वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नुकतीच एक बातमी वाचली कि भारतात तरूण लोकांमध्ये ह्रदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. याची कारणमींमासा करताना बदलती जीवनशैली, ताण, खाण्यापिण्याच्या सवयी यासारख्या गोष्टींकडे बोट दाखवले गेले. थोडक्यात ‘हे होणारच’ असा सूर आहे.
December 23, 2009
१०० लोकांचा एक समूह आयुष्यावर वक्तव्य करणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार अटेन्ड करीत होते...
त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एकेक फुगा (balloon) दिला . प्रत्येकाने फुगा फुगवायचा आणि त्यावर आपले नाव टाकून हॉल मध्ये सोडायचा होता. सर्व लोक कामाला लागले.
प्रत्येक जण आपण फुगवलेल्या फुग्यावर स्वतः चे नाव टाकीत होता. बघता बघता हॉल १०० फुग्यांनी भरून गेला...
नंतर त्या वक्त्याने सर्वांना ५ मिनिटांचा अवधी दिला आणि इतक्या साऱ्या फुग्यांतून स्वतः चे नाव असलेला फुगा शोधायला लावला.!!
इतक्या भरगच्च फुग्यांतून स्वतः फुगवलेला फुगा शोधताना सर्वांची तारांबळ उडाली. ५ मिनिटे संपली तरीही कुणीही स्वतः च्या नावाचा फुगा शोधू शकला नाही!!
... नंतर त्या वक्त्याने प्रत्येकाला कुणाचेही नाव असलेला एक फुगा उचलायला सांगितले. प्रत्येकाने एकेक फुगा उचलला. वक्त्याने प्रत्येकाला सांगितले की आपल्याकडे ज्याच्या नावाचा फुगा आहे त्या माणसाला तो फुगा देऊन टाका.
अश्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या हातातील फुग्यावर ज्याचे नाव आहे त्याला तो देऊ लागला आणि २ मिनिटांत प्रत्येकाकडे स्वतःच्या नावाचा फुगा आला.!!
यावर तो वक्ता बोलू लागला…
"आपल्या आयुष्याचेही असेच झाले आहे.! प्रत्येक जण आनंद, सुख, समाधान या गोष्टी शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो आहे... परंतु खरा आनंद, खरे सुख कशात आहे याची कुणालाही कल्पना नाही...
स्वतःचा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदात दडलेला असतात. इतरांना त्यांचा आनंद द्या आणि त्याबदल्यात तुम्हालाही नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल. मानवी आयुष्याच्या यशाचे खरे गमक यातच आहे...." हे ऐकून संपूर्ण हॉल नि:शब्द झाला....
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल..!
माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय..
जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूच येण मात्र अकस्मात असत.. कारण त्याला माहितीय, माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही..
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं! विश्वास उडाला की आशा संपते! काळजी घेण सोडल की प्रेम संपत!
म्हणुन, स्वप्न पाहा, विश्वास ठेवा, आणि काळजी घ्या!
आयुष्य खुप सुन्दर आहे आनंद घ्या.
-- सरिता मुकादम
September 30, 2017
आजच्या संगणकाच्या युगातही आकडेमोडीसाठी कॅलक्युलेटर हे साधन वापरले जातेच. आता संगणकावर, घड्याळात, मोबाइलमध्ये कॅलक्युलेटर आहे. लॅटिनमधील कॅलक्युलेअर म्हणजे दगडांच्या मदतीने मोजणी, यावरून कॅलक्युलेटर शब्द तयार झाला. पूर्वीच्या काळी आपल्याकडे अर्ध्या भागात रंगीत मणी लावलेली पाटी होती, तिच्यात जी खुबी होती त्याचाच वापर करीत गणनाची संकल्पना प्रगत झाली.
August 5, 2023
अनेक उपयुक्त मंत्र ( ज्याला आपण tailor made म्हणतो) जसे दत्तमाला,गुरुचरित्र,पद्मपुराण,नवनाथ, “दुर्गासप्तशती “मध्येही आहेत.मला सर्विस मध्ये विपदा यायच्या तेंव्हा “ॐरिम सर्व बाधा प्रशमन,…..वैरी विनाशनम रिम ॐ ” मंत्राचा खुप चांगला अनुभव आला. माझ्या वाचनात आलेल्या अन्य संदर्भात उपचारांसंबधीत काही मंत्र/ स्तोत्रांच्या उल्लेख आहेत ,त्यांचा प्रयोग म्हणा, उपयोग म्हणा, करून बघता यावा म्हणुन शेअर करतो आहे :
October 17, 2020
ख्रिस्तपूर्व ३१०२ या वर्षात कुरूक्षेत्रावर महाभारत युध्द सुरू होण्याच्या ऐन वेळी अर्जुनाच्या मनावर स्वकीयांवरील प्रेमापोटी मळभ आले. ते मळभ दूर सारून त्याला पुन्हा क्षात्रधर्मानुसारचे आपले कार्य करायला उद्युक्त करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णानी त्याला रणभूमीवर केलेला उपदेश‚ आणि त्या अनुषंगाने अर्जुनाला आलेल्या शंकांचे निरसन करावे म्हणून सविस्तर सांगितलेले ज्ञान‚ यातून हा गीतोपनिषदाचा ग्रंथ बनला आहे जो ‘श्रीमद्भगवद्गीता’ अथवा सुटसुटीतपणे ‘गीता’ या नावाने ओळखला जातो. आजच्या प्रचलित मराठी बोलीत रूपांतर केलेली गेय स्वरूपातली गीता लोकाना समजणे सोपे जाईल अशी प्रामाणिक मनोभावना यामागे आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.
April 2, 2022
मना मत्सरे नाम सांडू नको हो | अती आदरे हा निजध्यास राहो |
समस्तांमधे नाम हे सार आहे | दुजी तूळणा तूळिताही न साहे ||81||
बहू नाम या रामनामी तुळेना | अभाग्या नरा पामरा हे कळेना |
विषा औषध घेतले पार्वतीशे | जिवा मानवा किंकरा कोण पूसे ||82||
जेणे जाळिला काम तो राम ध्यातो | उमेसी अती आदरे गूण गातो |
बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे | परी अंतरी नामविश्वास तेथे ||83||
विठोने शिरी वाहिला देवराणा | तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा |
निवाला स्वये तापसी चंदमौळी | जिवा सोडवी राम हा अंतकाळी ||84||
भजा राम विश्राम योगेश्वराचा | जपू नेमिला नेम गौरीहराचा |
स्वये नीववी तापसी चंदमौळी | तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ||85||
मुखी राम विश्राम तेथेचि आहे | सदानंद आनंद सेवूनि राहे |
तयावीण तो सीण संदेहकारी | निजधाम हे नाम शोकापहारी ||86||
मुखी राम त्या काम बाधू शकेना | गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना |
हरीभक्त तो शक्त कामास मारी | जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ||87||
बहू चांगले नाम या राघवाचे | अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे |
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे | जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ||88||
जनी भोजनी नाम वाचे वदावे | अती आदरे गद्य घोषे म्हणावे |
हरीचिंतने अन्न सेवीत जावे | तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ||89||
न ये राम वाणी तया थोर हानी | जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी |
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी | बहू आगळे बोलिली व्यासवाणी ||90||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 6, 2016
तुळशीला प्रदक्षिणा घालून तीर्थ म्हणून तुळशीचे पान घातलेले पळीभर पाणी पिणे ही आणखी एक लुप्त होत चाललेली भारतीय परंपरा आहे. आमच्या पिढीने निदान तुळशी वृंदावन तरी पाहिले आहे. नातवाची तिसरी पिढी ते पाहील की नाही याचीच शंका आहे. अर्थात ग्रामीण भारतात अजूनही अंगणात तुळशी वृंदावने आहेत.
March 3, 2018
सलीमभाईनी 29 कसोटी सामन्यात 1202 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी एक शतक आणि 7 अर्धशतके केली. तसेच त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती 104 धावा आणि त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या.
December 17, 2021
गवती चहास कोठें कोठें हिरवा किंवा ओला चहा म्हणतात. बंगालीत या चहास बंधबेन व हिंदुस्तानींत गंधतृण म्हणतात. संस्कृतांत यास भूस्तृण असें नांव आहे. इंग्लिश मध्ये lemon grass असे म्हणतात. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हें गवत हिरवेंगार असून खरबरीत असतें. पूर्वेकडील आर्चिपिलेगोंतल्य पुष्कळ बेटांत, सिलोनांत व हिंदुस्थानांत गवती चहा मुद्दाम बागांत लावितात. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. या गवतास क्वचित फूल येतें. गवती चहा हे बहुवार्षिक गवत असून, ते दोन मीटरपर्यंत उंच वाढते. त्याला भरपूर फुटवे येतात. पाने केसाळ असून ८० ते १२५ सें.मी. लांब असतात. पानांना लिंबासारखा वास येतो. सिंगापूर व सिलोन येथें सुवासिक तेल काढण्याकरितां गवती चहा पुष्कळ लावितात. अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहानेच होते. मग त्यात गवती चहाच्या काही पाती मिसळा. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात. हा चहा चवीला उत्तम आणि आरोग्याला हितकारी आहे. यामुळे शरीर स्वच्छ होते, अवयवांचे कार्य सुधारते. मात्र लहान मुलांना गवती चहा देण्यापूर्वी अवश्य सल्ला घ्यावा. या गवताचा सुवासिक तेल काढण्याकडेच विशेष उपयोग होतो. 'कोलन वॉटर' तयार करण्यांत या तेलाचा फार खप होतो. तापांत घाम येण्यासाठीं गवती चहाचा काढा करून पाजतात. ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो. कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो. साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात. कपभर गवती चहा घेतल्याने किंवा त्याची वाफ घेतल्याने चोंदलेले नाक व छाती मोकळी होण्यास मदत होते. त्यातील अॅंन्टीबॅक्टेरियल घटक संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव करते. गवती चहाचे तेल डोकेदुखीची समस्या कमी करते. किडनी आणि यकृताचे कार्य सुधारते. गवती चहामुळे शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच सतत मुत्र विसर्जन झाल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते व पचनही सुधारते. गवती चहातील 'अॅतन्टीमायक्रोबाईल' घटक पचनसंस्थेचा मार्ग सुधारण्यास मदत करतो. त्यातील अॅसन्टीसेप्टीक घटक बॅक्टेरियांचा नाश करून बद्धकोष्ठता, छातीत होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते. वाताचा त्रास असलेल्या रुग़्णांनी गवती चहाचे तेल लावणे हितदायी आहे. त्यातील दाहशामक घटक सांधेदुखी कमी करतात. यासाठी गवती चहाचे तेल खोबरेल तेलात मिसळून गुडघ्यांवर लावावे. तसेच गवती चहा पिणेदेखील संधीवाताच्या रुग्णांसाठी हितावह आहे. गवती चहामुळे कर्करोगापासून बचाव होतो. त्वचेचा तसेच स्तनांच्या कर्करोगापासून बचावण्यासाठी गवती चहा फायदेशीर आहे. गवती चहा मधील व्हिटामिन ए त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यातील अॅसन्टीसेप्टिक घटक आणि अॅलस्ट्रिंजंट घटक पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. गवती चहा प्यायल्याने त्वचा आणि शरीर दोन्ही स्वच्छ राहण्यास मदत होते. गवती चहाचे तेल नेहमीच्या तेलात मिसळून लावल्यास शरीराची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. खरा `ग्रीन टी' प्यायचा असल्यास, `गवती चहा' (चहा पत्ती) आणि `पुदिना' ची जुडी विकत आणा, पुदिना कमी टाका (अगदी नावाला), त्यात थोडे आले टाका आणि साखर टाका, आणि मस्त उकळून प्या. या गवती चहा पासून पाण्याच्या वाफेच्या साह्याने उर्ध्वपातन (डिस्टिलेशन) करून तेल काढण्यात येते. तेल हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगते. तेलात ७० ते ८५ टक्के सिट्रॉल असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
February 28, 2017
आपण जसे आपल्या पहिल्या ‘ इनिंग ‘ कडे ,- म्हणजे शिक्षण , नौकरी -व्यवसाय , लग्न – या कडे जसे लक्ष देतो तसे आपल्या ‘ सेकंड इनिंग ‘ कडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत . सेकंड इनिंग म्हणजे निवृत्ती नंतरचे आयुष्य . या उतरत्या आयुष्याचे नियोजन गरजेचेच असते . ‘वेळ आल्यावर पाहू ‘ ‘ आत्ताच काय घाई आहे ?’ म्हणून टाळून देतो .
February 12, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti