(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चहा बनवण्याची सोपी व शात्रीय पद्धत

    चहाचे शास्त्रीय नाव कॅमेलिया सिनेन्सिस आहे. तसेच या वनस्पतीच्या पाने व पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून चहा हे पेय बनते.. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते.

    पाण्यानंतर हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा म्हणतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशीच नावे असल्याचे दिसते. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टी हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण, चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं, की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो.
    एकोणीशे चाळीस च्या दशका पर्यंत भारता मद्धे सकाळी चहा पिण्याची पद्धत नव्हती. त्याऐवजी लोक लिंबू पाणी प्यायचे. मित्रांना आमंत्रण देतानाही लिंबू पाणी पिण्यासाठी या असे असायचे.

    नंतरच्या काळात ब्रिटिश लोकांनी दक्षिण भारत व ईशान्ये कडे डोंगरउतारावर चहाची लागवड सुरु केली. तो चहा खपवण्या साठी त्यांनी लोकांना चांगल्या प्रकारे प्रलोभन दाखवून भारतीयांना चहाची सवय लावली. आमच्या लहान पणी आठवडे बाजारात लिप्टनचा चहाची टांग्यामधून जाहिरात करणारे एजंट यायचे व लोकांना फुकट चहा पावडर वाटायचे. अशा प्रकारे लोकांना सवय लावून नंतर विक्री करायचे.

    जगामद्धे नाही तरी भारतात चहाचे असंख्य प्रकार आहेत. त्यातील काही मुख्य प्रकार असे आहेत

    १. बदाम पिस्ता चहा, २. बिरयानी चहा, ३. गुलाबी चहा, ४. ईराणी चहा, ०५. आसाम चहा ०६. दार्जिलिंग चहा ०७. निलगिरी चहा ०८. तंदुरी चहा. ०९. कहवा काश्मिरी चहा.१० चॉकलेट चहा ११. कोल्हापूर कडील बासुंदी चहा १२. इराण्यांचा मस्का बन टी १३. ब्रिटिश लोकांचा हाय टी (खारी व बेकरी पदार्था बरोबर)

    अलीकडे कोविड महामारीत प्रसिद्धीस आलेले, मसाला टी, मालेगावचा काढा चहा, गवती चहाची पाने, तुळस वगैरे टाकून केलेला औषधी चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी इत्यादी.

    चहा तयार करण्याच्या पद्धती:

    चहाच्या पत्तीमद्धे टॅनिन नावाचे रसायन असते. पत्ती उकळत्या पाण्यात टाकली कि त्यातील टॅनिन पाण्यामद्धे उतरते.त्याची चव तुरट-तिखट असते. या रसायनामुळे मेंदूला तरतरी येते व त्याची सवय लागते. ब्रिटिश लोक चहा कोरा बिनदुधाचा घेतात. पण भारतीय लोकांना दूध व पत्ती घालून केलेला चहा आवडतो.

    चहाची चव हि पत्ती कितीवेळ उकळत्या पाण्यात आहे व त्यात किती प्रमाणात दूध घातले जाते यावर अवलंबून असते.काहींना कडक चहा आवडतो असा चहा उकळत्या पाण्यात बराच वेळ ठेवला जातो त्यामुळे त्यात ज्यास्त टॅनिन उतरते व चहा कडक बनतो.

    चहापत्तीची गुणवत्ता देखील चांगला चहा बनवण्यास कारणीभूत असते. त्यामुळेच बाजारात चहापत्तीचे विविध ब्रँड उपलब्ध आहेत. जो तो आपल्या आवडीप्रमाणे चहापत्ती वापरतो. सर्वात महाग व उत्कृष्ट चहा हा दार्जिलिंगचा मानला जातो.

    अनेकांना चहाशिवाय चैन पडत नाही. काही जण आळस घालवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी आवर्जून चहा पितात. तसंच बरेच जण दिवसाची सुरुवात चहाने करतात. विशेषतः विद्यार्थी वर्ग रात्री अभ्यास करताना हुशारी येण्यासाठी व झोप घालवण्या करता चहा घेतात. दिवसाची सुरुवात मनाजोग्या चहाने केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असाही काहींचा समज असतो; मात्र हाच चहा सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं चहा बनवतो. त्यामुळे चहाची चवसुद्धा वेगवेगळी असते.

    चहात केवळ चार गोष्टी वापरल्या जातात. प्रत्येक जण आवडीनुसार वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून चहा तयार करत असल्याने चव वेगवेगळी लागते. कोणी साखर वापरून, तर कोणी गुळाचा वापर करून चहा बनवतो. तसंच यामध्ये दूध टाकून किंवा बिनदुधाचाही चहा बनवला जातो.

    आपल्या, तसंच मित्र किंवा नातेवाईकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवला जातो; पण चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती, तो कसा बनवायचा याची खास माहिती/ पद्धत सांगणार आहे. चहा विविध प्रकारे तयार केला जातो. प्रत्येकाची चहा बनवण्याची एक खास पद्धत असते. तसंच प्रत्येकाची चहा उकळण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. दूध किंवा दुधाशिवायही चहा बनविला जातो. बिनदुधाचा चहा आरोग्यास चांगला असतो; मात्र आपल्याकडे दुध घालून बनवलेला चहा सर्वांत जास्त प्रमाणात प्यायला जातो.

    चहा बनविताना चुकीची पद्धत वापरणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे चहाची चव बिघडते. बरेच जण आधी दूध उकळून मग त्यामध्ये पाणी, चहा पावडर घालतात. ही चुकीची पद्धत आहे. यात बराच वेळ दूध उकळावं लागतं. गॅस जास्त लागतो. सर्वांत शेवटी चहा पावडर घालणंही चुकीचीच पद्धत आहे. चहा चांगला उकळावा लागतो. तसं केलं, तर कमी चहा पावडर वापरूनही चहाला चांगली चव आणि गंध मिळतो.

    ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशनने (BSI) वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने चहा करण्याची पद्धत सांगितली आहे. चहाचे भांडे हे नेहमी स्टीलचे किंवा पितळेचे असावे. या पद्धतीत एका स्टील किंवा पितळी भांड्यामध्ये फक्त दूध उकळवावं. चमच्याने ते ढवळत राहावं. दुसऱ्या भांड्यात चहासाठी पाणी गरम करायला ठेवावं. पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण एकसमान असावं. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये चहा पावडर घालावी. चहा पावडर साखरेच्या प्रमाणापेक्षा थोडी कमी असावी. त्यानंतर चहाला चांगली उकळी येऊ द्यावी. साखर चवीनुसार घालावी. कांही लोक चहा पाण्यामध्ये न उकळवता मुरवत ठेवतात. त्यानंतर आवडीनुसार चहात आलं, लवंग, मिरपूड यांपैकी काही घालायचं असेल तर घालू शकता. चहात आले कुटून घालताना चहाचे तापमान थोडे कमी होऊ द्यावे नाहीतर दूध नासते. त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये उकळायला ठेवलेलं दूध चहामध्ये घालावं. त्यानंतर मात्र चहा जास्त वेळ उकळू किंवा मुरुवू नये.
    अशी ही चहा बनवण्याची खास पद्धत आहे. विशेष म्हणजे जुन्या शहरांमध्ये बरीच वर्षं चहा विकणारे अमृततुल्य विक्रेतेसुद्धा चहा बनवण्यासाठी हीच पद्धत वापरतात. ही पद्धत तुम्हीही नक्की वापरून पाहा. ह्यात पण तुम्ही छोटा मोठा बदल करून तुम्हास आवडणाऱ्या चवीचा चहा बनवू शकता.
    चहा हे पृथ्वीवरील अमृत समजले जाते व ते प्राशन करण्यासाठी एवढा सोहळा केलाच पाहिजे ना?

    सध्या ह्या व्यवसायात उच्च शिक्षित तरुण पण उतरले आहेत. ते वेगवेगळे प्रयोग करून स्वतःचा चहाचा ब्रँड निर्माण करतात. त्यांचा व्यवसाय पण छान चालतो. जसे कि पुण्यात येवले टी ईत्यादी.

    सावधानता : चहा हा पित्तकारक गुणधर्माचा आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी जास्त चहा घेऊ नये. साधारण पणे दिवसातून २-३ कप चहा पुरेसा असतो.

    -- डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

      October 18, 2021


  • ग्लोबलायझेशन गणेशोत्सवाचे

    लोकमान्य टिळकांनी ११६ वर्षापूर्वी ज्या उद्देशासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला तो उद्देश आज किती गणेशोत्सव पार पाडतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. बहुतांशी गणेशोत्सव या मुळ तत्वापासून दूर गेले असेल तरी आज ही काही गणेशोत्सव या मुळ उद्देशापासून दूर गेलेले नाहीत.

      April 21, 2024


  • समर्थ रामदास स्वामी …..४

    शिवराय आणि रामदास स्वामी यांचे प्रत्यक्ष सान्निध्यात राहिलेल्या हनुमंत स्वामी याची बखर उपलब्ध आहे. त्या बखरीत असा उल्लेख आहे कि समर्थ सज्जन गडावर (परळीचा किल्ला )वास्तव्याला असताना त्यांनी कल्याण स्वामी यांना दासबोधाची प्रत शिवरायांना भेट देण्यास सांगितले होते.सुदैवाने बखरीतील लिहिलेल्या या घटनेला शिव चरित्रकार पाठींबा देतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दक्षिण दिग्विजय आटोपताच प्रताप गडावर श्री भवानीच्या दर्शना साठी गेले होते.त्या पूर्वी त्यांनी सज्जन गडावर समर्थांची भेट घेतली होती.सज्जन गडावर या शिव -समर्थ भेटीची वेळ वैशाख शुद्ध २ शके १६०० अर्थात १३ एप्रिल १६७८ अशी आहे.समर्थ श्रावण महिन्यात शिवथर घळीतून सज्जन गडावर वास्तव्याला आले.शिवथर घळ ते सज्जन गड हा पायी मार्ग असा आहे-----शिवथर घळ --कुम्भे शिवथर --ढालकाठी--कांगोरी किल्ला--महादेवाचा मुरा--नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्म गाव उमरठ--महाबळेश्वर मठ--तापोळा --बामणोली--शेंबडी वाघाली--नवरणवारीची खिंड --जुमडी--जळकेवाडी--वाघापूर सड्याचा उत्तर भाग --मोरवाडी --मोर घळ परसावडे --पांगरी --परळी --सज्जनगड.या पैकी तापोळा ते वाघरी हा मार्ग कोयनेच्या धरणात बुडालेला आहे.त्या ठिकाणी नौकेने प्रवास करावा लागतो.

    मोरघळीच्या माथ्यावरून सज्जन गडाचे विलोभनीय दृश्य दिसते त्यामुळे शिवरायांनी मुक्कामासाठी कोणता किल्ला हवा असे समर्थांना विचारताच समर्थांनी परळीचा किल्ला देणे असे सांगितले.

    शिवरायांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरच्या नायक राजांचा पराभव केला आणि दक्षिणेला मराठा साम्राज्य स्थापन केले.व्यंकोजी महाराजांनी समर्थ शिष्य भीमस्वामी यांना तंजावर मध्ये समर्थांचा मठ स्थापन करण्यासाठी जागा दिली.त्या ठिकाणी समर्थांचा मठ निर्माण झाला.व्यंकोजी राजांनी तारो गोपाल या नावाच्या अत्यंत धार्मिक अशा कारकुनास अनेक धार्मिक ग्रंथांच्या नकली करण्याची आज्ञा केली त्यात दासबोधाची प्रत सरस्वती महाल या ग्रंथालयात अजूनही जशीच्या तशी जतन केली आहे.अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे भोसल्यांचे सध्याचे वंशज जे तंजावरला राहतात त्यांच्या देवघरात आज तागायत दासबोध आहे आणि तो सोनेरी अक्षरांनी लिहिलेला असून त्याची दररोज पूजा होते.

    शिवरायांच्या वंशाजापैकी नागपूरकर भोसले हे देखील समर्थांना पुज्य मानत होते. त्यांच्या देवघरात समर्थांची पंच धातूची मूर्ती आहे .त्या मूर्तीची दररोज पूजा होते.सातारा गादीचे वंशज सुद्धा दरवर्षी "गुरु गादी" म्हणून न चुकता सज्जन गडावर जातात आणि समर्थांच्या समाधि समोर डोके टेकवून या महान राष्ट्र संता समोर नतमस्तक होतात.

    सदर लेखातील हा भाग हा नागपूरच्या म.रा. जोशी या संत साहित्य अभ्यासक यांच्या दासबोधाच्या प्रस्थावानेतून साभार घेतला आहे.श्री जोशी यांनी दासबोधाच्या १५० हस्त लिखित प्रतींचा अभ्यास केलेला असून त्यांनी 'दत्तात्रय स्वामी ' या नावाची प्रत प्रसिद्ध केली आहे.श्री जोशी यांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वर आणि तुकारामांची गाथा सुद्धा संपादित करून प्रसिद्ध केलेली आहे. संत तुकाराम आणि समर्थ यांचा जीवन कालखंड एकच आहे.आणि ज्या ज्या ठिकाणी दासबोधाचा अभ्यास होतो त्या त्या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि तुकारामंची गाथा सुद्धा अभ्यासली जाते.त्यामुळे समर्थांचे मठ हे संत साहित्याची विद्यापिठेच आहेत .

    --चिंतामणी कारखानीस

      February 29, 2016


  • मालवण देवबागचं अनोखं  ‘त्सुनामी आयलंड’..!!

    दोन दिवसांपूर्वी गांवाकडे आलोय सिंधुदुर्गात..सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत प्रचंड गरम..! घरात राहणं कठीण..! रात्री मात्र पांघरूणाशिवाय झोप यायची नाही येवढी छान थंड हवा

      May 8, 2016


  • केळीच्या पानावर जेवण का करावे ? 

    नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व ब्राम्हणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी ….

      August 1, 2017


  • बलात्कार

    प्रत्येक स्त्रिला सुरक्षा देणे हे आपल्या देशातील सुरक्षा यंत्रणेच्या आवाक्या बाहेरील आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीची सुरक्षा करणे ही आपली म्हणजे पुरुषांची जबाबदारी आहे. कारण हे बलात्कारी पुरुष आपल्यातच बेमालूमपणे वावरत असतात. त्यांना शोधण्यास त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास आता आपली नजर सराईत व्हायला हवी !  नाही का ?

      December 10, 2021


  • भेंडी…..एक पॉवर हाऊस

    माणसाच्या ५० टक्के आजाराला त्याचे पोट कारणीभूत असते. पोट नीट असलं की स्वास्थ्य आलबेल राहू शकते. त्यासाठी एक साधी भाजी महत्त्वपूर्ण कार्य करते ती म्हणजे शेंगेसारखी दिसणारी भेंडी ही भाजी होय. भेंडीच्या आत चविष्ट बिया असतात पण जाडसर, पारदर्शक द्रव असतो. काहींना ती आवडत नाही. पण तुमच्या पोटाचे विकार विशेषतः बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीच्या त्रासांवर भेंडी अक्सर इलाज असल्याचे आढळले आहे. या भाजीचा नियमित खुराक पचनेंद्रियांच्या कार्यासाठी लाभदायक ठरतो.

    इलिनोईस युनिव्हर्सिटीतील एक संशोधक डॉ. सिल्विया झूक यांच्या नोंदणीनुसार भेंडीची भाजी ही विविध अन्नद्रव्यांचे पॉवर हाऊस आहे. त्यातील अर्धा हिस्सा गम आणि पेक्टिनच्या धाग्याच्या रुपात असतो. त्यातील विद्राव्य तंतूमय अन्नामुळे रक्तातला कोलेस्टरॉल कमी होतो, तसेच हृदयविकार मंदावतात. जो अतिद्राव्य तंतूमय चोथा असतो तो पचनेंद्रियाचा मार्ग मोकळा ठेवण्यास हातभार लावतो. भेंडी सतत खाल्ल्याने आतड्याच्या कर्करोगापासून आपली सुटका होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठीसुद्धा या भाजीचा हातभार लागतो.

    या भाजीत बी-६ हे जीवनसत्त्व तसेच शरीराला उपयुक्त असे फॉलिक आम्लदेखील मुबलक असते. शिजविलेल्या अर्धा कप भाजीत खालीलप्रमाणे अन्नसाठा असतो ः कॅलरीज – २५ तंतूमय अन्न – २ ग्रॅम प्रथिने – १.५ ग्रॅम कार्बोहायड्रेटस् – ५.८ ग्रॅम जीवनसत्त्व अ – ४६९ युनिट जीवनसत्त्व क – १३ मिलीग्रॅम फॉलिक आम्ल – ३६.५ मिलीग्रॅम लोह – ०.४ मिलीग्रॅम पोटॅशियम – २५६ मिलीग्रॅम मॅग्नेशियम – ४६ मिलीग्रॅम भेंडीतील पातळ, चिकट द्रव्यामुळे आतड्यातील साखरेचे शोषण कमी होते व रक्तात वाढणार्‍या साखरेचे प्रमाण रोखले जाते. भेंडीतली जीव रसायने कोलेस्टरॉलच्या नव्हे तर यकृतरसातील विषारी पदार्थाशी परमाणूशी संयोग पावतात व शरीराबाहेर टाकण्यास सहाय्य करतात. भेंडीतील तंतूमय भाग बद्धकोष्ठता रोखतो. हे तंतू मऊ असल्यामुळे अन्य कठीण वनस्पतीज तंतूप्रमाणे ते आतड्याच्या आतल्या मऊ मांसल थरांना ओरखडे पाडीत नाहीत. त्याच्या घसरट गुणधर्मामुळे न पचलेल्या अन्नाचा घन भाग मोठ्या आतड्यातून सहज निसटत गुदद्वारामार्गे शरीराबाहेर पडतो.

    शरीराच्या स्वास्थ्याला पोषक ठरणार्‍या जीवाणूच्या वाढीस ही भाजी हातभार लावते. अशक्तपणा, थकवा व मानसिक तणाव घालविण्यासाठी ही भाजी उपयोगी पडते. फुफ्फुसाला होणारे संसर्ग, गळ्याचे विकार, खाज यासाठी सुद्धा उपाय म्हणून भेंडीची भाजी लागू पडते. या सर्व प्राप्तीसाठी भेंडीची भाजी अर्धवट उकळवून खाल्लेली बरी असा सल्ला दिला जातो....

    || भेंडी खा निरोगी रहा ||
    विशेष चव तसेच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेडी या फळभाजीत अनेक पोषण तत्वे असून, नियमित भेंजीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.

    भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खुप लाभदायी आहे. भेंडीमध्ये अनेक प्रकराचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासारखे जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.

    भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते. आपल्या शरीरातील विषारी सत्वे नष्ट करण्याचे काम भेंडी करते.
    भेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीज या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.
    ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.

    भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात व्हिटामीन सी हे जीवनस्तव असते. हे आपली इम्यूनीटी सिस्टमला ताकद वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. तर, यातील व्हिटामीन ए हे जीवसत्व डोळ्यांना निरोगी ठेवते.

    मधुमेहींसाठी औषध
    दोन भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंचे शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते पहा !.

    भेंडीचे १० फायदे
    हिरव्या भाज्यांमध्ये आपले एक वेगळे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगरसुध्दा म्हटले जाते. भेंडी ही अनेकांच्या आवडीच्या भाज्यांमधील एक आहे, तर काही लोकांना भेंडी बिलकुल आवडत नाही. परंतु भेंडी खाल्याने कोणते फायदे आणि नुकसान होतात हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसतील तर नक्की वाचा हे 10 फायदे,

    १. कँसर
    भेंडी आपल्या आहारा नियमित घेतल्याने तुम्ही कँसरला दुर ठेवु शकता. कोलन कँसरला दुर ठेवण्यासाठी भेंडी खास फायदेशीर आहे. ही आतड्यांतील विषारी तत्त्व बाहेर काढण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतडे स्वस्थ राहतात आणि चांगल्या प्रकारे काम करता.

    २. हृदय
    भेंडी हृदयाला सुध्दा चांगले ठेवते. यामध्ये असलेले पैक्टिन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, यासोबतच यामध्ये असणारा घुलनशील फायबर, रक्त आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतो. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.

    ३. डायबिटीज
    यामध्ये असणारे यूगेनॉल, डायबिटीजसाठी खुप फायदेशीर ठरते. हे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासुन थांबवते, ज्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.

    ४. अनीमिया
    भेंडी अनिमियासाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये असलेले आयरन हीमोग्लोबिन निर्माण करण्यात सहायक असतात. हे रक्त स्त्राव थांबवण्याचे काम करते.

    ५. पचनतंत्र
    भेंडी ही भरपुर फायबर असलेली भाजी आहे. यामध्ये असलेले फायबर पचनतंत्रासाठी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, बध्दकोष्ट आणि पोट दुखी यासारख्या समस्या होत नाही.

    ६. हाडांना मजबुत बनवते
    भेंडीमध्ये असणारे सर्व पदार्थ हाडांसाठी उपयोगी असतात. यामध्ये मिळणारे व्हीटॅमिन के हाडांना मजबुत बनवण्याचे कार्य करते.

    ७. इम्यून सिस्टम
    भेंडीमध्ये व्हिटॅमिन-सी सोबतच अँटीऑक्सीडेंसही मोठ्या प्रमाणात असते. यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबुत बनवुन शरीरातील आजारांपासुन लढण्यास मदत करते. भेंडीला रोजच्या जेवनात घेतल्याने अनेक आजार जसे की, खोकला, सर्दी यांसारख्या समस्या होत नाही.

    ८. डोळ्यांचा प्रकाश
    भेंडीमध्ये व्हिट्रमिन-ए, बीटा केरोटीन आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. नेत्रहिनतेसाठी जे कण हानीकारक असतात त्यांना नष्ट करण्याचे काम भेंडी करते. भेंडी मोती बिंदुपासून दुर ठेवते.

    ९. गर्भावस्था
    गर्भावस्थेमध्ये भेंडीचे सेवन फायदेशीर असते. भेंडीमध्ये फोटेल नावाचे एक पोषक तत्त्व असते, जे भ्रूणाच्या मेंदुचा विकास करण्यात महत्त्व पुर्ण भुमिका बजावते. या व्यतिरीक्त भेंडीत अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

    १०. वजन कमी करण्यात
    भेंडी आपले वजन कमी करण्यासोबत त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते. भेंडीचा उपयोग केसांना सुंदर, दाट आणि चमकदार करण्यासाठी केला जातो. यामधील पदार्थांना लिंबु सोबत मिसळुन शांपु प्रमाणे वापरता येऊ शकते.

    संकलक : प्रमोद तांबे

      February 8, 2017


  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग दोन

    आयुषोवेदः आयुर्वेदः

    आयु विषयी ज्यात सर्व ज्ञान मिळते ते शास्त्र.

    आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याचे शास्त्र.
    याचाच अर्थ मृत्युविषयीचे संपूर्ण ज्ञान.

    आपापल्या कर्मफलानुसार, त्याने नेमून दिलेले ( नियत) आयुष्य जगता यावे, या वेळेअगोदर मृत्यु येऊ नये, यासाठी कोणते नियम आहेत, ते जाणून घेण्यासाठी आयुर्वेद शिकावा.

    जगण्यातले हे अडथळे दूर करण्यासाठी हे अडथळे ओळखता येणे महत्वाचे. यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे रोग.

    हे रोग होऊ नयेत यासाठी स्वस्थवृत्त आणि रोग झाल्यानंतर रोगापासून पूर्ण मुक्ती मिळवणे यासाठी व्याधीमोक्ष असे दोन प्रमुख अभ्यासाचे विषय आहेत. याची योग्य सांगड घालता आली पाहिजे.

    या आरोग्यटीप लिहिण्याचे कारणच हे आहे, की सर्वांना हे स्वस्थवृत्त आणि व्याधीमोक्ष समजून द्यावे.
    जगण्याचे छोटे छोटे नियम सांगणाऱ्या आरोग्यटीपा म्हणजे स्वस्थवृत्त.
    आणि ज्याला त्याला झटपट उपाय हवा असतो. त्यांना जे घरगुती आरोग्य सल्ले दिले जातात, ते व्याधीमोक्ष. ( घरगुती सल्ले म्हणजे परिपूर्ण आयुर्वेद नव्हे हो, उगाच शब्दांचा छळ करू नका. )

    नळाला पाणी खराब येते याचे कारण न शोधता, नळच बदलून बघूया असा सल्ला देणारे, आजचे अजब पाश्चात्य वैद्यकीय तंत्र.

    हो आणखीन एक मोठ्ठा गैरसमज. आरोग्यटीपेमधे पाश्चात्य तंत्रज्ञानाला, त्यांच्या संशोधक वृत्तीला, काहीही किंमत नाही. असे पण नाही. जे योग्य आहे ते योग्यच ! पण जर आपले मूळ भारतीय आरोग्य शास्त्रच या पाश्चात्य विचाराने घराबाहेर काढले जात असेल आणि जाणीवपूर्वक बदनाम केले जात असेल तर

    यात कोण चुक कोण बरोबर असा प्रश्नच नसतो. प्रत्येक जण आपल्या जागी योग्यच असतो. फक्त एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला की सर्वच विकृत आणि चुकीचे दिसू लागते.

    आयुर्वेद हे थोतांड आहे. शास्त्रच नाही. फक्त पाळेमुळे. अंधश्रद्धा !
    आयुर्वेद हा कुठलाही आजार बरा करू शकत नाही. इन्स्टंट तर नाहीच नाही. ह्यात फक्त दिनचर्या चांगली समजून सांगितली आहे. बाकी सगळं फेकू.

    असा सूर येण्यामागे प्रचंड मोठे गैरसमज आहेत. एकतर पूर्वग्रह दूषित असणार किंवा आयुर्वेदात काय सांगितले आहे ह्याचा अभ्यास नसणार किंवा कुणीतरी चुकीच्या पद्धतीने आयुर्वेद समजून घेतला असणार किंवा गुरूविना ज्ञान घेण्याचा प्रयत्न झाला असणार किंवा आयुर्वेदाने यांव होते, त्यांव होते, दहा मिनीटात दमा जातो, पंथरा मिनीटात कॅन्सर गायब, असले काहीतरी 'टाॅल क्लेम' करणारे तथाकथित कुणाला तरी भेटले असणार ! स्वयंघोषीत वैद्यांची काही कमी नाही. जे पारंपारिक वैदू औषधे देतात, त्यांना शरीरशास्त्र माहिती नाही, जे योगतज्ज्ञ आहेत त्यांना औषधांची माहिती नाही. जे डाएटिशीयन आहेत, त्यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान.
    जिच्याकडे अनुभवाचा बटवा आहे, तीला पाठवली वृध्दाश्रमात, ज्यांच्याकडे आयुर्वेदाची पदवी आहे, त्यांना अनुभव नाही.
    उरलेल्या सगळ्यांकडे आहे फक्त अहंकार. मी सांगतोय तेवढंच बरोबर. बाकी सब झुठ.
    आणि सगळ्यांना हवे आहे, जमाने के साथ चलनेवाला इन्स्टंट !

    या सर्वांच्यात कडबोळ झालंय आयुर्वेदाचं !
    कुणीही यावे, टिचकी मारून जावे,
    काहीही सांगावे, काहीही बोलावे,
    मनमानी लिहावे, वाॅटसप करावे,
    अतिशहाणे करूनी सोडावे
    सकल जन.
    असं झालंय सगळं.

    यामुळे गैरसमज वाढतात.

    पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण
    उगाच ठेवी जो दूषण
    तो दुरात्मा दूराभिमान
    मत्सरे करी । असं समर्थांनी उगाच नाही सांगितलेलं.

    आयुर्वेदाला बदनाम करण्यामधे हा झटपट दृष्टीकोन कारणीभूत आहे.

    गरज आहे फक्त दृष्टीकोन बदलण्याची.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.02.2017

      February 13, 2017


  • अशोक चव्हाणांचा “आदर्श गेम”!

    एकंदरीत “आदर्श” च्या प्रकरणात विलासरावांना वाचविण्यासाठी अशोक चव्हाणांचा गेम करण्यात आल्याचे दिसत असले, तरी त्याच आधारावर अशोक चव्हाण आणि इतर आरोपीही सहज निर्दोष सुटू शकतात. या संपूर्ण प्रकरणामुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली आणि ती म्हणजे यानंतर कोणताही अधिकारी किंवा मंत्री अशी कोणतीही वादग्रस्त फाईल क्लिअर करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल, हा एक आदर्श संदेश यातून निश्चितच गेला आहे.

      July 9, 2012


  • भारताचे संस्थानिक आणि रेल्वे

    भारतीय संस्थानिकांचं रेल्वेप्रेम, त्यांनी बांधलेले आपल्या संस्थानातील रेल्वेमार्ग, त्यासाठी परदेशातून मागविलेली विविध प्रकारची इंजिनं, राजेशाही डबे या सर्व बाबींचा इतिहासही मोठा मनोरंजक आणि वाचनीय आहे.

    बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या छोट्या युवराजाला वाढदिवसानिमित्त छोट्या रुळांवरून चालणारी वाफेच्या इंजिनाची गाडी भेट दिली होती. तो स्वतः इंजिन चालवीत संपूर्ण महालाच्या परिसरात आपल्या मित्रांना घेऊन फिरत असे. मुंबई-बडोदा रेल्वे बांधणीला बडोद्याच्या महाराजांनी सढळ हाताने मदत केली, परंतु एका अटीवर. ती अट अशी होती, की या रेल्वेमार्गाला बॉम्बे बडोदा ( बी.बी.) असं नाव दिलं जावं. तोपर्यंत जी. आय. पी. रेल्वे-लाईन सुरु झाली होती. दादर हे या दोन्ही रेल्वे मार्गांवरचं स्टेशन होतं. दादर ट्रॅम टर्मिनस (T.T.) हे एका भागात होतं. यांना जोडणारा, दोन्ही रेल्वे मार्गांच्यावरून जाणारा वाहनांसाठीचा मोठा पूल टिळक ब्रीज १९२३ साली बांधला गेला. तेव्हापासून दादर टी.टी. व दादर बी.बी. असे दोन विभाग ओळखले जाऊ लागले.

    बडोदा संस्थानाप्रमाणेच, ग्वाल्हेरचे महाराजा सिंदिया यांनाही रेल्वेचं आकर्षण होतं. यांच्या राजवाड्याभोवतीही दोन मैल लांब रुळांवरून त्यांची अलिशान गाडी फिरत असे. त्यांच्याकडील मेजवानीकरता एका भव्य राजेशाही हॉलमध्ये जेवणासाठीच्या लांब लाकडी टेबलाच्या कडेने विजेवर चालणारी छोटी गाडी फिरत असे. त्यातील छप्पर नसलेल्या, सजविलेल्या डब्यातून विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या व काचेचे नक्षीदार चषक प्रत्येक समोर फिरवले जात. संपूर्ण गाडी चांदी व सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेली होती.

    हैदराबादच्या निझामांकडेही खाजगी रेल्वेगाडी होती. त्यांच्या त्या खाजगी गाडीच्या डब्याला हस्तिदंताची झालर व सोन्याचं छप्पर होतं.

    अनेक संस्थानिक मालगाडीचे डबे ओढून नेण्यासाठी हत्ती, खेचरं आणि घोड्यांची मदत घेत, त्यामुळे बऱ्याच मालाचा पुरवठा थेट छोट्या गावांपर्यंत होत असे. भिंड मोरेना ही मध्यप्रदेश संस्थानाची रेल्वेसेवा प्रख्यात होती. राजस्थानच्या जयपूर संस्थानच्या महाराणी गायत्रीदेवी यांनी लिहिलेल्या द प्रिन्सेस रिमेंबर्स या पुस्तकात त्यांच्या लहानपणी त्यांनी रेल्वेने केलेल्या प्रवासाची मनोरंजक हकीकत आहे.

    त्या म्हणतात बंगालचा उत्तर विभाग असलेल्या न्यू जलपईगुरी येथील कूचबिहार या संस्थानाची मी राजकन्या. माझे आजोळ बडोद्याचे. या ठिकाणी सुट्टीत आम्ही वारंवार जात असू. बडोदा येथे आजोबांचा राजवाडा होता. भारताच्या ईशान्य कोपर्‍यात असलेल्या आमच्या कूचबिहार येथून २००० मैल रेल्वेने प्रवास करीत भारताच्या पश्चिम किनाऱ्या जवळील बडोदापर्यंत जाणे म्हणजे मला व माझ्या सर्व लहान भावंडांना आनंदाची पर्वणीच असे. प्रवासाला निघताना आमच्या सामानाचा डोंगराएवढा ढीग असे. बडोद्यात कडक उन्हाळा व काही महिन्यात कडक थंडी, या दोन्ही गोष्टींना तोंड देण्यासाठी भरपूर सामानाची गरजच असे. निघण्याच्या दिवशी नुसता गोंधळ. आमचा प्रशिक्षित नोकरवर्ग सर्व सामान आगगाडीच्या डब्यात व्यवस्थित लावून ठेवीत असे. जवळजवळ संपूर्ण गाडीच आमच्या ताब्यात असेल. सामानाच्या याद्या परत परत बघून सामानाची उचकाउचकी करत एकदाचा प्रवास सुरू होत असे. तब्बल आठ दिवस गाडीतून प्रवास म्हणजे बालपणातील सर्वांत रम्य आठवडा. पहिल्या वर्गाचे तीन चार डबे आमचेच. दुसऱ्या वर्गाचे डबे मदतनिसांचे. नोकर, स्वयंपाकघर, स्वयंपाकी यांची सोय तिसऱ्या वर्गात केली जाई. हा सर्व प्रवास १९२० सालात होत असताना ते म्हणजे एखाद्या देशांतरच वाटे. डब्यातील बाथरूम स्वच्छ असे. शॉवर घेण्याची व्यवस्था असे. पहिले दोन दिवस आमचे आचारी साग्रसंगीत जेवण बनवीत, पुढे रेल्वेकेटरिंगचं जेवण आमच्या ऑर्डरप्रमाणे येत असे. काही वेळा ते प्लॅटफॉर्मवरील कॅफेट रेंगाळत धमाल करीत. हा सगळा रोमांचकारी अनुभव होता. गाडी स्टेशनात थांबली, की आमच्या डब्यापुढे विक्रेत्यांची एकच झुंबड उडे. फळं, मिठाई, गरम चहा, रंगीत लाकडी खेळणी, सोंड वर उचललेला राखाडी रंगाचा हत्ती, त्याची सोनेरी झूल, सजविलेले घोडे-उंट-वाघ-चित्ते, अशी खेळणी प्लॅटफॉर्मशिवाय दुसरीकडे कुठेच मिळत नसल्यानं त्यावेळी त्याची अपूर्वाई जास्तच वाटे. काही वेळा गाडी प्लॅटफॉर्मवर तास दोन तास उभी राहणार असेल, तर आम्ही मुलं स्टेशनवरच पळापळी, शिवशिवी खेळत खूप दंगामस्ती, आरडाओरडा करीत असू. मग भोजन गृहात जाण्यासाठी नोकर घाई करीत, एकदाचे आम्हाला डब्यात बसवीत व आमचा प्रवास पुढे चालू होत असे. अखेर बडोदा यायचं. दरवेळीच हव्याहव्याशा वाटणाऱ्या प्रवासाचा तो हवासा शेवट होत असे.

    पुढे माझ्या लग्नानंतर कूचबिहार येथून मी व माझे पतीराज जयपुरला येण्यास निघालो. सवाईमाधोपुरपासून आमचा प्रवास जयपुर संस्थानाच्या खास रेल्वेगाडीतून झाला. आमचा डबा म्हणजे महालच होता. वाटेत राजस्थान मधील लहान खेडी लागत होती. जयचं जन्मगाव इसारदा त्यानं दाखवलं, तेव्हा तो भावूक झाला होता. जयपुर जवळ येण्यास सुरुवात झाली तेव्हा राजपद्धतीनुसार नोकरांनी आमच्या डब्याच्या खिडक्यांची दारं लाकडी पट्ट्यांनी बंद केली. चेहरा झाकून घेण्याविषयी जय यांनी मला अतिशय सौम्यपणे सुचविलं. आमचा डबा मुख्य गाडीपासून अलग झाला आणि वेगळ्या रुळावरून एका भव्य इमारतीत नेला गेला. ही इमारत जयपूरच्या कोरीव पाषाणाची बनलेली होती. नाव होतं विमान भवन. मुख्य सोहळा येथे होणार होता.

    या सगळ्या गोष्टींवरून लक्षात येतं, की भारतीय संस्थानिकांचं रेल्वेवर नितांत प्रेम होतं. त्यांनी रेल्वेची शान जागतिक स्तरावर नेली.

      August 4, 2019