वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुर्वेदाने ‘निरोगी कोणाला म्हणावे?’ या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले आहे की; ज्याच्या शरीरात दोष, धातू आणि मल हे साम्यावस्थेत असतात. तसेच ज्याची इंद्रिये, आत्मा व मनदेखील साम्यावस्थेत असते ती व्यक्ती निरोगी असते. यातील दुसऱ्या ओळीतला उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. ‘मनाचे आरोग्य’ हे निरोगी असण्याकरता महत्वाचे आहे असे आयुर्वेद मानतो. १० ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मनःस्वास्थ्य दिन’ साजरा केला गेला. यावर्षी तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Depression; let’s talk ही संकल्पना राबवली आहे. थोडक्यात; ‘नैराश्यावर बोलू काही’!!
October 16, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५-१० जुनच्या पाच देशांच्या दौर्यामागे मुख्य उद्देश होता तो अणू पुरवठादार गटामध्ये (न्युक्लिअर सब्स्क्रायबर्स ग्रुप किंवा एनएसजी) भारताला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यातील सदस्य देशांचा पाठिंबा मिळविण्याचा. पाचपैकी तीन देश एनएसजीचे सदस्य आहेत.मोदी यांनी अफगाणिस्तान, कतार,स्वित्झर्लंड,अमेरिका,मेक्सिको या 5 देशांना भेटी दिल्या आहेत.
July 10, 2016
वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय..
December 31, 2016
ज्या दिवशी माझी मातृभाषा मराठी ही माझी अस्मिता ठरेल आणि या अस्मितेचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी आपण प्रत्येक जण जीवापाड प्रयत्न करू करत राहू अगदी वर्षातल्या प्रत्येक दिवशी तरच, आपण ठामपणे म्हणू शकतो की मी मराठी माणूस आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे. माझी भाषा माझी अस्मिता आहे आणि या अस्मितेच्या रक्षणासाठी मी अविरत प्रयत्न करीन. तरच मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे. असे आपण म्हणू शकतो.
March 27, 2019
मूल जन्माला येते, ते नैसर्गिकरित्या सुडौल व बांधेसूदच असते. त्यानंतर वाढीच्या वयात आहार व व्यायाम जसा असेल त्याप्रमाणे शरीराचे आकारमान, वजन बदलत जाते. नैसर्गिकरित्या असलेला बांधा/चण मात्र तसाच राहतो. उदाहरणार्थ, व्यक्ती बारीक, मध्यम किंवा रुंद चणीच्या असू शकतात.
ज्या व्यक्ती मुळातच बारीक चणीच्या आहेत, त्यांनी कितीही आहार व व्यायाम केला तरी मूळची चण बदलत नाही. त्यावर चरबीची किंवा स्नायूंची वाढ होऊन वजन वाढेलही, पण एकदा आहार व व्यायाम थांबला की काही काळातच शरीर पुन्हा नैसर्गिक चण धारण करेल.
याच प्रकारे मध्यम व रुंद बांध्याचेही होते. म्हणूनच शरीर सुडौल, बांधेसूद करायची सुरुवात करण्याआधी आपला मूळचा बांधा कसा आहे हे माहीत असणे अत्यंत गरजेचे असते.
एकदा आपला बांधा कळला की मग आपले वजन किती असावे हे ठरवता येते. बारीक चणीच्या व्यक्तीचे वजन मध्यम चणीच्या व्यक्तीत योग्य वजनापेक्षा 2-3 किलो किलो जास्त असू शकते.
उदाहरणार्थ - 5 फूट 2 इंच उंचीच्या तीन व्यक्ती आहेत. एक बारीक चणीची, एक मध्यम व तिसरी रुंद चणीची.
या उंचीसाठी मध्यम चणीच्या व्यक्तीचे योग्य वजन 50 ते 55 किलोदरम्यान असते, तर बारीक चणीच्या व्यक्तीचे योग्य वजन 47 ते 52 किलो व रुंद चणीच्या व्यक्तीचे 52 ते 57 किलो असू शकते. त्यामुळे आपली उंची व बांधा यावर आपले योग्य वजन अवलंबून असते, हे प्रथमत: लक्षात घ्यायला हवे.
तुमचे वजन व उंची प्रमाणात आहे किंवा नाही हे मोजायचे एक प्रमाण असते. त्याला Body Mass Index असेही म्हणतात. जर हा Index 18 ते 25च्या मध्ये असेल, तर तुमचे वजन उंचीच्या प्रमाणात आहे, असे म्हणता येते.
मात्र या वजनाच्या खेळात एक मेख मात्र आहे! आपल्या शरीराचा डौलदारपणा, सुबकपणा व आरोग्य यावर अवलंबून असते.
आपल्या एकूण वजनाच्या किती टक्के भाग स्नायूंनी व किती टक्के भाग चरबीने बनलेला आहे, याचे प्रमाण हीच ती मेख! वजन जरी उंचीप्रमाणे योग्य असेल, पण जर त्यात चरबीचे प्रमाण जास्त असेल, तर शरीर बेढब व स्थूल दिसते. पण जर स्नायूंचे प्रमाण जास्त असेल, तर मात्र शरीर सुबक, पिळदार व कसलेले दिसते. म्हणूनच वजन कमी करण्यापेक्षा शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे हे सुडौल बांधा मिळवण्यासाठी नितांत आवश्यक आहे. स्त्रियांमध्ये ही चरबी मुख्यत्वे कमरेच्या आजूबाजूस साचते, तर पुरुषांमध्ये पोटावर. त्यामुळेच स्त्रियांमधील स्थूलता ही पेअरच्या आकाराची व पुरुषांमधील सफरचंदाच्या आकारासारखी दिसते. मासिक पाळी संपल्यावर मात्र स्त्रियांमध्येही पुरुषांप्रमाणे पोटावरही चरबी साठू शकते. म्हणूनच या वयानंतर स्त्रियांच्या पोटाचा घेरही वाढलेला दिसतो. स्नायू व चरबी यांचे प्रमाण स्त्री-पुरुषांमध्ये वेगवेगळे असते.
पुरुषांमध्ये चरबीचे प्रमाण वजनाच्या कमीत कमी 12-15% असणे व स्त्रियांमध्ये 25-28% असणे हे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. त्यामुळे सुडौल बनवण्याच्या नादात चरबीचे प्रमाण यापेक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला, तर हानिकारक ठरू शकते. स्थूलपणाचे दुष्परिणामही बरेच आहेत. गुडघेदुखी, कंबरदुखी, थकवा, जडत्व, Varicose Veins, सायटिका, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग इ.इ. त्यामुळे शरीर सुडौल दिसण्याबरोबरच ते निरोगी ठेवण्यासाठी वजन त्यामुळे आटोक्यात असणे गरजेचे असते.
आजकाल ठिकठिकाणी Gyms, Yoga Centres यांचे पेव फुटलेले दिसते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सल्ले मिळतात. त्यामुळे नक्की कसे व किती वजन कमी करावे याबाबत गोंधळ असतो. सुडौल बांध्यासाठी योग्य आहार व व्यायाम याला पर्याय नाही.
* प्रथमत: हे लक्षात घ्यावे की व्यायाम आपल्यावर लादलेली गोष्ट न होता ती जीवनशैली बनली पाहिजे.
* आठवडयातून 4-5 वेळा एक तासभर योग्य प्रकारे व्यायाम केल्यास शरीर सुडौल व निरोगी बनतेच.
* व्यायामही वेगवेगळया प्रकारचे असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे एरोबिक पध्दतीचे व्यायाम - उदा. चालणे, पळणे, पोहणे, नृत्य. सध्या प्रचलित असलेला झुंबा याच प्रकारात मोडतो. अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी या प्रकारच्या व्यायामांची गरज असते. मात्र त्यासाठी कुठलाही एरोबिक व्यायाम कमीत कमी अर्धा तास, न थांबता व मध्यम गतीने करणे आवश्यक आहे.
तुमचे वय व शारीरिक व्याधी - उदा. गुडघेदुखी, कंबरदुखी तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार इ. ध्यानात धरूनच एरोबिक व्यायाम प्रकार व त्याची गती निश्चित करावी. अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
दुसरा प्रकार म्हणजे वजन उचलण्याचे व्यायाम. यामध्ये स्नायूंना बळकटी मिळते व स्नायूंचे आकारमानही वाढते. यामुळे शरीर पुष्ट, सशक्त व पिळदार होते. वजन वाढवण्यासाठी असे व्यायाम खूप उपयुक्त असतात.
शरीरातील स्नायूंचे प्रमाण वाढल्यामुळे अतिरिक्त चरबी निघून जाण्यासही मदत होते.
तिसरा प्रकार म्हणजे लवचीकता वाढवणारे व्यायाम प्रकार. यात सांध्यांचे व्यायाम, सूक्ष्म व्यायाम व योगासने यांचा समावेश होतो.
व्यायामांमुळेच नवीन बनलेले, बळकट झालेले स्नायू लवचीक असतीलच असे नाही. असे कडक स्नायू ताण सहन करू शकत नाहीत. त्यामुळे लचक भरणे, सांधे दुखणे असे त्रास होऊ शकतात.
लवचीकपणा वाढविणाऱ्या व्यायामांमुळे हे स्नायू लवचीक होतात व कुठल्याही प्रकारचा ताण सहन करू शकतात. त्यामुळे पाय मुरगळणे, मुका मार लागणे, सांधेदुखी इ. छोटया-मोठया दुखापती टळू शकतात.
वजन उचलण्याचे व्यायाम केल्यामुळे स्नायूंमध्ये जर Soreness किंवा ताठरपणा येत असेल तर या व्यायामांमुळे तो कमी होण्यास खूप मदत होते.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. वृषाली वझे आहारतज्ज्ञ
October 22, 2016
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पद्धतीने कृषिपंपासाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषणविरहित एक लाख सौर कृषिपंप योजना राज्य शासनाने महावितरणच्या माध्यमातून सुरू केली आहे. या योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शाश्वत विजेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे.
February 11, 2019
भाग - ४
अवतारकल्पना हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्याचें प्रतिबिंब आरत्यांमध्येही दिसतें. ‘दशावतारांची आरती’ तर आपल्याला दिसतेच, पण इतर आरत्यांमध्येही अवतारांचा उल्लेख येतो. ज्ञानदेवांच्या आरतीत ‘अवतार पांडुरंग’ असा उल्लेख आहे, तसाच तो नामदेवांच्या आरतीतही आहे (‘पांडुरंगे अवतार’). रामदासांच्या आरतीत, शंकर-मारुती-रामदास असा अवतारांचा उल्लेख आहे, ‘साक्षात शंकराचा अवतार मारुती । कलिमाजी तेचि जाली । रामदासाची मूर्ती ।’. खंडोबाच्या आरतीत, ‘… शंकर हृदयीं निवाला । तो हा मल्लतिक अवतार झाला ।’ असे शब्द आहेत. दत्ताच्या आरतीत, ‘त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा’ अशा शब्दांचा समावेश आहे . ( दत्त हा, ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीचें रूप आहे, असें मानलें जातें ). शिरडीच्या साईबाबांच्या आरतीत, ‘कलियुगीं अवतार’ हे शब्द समाविष्ट आहेत. साईबाबांना त्यांचे भक्त दत्ताचा अवतार मानतात, याचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे. नवनाथांच्या आरतीत ‘नवनारायण अवतार नवनाथ संत ।’ असा निर्देश आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ दत्तपंथी आहेत, त्यांच्या आरतीत, ‘त्रैगुण-परब्रह्म तुझा अवतार’ असा उल्लेख आहे. पावसच्या स्वरूपानंद स्वामींच्या आरतीमध्ये, ‘... दत्तगुरूंनी फल दिधलें थोर । तुझिया वंशीं अंश आमुचा येइल जन्मासी’ असा अवतार-निर्देश आहे. नृसिंह सरस्वतींच्या आरतीत, ‘विश्वरूपें तया (भक्तश्रेष्ठ त्रिविक्रम यति याला) दिधलें दर्शन’ असे शब्द आहेत. नृसिंह सरस्वती हे दत्तपंथीय आहेत. मात्र, ‘विश्वरूपदर्शन’ या उल्लेखावरून, भगवद्.गीतेमधील श्रीकृष्णानें दिलेल्या ‘विश्वरूपदर्शना‘चा संदर्भ स्पष्ट दिसतो. गीतेतील, ‘संभवामि युगे युगे’ या शब्दांमध्ये ‘अवतार-कल्पना’च अनुस्यूत आहे. त्यामुळे, नृसिंह सरस्वतींवरील आरतीतही ‘अवतार-कल्पने’चा अंतर्भाव अध्याहृत आहेच.
कोणत्या वेळी आरती म्हणायची, आरतीला कुठली मुख्य वस्तू (जसें, दीपक, कापूर वगैरे) वापरायची, अशा गोष्टींवरून आरत्यांना विविध नांवें आहेत, जसें कांकड-आरती, शेजारती, धूपारती, दीपारती, नैवेद्यारती, कर्पूरारती, निरांजनारती, वगैरे.
प्रत्येक आरती-कार्यक्रमात, कांहीं आरत्या त्याच (same) म्हटल्या जातात, तर कांहीं भिन्नही असतात. तसेंच, जेव्हां जेव्हां आरतीचा कार्यक्रम होतो, तेव्हां साधारणपणें विविध आराध्यांच्या आरत्या म्हटल्या जातात.
आरती ही मोठ्याने (loudly) म्हणण्याचीच गोष्ट आहे, आणि शक्यतो सामुहिकपणें. या मोठ्यानें म्हटल्यामुळे, तसेंच सामुहिकरीत्या म्हटल्यामुळे, ‘नादगर्जन’ घुमतें (resonating sound), व त्याचा श्रद्धाळू मनांवर सकारात्मक परिणाम होतो.
मराठी आरत्यांच्या साधारणपणें चार-सहा चाली आहेत, त्यांवरच आरत्या रचल्या व म्हटल्या जातात. त्यातही, कांहीं चाली जास्त लोकप्रिय आहेत, व त्या विशिष्ट चालीवर रचलेल्या बर्याच आरत्या आढळतात. जसें की, ‘दुर्गे दुर्गट भारी’ ही महिषासुरमर्दिनीची आरती ; ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही गणपतीची आरती ; ‘लवथवती विक्राळा’ ही शंकराची आरती ; ‘युगें अठ्ठावीस विटेवरी उभा’ ही विठ्ठलाची आरती ; अशा अनेक आरत्यांची मूळ चाल एकच आहे. हिंदी आरत्यांची चाल मराठीपेक्षा भिन्न असते (जसें, हिदी आरती. ‘ॐ जय जगदीश हरे’, ही हिंदी आरत्यांची एक लोकप्रिय चाल. बर्याच हिंदी आरत्या याच चालीवरच्या असतात).
मात्र, भाषा कुठलीही असो, चाल कुठलीही असो, आरतीतील भक्ती तीच, आणि मनांवर परिणाम तोच असतो.
आरतीनंतर भजन / प्रार्थना , व देवे/ मंत्रपुष्पांजली असते. या ‘प्रार्थने’तील कांहीं भाग मराठी तर कांहीं संस्कृत आहे. ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ हें पद मराठीत आहे, पण प्रार्थनेतील पुढील भाग ‘त्यमेव माताच पिता त्वमेव’ वगैरेपासून ते ‘हरे राम हरे राम’ पर्यंत भाग संस्कृतमध्ये आहे. ‘मंत्रपुष्पांजली’ (‘देवे’) हा भाग नुसता संस्कृतमध्ये आहे असें नाहीं, तर त्यात पुरातनकालीन संदर्भही आहेत. मंत्रपुष्पांजलीची सुरुवातच अशी होते - ‘ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवा: ....’ . आपल्याला माहीत आहे की, वैदिककालीन यज्ञसंस्कृतीचा लोप, रामायण-महाभारतकालानंतर, म्हणजे प्रागैतिहासिक काळींच झालेला आहे. म्हणजेच, मंत्रपुष्पांजलीतील या उल्लेखाचा संदर्भ अति-पुरातनकालीन आहे. मंत्रपुष्पांजलीमध्ये, नंतर, ‘कुबेर’ या दैवताला नमन आहे. कुबेराचा उल्लेखही ‘दैवत’ म्हणून गेल्या बर्याच शतकांमध्ये झालेला नाहीं. पुरातन काळातील, व त्यातल्या-त्यात-नंतरच्या-काळातील, उल्लेख पहायचा तर, आपल्याला हा कुबेराचा उल्लेख श्रीरामचंद्राच्या काळात, रावणाच्या संदर्भात दिसतो, आणि तिथेंही तो उल्लेख ‘तारीफ़ेक़ाबिल’ (praiseworthy) नाहीं, कारण, ‘रावणानें कुबेराला त्याच्या राजधानीतून हुसकून लावलें’ असा तो उल्लेख आहे. मंत्रपुष्पांजलीमधली पुढली एक ओळ पण पुरातनकाळाची द्योतक आहे. तिच्यात, ‘ॐ स्वस्ति साम्राज्यम्,भौज्यम्, स्वाराज्यम्, वैराज्यम्, पारमेष्ठ्यम्, राज्यम्’ असा उल्लेख आहे. कौटल्याच्या (कौटिल्याच्या) ‘अर्थशास्त्रा’त ज्या वेगवेगळधया प्रकारच्या राज्यांचा उल्लेख आहे, त्यातील कांही नांवे या, मंत्रपुष्पांजलीतील वाक्यात समाविष्ट आहेत. अशी राज्यें कौटल्यापूर्व काळात, व कौटल्याच्या काळात, अस्तित्वात होती.
याचा आपण कदाचित असा अर्थ काढूं शकूं की, पूर्वी ( जुन्या काळीं ) या अर्चनेतील फक्त संस्कृत भागच म्हटला जात असावा ; आणि नंतर, काळानुसार मराठी भागही त्या अर्चनेत जोडला गेला (add झाला) असावा. आरत्या तर मध्ययुगीन आहेत, हें आपण पाहिलेंच आहे. त्यामुळे, असा निष्कर्ष काढायला हरकत नाहीं की, आरत्यांनंतर म्हणायचा, ‘प्रार्थना’ व ‘मंत्रपुष्पांजली’ हा जो संस्कृत भाग आहे, केवळ तोच, पूर्वीच्या काळीं अर्चनेचा मूळ गाभा असावा.
(पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
September 8, 2016
जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांचे अलीकडेच निधन झाले. आयुका या विख्यात संस्थेची वास्तू ही चार्ल्स कोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली. या निमित्ताने आयुकाचे संस्थापक-संचालक प्रा. जयंत नारळीकर यांचा चार्ल्स कोरिया यांच्याशी निकटचा संबंध आला प्रा. नारळीकरांनी लेखणीबद्ध केलेल्या, चार्ल्स कोरिया यांच्या या काही आठवणी.
February 9, 2024
सदर्न हम्पशायर मध्ये हा दिवस ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सोमवारी साजरा केला जातो.
June 18, 2022
शरीरामध्ये कार्य करणा-या चैतन्याला जीवात्मा असे म्हणतात. तर या संपूर्ण सृष्टीचे संचालन करणाऱ्या परम चैतन्याला परमात्मा असे म्हणतात. जीवात्मा हा या परमात्म्याचाच अंश आहे. त्याचाच अपार क्षमतेच्या आधारे आपल्या मर्यादित चैतन्याच्या आधारे जीवात्मा या देहाचे संचालन करीत असतो. या वास्तविकतेला आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत.
November 9, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti