वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्याला शाळेत आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवलेआहे की--आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगेर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.
आता विचार करा. देवाने,निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल? 22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती? हे कसे? विचार चालेना!! एक दिवस
फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो,प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सुर्यनमस्कारात ते होते.
सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते.नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लॅडला व स्रियाना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी 5 ते 12 नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा गेल्या 32 वर्षाचा अनुभव आहे.
1985 साली मला एक गृहस्थ भेटले. वय 72 होते. मला म्हणाले--मला दोन दिवस संडासला झाली नव्हती, डायबेटीस,गुडघे दुखी होती. (हे बोटीवर कॅप्टन होते) 69 व्या वर्षी आयुष्यातील पहिला सुर्यनमस्कार घातला आणि संडासला धावलो. जोशी आता किती नमस्कार घालत असेन सांगा. मी म्हणालो २०-२५ घालत असाल. ते म्हणाले- रोज 156 नमस्कार घालतो माझे सर्व त्रास गेले
ह्या गृहस्थाचे पासून मी स्फुर्ती घेतली व नमस्कार चालू केले. माझा अनुभव असा की रोज 5 ते 12 नमस्कार तब्बेत चांगली ठेवायला पुरतात.
नमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते. 10 ते 15 मिनीटे लागतात. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या येण्याचा वेळ वाचतो.
फक्त केले पाहिजे रे !!?
-- अरविंद जोशी
B.Sc.
९४२१९४८८९४
April 6, 2017
From the time line of श्रीनिवास चितळे
अनुपमा ---"काका ,मी आधीच तुम्हाला सांगून ठेवते कि मला लग्नानंतर पुणे सोडून कुठेही जायचं नाही ,नो कर्जत ,नो कोकण ,नो मुंबई ."
"अग तू कुठे बघितल आहेस का ? कोणी आवडलाय का ? मला सांग हवतर मी जाऊन विचारतो .
"तस काहीही नाहीये काका ,पण मला पुणे सोडायचं नाही आणि आई पाठी लागली आहे कि देवगडच एक स्थळ आहे ,मुलगा इंजिनियर आहे आणि इथली बजाज मधली नोकरी सोडून तो गावाला शेती ,बाग बगिच्या पाहायला स्वतःहून गेला आहे म्हणे ".
"अहो,भावोजी बघा हो ,दारी १००० कलम ,सुपारीच्या ५ बागा ,शेती ,मुंबई पुण्याच्या सर्व सुख सोई आहेत आणि हि जायचं नाही म्हणते ".
"अहो वाहिनी सोडून द्या ना ,तिला नाहीना जायचं ,आणि त्याला छपन्न मुली मिळतील आणि हिला ५६ उत्तम स्थळ येतील ,अहो आपली एवढी हुशार मुलगी ,कम्प्युटर इंजिनियर त्या शिवाय लेखिका ,कवयत्री ."
"अहो त्या मुलाने आणि त्याच्या आईने हिला सरोज वन्सनच्या शेखरच्या लग्नात पहिली आणि त्यांना हि खूप आवडली आहे ,मी काय म्हणते एकदा आपण देवगडास जाऊन तर येऊ ,त्या मुलग्याशी हिला बोलू दे ,तिच्यावर जबरदस्ती नाही पण सहज एक कोकण ट्रीप म्हणून जायला काय हरकत आहे ? तिला नाही आवडला तर नाही ."
"अनुपमा हा वाहिनीचा मुद्दा मला पटला ,अग बघून घे कि ."
"ठीक आहे ,आलिया भोगासी असावे सादर "म्हणत बाई तयार झाल्या .
आम्ही कोकणात गेलो ,उत्तम स्वागत .तिच्या सासऱ्यांच्या "ये ग मनी माऊ ,अग तुला पाहिल्यावर अनिकेतनेच तुला हे नाव ठेवलय .आणि हे बघ मस्त दोन दिवस फिरा ,बागेत जा ,समुद्रावर जा ,खा प्या मजा करा आणि तरीही तुला पसंत नाही पडल तर नाही म्हण बाळा ."या गोड बोलण्यानेच अनुच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बदलले ,त्या दोघांनी खूप गप्पा वगैरे मारली आणि येताना गाडीत मला अनु म्हणाली "काका बोका आवडला,आणि मग पुणे येई पर्यंत त्याची आजी ,आई ,सासरे ,धाकटा दीर ,एक वन्सबाई ,बाग हे कित्ती कित्ती मस्त आहे याची सहस्र आवर्तन झाली .
लग्न झाल ,हि माझी तशी लांबची पुतणी , नंतर बरेच वर्ष गाठभेट नाही ,कधीतरी फोनवर बोलण व्हायचं ,तीच सारख एकच टुमण "काका ,काकू या कि एकदा पुतणीच राज्य बघायला ."
बरेच वर्षांनी योग आला ,गाडीतून उतरलो तर काकूला आणि मला मिठी मारून रडून झाल ,"काका तुम्ही इकडे ट्रीप सारख यायचं सांगितल नसतत ,तर मी खरच स्वर्गाला मुकले असते ,thank you ,thank you ,thank you काके काकू करून झाल .
"अगो बाई ,एक बाई रुसल्यात का आमच्यावर ,दोन दिवसात इकडे फिरकले नाही म्हणून,"बाप रे किती तो शिष्ठपणा अगदी पहिली कळी उमलली म्हणून एवढ नकोय काही ,माहित्ये पाहिलट करीण आहेस ती ,"सुखली ग ताई माझी ,दोन दिवसात पाणी नाही का मिळाल ,आज सांगत्ये हो वामनला इकडे पाट फिरवायला ."ओ पोफळे वाहिनी ,तुम्ही जीव धरणार कधी ,जरा वारा आला को १८० अंशात डुलता ."
मी आणि हि बघतच राहिलो ,"अनु किती सुरेक बोलत्येस झाडांशी ?अग कोणी शिकवलं तुला हे ?.
"काका ,आजे सासूबाई होत्याना त्या सुरवातीला मला घेऊन या बागा मधून फिरायच्या ,झाडावरून एवढ्या प्रेमाने हात फिरवत बोलायच्या कि ती झाड अगदी झिम्माड होऊन जायची आणि खर सांगते काकू ,आजी बागेत शिरण्यापूर्वी पेक्षा त्या अस झाडांशी बोलून गेल्या कि झाड टवटवीत व्हायची ."
मध्यंतरी माझ्या सासर्यांनी म्हणजे बाबांनी एक गोष्ट सांगितली कि म्हणे एक आदिवासी जमात आहे ,त्यांना एखाद झाड काढून टाकायचं असल कि ते झाड तोडत नाहीत ,सगळे गावकरी जमून त्या झाडाला मोठमोठ्या आवाजात शिव्या देतात ,मग ते झाड अपोआप मरून जात ."
आमच्या सासूबाई सांगतात झाड ,गुर यांच्याशी प्रेमाने बोलाव ,त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत कौतुक कराव कि ती झाड देता किती घेशील दो कराने अस दान देतात .
आम्ही मंत्रमुग्ध होवून नुसत ऐकत होतो ,तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या झाल्या का बागा फिरून आणि मालकिणीने केलेलं कौतुक ऐकून ? अनु तू बस हो काका काकूशी गप्पा मारीत मी बघत्ये जेवणाच .
मग .
एवढ्यात सासरे आले आणि गप्पात सामील झाले ."बाबा उद्या आपल्याला समुद्रावर पोहायला जायचं आहे ,मी काही ऐकणार नाही ".
"ते म्हणाले अग मी कशाला ?नवऱ्याला घेऊन जा ,माझ्यावर नको तुझी दादागिरी ".
अहो त्याला वेळ असेल तर ना ,साहेबांचा काहीतरी नवीन कलमाचा प्रयोग चालू आहे ,उद्या दापोलीस जायचं होत पण आता काका आलेत म्हणून पुढे ढकलली .
"अनु ,पोहायला कधी शिकलीस ?"
आज्जे सासूबाई आणि बाबा यांची पहिली अट होती कि पोहायला शिकायचं ,मी भीत होते पण बाबांनी हट्टच धरला कि यंदा गणपती विसर्जनाला समुद्रात तू गणपती नवऱ्या बरोबर घेऊन जायचीस म्हणून ,मग काय मारली उडी आणि घाबरल्ये मग यांनी माझी वेणी धरून वर घेतली आणि अशी घट्ट बिलगल्ये त्यांना ,तेव्हा हे हळूच म्हणाले अशी बिलगणार असलीस तर सतरा वेळा विहिरीतून वर काढेन .
"काका ,सासऱ्याच्या समोर काय पुराण लावल आहे ते ऐकलत ना ?"सासरे हसून म्हणाले तशी पटकन म्हणाली "बाबा you are not my सासरा only ,तुम्ही मित्र आहात माझे ".
माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे बाकी होते .
तेवढ्यात तीच पिल्लू आल आणि म्हणाल "आई मी शिपण्याला जाऊ ?'
फावड उचलत तरी का ?उगीच पाटात पाय फिरवत खेळत बसायचं ,सर्दी होईल ,काही नको जायला ."
तेवढ्यात सासूबाई पोह्याच्या बशा घेऊन बाहेर आल्या आणि म्हणाल्या "गवयाच्या पोराने मोठा आ लावला तर घसा दुखत नाही अनु ,जाऊ दे त्याला ."
"तरी काका अनुची गंमत सांगत्ये ,पहिल्यांदाच पावसात मनसोक्त भिजली ,एवढा पाऊस पुण्यात कधी बघितलेला नसेल ,आणि आली शिंकत आणि कोमट अंग घेऊन ,तेवढ्यात तिचा नवरा हसला आणि मग काय ग बाई तो सदाशिवपेठी फणकारा .तिला औषध दिल आणि दोन दिवसांनी पुन्हा मोठी सर आली तशी गोधडी लपेटून बसलेली ,तेवढ्यात हे आले आणि म्हणाले चला सुनबाई पावसात ,मनसोक्त भिजा ,अग म्हणजे इथल्या पावसाला पण कळत कि हे आपल माणूस आहे ,दोन तीन वेळा भिजलीस कि पाऊस मग सर्दी वगैरे नाही फक्त वरदहस्त देतो ."
तीन दिवस हे सगळ ऐकत होती ,जावई आणि अनु त्यांच्या नवीननवीन योजना ,शेतीतील ,बागेतील एकेक प्रयोग दाखवीत होते,गोठ्यातील गोधन दाखवीत होते .मी आणि हि फक्त अचंबित .तेवढ्यात दोन खड्डे खणलेले आणि दोन डाळिंबाची रोप उभी होती तिथे अनु घेऊन गेली आणि म्हणाली "तुमच्या दोघांच्या हस्ते वृक्षारोपण आणि आज इथेच बागेत जेवण असा बेत आहे ,"
निघताना मी विचारल "अनु पुण्यास कधी फेरी ?'
"काका ,खर सांगू ,इथून पाय निघत नाही ,दोन दिवस नसले कि या आमच्या लाडूबाई म्हणजे वेली रे रुसतात ,मला आठवण आली कि मीच गाडी पाठवून आई ,बाबांना इकडे बोलवून घेत्ये आणि आता काका तू हि निवृत्त झाला आहेस ,तुला हवेतेव्हा कळव मी तुमच्यासाठी गाडी पाठवून देईन ."आणि एकदा सगळ्या मुलांना देखील पाठवून द्या बघा म्हणाव आमच कोकण ".
-- श्रीनिवास चितळे
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..
June 13, 2017
पंचतत्व. अग्नि, वायू, पाणी, पृथ्वी, तेज ही तत्व मिळून पंचतत्व तयार होतं. मानवी शरीर देखील याच तत्वांनी बनलेलं. शरीर याच पंचतत्वाच विलीन होऊन जातं. शरीर विलीन होतं म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या रुपात पुन्हा मागे उरतं. कशात तरी समावून जातं. काही तरी बनून जातं. याचाच अर्थ असाच ना की आपण सारे एकमेकांपासुन तयार झालेलो आहोत.
October 29, 2018
एका वेगळ्याच.. हटके पद्धतीने बनवलेला.. हा हळदीचा गणपती….
September 3, 2016
काऊंटी फेअर्स
सन १८०० च्या सुमारास शेतकी जत्रांमधून खेडयापाडयातील लोकांना नवीन शेतकी तंत्रज्ञान, साधनं, पिकांच्या आणि जनावरांच्या जाती – उपजाती बघण्याची संधी मिळायची. १९ व्या शतकात, या जत्रांमधे इतर शैक्षणिक, स्पर्धात्मक, सामाजिक तसंच करमणुकीच्या गोष्टींचा समावेश होत गेला. त्या नंतर केवळ काही पिढयांमध्ये, जिल्हा आणि राज्य स्तरावरच्या शेतकी जत्रा, ही पूर्णांशाने एक अमेरिकन पध्दत / रीतिरिवाज (tradition) बनून गेली.
सुरवातीला या जत्रा केवळ काही सधन लोक भरवायचे. १८०७ साली मॅसेच्युसेट्स राज्यातल्या वॅटसन नावाच्या एका गृहस्थाने याची सुरुवात केली. त्याने सुरुवात केली ती मेंढयांची लोकर भादरायचे प्रदर्शन भरवून. १८१० साला पर्यंत हे प्रदर्शन म्हणजे फक्त मेंढया भादरायचे प्रदर्शन न राहता, त्याला एका छोटया जत्रेचे रूप आले होते. त्यात तीन, चार हजार जनावरांच्या प्रदर्शनाबरोबरच स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम, इतर ग्रामीण उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन, वगैरे गोष्टींचा समावेश झाला होता. वॅटसनने मोठ्या हुषारीने, स्त्रियांना देखील प्रदर्शनात गोडी निर्माण व्हावी म्हणून घरगुती कलाकुसरीच्या वस्तु, खाद्य पदार्थ वगैरे गोष्टींचा समावेश केला होता. आणि या सर्वांवर कळस म्हणजे या जत्रेचाच एक भाग म्हणून वार्षिक नाचगाण्याचा कार्यक्रम देखील ठेवला होता.
जसजशी वॅटसनच्या या जत्रेची बातमी पसरू लागली तसतशा जागोजागच्या शेतकरी सोसायटया देखील अशाच स्वरूपाच्या जत्रा आयोजित करण्यासाठी पुढे सरसावल्या. साधारण १८३० सालापर्यंत या ठिकठिकाणच्या जत्रांना तेथील स्थानिक धनिकांच्या पैशाशिवाय आर्थिक पाठबळ फारसे नव्हते. त्यामुळे बर्याचदा त्यांना आर्थिक चणचण जाणवायची. परंतु १८४० च्या सुमारास विविध राज्यांच्या विधानसभांनी शेतकी boards ची स्थापना केली आणि शेती संस्थांना पैसे पुरवायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून शेती जत्रा अधिक मोठया, वैविध्यपूर्ण आणि सुनियोजित होऊ लागल्या. १८४१ साली न्यूयॉर्क राज्यातील अशी पहिली जत्रा सिरॅक्युस या गावी भरली आणि तिला जवळजवळ १५००० लोकांचा प्रतिसाद लाभला.
लवकरच या जत्रा म्हणजे सार्या देशभर एक मोठंच आकर्षण ठरल्या. लोक या जत्रांची मोठया आतुरतेने वाट बघू लागले. अनेक शेतकरी कुटुंबं, जवळजवळ महिनाभर आधीपासून आपल्या कामाचे आयोजन करून, जत्रेसाठी काही दिवस मोकळे राहतील अशी तजवीज करू लागली. या जत्रा म्हणजे त्यांच्या दृष्टीने रोजच्या धबडग्यातून मोकळं होण्याचं आणि करमणुकीचं एकमेव साधन होतं. अनेक ग्रामीण लोकांसाठी या जत्रा म्हणजे विजेचे दिवे, कपडे धुण्याचं मशिन वगैरे आधुनिक गोष्टी प्रथमच बघण्याची संधी असायची.
यादवी युद्धाच्या वेळी, मीडवेस्ट मध्ये, लष्कराने या जत्रेच्या मैदानांचा उपयोग, लष्करी कवायती करण्यासाठी करायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक ठिकाणच्या जत्रा बंद पडल्या किंवा त्यांना इतरत्र जागा शोधायला लागल्या. यादवी युद्ध संपल्यानंतर पुनश्च जत्रांची लोकप्रियता उसळून आली. बहुतेक सार्या राज्यांनी भरपूर पैशाची मदत केल्यामुळे, अनेक ठिकाणी या जत्रांना कायम स्वरूपाचे बांधकाम करता आले. १८७० नंतर, राजकीय भाषणे, विविध खेळ, करमणुकीचे प्रयोग आणि खाद्यपदार्थांची चंगळ हे या जत्रांचे एक कायम अंग होऊन गेले.
August 29, 2015

नेहमीच्या पाण्यातही अतिशय अल्प प्रमाणात जड पाणी असतं. सन १९३२मध्ये नेहमीच्या पाण्यातून हे जड पाणी वेगळं करण्यात यश आलं. त्यानंतर काही काळातच, ओस्लोच्या प्राध्यापक हॅन्सेन यांनी जड पाण्याची चव जिभेवर जळजळ निर्माण करत असल्याचा दावा केला. खरं तर स्वाद कळणं, ही एक जैवरासायनिक अभिक्रिया आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या पाण्याची चव सारखीच असली पाहिजे. त्यामुळे, हॅन्सेन यांच्या दाव्यानंतर, ड्यूटेरियमचा शोध लावणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञ हॅरल्ड युरी यांनी १९३५ साली, जड पाणी प्रत्यक्ष चाखून ही चव तपासली. त्यांना दोन्ही पाण्यांच्या चवीत काहीच फरक नसल्याचं आढळलं.
March 29, 2022
मुंबईतील ब्रिटीशकालीन पुतळ्यांच्या सद्यस्थितीवरील एकूण चार लेखांपैकी हा शेवटचा चौथा भाग
November 11, 2016
१७९१ साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व खनिजशास्त्रज्ञ विल्यम ग्रेगॉर यांना एक नवा धातू मेनकॅनाइट खनिजात सापडला त्याव्रून त्यांनी त्याचे नाव मेनाकिन असे ठेवले. पुढे १७९५ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन हेन्रिक क्लॅपरॉथ यांना रुटाइलच्या खनिजात हा धातू सापडला. क्लॅपरॉथ यांना आधीच्या शोधाबद्दल काहीच माहित नव्हते, त्यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास करून त्यास टायटॅनियम असे नाव दिले. क्लॅपरॉथ यांनाच टायटॅनियमच्या शोधाचे श्रेय दिले जाते.
September 18, 2026
एक दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये त्या पूर्वीची दोन वर्षं कोरडी गेली होती. अवर्षणाचा तडाखा त्या भागाला बसला होता. खरं तर हा प्रदेशच मुळी पर्जन्यछायेतला आहे.
April 21, 2011
सगळं चाललंय ते टीचभर पोटासाठी.
काय शाकाहार, काय मांसाहार
काय असेल ते खाऊन घ्या गपचुप.
शेवटी पोट भरण्याशी मतलब ना !
सगळं खरं आहे, पण जी बुद्धी नावाची चीज दिली आहे ती कशासाठी ? त्याचा वापर कधी करणार ?
हिंदु भारतीय संस्कृती प्रमाणे या बुद्धीचा वापर आपले आयुष्य शतायुषी होण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवायची आहे. त्यासाठी सण साजरे करायचे आहेत, ते सुद्धा संस्कृतीमध्ये सांगितले आहेत तसे, बुद्धी वापरून.
सणांची रचना ही ऋतुनुसार केली आहे. मराठी महिन्यानुसार केली आहे.
आद्य शंकराचार्यांनी सर्वसामान्य माणसांना निरोगी जगणे सोपे व्हावे, यासाठी काही कर्मकांडे घालून दिली. या प्रत्येक कर्मकांडाचा थेट संबंध आरोग्याशी आहे. प्रत्येक हिंदु सणामधे काहीनाकाही गोडधोड केले जाते. सर्व पदार्थ शाकाहारीच असतात. अगदी क्वचित ते सुद्धा कुळानुसार, प्रदेशानुसार देवतेनुसार मांसाहाराचा नेवैद्य असेल,
प्रत्येक सण साजरे करण्यामध्ये जे आरोग्य दडलेले आहे, ते बुद्धीने शोधले को सापडते.
आता हेच पहा ना, आजच्या नरकचतुर्दशीला दिवसाची सुरवात करायची तीच सातीवण नावाच्या औषधी झाडाच्या सालीचा रस पिऊन.
चुकलं.
प्रत्येक झाड हे औषधीच असते. झाडाच्या मागे औषधी असे विशेषण लावण्याची पण आवश्यकता नाही. किंबहुना जगात जे म्हणून द्रव्य स्वरूपात आहे, ते सर्व माणसासाठी, शतायुषी होण्यासाठी, औषधीसाठी वापरता येऊ शकते.
तर आजच्या दिवशी या सातवीण वृक्षाच्या सालीला फार महत्व आहे. या वृक्षाला नमस्कार करून, दिवा लावून, प्रदक्षिणा घालून, प्रार्थना करून काही साल काढून, वाटून रस काढताना त्यामधे, सैंधव, जिरे, ओवा, मिरी, लिंबाचा रस घालून घ्यायचा प्रघात आहे. यामुळे दिवाळीचा फराळ अघळपघळ झाला तरी फार काळजी नसते. हा फराळ सहज पचून जातो. आज हा रस घ्यावाच !
"हे, ईश्वरी अंशाने आणि औषधी गुणाने युक्त असलेल्या वृक्षदेवते, आज तुझ्या औषधी गुणाचा आम्हा मनुष्याला फायदा व्हावा, यासाठी तुझ्या सालीचा काही भाग आम्ही निःस्वार्थ भावनेने, औषधी रूपात करणार आहोत, त्यासाठी तू तुझ्या सर्व औषधी गुणांनी युक्त होऊन आमच्यावर कृपा कर. औषधासाठी का होईना, तुझ्या अंगावर आम्हा वैद्यांना शस्त्र वापरावे लागत आहे, यासाठी तू आम्हाला क्षमा कर."
केवढा अर्थ भरला आहे या प्रार्थनेत !
प्रार्थनेत शक्ती असते.
जशी प्रार्थना असते, तसे फळ मिळते.
प्रार्थना जेवढी भावपूर्ण होते, तेवढा गुण जास्त येतो.
अखिल मानवाच्या कल्याणासाठी, कोणत्याही अपेक्षांशिवाय, आपल्या औषधी अंगाचा वापर मुक्तपणे करू देणाऱ्या या वृक्षदेवतांप्रती, या निमित्ताने शतशः नमन !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
29.10.2016
October 29, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti