वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शीत युद्धाच्या काळात अमेरिका व सोविएत युनियन (आजचे रशिया) या दोन महासत्ता अस्तीत्वात होत्या या दोनही महासत्तानी आपापली विचारसरणी इतर राष्ट्रांमध्ये लादण्याचा प्रयत्न केला व एकमेकांच्या आर्थिक विचारसरणीला विरोध केला. क्म्युनीजम व भांडवलशाही या दोन विचारसरणींच्या वैचारिक वादामुळे जगात अनेक ठिकाणी युद्धे निर्माण झाली त्यापैकी काही महत्वाची युद्धे म्हणजे व्हिएतनाम युद्ध,कोरियन युद्ध,व अफगाणीस्तान युद्ध.
May 5, 2020
अगदी सकाळी झोपून उठल्यापासून विचार करायचा म्हटलं तर उठल्यानंतर शेजारच्या घड्याळाकडे जाणारे किंवा देवासमोर जोडले जाणारे हात आज मोबाईल कडे जाऊ लागलेयत. या दोघांची जागा त्याने कधीच बळकावलीय. त्यानंतर, ब्रश करताना मोरीत किंवा बेसिन समोर उभं राहूनच आपण ते करत होतो. आज ब्रशवर पेस्ट घेऊन आणि गॅलरीत उभं राहून ते ओंगळवाणं आणि ओघळणार दृष्य साऱ्या जगाला दाखवत अनेकजण ब्रश करत असतात.
August 29, 2022
निसर्गाने मानवाला दिलेली नैसर्गिक संपत्ती ही अनमोलच आहे. त्यात कोकणाचा विचार केला तर कोकणाला लाभलेले हे निसर्गाचे वरदान पर्यटनासोबत आरोग्य संवर्धक देखील आहे. कोकणच्या जंगलात सापडणार्या शेकडो वनौषधी मनुष्याच्या आरोग्याला हितकारक आहेत. त्यांच्या योग्य वापराने आपण निरोगी राहू शकतो.
August 8, 2009
‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधुनी पाहे’, असा प्रश्न उपस्थित करीत जगात कुणीच सुखी नसल्याचा उपदेश संतांनी केला होता. संतांना सुखाची नेमकी कोणती व्याख्या अपेक्षित होती, हे ठाऊक नाही; परंतु आज प्रचलित असलेल्या सुखाच्या सरधोपट व्याख्येचा विचार केला तर शेकडो वर्षांपूर्वीचा संतांचा हा प्रश्न अगदी गैरलागू ठरतो. शेकडो वर्षांत सामाजिक, आर्थिक संरचना भरपूर बदलली आहे.
October 3, 2004
एखाद्याने केलेली निंदा ही ऐकणार्याने सकारात्मकतेने ऐकली तर बरे… नाहीतर एखादी व्यक्ती आधीच स्वत:च्या विचारांनी व्यापलेली असेल तर्…काही चांगले न होता त्याच्याकडुन बरेच असे वाईट घडुन जाते. म्हणुनच खरेतर ही म्हण “निंदकाचे घर नसावे शेजारी” अशी असायला हवी.
July 13, 2020
फिन्द्री” बनली प्रोफेसर … बापासाठी नकुशी ,आईसाठी साहेबीन आपण काहींना नकोसे जरी असलो तरी अनेकांना हवेसें असतो आणि त्यासाठी जगायचं असतं.आपलं अस्तित्व केवळ भविष्यावर सोपवून चालत नाही. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो.मुलगी झाली म्हणून तिला लहानपणी बाळ असताना फेकलं गेलं ,नकोशी असणारी ती मोठेपणी मात्र शिकली आणि प्राध्यापक बनली व डॉक्टरेटही मिळवली व महाविद्यालया मध्ये विभाग प्रमुख आहे व अध्यापन ही करते. हे स्वप्नं नव्हें ही वास्तवातील प्रेरणेची पायवाटच आहे.पण बापाला मुलगी नको होती म्हणून तिचं फेकलं जाणं हे अस्तित्वाचं सृजनात्मक रूप घेऊन अवतरले आहे.
June 17, 2026
वीस वर्षांपूर्वी जेव्हा एका प्रसंगामध्ये लक्ष्या आणि तात्या विंचू यांच्या बाचाबाचीत इंस्पेक्टर महेश जाधव कडून बाहुलारुपी तात्या विंचूच्या कपाळात मध्यभागी गोळी लागून त्याचा मृत्यू होतो. इपाटलेला २ मध्ये याच तात्या विंचूचा आत्मा बाबा चमत्कार कडून पुन:रुजिवीत करण्यात येतो. याच तात्या विंचूचा २० वर्षांनंतर वावर या पृथ्वीवर कसा आहे त्याला नेमकं काय साध्य करायचं आहे,
June 10, 2013
श्री.गणेशास प्रार्थना आपल्यासाठी व राजकारण्यांना चांगली बुद्धी देण्यासाठी.
January 19, 2011
काही चित्रपट बघितल्याशिवाय मरायचं नसतं म्हणे ! “अस्तु ” त्यातील एक आहे. एकदा बघितला की संवेदनांची समृद्धी वाढते. वारंवार बघितला की जगण्याचे पापुद्रे अलगद सुटत जातात आणि मोकळं व्हायला होतं.
April 27, 2021
८-९ मुली- किंचित धीट, किंचित बुजऱ्या ! वयोगट १२-१४. आज दुपारी सगळ्याजणी आमच्या समोर “नुक्कड नाट्य ” करून दाखविण्यासाठी जमलेल्या. निमित्त होते- कंपनीच्या सी एस आर ( सामाजिक उत्तरदायित्व ) अंतर्गत नजीकच्या वैशाली जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या आणि ५० शाळांमध्ये ” कुपोषण, व्यसनाधीनता, रस्ता सुरक्षा ” अशा विषयांवर स्ट्रीट प्ले करणाऱ्या या कन्यका – भोजपुरी आणि हिंदीत – प्रत्येकी ५-१० मिनिटांचे.
January 30, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti