वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बाहेरची, ‘मी’ पणाच्या धुळीची पुटं घासून काढली तरच आतली, आपणच जीव ओतून घडवलेली व्यक्तिमत्त्वाची मूर्ती प्रकट होते, झळाळून उठते. काही लोकांना नैसर्गिक सौंदर्याची देणगी लाभलेली असते. काही आपल्या कामातून, व्यक्तिमत्त्वातून सौंदर्याला अर्थ प्राप्त करून देतात…….
August 26, 2019
ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही.
सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फायटिक अॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार- या सर्व आरोग्यसंकटांकडे भारतीयांनी काणाडोळा करावा काय?
आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्यधोके का सांगितले जात नाहीत?
हा प्रश्न केवळ आपल्या आरोग्यापुरताच मर्यादित नाही, तर त्याला आर्थिक पलूसुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लीटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहीत धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल.
आजमितीस भारतीयांना एक कोटी १७ लाख टन खाद्यतेल लागते. त्यातला केवळ ०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत.
भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.
सकाळचा नाश्ता, रोजच्या जेवणासाठी लागणारे खाद्यतेल, जेवणातील प्रमुख धान्य, भाजी, फळे, सुकामेवा असे सगळेच अन्नपदार्थ जर आपण अमेरिका व युरोपमधून आयात करणार असू, तर त्याचा आपल्या देशाचा आर्थिक ताळेबंद आणि एकंदर आíथक स्थर्यावर काय व किती विपरीत बोजा पडेल याची कल्पनासुद्धा करता येणार नाही.
परकीय खाद्यान्नातून देशाचे होणारे हे आíथक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके समाजासमोर येणे म्हणूनच अगत्याचे आहे.
या ओट्स, ऑलिव्ह तेल, ब्रेकफास्ट सीरियल्स, किवी, ब्रोकोली वगरे पदार्थाबाबत असे काही चित्र उभे केले जाते, की यांचे सेवन केले की हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, स्थूलत्व आदी भारतीयांना ग्रासणाऱ्या जीवनशैलीजन्य आजारांवर सहज मात करता येईल. परंतु ही चक्क फसवणूक आहे. कारण या सगळ्या प्रकारात जीवनशैलीजन्य आजारांची जी खरी कारणे आहेत, त्यांकडे साफ दुर्लक्ष झालेले दिसते.
साखर, मदा, रिफाइण्ड धान्ये, मीठ, जंक फूड, तळलेला आहार यांचे नित्य सेवन, आहारसेवनाचे दोष, व्यस्त, स्पर्धात्मक, तरीही बठी जीवनशैली, परिश्रमांचा, व्यायामाचा, घामाचा अभाव, पोटावरची चरबी, स्थूल शरीर, मानसिक ताण आदी मूळ कारणांचा विचार न करता केलेले अन्य प्रयत्न निर्थक आहेत.
मूळ कारणांकडे दुर्लक्ष करून केवळ हे अन्नपदार्थ खाऊन तुम्ही आजारांचा प्रतिबंध करू पाहत असाल तर तो प्रयत्न फोल ठरेल यात शंकाच नाही.
ऑलिव्ह, ओट्स, ब्रोकोली, किवी, सफरचंद वगरे कोणतेही परकीय फळ वा भाजीची बी आपल्या भूमीमध्ये निसर्गत: उगवत नाही. इथेच खरे तर ते पदार्थ आपल्यासाठी बनलेले नाहीत याचा संदेश निसर्गाने दिलेला आहे.
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, अग्नी, बल, वय, कामाचे स्वरूप या सर्वाचा विचार करून आपल्याला सात्म्य होईल ते अन्न सेवन करावे. तेसुद्धा ऋतू-काळ-प्रदेश यांना अनुसरून- असे आयुर्वेदात म्हटले आहे.
परंतु परकीय पदार्थाचे सेवन करताना या मूलभूत आरोग्यनियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवले जाते.
आज जग जवळ आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल, हे नक्की.
आयुर्वेदानुसार, जो आहार देशसात्म्य आहे- अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.
आफ्रिका आणि आशिया खंडांमधील मूलनिवासी जोवर आपल्या मूळ आहाराला चिकटून होते, तोवर त्यांच्यामध्ये आधुनिक जीवनशैलीजन्य आजार दिसत नव्हते, हे सांगणारे अनेक संशोधकांचे अहवाल आज उपलब्ध आहेत.
हा इतिहास असतानाही आपण जर ओट्स, ब्रेकफास्ट सीरियल्स, ऑलिव्ह तेल आदी परकीय पदार्थाच्या मागे लागणार असू, तर दुर्दैव आपल्या आरोग्याचे आणि आपल्या देशाचेही!
आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की, याच पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत.
याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत.
यांनीच आपल्या मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले.
यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत.
यांनीच गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत.
ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते हरघडी बदलत असतात, त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तोही आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या देशवासीयांनी?
वैद्य अश्विन सावंत
drashwin15@yahoo.com
(पोषणसंदर्भ : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)
January 19, 2017
जागतिक मांजर दिवस हा २००२ पासून इंटरनॅशनल अनिमल वेलफेअर या संस्थेने साजरा करण्यास सुरवात केली. युरोप मध्ये १७ फेब्रुवारी व रशिया मध्ये १ मार्चला मांजर दिवस साजरा केला जातो.
कुत्र्यानंतर पाळीव म्हणून मानमरातब मिळवणारा प्राणी म्हणजे मांजर. प्रत्येकालाच लहानपणापासून प्राणी-पक्षिजगताची जाणीवदीक्षा दिली जाते ती चिऊ, काऊ आणि अखेरीस माऊच्या ओळखीने. पूर्वी वाडे, चाळी, बंगले संस्कृतीमध्ये अनेक दारांआड तरी या वाघाच्या ‘पाळीव’ मावशीचा वावर असायचा. अन् अनेक घरांचा तिच्यावर मौखिक दावा असायचा.
गंमत म्हणजे हा दावा असणारे मांजर मालक असल्याच्या भ्रमात राहणाऱ्या प्रत्येक घराला चकवा देत ऐटीत बागडायचे. चार घरांतील स्वयंपाकघरात आवश्यक पदार्थाची हक्कवसुली, सात उंबऱ्यांमध्ये फिरवत त्या घरांत पिल्लांना दाखवत गुपचुप गुडूप होण्याची कसरत करणारी मांजरे प्रत्येकाच्या स्मृतिकोशात दडली असतील. खाणे हवे असले, लाड करून हवे असले की जवळ येणारे आणि एरवी जगातल्या कोणालाही फुकटचा भाव न देता आपल्या जागेवर पहुडणे हे या प्राण्याचे सार्वत्रिक वैशिष्टय़.
मांजर पाळीव असले, तरी स्वत:चे स्वातंत्र्य आणि आब राखून असते. पाळीव असूनही मांजरांचा अनेक उंबऱ्यांवरचा भटका शिरस्ता आजही गाव आणि शहरांत सारखाच आहे. मात्र फ्लॅट संस्कृतीमुळे शहरी-निमशहरी भागांमध्ये कुत्र्याप्रमाणेच घरामध्ये जाणीवपूर्वक मांजर बाळगले जाण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. चार घरी फिरणाऱ्या मांजरींचे चित्र एकाच घरात २४ तास विसावणाऱ्या मांजरामध्ये परावर्तित झाले आहे. लोकांमध्ये मांजराच्या बाबतीत अनेकदा टोकाच्या भूमिका दिसतात.
मांजर अत्यंत आवडते असल्यास पाहताक्षणी तिच्या डोक्यावर कुरवाळण्यास हात पुढे होतो. तर नावडते असल्यास तिच्या कोणत्याही वर्तवणुकीबाबत हातातली वस्तू फेकून मारावी इतका संताप येतो. घरा, वाडय़ांमध्ये आगंतुक येणारे मांजर उंच इमारतींमधील फ्लॅटमध्ये दुरापास्त बनल्यानंतर आज मांजर विकत घेऊन पाळण्याचे प्रमाण वाढत आहे.
आपल्याकडे स्थानिक प्रजातीच्या मांजरात बरेच वैविध्य पाहायला मिळते. रंग, केस, आकार, गुणवैशिष्टय़े असे वैविध्य असूनही त्याच्या नेमक्या प्रजातींची किंवा वंशावळीची नोंद करण्यातच आलेली नाही. त्यामुळे गावठी किंवा देशी मांजर आणि परदेशी प्रजाती अशी ढोबळ वर्गवारी केली जाते.
स्वतंत्र प्रजाती म्हणून नोंद असलेल्या मांजरांमध्ये आपल्याकडे मिळणाऱ्या मांजरांची गुणवैशिष्टय़े दिसत असली, तरीही त्याची भारतीय प्रजाती म्हणून नोंद नाही. पाळीव मांजरातील स्वतंत्र प्रजाती म्हणून साधारण ७३ प्रजातींची नोंद जगात वेगवेगळ्या संस्थांनी केली आहे. त्यामध्ये अमेरिकन प्रजातींचा वरचष्मा आहे. नोंद झालेल्यापैकी जवळपास ४० प्रजाती या अमेरिकन आहेत. त्यामध्ये नैसर्गिक किंवा मूळ प्रजातींबरोबरच ‘हायब्रिड आणि मिक्स ब्रिड प्रजातींचाही समावेश आहे.
हायब्रिड म्हणजे दोन नोंद झालेल्या प्रजातींची गुणवैशिष्टय़े लक्षात घेऊन त्यांचे मुद्दाम ब्रिडिंग करून तयार करण्यात आलेली प्रजाती. दोन प्रजातींचे मुद्दाम न ठरवता ब्रिडिंग झाल्यानंतर त्यातून जन्माला आलेल्या पिल्लात काही पूर्णपणे वेगळी गुणवैशिष्टय़े दिसली, तर त्याची नोंद मिक्स ब्रिड म्हणून केली जाते.
भारतातील परदेशी मांजरांचे वेड वाढवण्यात हॉलीवूडपटांनी मोठा वाटा उचलला आहे. ‘स्टुअर्ट लिटिल’ या चित्रपटानंतर पर्शिअन, बॉबटेल या प्रजातींच्या मांजराची मागणी वाढली. ‘प्रिन्सेस डायरी’ या चित्रपटानंतर पांढरे अंग आणि काळे तोंड असणारे रॅग डॉल मांजर आपल्याकडे पसंतीस उतरले. आता हळूहळू इतरही अनेक वंशावळीची मांजरे भारतात आपले बस्तान बसवू लागली आहेत. येथेच त्यांचे ब्रिडिंगही होऊ लागले आहे. देशी मांजराशी ब्रिडिंग होऊन काही नव्या प्रजातीही जन्माला येत आहेत. घरी मांजर ठेवणे या पलिकडे जाऊन त्याच्यासाठी तयार खाणे, कपडे, शाम्पू, पावडर अशी उत्पादने आणि पार्लर, हॉस्टेल अशा सेवांनी भारतीय बाजारात जम बसवला आहे.
साधारणत: गेल्या दोन दशकांपासून आपल्याकडे परदेशी मांजरे मार्जारप्रेमींच्या घरी लाडोबा झाली आहेत. पर्शियन ही मूळ इराणमधील प्रजाती, तुर्किश अंगोरा ही तुर्कस्तानात मूळ असलेली प्रजाती, एक्झॉटिक शॉर्ट हेअर, माइन कून, रॅग डॉल या अमेरिकन प्रजाती, सयामी ही थायलंडमधील प्रजाती पाळण्याकडे सध्या प्राणिप्रेमींचा कल आहे. बहुतेक घरात ‘बेंगाल’ या प्रजातीची मांजरे असतात.
ही मांजरे बहुतेकदा आपल्या कबऱ्या, ठिपकेवाल्या देशी मांजरांशी साधम्र्य असलेली असतात. त्याचप्रमाणे पूर्ण काळी कुळकुळीत आणि हिरवे डोळे असलेली ‘बॉम्बे’ या प्रजातीशी साधम्र्य असलेली मांजरेही दिसतात. मात्र बेंगाल किंवा बॉम्बे अशी नावे असली, तरी याची नोंद अमेरिकन प्रजाती म्हणून आहे. साधारणपणे किमान ५ हजार ते कमाल ८० हजार या अशा किमतीत ही मांजरे मिळतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / लोकसत्ता.
August 8, 2021
हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे.
April 1, 2022
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. हिंदूच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो आहे.
September 26, 2025
समर्थांनी मनावर भाष्य करणारे २०५ श्लोक लिहिले त्यांनाच मनाचे श्लोक असे म्हणतात.मानवाच्या अशांतीचे मूळ म्हणजे त्याचे मन ! या मनापासून मुक्त होण्यासाठी मनच कसे उपयोगी पडते याचे विवेचन समर्थांनी मनाच्या श्लोकात केले आहे.संत एकनाथांनी 'जोशी' या नावाचे भारुड लिहिले आहे.त्यात भारुडात ते मनाचा उल्लेख करताना म्हणतात --
" मानाजी पाटील देहागावीचा
विश्वास धरू नका त्याचा. "
मन हे असे विश्वास न ठेवण्या सारखे चंचल आहे.मानवी जीवनात मन हे वासना धरते,ज्ञान मिळवते,परमेश्वराची भक्ती करते किंवा परमेश्वरा सगट सर्वांची घृणा सुद्धा करते. मन आणि हृदय यांत फरक आहे.मन विचार , तर्क आणि विवेकाचे अधिष्ठान आहे तर हृदय भावना , अन्तः प्रेरणा ,आणि नैसर्गिक प्रवृत्ती यांत प्रेम आणि तिरस्कार सुद्धा येतो यांचे मूळ आहे. म्हणून मनापासून बोलताना कुणी डोक्यावर ( ज्या मेंदूत विचार उत्पन्न होतात तिथे हात न ठेवता ) स्वतःच्या छातीवर डावीकडे म्हणजेच हृदयावर हात ठेवतो. प्रेमाचे स्वरूप दाखवताना याच साठी हृदयाचे चित्र असते.
ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, तुकारामांचे अभंग आणि समर्थांचे मनाचे श्लोक हि सामान्य माणसांच्या अध्यात्म साधनेची प्रस्थानत्रयीच आहे.लोकांचे कल्याण व्हावे म्हणून अत्यंत तळमळीने केलेली हि जणू आकाशवाणीच आहे.विज्ञानात शरीराचे शास्त्र आहे तर अध्यात्मात मनाचे शास्त्र आहे, अध्यात्म शास्त्राने मन शुद्ध,प्रसन्न,आणि निकोप करावे लागते.मनाच्या श्लोकांनी मनाचे शुद्धीकरण होते.म्हणूनच मनाच्या श्लोकांचे पठण ,मनन,चिंतन आणि आचरण हे अध्यात्माच्या अभ्यासाची सुरवात आहे.मन जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा ते विवेकाचा विचार करते आणि मन जेव्हा अविवेकाचा ध्यास घेते तेव्हा ते वासनामय होते. याच मनाला समर्थ बोध करून त्याला राघवाच्या दिशेनी घेऊन जातात. मनाच्या श्लोकांचे पठण बालवयात करणे अत्यंत फायदेशीर आहे. मी ब्राह्मण विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतले.वर्गात मनाचे श्लोक म्हंटले जात असत.त्या वयात त्याचे महत्व लक्षात आले नव्हते पण आता त्याची आठवण झाली तरी मन कासावीस होते. शालेय शिक्षणात मनाचे श्लोक शिकवणे हि काळाची गरज आहे.मनाचे श्लोक हेच अत्यंत प्रगत नागरिक शास्त्र आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.
--चिंतामणी कारखानीस
March 2, 2016
निरोगी समाज निर्माण करणे ही आपल्यासमोरील सद्यपरिस्थितील एक अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. त्यादिशेने वाटचाल करण्यासाठी ‘औषधी गर्भसंस्कार’ ही काळाची गरज आहे!!!
September 17, 2014
सध्या नागपुरात राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. कापूस उत्पादक पट्ट्यातील आणि त्यातही विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न या अधिवेशनात गाजत आहे. ‘गाजत’ हा खरोखरच यथार्थ वर्णन करणारा शब्द म्हणावा लागेल.
December 11, 2005
भूकंप होत असताना ज्या लहरी जमिनीखाली निर्माण होतात त्या पसरत जातात तेव्हा त्यांची नोंद आरेखन किंवा आलेखाच्या माध्यमातून घेतली जाते. हे काम ज्या यंत्राच्या मदतीने केले जाते त्याला सिस्मोग्राफ असे म्हणतात.
October 14, 2023
लिली सरगयू हि दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर होती . तिने डबल एजंट म्हणून महत्वाची भूमिका बजावली.
आधी आपण डबल एजंट म्हणजे काय समजून घेऊ. डबल एजंट म्हणजे एका देशाच्या गुप्तहेर एजन्सीचा गुप्तहेर शत्रुराष्ट्राकडे पाठवला जातो. तो शत्रूराष्ट्राला भासवतो कि तो त्यांच्यासाठी काम करतो. पण तो प्रत्यक्षात आपल्या देशासाठी काम करतो व शत्रूराष्ट्राला याचा सुगावा लागू देत नाही. हे काम अत्यंत जोखमीचे असते. कारण शत्रूराष्ट्राला सुगावा लागला कि त्याचे मरण ठरलेले.
ती “ ट्रेजर” या नावाने प्रसिद्ध होती. तिचा जन्म रशियातील सेंट पिटसबर्ग गावी २४ जानेवारी १९१२ रोजी झाला. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीच्या वेळी त्यांचे कुटुंबाने फ्रांसला पलायन केले. तिचे शिक्षण पॅरिस येथे झाले. ती पत्रकारीतेत पारंगत होती. तिचे इंग्रजी फ्रेंच व जर्मन भाषेवर प्रभुत्व होते.तिला १९३७ मध्ये जर्मनीद्वारे गुप्तहेर खात्यात भरती होण्याविषयी विचारले होते पण तिने नकार दिला. पण फ्रान्सच्या पडवानंतर तिने जर्मनीला गुप्तहेर खात्यात काम करण्यास होकार दिला.
मेजर एमील किलमनने तिला शिक्षण दिले. १९४३ ला ती आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन स्पेनला गेली. तिने लगेच इंग्लंडच्या मादरीद येथील m15 या गुप्तहेर संघटनेशी संपर्क केला. आपण जर्मन गुप्तहेर असल्याचे सांगून इंग्लंडसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली. ती मागणी मान्य होऊन तिला लगेच इंग्लंडला रवाना केले. लिलि ला “treasure” नाव देण्यात आले व बऱ्याच अधिकाऱ्याबरोबर कामाची संधि दिली. तिने डबल एजंट संबंधी आपल्या अमेरिकन मित्राला सांगितले.
१९४४च्या मेमध्ये तिला बातमी समजली की तिच्या आवडत्या कुत्र्याचे निधन झाले. यावर तिला प्रचंड राग आला. तिने m15ला कळवले की तिच्याकडे काही गुपिते आहेत. तिने त्यातील काही फोडली.त्यावर तातडीने बैठक बोलावण्यात आली. पण तीला m15 मध्ये काम करू देण्यात आले. ती जर्मनीला खोट्या बातम्या पुरवत राहिली. नंतर तिला संघटनेतून काढून टाकण्यात आले. इंग्लंडचे काही संदेश जर्मनीच्या एगनीमा यंत्राने पकडले १९४४ च्या शेवटी ती फ्रांसला परतली व फ्रेंच वूमन आर्मी सर्विस मध्ये काम करू लागली. ती रशियन भाषेची दुभाषी म्हणून काम करू लागली. १९४६ मध्ये तिने मेजर जॉन बारटन कॉलीन याच्याशी पॅरिसमध्ये लग्न केले. ते सोलोन येथे स्थायिक झाले.
१७ मे १९५० रोजी तिचे किडणीच्या आजाराने निधन झाले.
--रवींद्र शरद वाळिंबे
July 16, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti