वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मद्रासमधील चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत दोघांचे सूर जुळले व राजा परांजपे यांचे सोबत तो तरुण पुण्याला आला व त्यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातून सहायक दिग्दर्शक म्हणून त्याने चित्रपट सृष्टीतील ‘श्रीगणेशा’ केला… तो तरुण म्हणजेच आज नव्वदाव्या वर्षांत पदार्पण करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक, ऋषितुल्य राजदत्तजी!!!
April 2, 2023
बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत.
परवाच चिपळूण मधेहि बस्किन रॉबिन या आंतरराष्ट्रिय ब्रैंडच आऊटलेट सुरु झालय. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत.
मागे एकदा रत्नागिरीला मिरजोळे एम आय डी सी मधे एका क्लाएंट बरोबर मिटींगसाठी माझ्या एका सरांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या क्लायंटने अजून एका माणसाबरोबर ओळख करुन दिली . तो माणूस मुंबई मधे आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे माझ्या क्लायंट बरोबर आउटलेट उघडायचे होते त्यासाठी त्याला तिथे किंवा झाड़गाव एम आय डी सी मधे प्लांट सुरु करायचा होता .त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट करा म्हणून तो मला व सराना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.
त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. तेआवडणाऱ्यात मीही एक होतोच.
तो म्हणाला ; “आता मी ग्वाहा(पेरू) आणि चॉकलेटआईस्क्रीम मध्ये ४ -४नवीन फ्लेवर्स बनवलेआहेत. जे मला आता कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांनाखूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदाउठवता येईल. ”
प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना आम्हाला उपलब्ध मार्केट त्याची सध्याची परिस्थिति प्रोडक्टचा वाव त्याला उपलब्ध असणारा पर्याय ,लागणारा पैसा, लागणार वेळ ब्रेक ईवन पॉइंट वगैरे गोष्टी विचारात घ्याव्या लागतात म्हणून मी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेटउघडलं आणि तुझे फ्लेवर लोकांना आवडले नाही तर तू त्या चॉकलेट किंवा पेरू फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडे पर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वायाजाणार नाही का ? मग ते नुकसान कुणी सोसायच?”. पुढे माझेअनेक प्रश्न होतेच. वीजखर्च, दुध , कच्चा माल वाहतूक इत्यादी.
त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ;“त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही.अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही...”
आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ;“ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.”
तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासूनआईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाचसंपलेत. ”
“मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?”
“डालडा तुपापासून!”
“काय डालडा तूऽऽऽऽप?” होय डालडा-वनस्पति तूप दचकलात ना
पण काय आहे सर
“आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्यातर सगळे डालडाच वापरतात आणित्यामुळेच ते परवडतं. आजकाल आईस्क्रीममध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की ते डालडातूप आहे. शिवाय ते दुधाच्याआईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं.त्यामघे जो दुधाच्या आइसक्रीम मधे बर्फाचा कचकचित पणा काही वेळा येतो तो येत नाही आणि तेच लोकांना आवडतं.दूसर म्हणजे डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ”
तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.
पुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही.हे आपण घरात बघतच असतो याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला काही दिवसांनी वास येतो. आणि १०-१२ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळेखर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम वर्ष भर जरी फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.
डालडा आईस्क्रीमसाठी लाईटखुपच कमी लागते. १० डिग्रीतापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते आत्ता आठवत नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्याआईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.
शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चामाल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपेआहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीममध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे.म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीमआउटलेट निघू शकतात. ”
“डालडा आईस्क्रीम उत्पादनाचाआणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो.तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावेलागेल.ह्यामुळेच जर आज तुम्ही मार्केट मधल्या प्रतितयश कंपन्याच्या आइसक्रीम चे प्रोडक्शन ठिकाण बघितल तर ते हरियाणा , मध्यप्रदेश इकडचे दिसेल आता त्याच कारण कळल"
तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन नुकतेच बाजारात आलेले फ्लेवर टेस्ट करायला दिले.मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही.पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की.
ह्यापुढे आइसक्रीम खाताना ब्रैंड महत्वाचा नसून त्याचे कंटेंट किंवा इंग्रीडियंट बघा ते महत्वाचे आहे. बाकी तुमचे निर्णय आणि आरोग्य दोन्हीही तुमच्याच हातात आहे ....
-- व्हॉटसअॅप वरुन
April 4, 2016
स्मेरचारुमुखमण्डलां विमलगण्डलम्बिमणिमण्डलां
हारदामपरिशोभमानकुचभारभीरुतनुमध्यमाम् ।
वीरगर्वहरनूपुरां विविधकारणेशवरपीठिकां
मारवैरिसहचारिणीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ ३॥
आई जगदंबेच्या अतिदिव्य सौंदर्याचे आणि वैभवाचे लोकविलक्षणत्व विशद करतांना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
स्मेरचारुमुखमण्डलां- स्मेर शब्दाचा अर्थ आहे दंतपंक्ती किंचित दिसतील अशा प्रकारचे मंद हास्य.
अशा स्मेर हास्याने, चारू म्हणजे अत्यंत आकर्षक मुखकमलाने आई जगदंबा युक्त आहे.
अशा अत्यंतिक सुंदरतम हास्याने युक्त असणार्या, विमलगण्डलम्बिमणिमण्डलां - विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, स्वच्छ, पवित्र. गंड म्हणजे गालाच्या वर आणि डोळ्यांच्या खाली असणारे, डोळे आणि कान यांच्यामधील उंचवटे.
आई जगदंबेच्या या कपोल प्रदेशावर तिच्या मणी अर्थात विविध रत्न लटकवलेल्या बटा रुळत आहेत. अशा बटांनी अधिकच आकर्षक दिसणाऱ्या,
हारदामपरिशोभमान- मोत्यांच्या असंख्य माळांनी अत्यंत शोभायमान असणाऱ्या,
कुचभार- समस्त विश्वाच्या भरणपोषणासाठी पर्याप्त स्वरूपात विश्व तृप्तीकारक अमृताने भरलेल्या स्तन मंडलाने,
भीरुतनुमध्यमाम् - मध्यभाग अर्थात नाजुक कंबर भंग पावेल की काय? अशी भीती असणाऱ्या, अर्थात आई जगदंबेची कंबर इतकी नाजूक आहे की हार आणि स्तनभाराने ती लचकेल की काय? अशी शंका निर्माण होते, इतकी नाजूक.
वीरगर्वहरनूपुरां- विश्वातील समस्त वीरांचा गर्व ज्या नुपुरांच्या अर्थात त्या पैंजणांनी युक्त असणारी चरणकमले नष्ट करतात अशा,
अर्थात जगातील सर्व वीर जिच्या चरणी शरण येतात अशा, विविधकारणेश्वरपीठिकां- अनेक शंकरांना आपले चरणपीठ म्हणजे पाय ठेवण्याचे साधन समजणाऱ्या,
मारवैरिसहचारिणीं- मार अर्थात कामदेव. त्याचे वैरी म्हणजे भगवान शंकर. त्यांची सहधर्मचारिणी असणाऱ्या,
मनसि भावयामि परदेवताम् - परमदेवता आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 17, 2020
जगाला एकापेक्षा एक मौल्यवान, अजरामर काव्य कलाकृती प्रदान करणाऱ्या सर्व कवींना गौरवण्याचा हा दिवस.
युनेस्कोने जागतिक काव्य दिनाची २१ मार्च १९९९ रोजी पॅरिस परिषदेत या दिवसाची घोषणा केली. तेव्हांपासून प्रत्येक वर्ष एका महान कवीला समर्पित केले जाते. यंदाचे वर्ष तब्लिसी (जॉर्जिया)येथील कवी निकोलस बाजातशविली (१८१७-१८४४) यांना समर्पित करण्यात आले आहे. त्यांनी ३२ पेक्षा अधिक काव्यरचना केल्या. त्यात बहुतांश प्रेमकविता होत्या. मानवी भावना प्रकट करणे तसेच अनुभवण्याची अद्वितीय क्षमता काव्यात असते. युनेस्कोच्या महासचिवांनी म्हटलेच आहे की, कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते. एकोणिसाव्या शतकातील फ्रेन्च कलावंत जोसेफ राँऊ ह्यानी म्हटले होते की Science is for them who learn, Poetry is for those who know. हे खरच आहे की बुद्धीची कसोटी लावून विज्ञान शिकता येते पण पद्य मनाला भावणे गरजेचे असते. सुप्रसिद्ध कवयित्री मा. संजीवनी मराठे ह्यांनी कवितेच्या उगमाची प्रक्रियाच ह्या कवितेतून समोर आणली आहे. कविता तिच्या नाजूक नखरेलपणामुळे आणि भावतरलतेमुळे स्त्रीलिंगी मानली जाते. स्त्रियांच्या नकारात अनेकदा होकार दडलेला असतो असं मानलं जातं. म्हणूनच आपल्या कवितेत त्या म्हणतात -
कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी
नजरेपुढती ठुमकत येती रूपवती कामिनी
त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी
William Wordsworth ह्यांनी म्हटल्याप्रमाणे Poetry is the spontaneous overflow of powerful feeings. शब्दांच्या माध्यमातून होणारा रसरशीत भावनांचा उस्फुर्त उद्रेक म्हणजे कविता.
सर्व कवी, कवीयित्रींना आजच्या जागतिक कवी दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 23, 2017
हल्ली लवकर उठणे विसरायलाच झालं आहे. लवकर उठून करायचंय तरी काय, हे विचारणारी नवीन पिढी ! त्या पिढीला शिकवण्यासाठीच दीपावलीसारखा सण आमच्या संस्कृतीने आम्हाला दिला. अभ्यंग स्नान कसे करावे हे आम्हाला शिकवले.
February 2, 2018
उंबऱ्याची मर्यादा ओलांडू नये. या अशाच वाक्यामुळे शब्दाने शब्द वाढतात.अशावेळी शब्दच्छल न करता भाव लक्षात घ्यायचा असतो. हे वाक्य फक्त मुलींसाठी नाही सांगितले. मुलांसाठी सुद्धा तोच नियम आणि नवऱ्यासाठी पण !
August 14, 2017
आसमान से टपके खजुर में अटके हि म्हण सर्वांनाच माहित असणार.तर हा खजुर आपल्या सर्वांचाच आवडता पण ह्याचे खरे राष्ट्रीयत्व अरब देश आहे बरं का.म्हणजेच काय तर हा परदशी पाहुणा आपल्या देशात आला आणी आपलाच बनून गेला.
अत्यंत रूचकर फळ आपण सुक्यामेव्यात पण ह्याचा चांगलाच फडशा पाडतो नाही का.अत्यंत पौष्टिक देखील आहे हा.खजुराची चटणी अगदी कशावर ही छान लागते,खजुर बर्फि,खजुर घातलेली शेवयांची खीर,किंवा पक्वान्नांमध्येच कशाला नुसता देखील हा सुरेख लागतो.
ह्याचा सुपारीच्या झाडा सारखे दिसणारे झाड असते.ते बरेच उंच असते आणी त्याला हे खजुर लागतात. खजुर चवीला गोड असतात,थंड असतात व हे शरीरातील वात व पित्त दोष कमी करतात.
चला आता ह्याचे घरगुती उपाय पाहूयात:
१)संडासला साफ होत नसल्यास २-३ खजुर रात्री पाण्यात भिजत घालावेत व सकाळी ते पाण्यात कुचकरून ते पाणी प्यावे.
२)जुनी जखम बरी होत नसेल कर त्यावर खजुराचे पोटीस बांधावे व खजुर तुपासह खावा.मात्र हि जखम मधुमेहामुळे झाली नसावी.
३)४ खजुर+ १ चमचा शिंगाडा पीठ तुपावर परतावे व खाऊन त्यावर दुध प्यावे.ह्याने रक्त कणांची वाढ होते.
४)लहान मुलांना दात येत असताना होणाऱ्या जुलाबात मधासह खारीक उगाळून द्यावी.
५)डोके दुखत असल्यास खारकेचे बी उगाळून कपाळास लावावे.
६)घामोळ्यांवर खजुराचे बी उगाळून लावावे.
७)खजुराचे बी कुटून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे व ते पाणी पिण्यासाठी वापरावे ह्याने अंगातील उष्णता कमी होते व वारंवार लागणारी तहान देखील.
८)खजुराच्या बिचा लेप उगाळून तो पापण्यांवर लावल्याने डोळे लाल होणे,डोळ्यांची आग होणे कमी होते.
खजुर अतिखाल्ल्यास भुक मंदावणे,अजीर्ण व जुलाब होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
अगदी पूर्वीपासून आपल्या आज्जी – पणजी पासून आपण ऐकत आलो आहोत, बाळ जन्माला आलं की घरात असलेल्या अनुभवी बायका बाळाला काही त्रास झाला किंवा बाळ खूप रडत असल तर त्याला बाळगुटी द्या म्हणून सल्ला देतात. आज आपण असाच आपल्यआजीच्या बटव्यातल पूर्वापार चालत आलेली बाळगुटी का देतात त्यात कोणत्या औषधींचा समावेश असतो त्याचे प्रमाण आणि द्यायची पद्धत ह्याबाबत माहिती मिळवणार आहोत.
November 15, 2025

पृथ्वीवर आतापर्यंत अनेकवेळा हिमयुगं येऊन गेली आहेत. या हिमयुगांतलाच, पृथ्वी मोठ्या प्रमाणात बर्फाच्छादित असण्याचा काळ म्हणजे हिमायनाचा काळ. आतापर्यंतच्या संशोधनानुसार, सर्वांत जुनं हिमायन हे सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी होऊन गेलं आहे.
January 2, 2024
टायफॉइड- उलट्या होणे, पोट दुखणे आणि मुख्यतः ताप येणे ही टायफॉइडची लक्षणे. तापाची तीव्रता काही रुग्णांमध्ये कमी असते तर काहींमध्ये अगदी थंडी भरून खूप ताप येतो. थकवा खूप येतो. खोकलाही असू शकतो. सहसा हा आजार जीवघेणा नसतो, पण बरा होण्यासाठी बरेच दिवस किंवा आठवडेही लागू शकतात. औषधांना दाद न देणाऱ्या टायफॉइडमध्ये दहा ते चौदा दिवस शिरेतून इंजेक्शने द्यावी लागू शकतात.
June 9, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti