(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • न्यूट्रीशनचे ज्ञान खेळाची गुणवत्ता सुधारू शकेल का ?

    स्पोर्ट्स परफॉर्मन्स मध्ये न्यूट्रीशन महत्वपूर्ण भूमिका बजावते. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ज्ञान आणि त्यांचा खेळातील परफॉर्मन्स ह्याचा काही संबंध आहे का ह्या विषयी मात्र खेळाडूंमधे स्पष्टता नव्हती असे निदर्शनास आले. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ज्ञान जितके चांगले तितका त्यांचा न्यूट्रीशन चॉईस चांगला असू शकतो असे ही आढळले आहे. चांगल्या न्यूट्रीशन चॉईस चा फायदा त्यांना त्यांचा फिजीकल फिटनेस मधील विविध घटक जसे की बॉडी कंपोझिशन, अॅनरोबीक पॉवर, एनड्यूरन्स सुधारण्यासाठी मदत करू शकतात. खेळात ट्रेनिंग सुधारण्यासाठी, तसेच खेळाडूंचा परफॉर्मन्स उच्चतम होण्यासाठी योग्य प्रमाणात योग्य अन्नघटकांचे सेवन करणे महत्व पूर्ण ठरते. खेळाडूंना न्यूट्रीशन विषयी कितपत माहिती आहे हे तपासण्यासाठी वेगवेगळी मॉड्यूल वापरली जातात.

    खेळातील परफॉर्मन्स चांगला होण्यासाठी काही महत्वपूर्ण घटकांचे ज्ञान असणे लाभदायक ठरेल
    -- हायड्रेशन आणि डीहायड्रोशन स्टेटस
    -- स्पोर्ट्स ड्रिंक - योग्य ड्रिंक कोणते, ते केव्हा घ्यावे, किती घ्यावे
    -- एनर्जी साठी कार्बोहायड्रेट आणि फॅटचे किती सेवन करावे
    -- कार्बोहायड्रेट कधी घ्यावे आणि फॅटचे सेवन कधी करावे
    -- फळ आणि भाज्यांचे सेवन
    -- डाएटरी फायबर (तंतुमय पदार्थ) किती आणि कधी घ्यायला हवे
    -- प्रथिनांचे सेवन किती प्रमाणात करावे
    -- परफॉर्मन्स सुधारण्यासाठी जीवनसत्व व खनिज (vitamins and minerals) ह्यांचे सप्लीमेंट गरजेचे आहे का
    -- न्यूट्रीयंट टायमिंग महत्वाचे आहे का ?

    न्यूट्रीशन विषयीचे ज्ञान, खाण्याच्या सवयी आणि खेळ ह्या संदर्भातील काही अध्यापने
    सेमी-प्रोफेशनल सॉकर खेळाडू मध्ये न्यूट्रीशन चे ज्ञान आणि त्यांचा फिजीकल फिटनेस किती आहे हे तपासण्यासाठी एक अध्ययन केले होते. न्यूट्रीशन चे ज्ञान किती आहे हे तपासण्यासाठी त्या संदर्भातील 11 मुद्दे असलेली एक प्रश्नावली तयार केली. ह्या संदर्भातील सर्व खेळाडूंची माहिती जेव्हा गोळा केली तेव्हा मात्र हे खेळाडू कार्बोहायड्रेट चे सेवन कमी करताना आढळले. अशाच प्रकारच्या दुसर्‍या एका प्रयोगात किशोरवयीन सॉकर खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. त्या ही खेळाडूंमधे एनर्जी चे सेवन आवश्यकतेपेक्षा कमी होते, आहारात समतोल नव्हता, तसेच हे खेळाडू तळकट पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करतात असे निदर्शनास आले. ह्या दोन ही अध्यापनावरून न्यूट्रीशन चे सेवन उच्चतम पातळीवर घेऊन जाण्याची गरज आहे असे दिसते. हा पूर्ण शोध प्रबंध Scientfica volume 20 14 article ID 180353 मध्ये प्रकाशित झाली आहे

    अशाच प्रकारचे अध्यापन प्रोफेशनल English rugby खेळाडूंमधे् केले. त्यासाठी ह्या खेळाडूंचं न्यूट्रीशन विषयीचे ज्ञान आणि त्यांच्या खाण्याची सवयी eatwell plate food categories वरून तपासली. ह्यासाठी सुपर लिगच्या दरम्यान सर्व साधारण न्यूट्रीशन विषयी प्रश्नावली दिली. शोध प्रबंधासाठी निवडलेल्या 21 खेळाडूंचे वय 25+5 वर्ष, BMI 27+2.4 kg/m2, आणि खेळाचा अनुभव 6+4 वर्ष. त्यांना त्यांच्या न्यूट्रीशन ज्ञाना प्रमाणे चांगले ज्ञान व थोडे ज्ञान अशा दोन भागात विभागले. चांगले ज्ञान असलेले 11 खेळाडू होते तर थोडे ज्ञान असलेले 10 खेळाडू होते. खेळाडूंची खाण्याची पद्धत काय आहे हे जाण्यासाठी फूड (अन्न) प्रश्नावली मध्ये ते कोणते पदार्थ किती वेळेस घेत होते ह्याची माहिती घेतली.

    ह्या माहीती वरून असे निदर्शनास आले की ह्या खेळाडूंना न्यूट्रीशन विषयी बरेच ज्ञान होते, पण स्टार्ची आणि फायबरस पदार्थ कधी, किती वेळ कसे घ्यावे ह्या संदर्भात मात्र माहिती नव्हती. तसेच ज्या खेळाडूंचा स्कोर जास्त होता, ते खेळाडू जास्त फळे, भाज्या तसेच कार्बोहायड्रेट जास्त असलेले पदार्थ निवडताना आढळले. हा शोध प्रबंध Journal of International Society of Sports Nutrition 2015 12 :18 ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

    ह्या सर्व शोध प्रबंधा वरून असेच दिसते आहे कि खेळाडूंना न्यूट्रीशन संदर्भात हस्तक्षेप कसा करावा जेणेकरून त्याचा परफॉर्मन्स सुधारेल ह्यासाठी न्यूट्रीशन चे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. सुरुवातीला कमीतकमी प्रत्येक खेळाडूला त्याच्या खेळासाठी आवश्यक असलेल्या एनर्जी चे सेवन कसे करावे, लिन मसल मास कसे सुधारावे, त्यांच्या खेळाला आवश्यक असलेले वजन कसे घटवावे किंवा वाढवावे आणि हायड्रेशन विषयी कशी काळजी घ्यावी ह्या संदर्भात प्रशिक्षण देणे मोलाचं ठरेल.

      July 25, 2015


  • रंग चिकित्सा – भाग ३

    मागील लेखात आपण रंग किती प्रकारे आणि कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला लाभदायक ठरतात यावर चर्चा केली – माहिती घेतली. या लेखात आपण रंगांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.

    रंग हा घटक म्हणजे ‘स्वयंभू’ चैतन्य आहे. हे चैतन्य मनावर आणि त्यानंतर ‘मेंदू’ असलेल्या शरीरावर अधिराज्य गाजवते. आपला जन्म – जन्मवेळ – जन्म ठिकाण हे सारं एका ‘टाईम फॅक्टर’ मध्ये निश्चित बांधलेलं असतं. त्यानुसार जन्म कुंडली – जन्मराशी – अंकशास्त्रादी पुरातन आणि पारंपारिक शास्त्रांनी ‘त्या’ वेळेनुसार जन्म झालेल्या व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल मार्गदर्शनात्मक भाकित वर्तवलेले असते. यावर अनेक मत-मतांतरे आहेत. आपल्याला त्यात जायचे नाही. आपल्या विषयानुसार आपण राशी-नक्षत्र आणि जन्मवेळ इत्यादींची रंगांबरोबर सांगड घालून, त्याप्रमाणे आपल्यावर काय काय तसेच कोणते सकारात्मक परिणाम होऊ शकतात हे प्रत्येक नक्षत्रानुसार पाहणार आहोत.

      September 2, 2018


  • पाणबुडी ( submarine ) म्युझियम – भारतीय नौदलाचे गौरवस्थान

    भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र राज्यातील विशाखापटटम ( वैझ्याग ) हे पुरातन काळापासूनचे महत्वाचे बंदर. ब्रिटीश राज्यकर्त्यानी मोठी गोदी बांधून समुद्र व्यापार मार्गाचे महत्वाचे ठिकाण तयार केले. आज भारतीय नौदलात त्याचे अनन्य साधारण महत्व असून सबमरीन्सचा महत्वाचा बेस येथे आहे. विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीच वरील सबमरीन म्युझियम पाहून डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्येक भारतीय नागरीकाने त्याला भेट देऊन मानाचा मुजरा दिलाच पाहिजे अशी ही विशेष जागा आहे. आशिया खंडातील अशा तऱ्हेचे हे एकमेव म्युझियम आहे.

      March 19, 2019


  • नारळी पौर्णिमा

    श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे. या दिवशी नारळाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करतात. या सणाचे महत्त्व विशेष करून समुद्रकाठच्या भागात जास्त आढळते. नारळी पौर्णिमेनंतर कोळी मंडळी समुद्रात मच्छीमारीस जातात. त्याप्रित्यर्थ समुद्राचे पूजन करतात.

    -श्री करंदीकर गुरुजी

      August 30, 2023


  • एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ स्थापना दिन

    महिलांनी शिकावे, स्वावलंबी व्हावे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी २ जुलै १९१६ रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली. भारतातीलच नव्हे तर मध्य पूर्व आशियातील केवळ महिलांसाठी असलेले हे पहिले विद्यापीठ आहे.

      July 2, 2021


  • ग्रुप ऍडमिन / टोळी मुकादमाच्या मानसिकतेचा अभ्यास……

    ग्रुप ऍडमिन / टोळी मुकादमाच्या मानसिकतेचा अभ्यास….. ग्रुप वरील सदस्यांच्या भिन्नकभिन्न मानसिकतेचा सांगोपांग विचार, एक शोध, अनेक बोध..

      August 21, 2018


  • दि कश्मीर फाईल्स’ – सत्य ‘खरं’ असतं !

    “इंफोटेंमेंट” सदरातील चित्रकृतीने त्या चौकटीबाहेर जाऊन समोर धरलेला आरसा विद्रुप आणि असह्य होता. मल्टिप्लेक्सच्या थंडगार अंधारात हे साधं बघणंही अस्वस्थ करणारं होतं आणि बजाज स्कुटर /गॅस सिलेंडर मुळे वैतागणाऱ्या मला त्या मंडळींच्या जागी स्वतःला इमॅजिन करणेही अशक्य होतं.

      March 18, 2022


  • किचन क्लिनीक – तोंडली

    किचन क्लिनीक – तोंडली

    हि भाजी तशी आपल्या सर्वांच्या परिचयाची व ब-याच लोकांना आवडणारी.तोंडलीची चटणी,भाजी,उसळ,लोणचे असे अनेक प्रकार करून हिचा आस्वाद आपण सगळेजण घेत असतो.दिसायला छोटी असली तरी हि भयंकर रुचकर भाजी आहे.

    हि तोंडली वेलीला लागते.अर्थात हे त्या वेलींचे फळ होय.हि कडू व गोड अशा दोन प्रकारामध्ये उपलब्ध असते त्यातील कडू हि औषधात वापरतात तर गोड तोंडली स्वयंपाकामध्ये वापरतात.

    कच्ची तोंडली हि हिरवी असतात तर पिकलेले तोंडली हि आतून लाल असते.जसे ह्याचा वापर आपण स्वयंपाकामध्ये करतो तसाच ह्याचा उपयोग घरगुती उपचारांमध्ये देखील होतो.

    पिकलेले तोंडले हे चवीला आंबट व उष्ण असते व ते वात व कफ कमी करते व पित्त वाढविते.तर कच्चे तोंडले हे चवीला गोड तुरट असते व ते थंड असून शरीरातील कफ व पित्त कमी करते व वात दोष वाढविते.

    आता ह्याचे घरगुती औषधी उपयोग पाहूयात:

    १)तोंड आले असता कच्चे तोंडले चावून खावे.

    २)बाळंतिणीचे दूध वाढायला तिला तोंडली उकडून गरम मसाला न वापरतां भाजी करून द्यावी.

    ३)अम्लपित्तामध्ये तोंडलीची कोवळी भाजी उकडून धणे,बडीशेप व सुंठ घालून खावी.

    ४)खोकला येत असल्यास ४ तोंडली ४ कप पाण्यात उकळावी व ते पाणी १ कप करावे व त्यात १/२ चमचा भाजलेला ओवा,१/२ चमचा हळद व १/४ चमचा काळी मिरी पूड घालून ते पाणी प्यावे.

    ५)तोंडाला चव नसेल व जीभेवर देखील मळ साचला असेल तेव्हा कच्ची तोंडली व मीठ हे मिश्रण चावून रस व चोथा थुंकावा.

    ६)मधुमेह असणा-या व्यक्तिंनी तोंडलीची भाजी हळदींची फोडणी देऊन खावी.

    तोंडली खाण्याचा अतिरेक केल्यास पोटात वात धरतो व संडासला खडे होतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 10, 2016


  • वाहिन्यांचे लोकशाहीकरण आवश्यक

    प्रसारमाध्यमे हा भारतीय व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसारमाध्यमांनी प्रत्येक वेळी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळात प्रसारमाध्यमांच्या प्रत्येक शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

      May 15, 2024


  • फॅण्टासी आणि रोमॅण्टीक बाजी…

    दमदार कथानक आणि संवाद असलेल्या प्रोमोजने एखाद्या चित्रपटाचं मार्केटींग करुन प्रेक्षकांना स्वत:च्या चित्रपटाकडे खेचुन आणायचे आणि “तगडी स्टारकास्ट” च्या बळावर सिनेमात काहीतरी वेगळेपण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केल्यावर प्रेक्षकांना एनकॅश करायचे हे ट्रेंड आता जुने झालेत. श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, इला भाटे यांची मुख्य भूमिका असलेला बाजी हा चित्रपट मसालेदार आणि स्टारडम झालाय.हे वेगळ्या शब्दात सांगायचे तर कथेत अनोखेपणा नाही; पण फॅण्टासी क्रियेट करुन जुना व सध्याच्या काळाला सांगड घालण्यात काही फरकाने यशस्वी ठरलाय. संवादशैलीलात्या भागातला बाज आहे व मनाला भिडतील असे नाही! रोमॅन्टीक सेन्स बरा असला तरी प्रेमाचा फण्डा अचुकपणे हाताळण्यात आलेला आहे.

    बाजीची कथा घडते कोकणातल्या श्रीरंगपूरच्या छोट्याशा गावामध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर बारा-चौदा वर्षा नंतरच्या काळातील ही कथा! चिविलदास (श्रेयस तळपदे), हा सामान्य घरातील मुलगा स्वाभावाने बर्‍यापैकी बालीश जो आपल्या आईसोबत (इला भाटे) रहातोय, उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे. त्याच गावात गौरी (अमृता खानविलकर) नावाची मुलगी आहे जी चिदुची बालमैत्रीणं पण आहे; तिच्या स्वपनातला राजकुमार आहे "बाजी"! बाजी हे पात्र म्हणजे श्रीरंगपूरच्या गावकर्‍यांचा रक्षणकर्ता. कोणत्याही आपत्कालिन स्थितीत बाजी हा गावकर्‍यांच्या मदतीला धावून यायचा. हे सर्व चित्रपटाच्या सुरुवातीला कॉमिकच्या चित्रातून निवेदनात्मक पध्दतीने कथन करुन उत्तमरित्या सादरीकरण तर कुठे कलाकारांच्या अभिनयातून आल्यामुळे सुरुवातीचे प्रसंग खिळवून ठेवणारे आहेत. गौरीच्या स्वप्नातला राजकुमार सुध्दा बाजीच आहे कारण लहान असताना आपल्या गावातल्या जत्रेतील “जाइंट व्हील” वरचा तोल सुटल्यावर अडकल्यामुळे ती पडणार तितक्यात बाजी घोड्यावर येऊन तिला वाचवतो आणि म्हणूनच तिचं इतिहासातल्या बाजी वर प्रेम जडलयं. पण सध्याच्या स्थितीत तिचा मित्र चिदु तिच्यावर मनापासून प्रेम करतोय. चिदूचं व्यक्तीमत्त्वा आणि त्याचं स्थान हे आपल्यासाठी केवळ एका उत्तम मित्राप्रमाणे
    आहे. कारण त्याच्या गुणांचा दुरपर्यंतही बाजीशी संबंध नाही. त्यामुळे कथेला “रोमॅण्टीक टच” देखील मिळतो. चिदुच्या भोळेपणाचा गैरफायदा अनेकांनी आत्तापर्यंत घेतला असला तरी तो एक थट्टेचा भाग असतो. याच सुमारास मार्तंड (जितेंद्र जोशी)ची एंट्री होते. सुरुवातीला साधा, सरळ असलेल्या मार्तंडची खलकीवृत्ती कशी जागृत होते आणि चित्रपटाच्या अखेरपर्यंत त्याचा खलनायकी चेहर्‍याची खुनशी रुपं कशी उळघडत जातात हे सुरेखरित्या पडद्यावर साकारण्यात आले आहे. खलनायक बनलेला मार्तंड पुढे चिदुची हत्या करुन समुद्रात ढकलून देतो. पण ज्यासाठी चिदुची हत्या होते आणि जे बाबी मार्तंडच्या विक्षिप्त पणाला ठरतात ती म्हणजे पुरातन खजिना. आणि या दुर्मिळ खजिन्याच्या रक्षणासाठी बाजी त्या गावात वावरत होता. चिदुच्या हत्ये आधी ज्यावेळी त्याला कळते की आपण बाजीचे वंशज आहोत त्या वेळी गौरी ही गोष्ट तो अनेक मार्गाने पटवून देतो.

    shreyas actionपण गौरी चिदुवर प्रेम करत नसल्यामुळे, पुढे ट्विस्ट म्हणून वेगळा प्रसंग साकारण्याचा प्रयत्न दिग्दर्शका कडून केला गेलाय ज्यामुळे चित्रपट शैलिदार बनतो. कारण चिदु नंतर नव्याने नायकाची एंट्री होणार हे कोणत्याही चित्रपटाचा ठरलेला पॅटर्न असतोच. पुढे नायकाची अर्थात श्रेयस तळपदेची नव्याने एंट्री होते आकाश या व्यक्तीरेखेच्या माध्यमातून. आकाश हा हिरे चोर आहे. मुंबईहून हिरे चोरल्यावर थेट समुद्राच्या मार्गाने पोलिसांच्या तावडीतनं निसटत असतानाच त्याची नवका वादळाच्या तडाख्यात उलटते आणि आकाश थेट श्रीरंगपूरच्या समुद्र किनार्‍यावर येऊन आढळतो. चिदुच्या साथीदाराला जेव्हा आकाश बेशुध्द अवस्थेत सापडत़ो त्यावेळी आकाशला चिदुच्या घरी दाखल करण्यात येते. पण आकाश हा खरा चिदु नसून आकाश आहे, हे ज्यावेळी त्याच्या आईलला कळते तेव्हा तिची आई म्हणून झालेली व्याकुळ अवस्था पण त्याचवेळी आकाश श्रीरंगपूर मध्ये असणं ही किती महत्त्वाचं आहे हे ज्यावेळी आकाशला समजतं तेव्हा त्याच्या रुपाने झालेला बाजीचा प्रवेश गावकर्‍यांच्या दृष्टीनेही एकार्थी सुखद अनुभव असतो. इथे मार्तंड व त्याच्या माणसाने अख्खा गाव वेठीस धरलेला असतानाच त्याचा साम्राज्याला सुरुंग लागायला सुरुवात झालेली असते तर दुसरी गौरीच्या स्वप्नातला सुपरहिरो परतल्यामुळे “रोमॅन्स फ्लेव्हर” अनुभवायला मिळतो. पण गुन्हेगार असलेला आकाश ज्यावेळी हे सत्य गौरीला सांगणार तितक्यात मार्तंडच्या गुंडांकडून त्याचावर हल्ला होतो पण या प्रसंगाला ही आकाशने केलेली फाईट यामध्ये नाविन्य नसलं तरी त्यापुढे येणारे ट्विस्ट आणि पोलिस इन्सपेक्टर आकाशचा करत असलेला पाठलाग यातून “बाजी स्टाईल”ने सरकलेला चित्रपटाचा शेवट नक्कीच आपल्याला खिळवून ठेवेल.

    बाजी चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच कलाकारांचा कसदार अभिनय, सुयोग्य दिग्दर्शन आणि प्रसंग व काळानुसार केलेला वस्तुंचा वापर, वेशभुषा, चित्रपटाच्या तांत्रिक बाजू आणि बाजीची कथा सांगण्यासाठी आकर्षकरित्या केलेलं अॅनिमेशन त्याला जोड म्हणजे सचिन खेडेकरांच कथामय निवेदन. महत्त्वाचं म्हणजे मार्तंडच्या व्यक्तीरेखेला जितेंद्र जोशीचे न्याय दिलायं असंच म्हटलं पाहिजे. पुरस्कारांच्या वेळीही मार्तंडची दखल घ्यावी लागेल. सिनेमाची गाणी सुध्दा कथेच्या प्रसंगाला शोभणारी आहेत.

    या चित्रपटाची खटकणारी बाजू म्हणजे लांबलेलं कथानक; सुरुवातीला खुप इंटरेस्टीग वाटणारी कथा नंतर रटाळवाणे वाटत रहातं. “साऊथ टच” असलेल्या फाईट सीन्स याआधी ही अनेक मराठी सिनेमांमधून पहायला मिळाल्या आहेत. त्याच धाटणीवर आधारीत इथेही काही प्रमाणात बघायला मिळतात. दुसरं म्हणजे शेवटच्या 'सीन' ला आकाश हा मार्तंड पळवून नेत असलेला खजिना सोडवण्यासाठी घोड्यावरुन येताना दाखवण्यात आलाय; पण मुळात प्रश्न असा मनात येतो की घोडा आला कुठून? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजी चा पोषाख इतक्या वर्षानंतर ही सहीसलामत कसा? न त्याला वाळवी न कुठे छेद? कारण बाजीचा पोषाख हा ज्य ठिकाणी ठेवण्यात आलेला असतो त्यावरुन असा शंका येणं सहाजिक आहे!

    फॅण्टासी, रोमान्स आणि मसालेदार कथा व अभिनयात वरचढ आणि या सर्वांचं कॉम्बीनेशन म्हणजे बाजी हा सिनेमा. जर अश्या चित्रपटांना आपण पसंत करत असाल तसंच श्रेयस तळपदे व अमृता खानविलकर यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीला पहाण्यासाठी तरी बाजी एकदा पहायला काहीच हरकत नाही.

      February 9, 2015