वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
यदा कर्णरंध्रं व्रजेत्कालवाहद्विषत्कंठघंटा घणात्कारनादः |
वृषाधीशमारुह्य देवौपवाह्यंतदा
वत्स मा भीरिति प्रीणय त्वम् ‖ २० ‖
प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या परम उपास्य भगवान श्री शंकरांच्या चरणी अत्यंत मनोहर प्रार्थना करीत आहेत.
एखाद्या भक्ताने केलेले हे अत्यंत लडिवाळ आर्जव आहे.
ते म्हणतात,
यदा कर्णरंध्रं व्रजेत्- ज्यावेळी माझ्या कानावर येईल,
कालवाह - म्हणजे भगवान यमराजांच्या
द्विषत्कंठघंटा- कंठात बांधलेल्या घंटेचा घणात्कारनादः - भीषण अशा प्रकारचा आवाज.
तो ज्यावेळी माझ्या कानावर येईल, अर्थात माझा मृत्यू, काळ जवळ येईल, त्यावेळी हे भगवान महाकाल !
वृषाधीशमारुह्य - वृषभाधीश अशा आपल्या नंदीवर बसून,
देवौपवाह्यंतदा- हे भगवन् त्यावेळी आपण माझ्याजवळ यावे.
वत्स - हे भक्ता !
मा भीरिति - घाबरू नको, अशा आपल्या आश्वासक ध्वनीने
प्रीणय त्वम् - आपण मला प्रसन्न करा.
ही तुलनाच मोठी रम्य आहे.
आचार्य श्री म्हणतात माझ्या अंतिम समयी माझ्यासमोर भगवान यमराज नाही जर आपण असावे.
माझ्या कानात यमांच्या रेड्याच्या गळ्यात बांधलेल्या घंटेचा भीषण नाद नाही तर, हे वत्सा ! घाबरू नको. असा आपला आशीर्वाद घुमावा.
आपण वृषभा वर बसून यावे या विनंतीत, मला मृत्यू नंतर कशावर बसूनच जायची वेळ असेल तर ती यमराजाच्या काळ्याशार रेड्यावर नाही तर आपल्या पांढऱ्या शुभ्र नंदीवर बसून, यमराजांच्यासोबत त्यांच्या नरकात नव्हे तर नंदीवर बसून आपल्या परम वैभवशाली कैलास लोकांस जाण्याचे भाग्य प्रदान करावे. अशी अत्यंत सुंदरतम प्रार्थना आचार्यश्री करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 29, 2020
२००० नंतरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी अधिक कॉर्पोरेट झाली. याच काळात ‘व्हॅम्प डान्स’ किंवा ‘स्पेशल गाणे’ या शब्दांची जागा अधिकृतपणे ‘आयटम नंबर’ (Item Number) या शब्दाने घेतली. हे गाणे आता चित्रपटाचा एक स्वतंत्र भाग मानले जाऊ लागले, ज्याचा वापर चित्रपटाच्या पहिल्या टीझर किंवा ट्रेलरच्या आधी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता (Hype) निर्माण करण्यासाठी केला जाऊ लागला.
August 24, 2026
सुगंधी उटणे लावून केलेली आंघोळ साबण लावून केलेल्या आंघोळीपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी आहे. तरीसुद्धा आपण वैचारिक गुलामीमुळे स्वतंत्र विचार करू न शकल्याने साबणाच्या फेसातून बाहेर पडण्याची मानसिकताच नाहीये.
February 26, 2018
तुळतुळीत टक्कल आणि दोन पुनरागमनांसाठी प्रसिद्ध असलेला सय्यद किरमानी.
December 28, 2010
मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, पराचक्रे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागला.
January 22, 2013
आयुर्वेदातील ‘सुवर्णप्राशन संस्कार’ हा हिंदुस्थानच्या ‘राष्ट्रीय लसीकरण’ मोहिमेचा भाग व्हायला हवा. आयुर्वेद हे या राष्ट्राचे पर्यायी नव्हे तर प्रमुख वैद्यकशास्त्र आहे. उत्तम रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचाच आधार घ्यावा लागेल.
August 23, 2016
आजूबाजूंच्या घरांपुढच्या हिरव्या गर्द हिरवळीवर रंगी बेरंगी सुकलेली पानं पडायला लागतात. रस्त्यांवरची सुकलेली पानं, येणार्या जाणार्या गाड्यांमुळे इतस्तत: ढकलली जातात. छोट्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंची झाडं रंगी बेरंगी पानांनी भरून गेली की जणू रंगीत पताका आणि कमानींनी रस्ते सजवल्यासारखे दिसायला लागतात. थोड्याच दिवसात पडलेल्या पानांची संख्या एवढी वाढते, की रस्त्याच्या कडेला सुकलेल्या पानांच्या किनारी तयार होतात. जिथे फारशी गाड्यांची वर्दळ नसते असे आडबाजूचे छोटे रस्ते तर काही दिवसातच सुकलेल्या पानांनी पूर्णपणे झाकून जातात. रंगीबेरंगी पानांच्या गालिच्यांनी रस्ते आणि जमिनी भरून जातात. रस्ते, बाजूचे फूटपाथ आणि घरापुढच्या हिरवळी, सारं काही सुकलेल्या पानांनी एवढं भरून जातं, की रस्ते कुठे आहेत हे नवीन माणसाला समजणं मुश्कील व्हावं. मग एखाद्या बोटीने पाण्यावर लाटा उठवाव्यात तशा या सुकलेल्या पानांच्या लाटा उठवत, कधी तरी एखादी गाडी रस्त्यावरून अचानकपणे जाते आणि खालचा रस्ता दिसायला लागतो.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडी एवढी दाट की रस्त्यापासून १५-२० फूट आत काही दिसत नाही. ६०-७० फूट उंचीची ही सगळी झाडं अशी दाटीवाटीने उभी ठाकल्यामुळे, रस्याच्या दोन्ही बाजूला उंचच उंच भिंती असल्यासारखं वाटतं. मधेच एखादं घर, ओढा, शेत किंवा गावकूस लागतं आणि तेवढ्यापुरतं या भिंतीला भगदाड पडून भिंती पलीकडचे दृश्य नजरेस पडायला लागतं. बाकी सर्व वेळ फक्त समोरचा रस्ता आणि दोहोबाजूच्या झाडांच्या भिंतीमधला आकाशाचा पट्टा तेवढा वर दिसत असतो.
ऑक्टोबर सुरु होतो आणि पानगळती सुरू होते. झाडांच्या शेंड्यांपासून पानांची गळती सुरू होते आणि मग हळू हळू खालच्या फांद्यांवरची पानं गळायला लागतात. पानगळती सुरू होते तसतसे झाडांचे शेंडे हळू हळू मोकळे व्हायला लागतात आणि रस्त्याच्या वरचा आकाशाचा पट्टा रुंदावत जातो. जसजशी पानगळती वाढते तसतशी जणू एखादं जीर्ण वस्त्र विरायला लागावं, तसं हे एकेकाळचं मखमली हिरवं वस्त्र, रंगी बेरंगी डाग पडून फाटायला लागतं आणि त्याच्या वाढत जाणार्या छिद्रांमधून पलीकडली घरं, शेतं दिसायला लागतात.
ऑक्टोबर सरता सरता ‘फॉल कलर्स’ पूर्ण रंगात आलेले असतात. झपाट्याने होत चाललेल्या पानगळतीमुळे, उघड्या वागड्या होत जाणार्या रानामधे, अजून आपला गर्द लाल, नारिंगी पर्णभार संभाळून असलेलं एखादं झाड, डोंगरावर लागलेल्या वणव्यासारखं नजरेत भरत असतं. सुरवातीला एक एक दोन दोन करत गळणारी पानं हळू हळू खुळ्यागत जमिनीकडे झेपावू लागतात. अशातच एखादी जोरदार वार्याची झुळुक येते आणि झाडांच्या फांद्या हलवून जाते. मग ह्या पानांच्या रंगीबेरंगी पताका गिरक्या घेत घेत चहूकडे विखरून जातात. शेवटी शेवटी तर पानगळ एवढी वाढते, की गाडीतून जाताना दोहोबाजूंच्या झाडावरून एखादा पाखरांचा थवा जमिनीवर उतरावा किंवा एखादी टोळधाड आसमंतातून शेतावर उतरावी तसं वाटायला लागतं.
ओढ्यांच्या बाजूच्या झाडांची पानं गळायला लागून पाण्यात पडायला लागतात. सुरवातीला ही पडलेली पानं खळाळत्या पाण्याबरोबर वहात जातात. मग जसजशी त्यांची संख्या वाढायला लागते, तसतशी ही सुकलेली पानं, ओढ्याच्या कडेला आणि अधल्या मधल्या दगड धोंड्यांत अडकून साचायला लागतात.
एप्रिल मे पासून ते सप्टेंबर पर्यंत जाणवणारा हिरव्या रंगाचा दिमाख आता उतरत चाललेला असतो. झाडांच्या पायदळीची झुडपं आणि गवत देखील सुकत चाललेलं असतं. त्यात वरून पडणार्या सुकलेल्या पानांनी, रानाचा पायथा हिरव्याचा तपकिरी करून टाकलेला असतो. सुकलेलं गवत, झुडपांच्या काटक्या, झाडांच्या मोडून पडलेल्या फांद्या, दगड धोंडे आणि सुकलेली पानं या सगळ्यामुळे, जमिनीला वेगळाच असा रखरखीत पोत (texure) आलेला असतो.
August 10, 2015
एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.
तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो... आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...
आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते... माणसाचं आयुष्य हे असंच असतं... त्याच्या हातात काहीच नसतं... आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची... कर्ता करविता असतो तो ईश्वर...एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...
मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'
आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं... कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल? 'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...
त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं? 'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल? एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...
ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल? त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल? कोण सांगेल कोण?? कुणीच नाही... हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...
ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!
मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....-कोणी कितीही महान झाला असेल,पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही..स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस..देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं...
-स्वामी विवेकानंद
June 7, 2017
अनुराधा टी.के.यांचा जन्म कर्नाटकातील बेंगळुरू येथे झाला. त्यांनी बंगळुरू येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केली. १५ जुलै २०११ रोजी अंतराळ केंद्रातून GSAT-१२ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी GSAT-10, GSAT-9, GSAT-17 आणि GSAT-18 संप्रेषण उपग्रहांच्या प्रक्षेपणाचेही निरीक्षण केले.
August 25, 2025
गीर्देवतैति गरुड़ध्वज सुंदरीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति।
सृष्टि-स्थिति-प्रलय केलिषु संस्थितायै तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरूण्यै ।।१०।।
आई आदिशक्ती परांबेचे कार्य तीन प्रकारे चालत असते. या तीन पद्धतींनाच त्रिगुण असे म्हणतात. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या द्वारे कार्य करणाऱ्या आदिशक्तीच्या तीन रूपांना महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती असे म्हणतात.
या तीन रूपात कार्य करणाऱ्या तीन शक्तींचे वर्णन येथे आचार्यश्री करीत आहेत.
गीर्देवतैति- गीरा म्हणजे वाणी. त्या वाणीची देवता ती गीर्देवता. अर्थात आई सरस्वती.
गरुड़ध्वज सुंदरीति - गरुडध्वज म्हणजे भगवान विष्णू. त्यांच्या रथाच्या ध्वजावर गरुडाचे चित्र काढलेले असते. त्यांची सुंदरी अर्थात प्रियतमा. म्हणजे आई जगदंबा महालक्ष्मी.
शाकम्भरीति - जगदंबेचे एक नाव शाकंबरी असे आहे. कधीकाळी प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सर्व ऋषी-मुनींनी प्रार्थना केल्यामुळे आई जगदंबा प्रगट झाली. सगळ्या भक्तांच्या उदरभरणाची सोय व्हावी म्हणून तिने सर्वत्र शाक अर्थात भाज्या निर्माण केल्या. याच्या आधारे भक्तांचे भरणपोषण केल्यामुळे हे नाव रूढ झाले.
शशिशेखर वल्लभेति- शशि म्हणजे चंद्र. त्याला शेखर म्हणजे मस्तकावर धारण करणारे. अर्थात भगवान श्री शंकर. त्यांची वल्लभा अर्थात प्रियतमा. म्हणजे देवी पार्वती.
सृष्टि स्थिति प्रलय केलिषु संस्थितायै- या तीन स्वरूपात, त्या त्रिदेवांसह, सृष्टी निर्मिती, स्थिती अर्थात पालन आणि लय अर्थात विनाश या तीनही केली म्हणजे लीलांमध्ये आधारभूत स्वरूपात विद्यमान असणाऱ्या,
तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरूण्यै- त्या त्रिभुवनैकगुरू अर्थात त्रैलोक्यातील सर्व श्रेष्ठ तत्व असणाऱ्या भगवान विष्णूंची तरुणी अर्थात सुंदरीला नमस्कार असो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 19, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti