वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां सगळ्या देशाचे गांधीवादी युगपुरुष झाले आहेत . ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.
August 19, 2011
तुम्ही तुमच्या आरशातल्या प्रतिमेकडे निरखून पाहिलं आहेत का? म््हणजे पाहिलं नक्कीच असेल. पण ते आपलं सौंदर्य न्याहाळण्यासाठी त्या प्रतिमेची लक्षणं ध्यानात घेण्यासाठी पहा.
June 24, 2011
विद्यार्थ्यांचा उत्साह अगदी उतू जात होता. शाळेतील रोजच्या रसायन, भौतिक, गणित, इंग्रजी, मराठीऐवजी अगदी वेगळ्या, पण त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयांवरील चर्चेत प्रत्येकाला आपली मते हिरिरीने मांडण्याची इच्छा होती. आई, वडील, शिक्षक, मित्र, मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक या सर्वांबद्दल प्रत्येकाचं स्वत:चं असं खास मत होतं. मी त्यांच्या वयाचा असताना स्वत:चं मत कशाला म्हणतात याची मला कल्पनाही नव्हती. पण आज थोडीही भीड न बाळगता प्रत्येक विषयावर स्वत:ची ठाम मतं व्यक्त करणाऱ्या या पिढीचं कौतुक करण्यासाठी मला शब्द सापडत नव्हते. मात्र या रंगलेल्या चर्चेत कुणालचं गप्प बसणं मला खटकलं. त्याला चर्चेत ओढण्याचा प्रयत्न मी करू लागलो, पण तो मौन सोडण्यास तयार नव्हता. अगदी अबोल असलेल्या मुलामुलींनी सुद्धा उत्साहाने बोलावं, अशा वातावरणात त्याच्या अबोल्यामुळे माझी उत्सुकता चाळवली गेली व त्याच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करू लागलो. थोड्या वेळाने त्याने भीतभीत तोंड उघडले. पाणावलेल्या डोळ्यांनी मला विचारले, ‘मला जे काही वाटतं ते बोलून दाखवलं तर तुम्ही मला रागावणार तर नाही ना?’ त्याच्या तणावग्रस्त चेहऱ्याने त्याच्या पालकांना चर्चेसाठी आमंत्रण देण्यास मला बाध्य केलं.
आठवडा-पंधरा दिवसांत आटोपणाऱ्या एखाद्या उन्हाळी शिबिरात मुलांना पाठवलं, की त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची जबाबदारी संपली असं समजणाऱ्या कुणालच्या पालकांची नाखुशी ते चर्चेसाठी आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे झळकत होती. कुणालच्या अबोल्याचा त्याच्या पालकांच्या वागणुकीशी काही संबंध आहे का, हे चर्चेच्या ओघात पडताळून बघण्याचा मी प्रयत्न करत होतो. थोडा वेळ काही हलक्याफुलक्या विषयांवर गप्पा झाल्यानंतर त्याचे पिताश्री जरा मोकळेपणाने बोलू लागले. मुलांना जर आपल्या वडिलांचा धाक नसेल तर ती बिघडतात असे त्यांचे अगदी ठाम मत होते. मुलं सतत आपल्या धाकाखाली राहिली पाहिजेत यासाठी त्यांना सतत रागावणं, मारणं, ती कधीही मोकळेपणाने त्यांच्यासमोर वावरणार नाहीत याची काळजी घेणं हे वडिलांचे आद्यकर्तव्य आहे असा त्यांचा समज होता. मुलांशी सुसंवाद साधणे म्हणजे नक्की काय हे त्यांच्या गावीही नव्हतं. वडिलांशी केव्हाही बोलायची वेळ आली, की कुणाल प्रचंड तणावाखाली वावरत असल्यामुळे काहीही बोलण्याऐवजी गप्प राहणेच पसंत करू लागला. ‘वडील’ नावाच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या त्या प्रतिनिधीने केवळ स्वत:च्या मुलांनाच नव्हे तर पत्नीलाही प्रचंड धाकात ठेवले होते व त्याबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटत असे. कुणालच्या अबोल्याचा उगम सापडल्यामुळे आता त्यावर इलाज करण्याचं काम माझ्यासाठी सोपं झालं.
असे आम्ही कसे? आपल्यामुळे या जगात अस्तित्वात आलेल्या आपल्या मुलांशी सुसंवाद साधून त्यांचे आपण सर्वात जवळचे मित्र का होऊ शकत नाही? मुलांना त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेताना सख्ख्या जन्मदात्यांपेक्षा मित्र जवळचे का वाटतात? ज्या दिवशी आईवडिलांची आपल्या मुलांशी मैत्री होईल तो दिवस खऱ्या अर्थाने ‘फ्रेंडशिप डे’ असेल !
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
August 7, 2016
पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनावरून उभ्या देशात दोन गट पडले आहेत. एक गट खुनाचं समर्थन करतो आहे, तर दुसरा गट तेवढ्याच टोकाचा निषेध. खुन, मग तो कुणाचाही असो, तो निषेधार्हच असतो. कुणाच्याच खुनाचं समर्थन करता येत नाही.
September 19, 2017
अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘’योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला.
May 20, 2017
राम प्रधान समितीच्या अहवालामुळे सध्या महाराठ्र शासनाची अवस्था ‘धरले तर चावते, अन् सोडले तर पळते’ अशी झाली आहे. त्यामुळेच विधिमंडळात प्रधान समितीचा अहवाल सादर न करता त्यावरील कृती अहवाल तेवढा सादर करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी चिडून एवढा प्रचंड गोंधळ घातला की विधान परिषदेत तीन विरोधी सदस्यांना निलंबित करण्यात आले अहवालात असे कोणते भयंकर सत्य दडलेले आहे की सरकार स्वत:च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ देणे पसंत करते; पण अहवाल विधिमंडळात मांडत नाही?
June 21, 2009
श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज राजाधिराज असल्याने त्याचे आगमन व काही काळ वास्तव्य येथे होणार या कल्पनेनेच इ.स. १०३४ मध्ये प.प. श्रीरामचंद्र योगी हे या कृष्णा पंचगंगा संगमावर श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज वास्तव्य करण्याआधी ४०० वर्षे येऊन वास्तव्य करु लागले. ज्यांच्या आगमनाच्या वार्तेनेच भूमी शेकडो वर्षे पावन झाली आहे.
August 24, 2023
समाजात वावरताना आपल्याला बरेचदा असे आढळून येते की, काही लोकांमध्ये प्रचंड क्षमता असूनही ते आपल्या क्षमतेला योग्य न्याय देऊ न शकल्याने गरिबीत किंवा अडचणीत दिवस काढत असतात, तर काही लोकांच्या वकुबाला बऱ्याच मर्यादा असूनही ते आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून यशस्वी जीवन जगत असतात. विचारसरणीतील किंवा दृठिकोनातील फरकामुळेच हा भेद निर्माण झालेला असतो. ‘ग्लास अर्धा भरला आहे’ आणि ‘ग्लास अर्धा रिकामा आहे’ या दोन वैचारिक दृठिकोनांत सर्वसामान्य लोकांची विभागणी करता येईल.
March 26, 2006

October 13, 2015
दरिद्रोऽस्म्यभद्रोऽस्मि भग्नोऽस्मि दूये
विषण्णोऽस्मि सन्नोऽस्मि खिन्नोऽस्मि चाहम् |
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो
ममाधिं न वेत्सि प्रभो रक्ष मां त्वम् ‖ १६ ‖
भगवान दयासिंधू आहेतच मात्र व्यवहारात देखील ज्याप्रमाणे एखादे बालक त्याची असहाय्यता प्रगट करत नाही जोपर्यंत त्याची आई सुद्धा त्याला उचलून घेत नाही, त्याच प्रमाणे भगवान देखील सहजासहजी दया करीत नाहीत. याच भूमिकेतून आचार्य स्वतःच्या अगतिकतेला भगवान श्री शंकरांच्या समोर सांगत आहेत. ते म्हणतात,
दरिद्रोऽस्मि- मी दरिद्री आहे. आपल्या दये शिवाय माझ्याजवळ काहीही नाही.
अभद्रोऽस्मि- मी अभद्र आहे. अनेक अमंगल विचारांनी माझे मन युक्त आहे.
भग्नोऽस्मि - मी भग्न आहे. आयुष्यातील इतका सगळा चांगला काळ सत्कर्मा मध्ये न लावल्याने, हाती फार काही उरले नाही म्हणून आतून दुभंगलो आहे.
दूये- मी दु:खी आहे. हे भगवंता तू मला दिव्य मानवी जीवन दिले. पण मी ते कृतार्थ केले नाही याचे दुःख आहे.
विषण्णोऽस्मि- मी विषण्ण आहे. ही संधी गमावल्याची विषण्णता आहे.
सन्नोऽस्मि- मी सुन्न झालो आहे. काय करावे ते मला कळत नाही आहे.
खिन्नोऽस्मि चाहम् - मी खिन्न आलो आहे.
आता माझा उद्धार कसा होईल? या विचाराने माझी बुद्धी कुंठित झाली आहे.
आपल्या सगळ्यांच्या वतीने आपली अवस्था मांडतांना आचार्यश्री ही भूमिका मांडत आहेत.
अर्थात असे असले तरी,
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो- हे भगवान हो आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात.
ममाधिं न वेत्सि- मग माझे हे अगतिकतेचे दुःख आपल्याला कसे कळणार नाही?
प्रभो रक्ष मां त्वम् - हे प्रभो! आपण माझे रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 25, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti