वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे शहाणपणाचे आहे.
October 17, 2023
चिकूचे शास्त्रीय नाव Acharas sapota (family Sapotaceaae) आहे. यास Manilkara zapota (family Z apotaceae) असेही नाव आहे. सुमधुर फळाबद्दल परिचित असलेल्या या मध्यम आकाराच्या (सु. ८–१० मी. उंचीच्या) वृक्षाचे मूलस्थान मेक्सिको असून आता उष्ण कटिबंधातील सर्व प्रदेशांत तो लागवडीत आहे. महाराष्ट्रात कुलाबा व ठाणे या जिल्ह्यांत आणि गुजरातच्या दक्षिण भागात व सौराष्ट्रात अधिक पिकवितात. महाराष्ट्रातील डहाणू येथील चिक्कू प्रसिद्ध आहेत. तेथे दरवर्षी चिक्कू महोत्सव भरतो.
October 5, 2021
मला तर वाटते कि मदन मोहन यांनी लताच्या आवाजाचा जितका सुंदर उपयोग करून घेतला तितका इतर संगीतकारांनी फार कमी करून घेतला.”कदर जाने ना “ हे गाणे ऐकून तर बेगम अख्तर सुद्धा चकित झाल्या फारसे शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसून कसे रागदारीवर गाणे केले.
August 9, 2022
आठव्या वर्गात त्याला बर्यापैकी वाचता येते, ही त्याची प्रगती मानली जाईल, एरवी ही प्रगती दुसर्या-तिसर्या वर्गात अपेक्षित असायची. मूल्यमापनच नसल्यामुळे मूल्यमापनाचे निकष असण्याचीही गरज उरणार नाही. प्राथमिक शिक्षकांसाठी ही तशी आनंदाची बाब असली तरी सरकारच्या या निर्णयाचा दुरगामी परिणाम होणार आहे. सहा ते चौदा हा वयोगट अतिशय संस्कारक्षम वयोगट आहे. याच वयात मुले घडतात किंवा बिघडतात. नेमक्या याच वयोगटात त्यांना घडविण्याची जबाबदारी असलेल्यांना सरकारने मोकळं रान दिले तर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होऊ शकतो.
May 16, 2010
माझे 'हे आम्ही का करायचे ?' हे पुस्तक २००२ साली प्रकाशित झाले. त्यातील माहिती खाली देत आहे.
अंगाला भस्म का लावायचे?
गुरुचरित्रात भस्म या विषयी एक अध्याय आहे. म्हणून मी स्वतः अंघोळ झाल्यावर भस्म लावून पाहिले. तेंव्हा माझ्या असे लक्षात आले की, भस्म लावले की थंडीच्या दिवसात थंडी वाजत नाही, उन्हाळ्याच्या दिवसात घाम कमी येतो व घामोळे होत नाही.
भस्म म्हणजे गाणगापूरच्या भस्माच्या डोंगरावरील भस्म नव्हे. उदबत्तीची राख , गाईच्या गोवऱ्या जाळून होणारी राख हे भस्म. भस्म हे उरलेली राख असते त्यामुळे ते निर्जंतुक नक्की असते. शिवाय गाईच्या शेणापासून केलेले भस्म रेडिएशन वेव्ह्ज पासून संरक्षण करते.
कपाळाला -आज्ञाचक्राला हे भस्म लावण्याची प्रथा दक्षिण भारतात आहे . हल्ली उन्हाळ्यात पावडरच्या जाहिराती येतात. त्या पावडरी पांढऱ्या दगडाची पावडर असते. त्यापेक्षा भस्म केव्हाही स्वस्त व उत्तम.
थोडे भस्म (चिमूटभर) हातावर घ्यावे, त्यात थोडे पाणी कालवावे व सर्व अंगाला लावावे. त्यात मांड्या , पोटऱ्या, दंड, छाती, मान, खांदे, कपाळ, कान या महत्वाच्या अवयवांना लावल्यास थंडी वाजत नाही.
-- अरविंद जोशी
B.Sc.
९४२१९४८८९४
April 6, 2017
जो डार्लिंग यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध सिडने येथे 14 डिसेंबर 1894 मध्ये खेळला . पहिल्या इनिंगमध्ये ते टॉम रिचर्डसन कडून त्याच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाले तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 53 धावा केल्या हा सामना इंग्लंडने 10 धावांनी जिंकला खरे तर इंग्लंडला फॉलो ऑन मिळालेला होता आणि ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 586 धावा केल्या होत्या.
December 9, 2021
निसर्गाने मुक्तहस्ताने केलेला कोकण साहित्यरसांनी सुद्धा तितकाच बहरला. साहित्य विश्वात त्याचे सौंदर्य कायम अधोरेखित होत आले आहे. कोकणातील साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचे वेगळेपण इथल्या मातीशी नाते सांगणारे आहे. इथल्या मातीतील शब्द रुपी मोत्यांची पखरण करीत हे साहित्य विश्वात बहुमान मिळवित आहेत. आपल्यासाठी हे अभिमानास्पद आहे.
January 24, 2023
श्रीरामाचा अवतार
दुष्टांचा करण्या संहार
जन्म घेतला पृथ्वीवर
परमेश्वरानी ||१||
रामासी लाभले मोठेपण
तयाठायीं तन मन धन
अर्पिती सर्व भक्तजन
प्रेमभरे ||२||
थोर ग्रंथ रामायण
त्यातील जन्मकथा निवडून
करीत असे अर्पण
तुमचेसाठीं ||३||
लंकाधीपती रावण
होता शिवभक्त महान
उन्मत्त झाला वर पावून
त्रास देई सर्वाना ||४||
युद्ध केले स्वर्गासी
बंदी केले देवांसी
छळूं लागला तयांसी
दुष्टपणानें ||५||
रावणाच्या त्रासा पोटीं
देवांच्या मुक्तीसाठीं
अवतार घेई जगत् जेठी
श्रीराम जन्म घेऊनी ||६||
आयोध्येचा दशरथ राजा
आनंदी होती प्रजा
सुखी बघण्यात मजा
त्यास वाटे ||७||
एक दुःख होते त्यास
पुत्राविना जात दिवस
पुत्र प्राप्त करण्यास
प्रयत्न केले बहूत ||८||
राजा जाई वशिष्ठ गुरु कडे
घालूनी त्यास साकडे
पुत्राविना वंश न वाढे
मार्ग सुचवावा ||९||
वशिष्ठ गुरु सुचविती
यज्ञ करण्या सांगती
पुत्रकामेष्टी यज्ञ महती
आगीच असे ||१०||
गुरुंचा आशिर्वाद घेऊनी
राजा निघाला तेथून
संकल्प केला दशरथांनी
पुत्रकामेष्टी यज्ञाचा ||११||
श्रृंगऋषी महान
होते तप सामर्थवान
विनवितसे जाऊन
त्यांचे आश्रमी ||१२||
पाद्यपुजा त्यांची करुनी
भक्तिभावे विनवूनी
यज्ञासाठीं पाचारण करुनी
तयासी बोलावले ||१३||
मंडव घातला भला
यज्ञाचा भव्य सोहळा
ऋषीगण ब्राह्मण सगळा
यज्ञासी जमती ||१४||
यज्ञांत आवाहन केले
सर्व देव निमंत्रिले
हविर्भाव सर्वासी दिले
श्रृंगऋषीनें ||१५||
स्पष्ट मंत्रोपचार म्हणून
सर्व ऋषी एकसूर धरुन
अग्नीसी टाकती हवन
राजा दशरथ ||१६||
प्रसन्न झाली यज्ञदेवता
पायस कलश हातीं देता
समान भाग राण्यांस वाटता
पुत्र प्राप्त होई ||१७||
दशरथाच्या राण्या तीन
कौसल्या सुमित्रा नि कैकयी लहान
आनंदी झाल्या पायस बघून
यज्ञाचा प्रसाद ||१८||
कैकयी बसली रुसून
पट्टराणी मी लहान असूनी
प्रथम भाग कौसलेस देवून
अपमान माझा होई ||१९||
प्रसाद घेवूनी बैसली
मनीं विचार करुं लागली
तत् क्षणी एक घार आली
प्रसाद जाई घेऊन ||२०||
सर्वजण होती चकीत
कांही समजण्याचे आंत
एक भाग घार नेत
आकाशी उडाली ||२१||
कैकयी झाली दुःखी
शब्द निघेना मुखी
प्रसंग ओडावला एकाएकीं
तिचेवर ||२२||
आपल्या प्रसादातील भाग
देवून कैकयीस सांग
सोडून द्यावा तुझा राग
विनवितसे दोन्ही राण्या ||२३||
चैत्रशुद्ध नवमीला
राम जन्म झाला
कौसल्या मातेला
आनंद होई त्रिभुवनी ||२४||
सुमित्रेचा लक्ष्मण
कैकयीस भरत शत्रुघ्न
चार पुत्र मिळून
पितृत्व दिले दशरथासी ||२५||
आदर्श जीवन जगला
पितृआज्ञे वनवास सोसला
मारिले दुष्ट रावणाला
यशस्वी केले रामराज्य ||२६||
रामाचा महीमा थोर
परमेश्वराचा तो अवतार
भक्तांचा करी उद्धार
त्याचे आशिर्वादे ||२७||
एक पत्नी, वचनी, बाणी
सत्य आणि प्रेमळ वाणी
अद्वितीय गुणांच्या खाणी
रामासी ठरवी पुरुषोत्तम ||२८||
रामाचे जीवन भव्य
आदर्शमय ते काव्य
दाखवोनी जगाला दिव्य
ठाव घेई सर्वा मना ||२९||
रामनामी मोठेपण
जाईल तो उद्धरुन
संकटे जात निघून
आठवण येता त्याची ||३०||
रामरक्षा स्तोत्र पठण
करी तुमचे देह रक्षण
नित्य नियमें वाचन
मनोभावें ||३१||
" शुभं भवतु "
डॉ. भगवान नागापूरकर
५-०१११८३
January 4, 2018
आमची मुंबईच्या प्रिय मुंबईकरांनो मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोलायचं कारण म्हणजे आज मला मनातुन खूप भरून आले आहे. आणि भरून येण्याचे कारण म्हणजे मला लवकरच तुमच्या सेवेत पूर्ण क्षमतेने सामावून घेण्याची चर्चा माझ्या कानापर्यंत पोहचली आहे.
January 4, 2021
काळाबरोबर जगणं धावपळीचं बनलं होतं. घरातून बाहेर पडलं की लगेच गाडी मिळायला पाहिजे, अशी मनोवृत्ती बनत होती. खासगी वाहतूक पुन्हा सुरू झाली होती. एसटीही आपलं रूपडं बदलू लागली. एशियाड सेवेनं शहर जोडली. ‘शिवनेरी’, ‘अश्वमेध’ यासारख्या गाड्या दिमाखात धावत खासगी आरामगाड्यांशी स्पर्धा करू लागल्या. एसटीचा विकास आणि विस्तार होत राहिला. खासगी वाहतुकीचाही विस्तार होत राहिला…
April 29, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti