(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – १

    भारत आणि अमेरिका दोन्हीही खंडप्राय देश. शेती हा दोघांच्याही सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा महत्वाचा घटक. फार खोलात न जाता, किंवा रुक्ष आणि किचकट आकडेवारी सादर न करता, या दोन देशांतल्या शेतीची ढोबळ तुलना आणि त्यानंतर थोडा अमेरिकन शेतीचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

    अमेरिकेचं क्षेत्रफळ (२२,६४० लाख एकर), भारताच्या क्षेत्रफळाच्या (८,२०० लाख एकर) साधारणपणे तिप्पट आहे. त्यातील शेतीच्या वापरासाठी असणारी जमीन, अमेरिकेत ९,३८० लाख एकर तर भारतात ४,०५० लाख एकर एवढी आहे. म्हणजे अमेरिकेच्या एकूण जमिनीपैकी साधारण ४१% जमीन शेतीसाठी, तर भारतात सुमारे ५१% जमीन शेतीसाठी वापरली जाते. २००० सालच्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत सुमारे २२ लाख फार्मस आहेत तर भारतात हीच संख्या १२०० लाख आहे. भारतात एवढया प्रचंड मोठया प्रमाणावर फार्मस असण्याचे कारण म्हणजे आपल्या फार्मसचे छोटे आकार. सर्वसाधारण अमेरिकन फार्मचे क्षेत्रफळ आहे ४१८ एकर्स तर भारतात हाच आकार घटून होतो ३.३ एकर्स. त्यात पुन्हा वंशपरंपरेने वडिलोपार्जित जमीन मुलांमधे विभागली जात असल्यामुळे, दर पिढीमागे फार्मसचा आकार अधिकच लहान होत चालला आहे. शिवाय भारतात अनेक राज्यांमधे जमिनीसंदर्भाच्या कायद्यांनुसार, जमिनीच्या मालकी हक्कांवर बंधने टाकली आहेत. त्यामुळे अशा राज्यांमधे, जलसिंचित जमिनीवर १० ते २० एकर आणि कोरडवाहू जमिनीवर १५ ते ६० एकर, अशी मालकी हक्काची बंधनं आहेत.

    आजमितीला भारतातले साधारण ६०% लोक शेती किंवा पशुपालनाच्या जोडधंद्यावर अवलंबून आहेत. अमेरिकेत हेच प्रमाण केवळ २% आहे. शिवाय भारतीय शेती ही एकरी उत्पादनाच्या दृष्टीने, जगातील सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा देखील निकृष्ट दर्जाची आहे. भले दूध, तांदुळ, ऊस, गहू, शेंगदाणे, भाजीपाला, ह्या गोष्टींच्या उत्पादनात आपला जगात पहिला, दुसरा नंबर असेल, पण त्यात एकेका गायीच्या किंवा प्रत्येक एकरी उत्पादकतेपेक्षा, आपलं एकूण संख्याबळ (गायींची संख्या किंवा त्या धान्याच्या लागवडीखाली असलेले एकर्स) प्रचंड आहे, हीच खरी गोम आहे.

    या पार्श्वभूमीवर, भारताच्या आणि अमेरिकेच्या शेतीचा तौलनिक अभ्यास करणं योग्य ठरणार नाही. अमेरिकन शेतांच्या प्रचंड मोठ्या आकारामुळे आणि तुटपुंज्या मनुष्यबळामुळे, शेतीचं अधिकाधिक यांत्रिकीकरण ही गरज होती आणि आहे. या उलट भारताच्या टिचभर आकाराच्या फार्मसवर मोठी यंत्र सामग्री वापरणे हास्यास्पद होईल. शिवाय शेतीच्या आधारे उदरनिर्वाह करणार्‍या लाखो करोडो गरीब कष्टकरी जनतेच्या पोटावर पाय दिल्या सारखं ते होईल.

    अमेरिकन फार्मस एवढे मोठे कसे झाले आणि त्यांच्यात काळानुसार कसे बदल घडत गेले ते बघणं थोडं मनोरंजक ठरेल. तसंच कष्टांना आणि उद्योजकतेला जोड देऊन, पुढच्या पिढयांच्या हातात शेतीची सूत्र सोपविण्यासाठी अमेरिकेत काय केलं जातं, ते पाहणं देखील योग्य ठरेल.

      August 18, 2015


  • ९०/१० तत्व

    फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे. जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो.

    उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे.

    या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे.
    उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला.
    हे फक्त १०% झालं.

    यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे.

    तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐकवलेत.

    तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर, मुलगी अजूनही रडतेच आहे. आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची स्कुलबस निघून गेली.

    तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायला हवे.

    तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवताय. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात.

    तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली.

    २० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं.

    तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला.

    दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून वाईट झाले.

    आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय.

    का?

    कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद.

    तुमचा दिवस वाईट का गेला?

    • त्याला कारण कॉफी होती?
    • त्याला कारण मुलगी होती?
    • त्याला कारण पोलीस होते?
    • त्याला कारण तुम्ही स्वतः होता?

    उत्तर
    तुम्ही स्वतः

    कॉफी चं काय झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं. त्या ५ सेकंदात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे तुमचा दिवस खराब गेला.

    काय करायला हवे होते?

    कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली.
    तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊनये यासाठी लक्ष दे" आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता आला असता.

    मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता.

    तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात.

    फरक पहा
    दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा.

    खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो. उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.

    ९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे?

    • जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका, पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर काय होते, त्याप्रमाणे वागा. त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या. चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल आणि त्यामुळे मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावू शकते.

    • रस्त्यात कुणी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किंवा कट मारला किंवा चालतांना तुमच्या पुढे कुणी गेले किंवा तुमच्या कुणी आडवे गेले तर तुम्ही काय करता? तुम्हाला राग येतो? तुम्ही दात ओठ खाता? स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता? मुठी आवळता? भांडायला जाता? तुमचा श्वासोत्वास वाढतो?

    तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे?

    ९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा.

    तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किंवा तुमची हक्काची ऑर्डर तुम्हाला न मिळता दुसऱ्याला गेली आहे असे तुम्हाला कळले तर?

    • मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका
    • तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा.

    बस, कॅब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले

    • संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत नाहीत.
    • पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे
    • वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा
    • आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा

    ९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुया

    -- आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवर आलेले पोस्ट

      September 13, 2017


  • महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ८ – अंजीर

    भारतात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यात अंजिराची लागवड केली जाते. पिकलेली ताजी अंजीरे रुचकर असतात. सुकविलेली गोड फळे तसेच त्यांचा मुरंबा खाल्ला जातो. पूर्ण पिकून गळून पडलेल्या अंजिरापासून खाण्यासाठी सुकी अंजिरे तयार करतात.

      September 1, 2021


  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – शेपू

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – शेपू

    शेपूची भाजी हि ब-याच जणांना न आवडणारी अर्थात नावडती. तिला येणा-या विशिष्ट गंधामुळे ती ब-याच लोकांना आवडत नाही.(मला देखील आवडत नाही). हिच्या बियांना बाळंतशेपा असे म्हणतात ह्यांचा उपयोग लहान मुलांच्या बाळऔषधांत वापरतात.

    हिचे झाड तीन फूट उंचीचे असते.हि भाजी चवीला गोड व उष्ण असते हि शरीरातील कफ व वात दोष कमी करते.भाजी म्हणून जरी हि तेवढी चांगली लागत नसली तरी हिचे देखील बरेच औषधी उपयोग आहेत बरे का!

    चला मग शेपूचे औषधी उपयोग पहायचे ना!

    १)जखमेवर हिच्या पाल्याची चटणी वाटून लेप करावा.

    २)तोंडास रूची नसणे,जीभ जाड होणे,तोंडाला दुर्गंध येणे अशा तक्रारींमध्ये शेपूचा कोवळा पाला व आल्याचा एक तुकडा चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावी.

    ३)लहान मुलांना शेपूची ताजी पाने एक कपभर पाण्यात उकळावे व पाव कप पाणी शिल्लक ठेवावे व हे पाणी प्रत्येक दुग्धपानापुर्वी १-१ चमचा द्यावे त्यामुळे बाळाचे पोटाचे आरोग्य उत्तम राहते.

    ४)शेपूची पाने घालून तीळाचे तेल उकडून ते गाळावे हे तेल मार लागणे,मुरगळणे,संधिवात ह्यांच्या वेदनांमध्ये लावल्यास उत्तम.

    ५)बाळंतीणीस रक्तस्राव कमी होण्यास व दुधभरपूर येण्यास शेपूची भाजी देतात.
    हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पित्त वाढते.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      October 21, 2016


  • श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९

    अनंतकोटी ब्रह्मांडनायिक आणि अनंतकोटी ब्रह्मांडनायिका भगवान शंकर तथा देवी पार्वतीच्या वंदन समयी आचार्यश्री म्हणतात..

      September 27, 2020


  • ॐ जय जय जी गणराज


    ॐ जय जय जी गणराज स्वामी विद्यासुखदाता ।।
    धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ0।।

    शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।।
    दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ।।
    हाथ लिये गुडलड्डू सांई सुरवरको ।।
    महिमा कहे न जाय लागत हूं पदको ।।1।।

    ॐ जय जय जी गणराज ।।धृ0।।

    अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।।
    विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी ।।
    कोटीसुरजपकाश ऐसी छब तेरी ।।
    गंडस्थल-मदमस्तक झुले शशिबिहारी ।।2।।

    ॐ जय जय जी गणराज ।।धृ0।।

    भावभगतसे कोई शरणागत आवे ।।
    संतती संपती सबही भरपूर पावे ।।
    ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।।
    गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ।।3।।
    ॐ जय जय जी गणराज स्वामी विद्यासुखदाता ।।
    धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ0।।

    गायक - श्री.सुधीर गोरे.
    गायीका - सौ. वृक्षाली घाणेकर

      October 15, 2015


  • आहारातील बदल भाग ४७ – चवदार आहार -भाग ८

    सर्व प्रकारची लवणे ही सर्वसाधारणपणे, दोषांना पातळ करणारी, पचायला हलकी, सूक्ष्म स्त्रोतसापर्यंत जाणारी, वाताचा नाश करणारी, पाचक, उष्ण, तीक्ष्ण गुणाची, रूची वाढवणारी आणि कफ पित्त वाढवणारी असतात.

    सैंधव मीठ हे डोंगराळ मीठ आहे.
    सर्व मीठामधे श्रेष्ठ आहे.
    किंचीत गोडसर असून वृष्य गुणाचे म्हणजे धातुंचे पोषण करणारे असते.
    ह्रद्य म्हणजे मनाला आनंद देणारे आणि ह्रदयाला हितकारक असते.
    पचायला हलके असून किंचित उष्ण, दाह निर्माण करणारे आहे.
    तिन्ही दोषांना संतुलीत ठेवायला मदत करणारे असते.
    पण भूक वाढवणारे आणि विशेष करून डोळ्यांना हितकर आहे.
    प्रत्येक घरात असावेच असे हे सैंधव उपवासाचे मीठ म्हणून पण प्रसिद्ध आहे.
    जिथे मीठ कमी पडते आहे, पण खारटपणा हवाच आहे, तिथे सैंधवच वापरावे. बाजारात सैंधव किंवा शेंदेलोण नावाने विकत मिळते.

    संचळ किंवा पादेलोण हे आपल्या विशिष्ट वासाने प्रसिद्ध आहे. चांगली ढेकर येत नसेल तर हे संचळ मीठ वापरावे.
    पचायला हलके, ह्रदय आणि मनाला हितकर, विशिष्ट वास असलेले, अवष्टंभ नाशक म्हणजे पचनातील किंवा मलविसर्जनातील अडथळे दूर करणारे आहे. पचन पूर्ण झाल्यावर ते तिखट गुणांनी काम करते. भूक वाढवणारे, चव वाढण्यासाठी वापरले जाणारे आहे. भेळ पाणीपुरी या पदार्थांना याच संचळामुळे रूची प्राप्त होते. घरात बडिशेप, जिरे आणि ओवा समभाग घेऊन त्यात चव पाहून थोडेसे सैंधव आणि संचळ घालून ठेवले तर उत्तम पाचक चूर्ण तयार होते. जेवणानंतर कधीतरी चघळून खायला हरकत नाही.

    बीड लवण बाजारात याच नावाने मिळते.
    वरून आणि खालून दोन्ही मार्गाने वाताची आणि कफाची शुद्धी करण्यासाठी बीड लवण वापरतात. भूक वाढवणारे असून, जाडी कमी करणारे म्हणूनही प्रसिद्ध आहे.
    मलाचा आणि वाताचा अवरोध दूर करणारे असल्याने फुगलेले पोट आणि त्यामुळे होणारी पोटदुखी कमी करणारे आहे.
    वरील तिन्ही प्रकारची लवण आपण घरात वापरावीत असा आग्रह वैद्य मंडळी करत असतात.

    समुद्रात तयार होणारे मीठ हे सहज उपलब्ध होणारे, पचायला इतर लवणापेक्षा जरा जड, आणि पचन पूर्ण झाल्यावर मधुर गुणाचे होत असल्यामुळे कफाला थोडे वाढवणारे आहे.

    समुद्रातून मिळणारे खडे मीठ आणून ते शुद्ध करण्यासाठी नीट पाखडून घ्यावे म्हणजे सुका कचरा निघून जातो. नंतर पाण्यात विरघळून गाळून घेतले असता, वाळू आणि मातीतले दोष जातात. मीठ विरघळून घेतलेले पाणी पुनः उकळले किंवा उन्हात वाळवले कि शुद्ध मीठ परत मिळते. मिक्सरमधून काढले की बारीक होते. ही सर्व प्रकारची मीठे एकत्र करून सुद्धा आपण वापरू शकतो.

    औद्भिद नावाचे एक खनिज मीठ आहे, पण ते गुणांनी तेवढे चांगले नाही. पटकन पातळ होणारे, किंचीत कडवट, तिखट असून तीक्ष्ण गुणाचे असते.

    शोधली की सापडतील,
    मागितली की मिळतील.
    चांगल्या आरोग्यासाठी हे करावंच लागेल.
    खाल्ल्या मीठाला जागावंच लागेल.

    इंग्रजांनी त्यांचे मीठ भारतात आणून तेच विकत घेण्याचा कायदाही केला होता. आजही जवळपास तसेच आहे, स्वस्त, साधे, काळसर दिसणारे, खडे मीठ खायच्या बाजारातून गायब झाले आहे. पण, मच्छीमारी उद्योगामधे आणि झाडांना खत म्हणून विकत मिळते.

    मूठभर मीठ उचलून मनात क्रांतीच्या ज्वाला पेटवल्या गेल्या होत्या, स्वदेशी भावना मनात रूजवल्या होत्या.
    पुनः एकदा आपले मीठ आपल्यासाठी वापरूया,
    देशाचे आणि देहाचे आरोग्य वाढवूया.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    08.11.2016

      November 8, 2016


  • श्रीमुद्गलपुराण – ११

    असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात.

      September 12, 2019


  • खगोलशास्त्रावर आधारित गैरसमजुती कोणत्या?

    खगोलशास्त्राबद्दल जनसामान्यांत अनेक समज-अपसमज प्रचलित असतात. मध्यंतरी अशी बातमी पसरली होती की मंगळ ग्रह पृथ्वीच्या खूपच जवळ येणार असून तो पौर्णिमेच्या चंद्राइतका मोठा दिसेल. ही बातमी खोटी होती. सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरताना ठरावीक कालाने परस्परांजवळ येतात. पण जवळ आल्यावरही थोडा तेजस्वी दिसण्यापलीकडे मंगळ नुसत्या डोळ्यांना मोठा दिसत नाही. कारण तो फारच दूर आहे.

      October 20, 2023


  • विकासाला कौल!

    एकजात सगळ्याच तज्ज्ञांना मोडीत काढणाऱ्या निवडणूक निकालाचे विश्लेषण करायचे झाल्यास ते केवळ एका वाक्यात करता येईल आणि ते म्हणजे मतदारांनी विकासाला कौल दिला.विकासासाठी एक स्थिर आणि सक्षम सरकार गरजेचे असते, ही भावना कुठेतरी मतदारांच्या मनात बळावली आणि त्यांनी दोनपैकी एक पर्याय निवडताना काँठोसला उजवा कौल दिला.

    पंधराव्या लोकसभेचे निवडणूक निकाल काँठोससहित सगळ्याच राजकीय पक्षांना आणि तथाकथित राजकीय तज्ज्ञांना धक्का देणारे ठरले.

      May 24, 2009