वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
त्या पाच बाय दहाच्या खोलीत –
एक लोखंडी कॉट रहाते,
अगदी त्याच खुराड्यात –
एक कपाट रहाते,
August 27, 2022
आंतरराष्ट्रीय डायबेटीज फौंडेशनच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात ६२ दशलक्ष डायबेटीसचे रुग्ण आहेत. सध्या भारतात डायबेटीस रुग्णांची संख्या हि इतर देशांच्या तुलानेत सगळ्यात जास्त आहे. इंडिअन हार्ट असो. नुसार २०३५ मध्ये भारतात १०९ दशलक्ष रुग्ण डायबेटीसचे असतील. हि आपल्या चिंतेची बाब आहे. डायबेटीसने होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा वाढेल असे आकडे वारीहून दिसून येते.
ह्याचे कारण काय?
1) हाय कॅलरी असलेला आहार.
2) वाढलेले व्यसनांचे प्रमाण.
3) व्यायामाचा अभाव
4) स्थौल्य
5) वाढता मानसिक ताण-तणाव
6) बदलती जीवनशैली
आयुर्वेद काय म्हणते?
“प्रकृष्टोमेह: यास्मिन रोगे स प्रमेह: म्हणजेच ज्या रोगात मुत्राचे प्रमाण वाढते (प्रभुताविलमुत्रता) तो प्रमेह. प्रमेह हा व्याधी डायबेटीस ह्या व्याधीशी मिळता-जुळता आहे. डायबेटीससाठी प्रचलित शब्द ‘मधुमेह’ हा प्रमेहाच्या वाताज प्रकारपैकी एक आहे.
आयुर्वेदानुसार प्रमेहाची करणे-
नवे धान्य वापरणे, नवे तांदूळ, उडीद व डाळींच अतिप्रमाणात घेणे, खीर, खिचडी, भात अधिक घेणे, नवीन मद्य/दारू पिणे, न विरजलेले दही, ताजे दही, द्रव पदार्थ, गोड पदार्थ अधिक प्रमाणात घेणे, पंचकर्म व व्यायाम न करणे, अधिक झोपणे, झोपून वा बसून राहणे, हे सर्व करणे शरीरात कफ, चरबी वाढवतात आणि प्रमेह हा व्याधी उत्पन्न करतात.
चला तर मित्रांनो, योग्य व गरजे इतकाच आहार घेऊया आणि पुरेसा व्यायाम करूया आणि भारताला डायबेटीस मुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया.
वैद्य भूषण मनोहर देव.
ज्योती आयुर्वेद,
जळगाव 8379820693
http://wp.me/p7ZRKy-4k
May 17, 2017
विज्ञानात पीएचडी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. कमला सोहोनी (उर्फ भागवत) यांचा जन्म १९१२ मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला.त्या प्रसिद्ध मराठी संहित्यिका दुर्गा भागवत यांच्या भगिनी होत्या. त्यांचे वडील नारायणराव भागवत हे रसायनशास्त्रज्ञ होते. कमला यांनी १९३३ मध्ये मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्र (सहाय्यक) विषयात बॅचलर (प्राचार्य) आणि बी.एससी. पदव्या मिळवल्या.
August 29, 2025
रसाचा आणखी एक उपप्रकार म्हणजे अनुरस होय. मुख्य चवी बरोबर आणखी एक चव मागाहून जाणवते तो अनुरस. जसे मध खाताना गोड लागतो, पण मध पोटात गेल्यावर जीभेवर एक प्रकारची तुरट चव रेंगाळत रहाते. त्याला मधाचा अनुरस म्हणतात.
कोणतेही पदार्थ एकल रस प्रधान असत नाहीत. म्हणजे मध फक्त गोडच असतो असे नाही. अग्निच्या कमी अधिक असण्यामुळे, पंचमहाभूतांच्या तरतम भावामुळे, पदार्थातील चवी मधे थोडा थोडा बदल होत जातो. आणि अनुरसांची निर्मिती होते.
जसे हिरवा रंग बघितला तरी त्यात अनेक सूक्ष्म छटा असतात. साडीला योग्य मॅचिंग ब्लाऊजपीस शोधताना, हे पाच पन्नास रंग आपल्याला सहज दिसतात. तसे, चवींमधे देखील एका चवीत आणखी दुसरी चव मिसळत गेली कि वेगळी वेगळी चव बनत जाते. घरात साखर, चहा पावडर, दूध, पाणी तेच असले तरी चार माणसांनी बनवलेल्या चार चहाच्या चवीमधे फरक पडतोच ना ! यातील साखर पावडरचे प्रमाण थोडे जरी कमी जास्त झाले किंवा गॅस लहान मोठा ठेवला गेला तरी बनणारा चहा हा वेगवेगळ्या चवींचा बनतो, हे आपण व्यवहारात पाहातो, तसेच आहे.
हिरड्यांचा तुरटपणा, सुपारीचा तुरटपणा यात फरक आहे. साखरेचा गोड पणा आणि गुळाचा गोडपणा यातही फरक आहे. तसेच कारले आणि मेथीच्या कडूपणातही फरक दिसतो. त्यामुळे प्रत्येक चवीचे वेगवेगळे अनुभव येणे आणि त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसणे, चुकीचे नाही.
एखादे नवीन व्यंजन बनवताना त्यात कोणत्या चवी किती प्रमाणात मिसळल्या जात आहेत, त्यावर त्या पदार्थांचे औषधी गुण अवलंबून असतात.
डाळीपासून गोड गुळ घालून खीर करता येते, आणि तिखट मसाला एकत्र केला की, आमटी बनते. आंबट घातले की, चटणी होईल.
आता हेच बघा ना, खीर गोड आहेच, आणि पुरणपोळी पण गोडच आहे. हे दोन्ही गोड पदार्थ एकाच चणाडाळीपासून बनतात, म्हणजे यांचे गुण एकच असतील का ? कारण एक खीर शिजवली जातेय आणि दुसरी पुरणपोळी भाजली जातेय. जो पदार्थ पाणी घालून शिजवला जातो, तो पचायला जड बनतो, तर भाजून ज्याच्यातील पाणी कमी केले जाते, ती पुरणपोळी पचायला खीरीच्या तुलनेत हलकी होईल का ? असा विचार करायला हरकत नाही, पण पुरणपोळी बनवण्यासाठी आणखी एक मधुर रस वापरला जातो, तो म्हणजे गहू. म्हणजे पुनः ती पचायला जड झाली. यासाठी
पुरणपोळी खाताना ती तुपाबरोबर किंवा कोकणात नारळाच्या दुधाबरोबर इतरत्र गाईच्या दुधाबरोबर खाल्ली जाते. सोबत डाळीची मसालेदार तिखट आमटी (ज्याला कट असेही म्हणतात.) पुरणपोळी पचवायला मदत करायला हजर असतेच.
यासाठी आहार बनवताना किंवा खाताना, चवींच्या मिलाफाचा संगम करण्यासाठी, युक्ती वापरणे महत्वाचे असते. जी ओरीजिनली भारतीयांकडे आहे.
एखादा पदार्थ सहजपणे पचावा, यासाठी त्या पदार्थामधे अन्य काही पदार्थ युक्तीने मिसळले जात होते. आता सर्वच बदलले. दोन भिन्न चवीचे पदार्थ बिनधास्त एकत्र केले जात आहेत. जसे मधुर रसाच्या दुधात आंबट फळे घालणे, किंवा दूध घातलेल्या चहामध्ये खारट चवीची खारी मारी बुचकळून खाणे हे रस विरूद्ध आहे.
हे विरूद्ध एखादा दिवस खाल्ले म्हणजे लगेच रोगाची लक्षणे दिसतील असे नाही. पण वारंवार असे रस विरूद्ध पदार्थ खाल्ले गेले तर मात्र असात्म्यता अहणजे अॅलर्जी निर्माण होते, हे नक्की !
वेगवेगळ्या फूड चॅनेल्सवर रंगसंगती, फॅशन, ट्रेंड, व्हरायटी, न्यू इन्व्हेंशन इ. च्या नावाखाली आरोग्यदायी आहाराचा पार बट्ट्याबोळ चाललेला आहे. त्यात डाएटीशियन या पदवीधारकांकडून आयुर्वेदातील मूलतत्वे बरोबर विरूद्ध करून सांगितली जात आहेत. वैद्य मंडळीदेखील पाश्चात्य बुद्धीची बनत चालली आहेत, अनेक डाॅक्टरांचे देखील आहाराबाबत एकमत होत नाही, आणि नेमकं आपण कसं वागायचं, हे समाजाला समजतच नाहीये.
किती किती ठिकाणी दुरूस्ती करणार ? आभाळच फाटले आहे, ठिगळे तरी किती लावणार ? बघू, अच्छे दिन आनेवाले है, असं ऐकायला येतंय !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
29.11.2016
November 29, 2016
भारतात आज निर्माण होणाऱ्या एकूण वीजेपैकी मोठा भाग हा औष्णिक ऊर्जेद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा आहे. औष्णिक पद्धतींनी निर्माण केल्या जाणाऱ्या वीजेचं प्रमाण हे एकूण वीज निर्मितीच्या 65 टक्के इतकं आहे. सुमारे 22 टक्के वीज ही जलविद्युत प्रकल्पांद्वारे तर 3 टक्के वीज ही अणुऊर्जेद्वारे निर्माण होते. उर्वरित 10 टक्के वीज ही पवनऊर्जा, सौरऊर्जा यासारख्या इतर अपारंपारिक स्रोतांद्वारे निर्माण होते.
June 12, 2023
रामायणातील खलनायक म्हणून रावणाला ओळखले जाते. रावणाची ही एक वेगळीच ओळख वाचा
November 7, 2016
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॉ. हेलन टाऊसिग या बालहृदयरोजतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होत्या. जन्मतःच हृदयात दोष असणार्या बालकांवर हृदयशस्त्रक्रिया करून त्यांचे आयुष्यमान उंचावणारी शल्यचिकित्साडॉ. ब्लॅलॉक यांनी प्रथमतः यशस्वी केली व त्यानंतर त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
May 14, 2019
त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते.
June 29, 2022
मागील काही दिवसापासुन म्हणजे 8/11/16 तारखेपासून काळा पैसा कसा तयार होतो, कोण साठवतो यावर बरीच चर्चा टीव्ही, फेसबुक, व्हाट्सअँप वर दिसून आली, मीही त्यातलाच एक म्हणून जमेल तसे दोन लेख लिहिले.
विरोधी पक्षनेते, तसेच NDA मधील काही विरोधी नेते प्रत्येक भाषणाच्या सुरवातीलाच सांगतात, आम्ही काळ्या पैशाविरुद्ध आहोत, परंतु ज्या तर्हेने हे सर्व हाताळले जातंय ते बरोबर नाही, कारण आम्हाला विश्वासात न घेता हि कारवाई केली गेली. अश्या कारवाया सांगून करायच्याच नसतात. अतिशहाण्यांनो, तुम्हाला विश्वासात घेऊन हि कारवाई कधीच यशस्वी झाली नसती, हि गोष्ट माझ्यासारख्या अतिसामान्य बौद्धिक क्षमता असलेला माणूस सुद्धा सांगू शकेल. असो,
स्वातंत्र मिळाल्या पासून 70 वर्षात काळात, 60 वर्षे काँग्रेस पक्षातील गांधी घराण्याने एकहाती सत्ता उपभोगली, याच पक्षाचे नेते आज टीव्हीवर मोठया तोंडाने सांगतात आम्ही काळ्यापैशाच्या विरुद्ध आहोत, हि लाजिरवाणी गोष्ट नाही का वाटत?
राहुल गांधी आजही प्रत्येक भाषणात सांगतात, आम्ही गरिबांच्यासाठी आहोत. अहो, तुम्ही गरिबांच्यासाठी असणारच, कारण देशातील जितकी जास्त जनता गरीब राहणार, तितकी तुमची सत्ता अभादित राहणार, हि युक्ती साठ वर्षे तुमचे पणजोबा, आजी, वडील, आई व आता तुम्ही वापरली, व आज ह्या देशातील 55 टक्के जनता दारिद्ररेषेखाली ठेवण्यासाठी आपणच कारणीभूत ठरला आहात, याचा अर्थ असा निघतो, "तुम्ही गरीब हटावसाठी नसून गरिबी टिकावसाठी आहात." गरिबी हि तुमच्यासाठी शेती आहे, गरीब माणसे हे पीक आहे, आणि हे पीक जास्तीतजास्त फोफावेल यासाठी तुम्ही व तुमचे शिलेदार कळ्यापैशाच्या रुपात भरपूर खत घालून, शेतीचे मताच्या रुपात उत्पन्न काढत होते. आज हेच लोक गरिबांवर अन्याय होतो आहे म्हणत सगळीकडे छाती बडवून दाखवत आहेत.
गरिबी, काळा पैसा या विरुद्ध रडणे हे मगरीचे अश्रू आहेत हे आता अशिक्षिताला सुद्धा समजले आहे, म्हणून तुम्ही लोकसभेत 425 वरून तुम्ही 44 वर घसरला. 15 ऑगस्ट 1947 ला भारतासोबत दक्षिण कोरिया या देशाला सुद्धा स्वातंत्र मिळाले, आज कोरिया एक प्रगत राष्ट्र म्हणून जगात उदयास आले आहे, आणि भारत आजही काँग्रेसच्या कृपेने हागणदारी मुक्त होण्यासाठी झगडत आहे.
सत्तर वर्षात, या देशात नाव घेण्यासारखे रस्ते झाले नाहीत, सरकारी दवाखाने म्हणजे नरक बरा, एकही उच्च शैक्षणिक विद्यापीठ जगात पहिल्या 25 मध्ये सुद्धा नाही, प्रार्थमिक शिक्षण आळ्या, व खडे मिश्रित खिचडी खाण्यापुरते शिल्लक आहे.
28 ला भारत बंद का करायचा, याचे ठोस स्पष्टीकरण यातील एकही नेता देऊ शकत नाही. वास्तविक, नोटा बंदीमुळे मोदी सरकारने धाडसी पाऊल उचलून देशाची अर्थकरणाची दिशा बदलून टाकली आहे, हे यश विरोधकांना पचनी पडणे महाकठीण झाले आहे, हेच सर्व विरोधाचे मूळ कारण आहे.
-- विजय लिमये
9326040204
November 28, 2016
स्वभावातून सवयीचा उगम पावतो. लहानपणापासून सगळ्यांनाच बऱ्या-वाईट सवयी लागतात. अगदी बालसुलभ म्हणजे अंगठा चोखणे, नखे कुरतडणे, दिसेल ते तोंडात घालण्याची प्रवृत्ती असणे. ! त्यानंतर खोटे बोलणे, भरभर (अथवा हळूहळू) जेवणे, कोठेही (दिलेल्या) वेळेवर पोहोचणे, गोष्टी/ कामे पुढे ढकलणे, सकाळी उशिरा उठणे आणि ही यादी संपता संपणार नाही.
June 26, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti