वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पाणी शुद्धीकरण भाग पाच
पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी एक पद्धत शाळेत शिकवली गेलीय, जी एकदम साधी सोपी आहे.
त्यातील मुळ कल्पना लक्षात घेतली की, आपल्याला हवे बदल त्यात करता येतील.
एका छोटे छिद्र असलेले मडके घेऊन त्या छिद्रावर एक तलम मलमलचे कापड आतल्या बाजूला ठेवावे. त्या मडक्यात चार इंच वाळू भरावी. त्यावर कोळसे टाकावेत. त्यावर माठे गुळगुळीत दगड भरावेत. वरून हळुवार पाणी ओतावे. मोठी अशुद्धी कोळशात अडकते. छोटी अशुद्धी वाळूच्या कणामधे अडकते. त्याहून छोटी अशुद्धी कापडात अडकते. आणि नंतर छिद्रांतून पाणी ठिपकू लागते. जे शुद्ध स्वरूपात मिळते. दररोज कापड स्वच्छ धुवुन घ्यावे.
याच यंत्रामधे थोडा बदल असाही करता येतो. दोन मडकी एकावर एक ठेवून वरील मडक्याच्या तळाला छोटे छिद्र करावे आणि सर्व सामग्री घालावी. खालील मडक्यात पाणी जमा होते.
हेच तत्व वाॅटर फिल्टर्स मधे वापरले जाते. वेगवेगळी मटेरीयल वापरून काही अडथळे (कांड्या ) निर्माण केले जातात, जेणेकरून पाण्यातील अशुद्धी त्यात अडकत जाईल. काही दिवसानी हया कांड्या बदलाव्या लागतात.
काही फिल्टर्स मधे इलेक्ट्रॉनिक रचना वापरली जाते. पण सर्वात उत्तम उपाय म्हणजे पाणी उकळून घेणे.
पाणी किती उकळले म्हणजे त्यातील अशुद्धी दूर होईल ?
आजचे विज्ञान सांगते किमान चाळीस मिनीटे पाणी उकळत राहिले तरच त्यातील अशुद्धी जाते. काही जंतु असे असतात, की ते पाण्याचे तापमान जसे वाढत जाते तसे स्वतःभोवती एक कवच तयार करतात आणि उकळत्या पाण्यात चक्क खेळतात. हे छुपे रूस्तम चाळीस मिनीटापर्यंत जिवंत राहू शकतात नंतर मात्र ते मरतात.
पाण्याचा एक सोळांश काढा करणे, हा नक्कीच चांगला उपाय आहे. कोणत्याही वाॅटर फिल्टर मधले पाणी सोळा लीटर घेऊन ते एक लीटर उरेपर्यंत आटवावे.
केवळ उकळले तरी पुरत नाही. पुनः ते गाळावेही लागतेच. कारण उकळल्यामुळे त्यातील अविद्राव्य घटक तळाला बसतात आणि ते प्रत्यक्षात दिसतात. ते गाळल्याशिवाय दूर होतच नाहीत.
एक सोळांश उकळणे राहिले दूरच, किमान अष्टावशेष तरी राहूदेत, किंवा चतुर्थांश तरी आटवा, किंवा दोनाचे एक तरी करा, किमान उकळा तरी. यापैकी काहीही एक करा, पण करा.
नाहीतर तुमची पचन क्षमता एवढी वाढवा की, रोगाचे जंतु तुम्ही प्रत्यक्ष गिळलेत, तरी ते तुमच्या अग्निने सर्व भस्म करून टाकू शकाल.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.01.2017
January 1, 2017
ठाणे जिल्हयात यापैकी ६ शाखा कार्यरत आहेत. कोमसापच्या सर्व शाखांतर्फे दरवर्षी स्थापना दिवस विविध कार्यक्रम करून साजरा केला जातो.
कोकणातील आवाज,लेखणी महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी असलेलं हे व्यासपीठ..
March 24, 2022
आपल्याकडे संगीत म्हटलं की गीतकार, संगीतकार आणि गायक अशी त्रिमूर्ती असावी लागते. हिंदीमधे गीतकार शैलेंद्र किंवा हसरत जयपुरी, संगीतकार
शंकर जयकिशन आणि गायक मुकेश किंवा गीतकार शकील बदायुनी, संगीतकार नौशाद आणि गायक महमद रफी किंवा गीतकार राजा मेहेंदी अली
खां, संगीतकार मदन मोहन आणि गायिका लता मंगेशकर असे त्रिवेणी संगम असले की डोळे मिटावेत आणि शब्द आणि स्वरगंगेत बुडून जावं. क्वचित्
कधी सी.रामचंद्र, हेमंतकुमार किंवा सचिन दा आपल्याच आवाजात गायले तर तेवढ्यापुरतं संगीतकार आणि गायक एक होणार. अर्थात मराठीमधे गोष्ट
थोडी वेगळी आहे. ग.दी.मांनी लिहावं आणि बाबुजींनी (सुधीर फडके) चाल देऊन गावं हा अलिखित नियम !
पण कंट्री म्युझिकमधे सहसा गीतकार आणि गायक एकच असतो. त्यात बहुतेक सगळे (निदान पुरुष कलाकार) गिटार वाजवणारे. त्यामुळे पठ्ठ्या
स्वत:च गाणे लिहिणार, त्याला चाल लावणार आणि गिटार वाजवत स्वत:च गाणार. काही वेळां त्यांच्या जोड्या किंवा ग्रूप्स असतात. त्यामुळे दोघांनी
मिळून गाणी लिहायची, त्याला संगीत द्यायचं आणि गायचं असं चालतं. तीन चार जणांचा ग्रूप असला तर सहसा एक दोन जण गाणं लिहितात, एखादा
मुख्य गायक आणि बाकी साथ देणारे, आणि बहुतेक जण एखादं वेगवेगळं वाद्य वाजवणारे.
कंट्री म्युझिक आणि मराठी संगीताची तुलना करायची झाली तर काही साधर्म्य जाणवतं. कवितेचा ढंग, गाण्याची शैली, त्यातला आशय, त्याचे
चित्रांकन (Video) वगैरे सगळ्याचा विचार केला तर आपले वसंत बापट, शाहीर साबळे आणि दादा कोंडके यांच्या गाण्याचं आणि शैलीचं अजब
मिश्रण डोळ्यांसमोर तरळून जातं.
कंट्री म्युझिकमधे काही काही विषय ठळकपणे पुन: पुन्हा येतांना दिसतात. यातला महत्वाचा विषय म्हणजे “माझा गाव”. यात आपल्या कुठल्यातरी
कोपर्यातल्या छोट्याश्या गावाचं मोठं कौतुक केलेलं असतं. गदिमांच्या “खेड्यामधले घर कौलारू”ची आठवण यावी असं! मग आपल्या गावातली छोटी
शाळा, गावाबाहेरचा ओढा, गावाच्या वेशीवरची पाण्याची टाकी, गावातलं जुनं छोटं चर्च, झोपाळू रस्ते, पिढ्यान पिढ्यांचे शेजारी, कोपर्यावरचं तुटपुंज्या
वस्तू मिळणारं छोटसं किराणा दुकान, यांच्या आठवणी काढलेल्या असतात. त्यात आपण काऊबॉय किंवा काऊगर्ल आहोत हे मोठ्या अहमहमिकेने
सांगण्याची धडपड असते. “आम्ही आपले गावंढळ आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे” हे “गर्वसे कहो हम हिंदू है” या चालीवरचं पालूपद!
अमेरिकेत गावाकडच्या लोकांना ‘रेड नेक’ म्हणतात. (उन्हा तान्हात काम करणार्या लोकांच्या माना, उन्हात रापून तांबड्या लाल होतात. त्यामुळे शहरी
लोकांनी शेतकरी – गावंढळ लोकांना ठेवलेलं हे शेलकी विशेषण) त्यामुळे आपल्या ‘रेड नेक’ पणाचं कौतुक कंट्री म्युझिकमधे होणं हे ओघाने आलंच.
-- डॉ. संजीव चौबळ
July 16, 2016
नागपूरचे हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे अनेक प्रश्नांना अनुत्तरित ठेवून संपले. दरवर्षीची परंपरा याही वर्षी पाळल्या गेली. विदर्भाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा वार्षिक सोहळा यापलीकडे नागपूर अधिवेशनाला आता महत्त्व उरलेले नाही.
December 24, 2006
घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किमंती/भाव गगनाला भिडल्याने घराच्या किंमती वारेपाम वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात कुठेही घर घेणे सोपे नाही. त्यातून प्रत्येकाचे स्वप्न असते की माझे मुंबईत घर असावे. घर विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल किंवा स्वत:कडील पुंजी कमी पडते म्हणून बँकेतून कर्ज काढून घर घेण्याचेही धाडस होत नाही. कारण बँकांच्या व्याजाचे दर सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. मुद्दल अधिक व्याज फेडण्यामध्ये उभ आयुष्य सरून जाईल.
July 26, 2011
इंधनाच्या बाबतीतले परावलंबित्व ही देशाच्या विकासासमोरची एक मोठी समस्या आहे आणि त्यापेक्षा मोठी समस्या दूरदृष्टी नसलेल्या नेतृत्वाची आहे. सुदैवाने आज राजकारणात युवा शक्ती मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसत आहे. या युवकांनी एकत्र येऊन या देशाला महासत्ता बनविण्याचा निर्धार केला, तर परिस्थिती निश्चितच बदलू शकते. नाविन्यपूर्ण विचार, ते अंमलात आणण्याची धमक, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी या सगळ्या गुणांनी युक्त असलेले नेतृत्व ही आज देशासाठी काळाची गरज बनली आहे.
May 5, 2012

अतिउंचीवरील परिस्थिती ही सजीवांसाठी राहण्याच्या दृष्टीनं अत्यंत बिकट असते. अतिथंड तापमान, अत्यंत शुष्क हवा, प्राणवायूची कमतरता, खाद्याचा अभाव, अशा सर्व कारणांमुळे, अधिकाधिक उंचावर जावं तसं तिथे आढळणाऱ्या पशु-पक्ष्यांची संख्या रोडावत जाते.
November 20, 2023
प्रकाशन दिनांक :- 11/04/2004
एखाद्या सरकारी खात्यात ‘सद्भावना सप्ताह’ दरम्यान जसे वातावरण असते तसे वातावरण सध्या संपूर्ण देशात दिसून येत आहे. विशेषत: राजकीय पक्षाशी संबंधित नेते आणि कार्यकर्ते चेहऱ्यावर विलक्षण माधुर्य ठेवून वावरत आहेत. अर्थात त्यामागे सद्भावनेचा भाव किती आणि स्वार्थाचा मुलामा किती, हा वेगळा विषय ठरतो.
April 11, 2004
वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्त्वाचे स्थान आहे. आपण झोपेतून उठण्यापूर्वी, रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पहाटे पोहचवण्याचे काम ही मंडळी अविरतपणे करत असतात.
October 15, 2021
श्री गणेशांबद्दल आपल्या मनात जे प्रश्न येतात त्यापैकी हा एक महत्त्वाचा प्रश्न. खरेच आहे एखाद्या महानगरातल्या सगळ्या माता- भगिनींच्या अंगावर मिळून सुद्धा इतका मळ असूच शकत नाही. मग जगज्जननी त्रिपुरसुंदरी पार्वती इतकी अस्वच्छ कशी असेल?
September 2, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti