वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी 'तेजस एक्स्प्रेस'ची अक्षरश: दैना करून टाकली.
काही व्यक्तींना नशिबाने अनेक चांगल्या गोष्टी मिळतात. मात्र, त्याच व्यक्ती आपल्या करंटेपणाने आणि वाईट सवयींमुळे या सगळ्यावर पाणी फेरतात, याचे मासलेवाईक उदाहरण सध्या ‘तेजस एक्स्प्रेस’च्या निमित्ताने अनुभवायला मिळाले आहे. गोव्याहून आपला पहिलाच प्रवास करून मुंबईत परतलेल्या या गाडीची अवस्था बघून रेल्वे अधिकाऱ्यांना धक्काच बसला. पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी ‘तेजस एक्स्प्रेस’ची अक्षरश: दैना करून टाकली आहे. ‘तेजस एक्स्प्रेस’ मुंबईत परतली तेव्हा गाडीच्या डब्यांमध्ये लावण्यात आलेल्या अनेक एलईडी टीव्हींची प्रवाशांनी तोडफोड केल्याचे समोर आले. तसेच मनोरंजनासाठी देण्यात आलेले हेडफोन्सही प्रवाशांनी लंपास केले आहेत. याशिवाय, गाडीतील स्वच्छतागृह आणि इतर परिसरात पसरलेला कचरा पाहून अस्वच्छता हा भारतीय प्रवाशांच्या पाचवीला पुजलेला अवगुण आहे की काय, असेही जाणवले.
तेजस एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी २.३० वाजता करमाळीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर साडेआठ तासांमध्ये गाडी सीएसटी स्थानकावर दाखल झाली होती. मात्र, या पहिल्याच प्रवासात गाडीत होणारी चोरी आणि तोडफोड पाहून रेल्वे अधिकाऱ्यांसमोर नवीनच समस्या उभी राहिली आहे. या गाडीच्या ‘इकॉनॉमी क्लास’मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा संपूर्ण वृत्तांत कथन केला आहे. अनेक प्रवासी सीटसमोर लावण्यात आलेले एलईडी टीव्ही उचकटून काढण्याचा प्रयत्न करत होते. काहीजणांनी तर एलसीडी टीव्ही काढून बॅगेत भरले होते. मात्र, रेल्वे अधिकारी याठिकाणी वेळीच आल्यामुळे या प्रवाशांचा नाईलाज झाला. याशिवाय, गाडीत असणाऱ्या बायो आणि व्हॅक्युम स्वच्छतागृहांमध्ये प्रवाशांनी मोठ्य़ाप्रमाणवर घाण केल्याचे दिसून आले. स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर अनेक प्रवासी फ्लश करत नव्हते. तसेच अनेक स्वच्छतागृहांमध्ये विष्ठा आणि कचरा जमिनीवर पसरला होता. त्यामुळे आता एकूणच प्रवाशांच्या मानसिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
-- सुनील बिडकर
June 5, 2017

पृथ्वीवरच्या वृक्षांचं स्वरूप उक्रांतीद्वारे सतत बदलत आलं आहे. आज आपल्या अवतीभोवती अनेक जाती-प्रजातींचे मोठमोठे वृक्ष आढळतात. मात्र एकेकाळी पृथ्वीवर फक्त शेवाळासारख्या किंवा नेच्यांसारख्या दिसणाऱ्या, छोट्या अपुष्प वनस्पती अस्तित्वात होत्या. या वनस्पतींना वृक्षासारखं स्वरूप सुमारे अडतीस कोटी वर्षांपूर्वी प्राप्त झालं. या वृक्षांचं स्वरूप आजच्या वृक्षांपेक्षा खूपच वेगळं होतं.
February 16, 2024
सुरुवातीला किर्लोस्करवाडीत फक्त पाण्याचे पंप बनत होते. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे पंप म्हणजे किर्लोस्करांचे, अशीच ख्याती झाली. किर्लोस्करांनी पुढे आपल्या उत्पादनांचा पसारा वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबरच यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पदनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तिथेच सुरू झाली.
March 26, 2022
टाकोज हा मेक्सिकन पदार्थ असून अमेरिकेत आणि कॅनडा मध्ये दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय टाकोज दिवस साजरा केला जातो.
October 4, 2021
कोटीराङ्गदरत्नकुण्डलधरे कोदण्डबाणाञ्चिते ।
शिञ्जन्नूपुरपादसारसमणीश्रीपादुकालंकृते
मद्दारिद्र्यभुजंगगारुडखगे मां पाहि मीनाम्बिके ॥ ३॥
आई जगदंबेचे अद्भुत वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
कोटीराङ्गदरत्न- कोटी अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे, अत्यंत मौल्यवान रत्नांनी घडविलेले अंगद म्हणजे बाजूबंद,
कुण्डलधरे- कुंडलांना धारण करणाऱ्या, कोदण्डबाणाञ्चिते- कोदंड अर्थात धनुष्य. हे भगवान विष्णूंच्या धनुष्याचे नाव. दंड अर्थात सत्ता. अधिकार. ज्यावर कोणाचाही दंड चालत नाही ते कोदंड. आई जगदंबेची देखील क्षमता तशीच असल्याने तिच्या हातातील धनुष्याला ही कोदंड म्हटले आहे.
हे कोदंड आणि बाण धारण करणाऱ्या,
कोकाकार- कोका अर्थात पांढऱ्या कमळाच्या उमलण्यास सिद्ध असणाऱ्या टपोऱ्या कळीप्रमाणे आकार असणाऱ्या,
कुचद्वयो- स्तन युगुलावर,
परिलसत्प्रालम्बहाराञ्चिते- रुळणाऱ्या मोत्यांच्या माळांनी अत्यंत सुंदर दिसणाऱ्या,
शिञ्जन्नूपुर- मनोहरी किंकिंण करणाऱ्या पैजणरूपी,
पादसारस- सारस पक्षी जसा कमळावर बसून आवाज करतो तशी ती पैंजणे चरण कमला वर ध्वनी करीत आहेत अशी,
मणीश्रीपादुकालंकृते- रत्नजडित सौंदर्याने संपन्न खडावा चरणात धारण करणाऱ्या, रत्न आणि सोने यांचे पैंजण देखील राणी शिवाय कोणाला वापरण्याची परवानगी नाही. संपूर्ण विश्वाची महाराणी असणारी आई जगदंबा पैंजणच नव्हे तर खडावा देखील रत्नजडित वापरते
आई जगदंबेच्या अद्वितीय वैभवाचे वर्णन करताना आचार्यश्री एका वेगळ्याच भूमिकेला आपल्यासमोर ठेवतात. येथे त्यांनी वापरलेली उपमा अत्यंत मनोज्ञ आहे. आचार्य श्री म्हणतात,
मद्दारिद्र्यभुजंगगारुडखगे - माझ्या दारिद्र्य रुपी सर्पा करिता गरुड रुपी पक्षी असणाऱ्या, अर्थात जसे गरुडाला पाहताच सर्प पळून जातो तसेच तिच्या दर्शनाने संपूर्ण दारिद्र्य लुप्त होते अशा सकल दारिद्र्य विनाशिनी,
मां पाहि मीनाम्बिक- हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 27, 2020
मेक्सिको या देशात जेव्हा क्रांती झाली आणि प्रस्थापित राज्यकर्त्यांविरुद्ध जेव्हा तेथील जनतेने स्वातंत्र्यासाठी बंड पुकारले तेव्हा त्या देशातील कानाकोपऱ्यातून तेथील महिलाही त्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या होत्या.
February 2, 2024
आज आपण नाट्यगृहात, महोत्सवात, स्पर्धेत इ. ठिकाणी पाहणाऱ्या नाटकाला हजारो वर्षांचा इतिहास आणि परांपरा आहे. पुरातन काळापासून ते आजच्या एकवीसाव्या शतकातील नाटकांच्या सादरीकरणात, शैलीत, तंत्रज्ञानात काळानुरूप बदल होत आले आहेत. जगातील सर्वात पुरातन नाट्यपरंपरा म्हणून ग्रीक आणि भारतातील संस्कृत रंगभूमीची ओळख आहे.
March 27, 2018
पुलंचा जीवनपट मांडताना केल्या गेलेल्या अक्षम्य चुका आणि भीषण कलात्मक स्वातंत्र्याचा रोखठोक पंचनामा करणारा श्री मुकुंद संगोराम यांचा लेख..
January 14, 2019
पाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला तरी हा हल्ला महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला आक्रमक कारवाईनेच उत्तर देणे गरजेचे असले तरी भारताने अन्य मार्गांचा अवलंब करून पाकिस्तानची कोंडी केली पाहिजे.
November 15, 2018
…..तरी येणाऱ्या आपल्या नविन पिढ्यांना त्या विभागाचं बिल्डरने दिलेलं नांव हेच खरं नांव वाटायला लागेल आणि नविन पिढीला आताचं जुनं नांव आणि त्याचा इतिहास कधी माहिती होणारच नाही, ही भितीही आहेच. तेंव्हा मुंबैकरांनो, सावध व्हा..!!
February 8, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti