वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गेल्या दोन दशकांमध्ये चरबी कमी करण्याबद्दलचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यालाच लायपोसक्शन म्हणतात. यामध्ये चरबी कायमची कमी करता येते व शरीरालापण सुडौल बनवता येते. समाजात वावरताना स्वाभिमानाने, आत्मविश्वाासाने वागता येते. सुडौल व तंदुरुस्त शरीर हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. नियमित व्यायाम करूनही काही व्यक्तींमध्ये जास्त चरबी असते. ती कुठेही असू शकते, तर काही विशिष्ट ठिकाणीही असू शकते. बराच व्यायाम आणि डाएटिंग करूनही ही चरबी घालवता येत नाही. आनुवंशिकता हे बऱ्याच वेळा कारण असू शकते. गेल्या दोन दशकांमध्ये चरबी कमी करण्याबद्दलचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यालाच "लायपोसक्शेन' म्हणतात. यामध्ये चरबी कायमची कमी करता येते व शरीरालापण सुडौल बनवता येते. समाजात वावरताना स्वाभिमानाने, आत्मविश्वाीसाने वागता येते.
लायपोसक्शन म्हणजे काय?
कातडीखाली असलेली चरबी छोटीशी जखम करून त्यातून विशिष्ट नळीवाटे काढतात. हे दोन प्रकाराने केले जाते.
पॉवर असिस्टेड लायपोसक्सन
यात इलक्ट्रिकच्या साहाय्याने किंवा हवेच्या दाबाने विशिष्ट नळी सतत हलवत ठेवतात. त्यामुळे चरबी पातळ होते व बाहेर काढण्यास सोपे जाते.
अल्ट्रासाऊंड असिस्टेड लायपोसक्शेन
यात अल्ट्रासाऊंडच्या साहाय्याने चरबी काढली दाते. चरबी काढण्याअगोदर प्रथम सलाईन व त्याचबरोबर अड्रेनलीन टोचले जाते, ज्यामुळे रक्तस्राव कमी होतो. या प्रकाराने गाल, हनुवटी, मान, दंड, स्तन, पाठ, छाती, पोट, कंबर, बसण्याची जागा, मांडी, पायाचा खालचा भाग, घोट्याजवळची वगैरे ठिकाणची चरबी काढता येते. याच वेळी जरूर असेल तर फेसलिफ्ट, स्तनांचा आकार कमी करणे किंवा पोटाची चरबी कमी करता येते.
अपेक्षा
लायपोसक्शन हे वजन कमी करण्यासाठी ट्रीटमेंट म्हणून केले जात नाही. त्यासाठी व्यायाम व खाण्यावर बंधन हेच योग्य आहे. लायपोसक्शनमुळे चरबी कायमची कमी करता येते. जिथे ती जास्त आहे किंवा इतर शरीराच्या मानाने बेडौल दिसते आहे, अशा जागांमधून ती कायमची कमी करता येते.
योग्य व्यक्ती कोण?
ज्यांच्यात कातडीची स्थिती उत्तम आहे, स्नायू चांगले आहेत, एकूण आरोग्य ठीक आहे, जखम भरण्याची क्रिया उत्तम आहे, विडी, सिगारेट ओढत नाही किंवा कुठला आजार नसेल अशी तरुण व्यक्ती लायपोसक्शन करून घेऊ शकते.
ज्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे, ज्यांच्यापुढे विशिष्ट ध्येय आहे अशा व्यक्ती.
ब्लड प्रेशर, डायबेटिस किंवा हार्टडिसीझेस असलेल्या व्यक्तींचा वेगळा विचार करावा लागतो. तसेच ज्या जागेतून चरबी काढायची त्या जागेची जर काही शस्त्रक्रिया आधी झाली असेल तरीही विचार करावा लागतो.
प्रथम सुरुवात कुठे करणार?
प्रथम अस्थेटिक सर्जनबरोबर विचारविनिमय करा. लायपोसक्शीनमुळे शरीर कसे सुडौल करता येईल याबद्दल माहिती करून घ्या. त्याचे परिणाम, करण्याचे वेगवेगळे मार्ग समजावून घ्या व मगच विचार करा. त्याचप्रमाणे करण्याअगोदर तुमची खरीखुरी आरोग्याबद्दल माहिती तसेच चालू असलेली औषधी, ऍलर्जी, स्मोकिंग वगैरेबद्दल सर्जनला सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. आशीष दावलभक्त, ऍस्थेटिक प्लास्टिक सर्जन, पुणे.
January 12, 2017
‘हार्ट-लंग’ मशीनच्या विकासामुळे ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेची गरज अधिकांशाने पूर्ण झाली. डॉ. जॉन हेशॅम गिबन (ज्युनिअर) यांच्याकडे या प्रणालीच्या विकासाचे जनकत्व जाते. दि. ६ मे १९५३ रोजी डॉ. गिबन यांनी ‘हार्ट-लंग’ मशीनच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली. यशस्वीपणे पार पडलेली ही पहिली ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया मानली जाते.
February 20, 2019
ढगांनी वेढलेल्या हिरव्या टेकड्यांवर सूर्याची पहिली किरणं स्पर्शून जातात आणि मनात एक अनामिक शांतता संचारते. काही ठिकाणं फक्त डोळ्यांनी पाहण्यासाठी नसतात; ती अनुभवण्यासाठी, आतून जाणण्यासाठी असतात. भारताच्या ईशान्य हिमालयात वसलेले, सिक्किम ही अशीच जादुई भूमी. निसर्ग, अध्यात्म, साहस, शांतता आणि सौंदर्य या सर्वांचा सुंदर संगम येथे अनुभवता येतो.
November 14, 2025

वूली मॅमथ किंवा हत्तीसारख्या प्राण्यांच्या बाबतीत, त्यांचं वय जसं वाढत जातं, तसं त्यांच्या सुळ्यांत काळागणीक नवेनवे थर जमा होऊन सुळ्याची जाडी वाढत जाते. त्यामुळे या प्राण्यांच्या सुळ्यांतील या थरांची संख्या मोजून त्यांचं वय समजू शकतं.
November 19, 2021
भगवान श्रीविष्णूच्या चरणकमलांचे वर्णन करताना, त्यातही त्या चरणांगुलींना असणाऱ्या नयनमनोहर नखांचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा एखाद्या महाकवीला लाजवेल असे अलौकिक वर्णन करीत आहे.
December 19, 2020
February 14, 2018
किल्ले राजगडाच्या सगळ्यात उंच असलेल्या (डोंगरावर डोंगर असलेल्या) बालेकिल्ल्यावरून दिसणारं सह्याद्रीचं हे आगळंवेगळं रूप. सह्याद्रीची सगळी राकटता, बुलंदी दर्शवणारं. मराठी मनाला अक्षरशः वेड लावणारं. त्याची छाती अभिमानाने फुलवणारं. त्याचं रक्त-ऊर्जा उफाळून आणणारं. प्रत्येक मराठी मनाने आयुष्यात एकदा तरी किल्ले राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून सह्याद्रीचा हा अनोखा नजारा बघावा.
May 1, 2020
आज २७ फेब्रुवारी. ‘जागतिक मराठी भाषा दिवस’. याच दिवसाला`राजभाषा दिवस’ असंही म्हणतात. जेमतेम सात दिवसांपूर्वी, २१ फेब्रुवारीला `जागतिक मातृभाषा दिवस’ जगभरात साजरा केला गेला.
February 27, 2017
February 22, 2022
वडिलांबरोबर राजकारणाचे धडे गिरवायला मिळाले तरी आज खासदार म्हणून स्वतंत्रपणे वाटचाल करावी लागत आहे. सर्वात तरुण खासदार म्हणून नावलौकीक मिळाला असला तरी वाढत्या जबाबदारींची जाणींवही होती. हीं जबाबदारी पेलताना पक्षातील कार्वकर्त्यांबरोबरच अन्य पक्षातील सदस्यांची मोलाची साथ लाभली. त्यामुळे गल्लीतून सुरू झालेली दिल्लीची वाटचाल उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने सफल राहिली आहे.
April 12, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti