वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
विक्रमी एदिसा खेळल्यानंतर कसोटी पदार्पण करून, पदार्पणात शतक झळकावणारा सुरेश रैना
November 26, 2010
रसाचा आणखी एक उपप्रकार म्हणजे अनुरस होय. मुख्य चवी बरोबर आणखी एक चव मागाहून जाणवते तो अनुरस. जसे मध खाताना गोड लागतो, पण मध पोटात गेल्यावर जीभेवर एक प्रकारची तुरट चव रेंगाळत रहाते. त्याला मधाचा अनुरस म्हणतात.
कोणतेही पदार्थ एकल रस प्रधान असत नाहीत. म्हणजे मध फक्त गोडच असतो असे नाही. अग्निच्या कमी अधिक असण्यामुळे, पंचमहाभूतांच्या तरतम भावामुळे, पदार्थातील चवी मधे थोडा थोडा बदल होत जातो. आणि अनुरसांची निर्मिती होते.
जसे हिरवा रंग बघितला तरी त्यात अनेक सूक्ष्म छटा असतात. साडीला योग्य मॅचिंग ब्लाऊजपीस शोधताना, हे पाच पन्नास रंग आपल्याला सहज दिसतात. तसे, चवींमधे देखील एका चवीत आणखी दुसरी चव मिसळत गेली कि वेगळी वेगळी चव बनत जाते. घरात साखर, चहा पावडर, दूध, पाणी तेच असले तरी चार माणसांनी बनवलेल्या चार चहाच्या चवीमधे फरक पडतोच ना ! यातील साखर पावडरचे प्रमाण थोडे जरी कमी जास्त झाले किंवा गॅस लहान मोठा ठेवला गेला तरी बनणारा चहा हा वेगवेगळ्या चवींचा बनतो, हे आपण व्यवहारात पाहातो, तसेच आहे.
हिरड्यांचा तुरटपणा, सुपारीचा तुरटपणा यात फरक आहे. साखरेचा गोड पणा आणि गुळाचा गोडपणा यातही फरक आहे. तसेच कारले आणि मेथीच्या कडूपणातही फरक दिसतो. त्यामुळे प्रत्येक चवीचे वेगवेगळे अनुभव येणे आणि त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसणे, चुकीचे नाही.
एखादे नवीन व्यंजन बनवताना त्यात कोणत्या चवी किती प्रमाणात मिसळल्या जात आहेत, त्यावर त्या पदार्थांचे औषधी गुण अवलंबून असतात.
डाळीपासून गोड गुळ घालून खीर करता येते, आणि तिखट मसाला एकत्र केला की, आमटी बनते. आंबट घातले की, चटणी होईल.
आता हेच बघा ना, खीर गोड आहेच, आणि पुरणपोळी पण गोडच आहे. हे दोन्ही गोड पदार्थ एकाच चणाडाळीपासून बनतात, म्हणजे यांचे गुण एकच असतील का ? कारण एक खीर शिजवली जातेय आणि दुसरी पुरणपोळी भाजली जातेय. जो पदार्थ पाणी घालून शिजवला जातो, तो पचायला जड बनतो, तर भाजून ज्याच्यातील पाणी कमी केले जाते, ती पुरणपोळी पचायला खीरीच्या तुलनेत हलकी होईल का ? असा विचार करायला हरकत नाही, पण पुरणपोळी बनवण्यासाठी आणखी एक मधुर रस वापरला जातो, तो म्हणजे गहू. म्हणजे पुनः ती पचायला जड झाली. यासाठी
पुरणपोळी खाताना ती तुपाबरोबर किंवा कोकणात नारळाच्या दुधाबरोबर इतरत्र गाईच्या दुधाबरोबर खाल्ली जाते. सोबत डाळीची मसालेदार तिखट आमटी (ज्याला कट असेही म्हणतात.) पुरणपोळी पचवायला मदत करायला हजर असतेच.
यासाठी आहार बनवताना किंवा खाताना, चवींच्या मिलाफाचा संगम करण्यासाठी, युक्ती वापरणे महत्वाचे असते. जी ओरीजिनली भारतीयांकडे आहे.
एखादा पदार्थ सहजपणे पचावा, यासाठी त्या पदार्थामधे अन्य काही पदार्थ युक्तीने मिसळले जात होते. आता सर्वच बदलले. दोन भिन्न चवीचे पदार्थ बिनधास्त एकत्र केले जात आहेत. जसे मधुर रसाच्या दुधात आंबट फळे घालणे, किंवा दूध घातलेल्या चहामध्ये खारट चवीची खारी मारी बुचकळून खाणे हे रस विरूद्ध आहे.
हे विरूद्ध एखादा दिवस खाल्ले म्हणजे लगेच रोगाची लक्षणे दिसतील असे नाही. पण वारंवार असे रस विरूद्ध पदार्थ खाल्ले गेले तर मात्र असात्म्यता अहणजे अॅलर्जी निर्माण होते, हे नक्की !
वेगवेगळ्या फूड चॅनेल्सवर रंगसंगती, फॅशन, ट्रेंड, व्हरायटी, न्यू इन्व्हेंशन इ. च्या नावाखाली आरोग्यदायी आहाराचा पार बट्ट्याबोळ चाललेला आहे. त्यात डाएटीशियन या पदवीधारकांकडून आयुर्वेदातील मूलतत्वे बरोबर विरूद्ध करून सांगितली जात आहेत. वैद्य मंडळीदेखील पाश्चात्य बुद्धीची बनत चालली आहेत, अनेक डाॅक्टरांचे देखील आहाराबाबत एकमत होत नाही, आणि नेमकं आपण कसं वागायचं, हे समाजाला समजतच नाहीये.
किती किती ठिकाणी दुरूस्ती करणार ? आभाळच फाटले आहे, ठिगळे तरी किती लावणार ? बघू, अच्छे दिन आनेवाले है, असं ऐकायला येतंय !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
29.11.2016
November 29, 2016
लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.
January 10, 2022
आजच्या काळात निदान भारतात तरी कोणतेही क्षेत्र भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटलेले नाही. शिक्षणक्षेत्र पुण्याचे आणि ज्ञानदानाचे कार्य सर्वश्रेष्ठ मानले जाते. शिक्षणाने माणसाचा उद्धार होतो आणि तो नीती-अनितीमधील फरक ओळखू शकतो असा गैरसमज सर्वत्र आढळून येतो, पण आज शिक्षणाच्या नावाखाली केवळ तुंबड्या भरण्याचे काम सुरू आहे.
April 20, 2024
‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे मुळातच खूप पैसा आहे तिथे अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर संपत रहातो. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा मात्र इथेच रहातो !!!
November 28, 2018
शरीरात एक बॅटरी असते. ती पुरवून पुरवून वापरायची असते. शरीराला रात्रौच्याच वेळी, पूर्ण विश्रांतीच्या वेळी ही उर्जा वापरायची असते.
मोबाईल बॅटरीमोडवर जातो, तेव्हा बॅटरी लवकर संपते. चार्जिंग ऑन असताना त्याच्यावर ऑडीओ ऐका, नाहीतर, व्हिडिओ पहा. बॅटरीवर लोड नाही. तसंच सूर्य असताना दोन्ही जेवणं संपली की शरीरातील बॅटरीवर लोड नाही, जी उर्जा अन्य महत्त्वाच्या अंतर्गत कामासाठी वापरली जाऊ शकते.
आणखी एक उदाहरण समजून घेऊया.
नीट शब्द शब्द वाचलेत तर समजेल.
जर मी माझ्या हातांचे काम वाढवले तर शरीरातील रक्त किंवा उर्ज़ा हातामधे आणली जाईल. पायांनी धावलो तर, हीच उर्जा पायात वळवली जाईल. डोक्याचे काम केले तर हीच उर्जा इतर अवयवांमधून काढून मेंदूकडे नेली जाईल, ( म्हणून जिथे उर्जा जाईल, तेव्हा इतर अवयवांमधील शक्ती तुलनेने कमी होईल, मेंदुचे काम वाढवले, अभ्यास केला, तर हातापायामधील शक्ती मेंदुकडे वापरली जाईल. हातापायामधील शक्ती तात्पुरती कमी केली जाईल. )
म्हणून पाठांतरासारखा अभ्यास पहाटेच्या वेळी करावा. मेंदुला रात्रभर रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्याने मेंदु तरतरीत असतो. नीट लक्षात रहाते. पण दिवसभर विचार करून मेंदु दमलेला असतो, आणि रात्री झोप येते तेव्हा जागरण करून अभ्यास केला तर काऽऽही उपयोग होत नाही. झोप येणे, म्हणजे आतून येणारा सिग्नल आहे. "आता मी दरवाजा बंद करत आहे. बाहेरचे व्यवहार बंद. आम्हाला आतील दिवसभराची सर्व पेंडींग कामे करायची आहेत." असं तो म्हणतो.
बॅन्क कशी दुपारी तीननंतर आतून बंद करून घेतली जाते. पण आतमधे बॅन्क बंद नसते. आतमधे काम सुरू असते. तसंच शरीराचं असतं. आतली कामे करायची असल्याने दरवाजा आतून बंद ! (म्हणजे झोप. )
आता पचनाचे काम आतील भागात सुरू झालेले आहे, तेव्हा हीच उर्जा पचनासाठी वापरली जाईल. म्हणजे "पेरीफेरल सर्क्युलेशन" कमी होईल. आणि "सेंट्रल सर्क्युलेशन" वाढवले जाईल. इथे सुद्धा हातापाय आणि डोक्यातील शक्ती पचन नीट होण्यासाठी आतमधे वळवली जाते. जेव्हा उर्जा आतमधे आहे, तेव्हा बाहेरची कामे कमीच करावीत.
आता एक गोष्ट लक्षात येतेय का पहा.
आज्जी सांगायची, "अरे आत्ता जेवला आहेस ना, धावतोस कसला, पोटात दुखेल. असं जेवणानंतर लगेच धावू नये "
....... म्हणून जेवणानंतर लगेच धावू नये, लगेच मोठे काम करू नये, लगेच अभ्यास करू नये. कारण असं मोठे शक्तीचे काम बाहेर सुरू झाले तर आतील पचन बिघडते.......
जेव्हा पचनानंतर उर्जा तयार होणार असते, तेव्हा बाकीची सर्व कामे थांबवली तर शरीराला आतमधे लक्ष दिले जाईल. आतले काम पूर्ण झाले नाहीतर दुसऱ्या दिवशी पुनः काम सुरू करताच येणार नाही. म्हणून इतर सर्व कामे थांबवायची ऑर्डर काढली जाते, म्हणजेच आपणाला झोप निर्माण केली जाते. बाकी सगळी कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये विश्रांतीला गेली की मनाला मनसोक्तपणे आपली आतली कामे करता येतात. पोरं, नवरा शाळेत, कामाला गेली की कसं छाऽन कामं आवरता येतात. कोणाचाही अडथळा नाही.
तसं जर लवकरात लवकर पचनाचे काम पूर्ण करण्यासाठी, आपण जर लवकर जेवलो, आणि लवकर झोपलो तर पुढे तो मनसोक्त काम करवून घ्यायला मोकळा !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.03.2017
March 6, 2017
अनेक वर्ष दुःखात, दारिद्र्यात, अज्ञानात असलेल्या समाजाला त्या त्यावेळी त्या त्या व्यक्तींनी प्रेरणाची पायवाट निर्माण केल्यामुळेच समाज त्यातून बाहेर येऊ शकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यामुळे आज खितपत पडलेला समाज यशाची मजल गाठू शकलां.
December 27, 2024
वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस, सगळ्यांचीच भूमिका एकाचवेळी निभावू शकणारी सोशल मिडिया सध्या जगामध्ये अवतरली आहे. लिहून वाचून मोठी झालेली आमची शेवटची पिढी जोपर्यंत जगात आहे तोवर या सगळ्यांचे अस्तित्व टिकून राहणार आहे. त्यानंतर मात्र अवघड आहे.
January 16, 2023
ब्लाँच चारलेटचा जन्म २३ मे १८९८ रोजी लंडन येथे झाला.ती मुळची बेल्जियमची होती. १९४० साली जर्मनीने बेल्जियम काबिज केल्यावर ती लंडन येथे आली. तिचे फ्रेंच वरील प्रभुत्व पाहून स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेने तिला आपल्यात सामील केले.वयाच्या चाळीशी नंतर एसओई(ब्रिटनची गुप्तहेर संघटना ) मध्ये येणारी ती सर्वात वयस्क गुप्तहेर होती.
December 13, 2022
हे झाड उत्तम सावली व सुंगधी फुले यामुळे ते लोकप्रिय आहे. दरवळ म्हंटल की, फुलांचा असं एक समीकरण आहे. फुलांचे अनेकविध प्रकार आणि मनात भरून टाकणारे त्यांचे सुवास. प्रत्येक फुलाचा वास वेगळा आणि रुबाब त्याहून वेगळा. सुगंधाची उधळण करणारी अशी कित्येक फुलं आहेत परंतु मूकपणा जवळ बाळगणारी अशी ही बकुळच.
July 8, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti