोखरच स्तुत्य आणि संरक्षण दृष्ट्या आवश्यक आहे.
July 16, 2019
अनुभूतीशिवाय संबोध स्पष्टता नाही. संबोध स्पष्ट नसले की बोध होत नाही. अर्थ माहीत नसताना बऱ्याचशा वेळेला अनेक विद्यार्थी पाठांतर करतात. पाठांतर जर समजून केलं तर संबोध स्पष्ट व्हायला मदत होते. अनेक वेळा पाठांतर करून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, विद्यार्थ्यांना अर्थ विचारला असता ते निरुत्तर होतात.
June 30, 2026
ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते.
April 17, 2020
इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १८० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १८० कोटींहून अधिक लोकांचे एक कुटुंबच बनले आहे.
February 4, 2019
आज ७ ऑगस्ट, नागपंचमी
1. नाग/साप कधीही दूध पीत नाही, कारण तो सस्तन प्राणी नाही.
2. नाग जिभेने वास घेतो, त्यामुळे तो सारखी जीभ बाहेर कडून आसपास असणाऱ्या प्राण्यांचा अंदाज घेतो.
3. नाग पूर्ण मांसाहारी प्राणी आहे, तो इतर प्राण्यांची अंडी, किंवा लहान प्राणी, जसे उंदीर, बेडूक, सारडा यांना खातो.
4. त्याची स्मरण शक्ती अतिशय अल्प असते, त्या मुळे सिनेमात दाखवतात तसे नागीण बदला घेत नाही.
5. शक्यतो हा प्राणी मनुष्याला घाबरतो व लपून राहण्याचा किव्वा पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही घाबरू नका.
6. नाग कंपनाने (vibrations) सुद्धा जवळपास कोणी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गुरखा म्हणून रात्री काठी वाजवतो, साप व नागाला दूर जाण्यासाठी प्रोत्साहित करतो.
7. नागाला कान नसतात, तसेच त्याची नजर तीक्ष्ण नसते.
8. नागाने 1 बेडूक किव्वा उंदीर खाल्यास त्याला किमान 15 दिवस अन्नाची गरज नसते.
9. नागपंचमीला त्याच्या डोक्यावर हळद किव्वा कुंकू टाकू नका, यामुळे त्याला इजा होऊ शकते.
10. नागाला पुंगीचा आवाज ऐकू येत नाही, गारुडी पुंगी हलवतो, म्हणून नाग ते पाहून झडप घेऊन चावण्यासाठी स्वतः हलतो, ज्याला काही मूर्ख लोक डोलणे समजतात.
थोडक्यात सांगायचे तर हा सण बंद करावा, किव्वा त्या दिवशी सर्व शाळेत सर्प घराण्यातील जीवांची मुलांना माहिती द्यावी ज्यामुळे त्यांच्यातील भीती व गैर समज दूर होण्यास मदत होईल. 21 व्या शतकात आलो आहोत याचे भान ठेवा, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको.
आपणास कोणीही नाग सापाचे खेळ दाखवताना दिसल्यास पोलिसांना खबर द्या, त्याच्या जवळचे प्राणी जप्त करा, आणि सुजाण नागरिक आहेत हे उदाहरण देऊन सिद्ध करा.
We were country of snake charmers, now we are country of mouse charmers. Lets now work hard to rule world with mouse in hand.
पूर्ण लेख वाचल्या बद्दल, आभारी आहे
-- विजय लिमये
9326040204
August 7, 2016
Standardization is the process of developing and implementing technical standards. ग्रामीण भागाचे सर्व प्रथम standardization झाले पाहिजे होते. लाखो कोटी रुपये खर्च करूनही आम्ही जगाला आमचे एकही खेडे दाखवण्या योग्य करू शकत नाही हे सत्य नाकारू शकत नाही. घरांची रचना, त्यांच्या समोरील आंगणे, (खरेतर घरासमोरील बाग म्हणायचे होते ) त्यांची पाणी पुरवठा योजना, त्यांची मलनिस्सारण योजना या बाबत ग्रामीण भागातील एखादा सरपंच सुद्धा अनभिज्ञ आहे हि आजची परिस्थिती आहे.
मी अमेरिकेतील रूट (राउट) ६६ या त्यांच्या देशातील पहिल्या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करून तिथली खेडी पाहीली आहेत. आपल्या देशात शहरांमध्ये जागांचा तुटवडा आपण समजू शकतो पण ग्रामीण भागातील जमीनी वर्षानुवर्षे पडीक पडलेल्या असतात. घरा बाजूची मोकळी जागा अनेक ठिकाणी उकिरडा असे म्हणता येईल अशी असते.युरोप मधील अनेक खेडी जणू काही परीकथेतील जगा सारखी सुंदर दिसतात.घरांच्या रचना , रंगसंगती , सभोवताली असलेल्या बागा ,ग्रामीण भागातील रस्ते , शाळा ,चर्चेस , लहान लहान दुकाने,पाहीली की मन थक्क होते. आपल्याकडे असे गाव का दिसत नाही याचे आश्चर्य वाटत राहते.कुणी असा प्रयत्न का करीत नाही हा विचार मनात येऊन दुखः होते. नाही म्हणता अण्णा हजारे यांचे गाव याला थोडासा अपवाद समजला जाईल. पण सौंदर्य आणि स्वच्छता या बाबतीत आपण खूप मागासलेले आहोत हे सत्य नाकारता येणारच नाही.
" नगर रचना " हा प्रकारच मुळी आमच्या ग्रामीण भागात कुणालाही माहीत नाही हि परिस्थिती आहे. कुणीही कशीही घरे बांधतो ,घर समोरचा परिसर स्वच्छता न करता ठेवतो , हे पाहिल्यावर आमची मानसिकताच मुळापासून बदलणे गरजेची आहे याची प्रकर्षाने जाणीव होते.
आमचे धुरंधर राजकारणी युरोप , अमेरिकेत फिरायला जातात आणि काय बघतात हेच समजत नाही. 'ती' मंडळी जर करू शकतात तर आपण का करू शकत नाही हे मला पडलेले एक कोडे आहे. ग्रामीण भागात युरोपातील किवा अमेरिकेतील खेड्या प्रमाणे निदान एकतरी ' मॉडेल गाव ' तयार होणे गरजेचे आहे. आपल्याकडे पाणी मुबलक आहे पण नियोजन नाही , आपल्याकडे मनुष्य बळ प्रचंड आहे पण काम करण्याची मानसिकता नाही .पैसा आहे पण वापरता येत नाही. हे एकट्या दुकट्याचे काम नाही .
मोदी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी खूप चांगला प्रकल्प खासदारांना दिला आहे. सचिन तेंडुलकरांनी एक गाव दत्तक घेतले आहे.ते गाव त्यांनी खूप चांगले सजवले आहे.पण या बाबतीत फार प्रचंड वेगाने काम करण्याची गरज आहे.मग लोकसभा आणि राज्य सभेतील इतर खासदारांचे काय ? दरवर्षी किमान ७५० खेडी आम्ही का बदलू शकत नाही ? खेड्यांची सुधारणा , खेड्यांना जोडणारे रस्ते ,दळण वळणाची आधुनिक साधने हि जर प्रत्तेक खेड्यात असतील तर हा देश युरोप अमेरिकेला तोडीस तोड होण्यास काहीही हरकत नाही.
पण मागास वर्गीयांच्या साठी निर्माण केलेल्या आण्णा भाऊ साठे महामंडळातील खाल्लेल्या कोट्यावधी रुपयांच्या सुरस कथा ऐकल्यावर खूप संताप येतो. लाखो रुपयांची माया जमवण्याच्या मानसिकतेतून हा देश कधी बाहेर येणार ? तरुण पिढी समोर काय आदर्श आहे यांचा ?
यासाठी तातडीने गावांचे Standardization करण्याची नितांत गरज आहे.आमचा तरुणांना शिर्डीच्या पायी वा-या करण्यासाठी प्रोत्साहन देणारे राजकारणी नकोत. तर याच तरुणांचे बळ आणि बुद्धी देशासाठी कशी लागेल याचा विचार करणारे नेते या देशाला हवे आहेत .पायी चालत जाणारे हजारो तरुण मी जेव्हा पाहतो तेव्हा खुद्द शिर्डीच्याच साई बाबांना मला साकडे घालावेसे वाटते ..... बाबा आता तुम्हीच हे सर्व थांबवा !!!! तरुणांना देशकार्या साठी कामाला लावा !!!! स्वार्थी नेते तरुणांना आमिष दाखवून वापरून घेत आहेत .
-- चिंतामणी कारखानीस
April 9, 2016
अंतराळ पर्यटन म्हणजे गंमत म्हणून अंतराळ प्रवास. ऑर्बिटल, सबोर्बिटल आणि चंद्र स्पेस टूरिझम यासह अंतराळ पर्यटनाचे बरेच प्रकार संशोधकांच्या आणि यात काम करणाऱ्या कंपन्यांच्या डोक्यात आहेत. गेल्या काही वर्षात अवकाशात एक चक्कर मारणे शक्य झाले आहे. एका रशियन अवकाश एजन्सीने हे शक्य केले आहे.
December 31, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti