वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

धूमकेतूच्या केंद्रकाचा आकार हा सर्वसाधारणपणे दहा ते वीस किलोमीटरच्या दरम्यान असतो. हे केंद्रक खडक, धूळ, पाणी, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, इत्यादींपासून बनलेलं असतं. जेव्हा धूमकेतू अंतराळातून प्रवास करत असतो, तेव्हा या केंद्रकाचं तापमान खूप कमी असतं. परिणामी, त्यावरील पाणी, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, यांसारखे पदार्थ गोठलेल्या अवस्थेत असतात.
December 18, 2021
(‘डिफरन्टली एबल्ड’ व्यक्ती)
लेखक : सुभाष स. नाईक
मार्गदर्शन : डॉ. स्नेहलता नाईक
अन्नदानम् परमदानम् विद्यादानम् मत:परम
अन्नेन क्षणिकातृप्तिर् यावज्जीवच विद्यया ।।
अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पण विद्यादान हे श्रेष्ठतम आहे. अन्नाने क्षणभरासाठी तृप्ती मिळते, तर विद्येने जीवनभरासाठी तृप्ती मिळते.
हा एक जुना संस्कृत श्लोक आहे, विस्मृतीत गेलेला. हल्लीच्या काळात शिक्षणाचा खेळखंडोबा चाललेला आहे. अन्, त्याबद्दल त्याबद्दल बरेच लिहिले-बोललेही जाते. पण ६८ टक्क्यांबाहेरील विद्यार्थ्यांबद्दल किती लोक बोलतात ? तुम्ही विचाराल की, हे ६८ टक्के काय प्रकरण आहे ? हा काही ‘कोटा’ ( quota ) आहे का, ‘एस्.सी. एस्.टी.’ किंवा ‘ओ.बी.सी.’ सारखा ? की, हा एखादा ‘कट्-ऑफ पॉइंट’ ( cut-off point ) आहे , ऍडमिशनसाठी ठेवलेला ? तेव्हा, ६८ टक्क्यांमधे नसलेल्यांबद्दल बोलण्याआधी आपल्याला ही ६८ टक्क्यांची भानगड समजून घेतली पाहिजे.
‘६८’ टक्केवाल्यांचे जग :
सर्वप्रथम आपण ‘नॉर्मल’ म्हणजे काय हे समजून घेऊ या. नॉर्मल म्हणजे सर्वसाधारण. नॉर्मल अर्थात सर्वसाधारण म्हणजे काय ? एखाद्या विशिष्ठ गटातील जास्तीत जास्त गोष्टींचे जे गुणधर्म असतात, ते त्या गटासाठी ‘सर्वसाधारण’ आहेत, असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, माणूसप्राणी. माणसाला दोन हात, दोन पाय, एक डोके, ताठ उभा राहू शकणारा देह, दहा-दहा बोटे, असे गुणधर्म नॉर्मल म्हणता येतील. पक्ष्यांचे म्हणाल तर, पंख, चोच, अणकुचीदार पंजे, हे त्यांच्यासाठी नॉर्मल गुणधर्म म्हणता येतील.
त्या विशिष्ठ गटातील एखाद्याचे गुणधर्म जर काही नॉर्मलपेक्षा वेगळे असले, (उदा. दहाऐवजी अकरा बोटे असणे), तर तो ‘नॉर्मलपेक्षा-भिन्न’ (different from Normal) आहे, असे म्हणता येईल.
संख्याशास्त्रात (statistics) ‘नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन’ नावाचा एक फिनॉमेनॉन (phenomernon) आहे. हा फिनॉमेनॉन ‘बेल्-कर्व्ह’ नामक आलेखाने (घंटीच्या आकाराचा आलेख) दाखवता येतो. सरासरीचा बिंदू (mean) हा या आलेखाचा मध्यबिंदू आहे. या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूला जर ‘एक सिग्मा’ (one sigma) इतके ‘स्टँडर्ड-डिव्हिएशन’ (deviation,तफावत) बघितले, तर त्या ‘रेंज’ (range) च्या अंतर्गत त्या गटातल्या ६८% वस्तू सामावतात ; ‘दोन सिग्मा’ डिव्हिएशनच्या अंतर्गत ९३% , व ‘तीन सिग्मा’ डिव्हिएशनच्या अंतर्गत ९९.७% इतक्या वस्तू सामावतात. सरासरीपासून एक सिग्मापर्यंतच्या सर्व वस्तूंचे गुणधर्म सरासरीपासून फारसे वेगळे नसतात, म्हणजेच जवळजवळ सरासरीसारखेच असतात.
एक सिग्मा ते दोन सिग्मा अंतर पाहिले, तर त्या गटातील गुणधर्म हे सरासरीपासून बर्यापैकी वेगळे असतात, ओळखू येण्याइतके वेगळे असतात. दोन ते तीन सिग्मा या अंतरातील गटाचे गुणधर्म सरासरीपेक्षा बरेच दूर असतात, बरेच वेगळे असतात. मघाचे, भारतीय पुरुषांचे उदाहरण उंची हा घटक घेऊन पाहू या, म्हणजे हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. उदाहरणार्थ असे समजू की भारतीय पुरुषांची सरासरी उंची ५ फूट ६ इंच आहे. त्याप्रमाणे, साधारणपणे ५ फूट ४ इंच ते ५ फूट ८ इंच उंच भारतीय पुरुष उंचीच्या संदर्भात ‘नॉर्मल’ समजले जातील. समजा, एखादा पुरुष ५’-२” उंच आहे. तो पुरुष ‘थोडा-बुटका’ समजला जाईल. ५’-१०” उंच असलेला दुसरा एक पुरुष ‘थोडा-उंच’ म्हटला जाईल. पण, एखादा ४’-६” असलेला माणूस ‘खूपच-बुटका’ (अर्थात, नॉर्मलेक्षा खूपच वेगळा) व दुसरा एक ६’-६” उंच असलेला माणूस ‘खूपच-उंच’ या सदरात गणला जाईल (अर्थातच, हाही माणूस उंचीच्या बाबतीत नॉर्मलपेक्षा खूपच भिन्न समजला जाईल). पण असे असले तरी, त्यांचेही इतर गुणधर्म (जसे, दोन हात, दोन पाय इ.), दाखवतात की तीसुद्धा माणसेच आहेत, कारण की त्या दुसर्या गुणधर्मांच्या बाबतीत ती माणसेही इतरांसारखीच असतात. भारतीय बायकांच्या बाबतीत उंचीचे नॉर्मस् पुरुषांपेक्षा वेगळे असतील. तसेच पाश्चिमात्यांचे उंचीचे नॉर्मस् किंवा चिनी लोकांचे उंचीचे नॉर्मस् हे भारतीयांच्यापेक्षा वेगळे असतील.
महत्वाची गोष्ट ही आहे की , जगातील गोष्टी , या ‘६८%’ म्हणजेच नॉर्मल लोकांसाठीच असतात. उदाहरणार्थ, हॉकी स्टिक. साधारणपणे माणसे उजव्या हाताने काम करणारी (right-handed) असतात. त्यामुळे हॉकी-स्टिक त्यांच्यासाठी डिझाइन केलेल्या असतात. म्हणून, डावखोर्यांना (left-handed) त्या वापरतांना त्रास हा होतोच ! जगातील पद्धती (systems), सुविधा (facilities), या ‘६८‘ टक्केवाल्यांसाठीच बनवलेल्या असतात ; आणि उरलेल्या ३२ टक्क्यांना त्याबरोबर जावे लागते. या ३२ टक्क्यांमधेसुद्धा, जो सरासरीच्या जास्त जवळ, त्याला तडजोड/समायोजन (ऍडजस्टमेंट) जास्त सोपे जाते. जो जास्त दूर, (जसे की, ‘दोन सिग्मा’ पेक्षा जास्त स्टँडर्ड-डिव्हिएशन असलेली व्यक्ती), त्याला ही ऍडजस्टमेंट बरीच कठीण जाते. तरीही त्याला त्या पद्धतीबरोबर (सिस्टमबरोबर) फरपटत जावे लागते. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर, इमारतीचे दार जमिनीपेक्षा उंच असल्यास पुढे पायर्या असतात. पण मग, लंगडे असणार्या व्यक्तींचे काय ? अशा लोकांसाठी किती ठिकाणी उतार (ramp) बांधलेला असतो ?
तुम्ही म्हणाल की, या ‘नॉर्मल’ चा शिक्षणाशी काय संबंध ? याचे उत्तर असे आहे की, शिक्षणाचा आराखडाही ‘नॉर्मल’ लोकांसाठीच बनवलेला असतो. सध्याच्या शिक्षणपद्धतीचा व बुद्धिमत्तेचा संबंध आहे. म्हणून, आपण बुद्धिमत्ता या गुणधर्माच्या संदर्भात ‘नॉर्मल-डिस्ट्रीब्यूशन’ कडे पाहू या. बुद्धिमत्तेचे मापन ‘आय्.क्यू.’ (इंटलिजन्स कोशंट) याने करतात. माणसासाठी, ‘१००’ हा आकडा आय्. क्यू. ची सरासरी (mean) मानतात. ६८% माणसांचा आय्. क्यू. ८५ ते ११५ असेल. या ‘रेंज’पेक्षा अधिक आय्. क्यू. असलेले ‘सबनॉर्मल’ व कमी आय्. क्यू. असलेले ‘ऍबनॉर्मल’ म्हणवले जातील. हे सबनॉर्मल लोक अति-हुशार म्हणून गणले जातात. यांनासुद्धा ऍडजस्टमेंट करायला त्रास होऊ शकतो, व होतोही. जे ऍबनॉर्मल आहेत, त्या आय्. क्यू. कमी असलेल्यांना ‘मेंटली चॅलेंज्ड’ असे म्हणतात. हल्ली त्यांना ‘डिफरंटली एबल्ड’ असे म्हणू लागले आहेत, आणि ते योग्यच आहे. कसे, ते पुढे येईलच.
आपण बुद्धीच्या विषयाकडे नंतर पुन्हा वळू.
जे लोक, ‘नॉर्मल असलेल्या ६८ टक्क्यांपेक्षा भिन्न’ आहेत , त्यांचे काय ?
पूर्वीच्या काळी, असे वेगळे असलेल्यांना खूपच त्रास वा अपमान सोसावा लागत असे, कधीकधी त्यांना जगणेही अशक्य होत असे. पुरातनकालीन ग्रीसमधील स्पार्टा या गणराज्यात, जे नवजात शिशु नॉर्मल नसत, हँडिकॅप्ड (handicapped) असत, त्यांना एक रात्र बाहेर, लांब एकटे ठेवून दिले जात असे ;
मेले तर मेले !! महाभारतातील धृतराष्ट्राला, तो आंधळा असल्यामुळे, मोठा भाऊ असूनही, राज्य मिळाले नाही. हा अन्यायच नाही काय ? खरे तर, सगळे महाभारतच ‘राज्य वस्तुत: कोणाचे?’ या प्रश्नामुळेच घडले. धृतराष्ट्र राजा होता, तर ते न्याय्य झाले असते, व घटनांना वेगळीच कलाटणी मिळाली असती.
आजचे युग सुधारलेले म्हणवते खरे, पण नॉर्मलपेक्षा वेगळे असलेल्यांबद्दल आपला दृष्टिकोन काय आहे ? आपण ‘नॉर्मलपेक्षा-भिन्न’ असलेल्यांसाठी काही करतो आहोत काय, त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था निर्माण करतो आहोत काय ? त्यांच्या शिक्षणासाठी आपण काय सोयी निर्माण करत आहोत ?
परंतु पुढे जाण्यापूर्वी, वर्गीकरणाशी संबंधित एका महत्वाच्या प्रश्नाकडे नजर टाकणे आवश्यक आहे.
तो प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
नॉर्मल (normal) व ‘नॉर्मलपेक्षा-भिन्न’ (different from normal) असे वर्गीकरण करण्यासाठी ,
केवळ ‘आय्. क्यू.’ हेच योग्य मापन आहे काय ? :
हा मुद्दा फार महत्वाचा आहे, व तो समजून घेणे जरूरीचे आहे. आय्. क्यू. हे मापन सन १९०० पासून वापरात येऊ लागले. म्हणजे ते १०० हून अधिक वर्षे जुने आहे. ते उपयुक्त आहे हे खरे ; पण ते परिपूर्ण आहे काय ? आय्. क्यू. मापनामधे कोणते गुणधर्म जास्त वापरले जातात ? ते आहेत : ‘तर्कानुसारी विचार करण्याची क्षमता’ (Logical-thinking ability), गणित, आणि भाषिक क्षमता (Linguistic- ability). माणसाकडे यांच्याव्यतिरिक्त इतर क्षमता नसतात काय ? अन्, असल्यास, त्या क्षमता उपयोगी नसतात का ? त्या मापनासाठी वापरल्या जात का नाहीत ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उठू शकतात.
तीसएक वर्षांपूर्वी अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी ‘बहुआयामी बुद्धिमत्ते’ बद्दलची (Multiple Intelligence) धिअरी मांडली. त्यांचे ‘फ्रेमस् ऑफ माइंड’ (Frames of Mind) हे पुस्तक प्रसिद्ध आहे. (बुद्धिमत्तेच्या बहुआयामीपणाबद्दल अन्यही थिअरीज् आहेत. पण तूर्तास आपण गार्डनर यांची थिअरी समजून घेऊ. शिक्षणाविषयीचा मुद्दा आपला स्पष्ट होण्यासाठी सध्यातरी तेवढे पुरेसे आहे).
मात्र, गार्डनर यांची थिअरी समजून घेण्यापूर्वी आपण मेंदूबद्दल थोडेसे जाणून घेऊ या.
माणसाच्या मेंदूचे दोन भाग (Lobes) असतात, जे एकमेकांना जोडलेले असतात. तुमच्याआमच्या सर्वसाधारण व सोप्या भाषेत त्यांना ‘उजवा मेंदू’ व ‘डावा मेंदू’ असे संबोधतात. या दोन्ही भागांचे कार्य वेगवेगळे असते. एक भाग तार्किक कार्यांवर (Logical functions) भर देतो. गणित, शब्द, भाषा, तर्क वापरून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधणे, या गोष्टींसाठी हा भाग वापरला जातो. दुसरा भाग सृजनशील कार्यांसाठी (Creative Functions) वापरला जातो. चित्रें, संगीत, इतर कला, अशा सृजनशील गोष्टींसाठी हा दुसरा भाग वापरला जातो. एक साधे उदाहरण द्यायचे तर, एखाद्या माणसाचे नाव आपल्या मेंदूच्या एका भागात साठवलेले असते, तर त्याच्या चेहर्याचे चित्र आपल्या मेंदूच्या दुसर्या भागात साठवलेले असते. त्यामुळेच, कधीकधी आपल्या एखाद्या माणसाचा चेहरा आठवतो पण नाव काही आठवत नाही ; किंवा नाव आठवते पण चेहरा आठवत नाही. या माहितीवरून , आपल्याला हे स्पष्ट होते की,
आय्. क्यू. टेस्टिंगमधे मेंदूच्या सर्व क्षमता कसाला लागत नाहीत, मेंदूचे दोन्ही भाग (Lobes) समान प्रकारे वापरले जात नाहीत.
डॉ. हॉवर्ड गार्डनर यांची ‘मल्टिपल इंटलिजन्स’ ची थिअरी सांगते की बुद्धिमत्तेला वेगवेगळे आयाम असतात. ते आठ आयाम मानतात. ते आठ आहेत :
[यालाच हल्ली वेगळ्या परिभाषेत ‘इमोशनल इंटलिजन्स’ असे म्हणतात.]
आता, या वर्गीकरणावरून, आपल्या लक्षात येते की जगप्रसिद्ध गणितज्ञ रामानुजम् , महान गायक भीमसेन जोशी व क्रिकेटियर सचिन तेंडुलकर हे कसे वेगळे आहेत, त्यांच्या मेंदूच्या क्षमता कशा वेगळ्या आहेत. अर्थातच रामानुजम् हे भीमसेन होऊ शकले नसते, आणि भीमसेन हे रामानुजम् होऊ शकले नसते.
एका अशाच ‘डिफरंटली एबल्ड’ इंग्लिश मुलाची सत्यकथा मी (बहुधा ‘रीडर्स डायजेस्ट’ मधे) वाचलेली आहे.
या मुलाला एकट्याने रस्तासुद्धा ओलांडता येणे कठीण वाटत असे. पण त्याची भाषिक बुद्धिमत्ता जबरदस्त होती. एकदा तो लंडनला विमानात चढला, हॉलंडमधील ऍमस्टरडॅम येथे जाण्यासाठी. हा फक्त दोनएक तासांचा प्रवास आहे. प्रवास सुरू होतांना त्याने डच भाषा शिकण्याचे पुस्तक वाचायला घेतले ; अन् उतरेपर्यंत तो ती भाषा, मातृभाषा असल्याप्रमाणे बोलू लागला होता !
असाच एकदा मला डॉ. वत्स या गृहस्थांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. हे गृहस्थ एम्. डी. मेडिकल डॉक्टर होते. त्यांनी सांगितले की शाळेत असतांना त्यांना गणित हा विषय अजिबात कळत नसे, ते त्यात नापासही होत असत. पण पुढील शिक्षण व व्यवसाय त्यांनी असे निवडले जिथे गणिताचा विशेष संबंधच येत नाही, म्हणूनच ते यशस्वी झाले. जर त्यांचा व्यवसाय गणिताशी संबंधित असता, तर ते नक्कीच अयशस्वी (failure) म्हणूनच गणले गेले असते.
या सर्वाचा अर्थ असा की, ‘सब घोडे बारा टक्के’ या म्हणीप्रमाणे आपण वागू नये ; आपण सर्वांना एकाच तराजूत तोलू शकत नाही.
शिक्षण, ‘अति-हुशार’ मुले व ‘डिफरंटली एबल्ड’ मुले :
शालेय शिक्षणात सर्वच मुलांवर परफॉर्मन्ससाठी घरून व शाळेतूनही खूपच दबाव येतो. अन्, नेहमीच्या शालेय विषयांमधे जे कच्चे असतात, ते ‘ढ’ म्हणवतात. अशी मुले साधारण (नॉर्मल) असतील किंवा नसतीलही, पण त्यांच्यात काही इतर क्षमता (abilities) आहेत काय, याचा विचार करायला शिक्षकांनाही वेळ नसतो अन् पालकांनाही.
पारंपारिक शिक्षणपद्धतीत गणित व भाषा यांना अतोनात महत्व आहे. शाळा जोर देतात तो असतो तार्किक-बुद्धिमत्ता व भाषिक-बुद्धिमत्तेवरच (logical-intelligence and linguistic-intelligence). खास करून लेखन-वाचनावर शाळांचा जोर असतो. गार्डनर यांचे म्हणणे असे आहे की, ‘शालेय शिक्षणाचा हेतू , विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या बुद्धिमत्तांचा विकास करणे, आणि त्याच्या बुद्दिमत्तांना योग्य (suitable) अशा, व्यावसायिक व अव्यावसायिक ध्येयांपर्यंत पोचण्यासाठी त्यांना मदत करणे, असा असला पाहिजे.’
शालेय शिक्षणात ,‘ नॉर्मलपेक्षा वेगळे’ असलेल्या मुलांना तर नक्कीच त्रास होतो. ‘अति-हुशार’ मुलांनाही इथे ऍडजस्ट व्हायला त्रास होतो. अशी काही अति-हुशार मुले कधीकधी बिघडलेलीही आहेत. तसे होऊ नये यासाठी शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते.
मला एक उदाहरण आठवते. एक मुलगा शाळेमधे, अभ्यासात अतिहुशार म्हणून गणला जात असे. सर्वच विषय त्याला चांगले येत असत. ‘सर’ (शिक्षक) जे काही शिकवत होते ते त्याला आधीच येत असल्यामुळे तो वर्गात हळूच कॉमिक्स वाचत असे. ते एकदा सरांनी पाहिले. त्यांना आधीच त्या मुलाच्या परफॉर्मन्सबद्दल माहीत होते. सर रागावले नाहीत. त्यांनी शांतपणे त्या मुलाला कारण विचारले. मुलाने शरमून सांगितले की, सर हे तर मला आधीच येत आहे. सरांनी त्याला शिक्षा केली नाही, वर्गाबाहेर पाठवले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, परवानगी देत सांगितले, ‘ठीक है, पढ़ो कॉमिक्स. पर किसीको डिस्टर्ब मत करना’. त्यानंतर त्या मुलाने वर्गात कॉमिक्स वाचली नाहीत ! ते सर खरोखरच ‘ग्रेट’ म्हणायला हवे. सरांनी शिक्षा केली असती, तर काय झाले असते ? हा जो अनुकूल परिणाम झाला, तो तर नक्कीच झाला नसता ; कदाचित तो मुलगा तेव्हा, नाहीतर नंतर, बिघडूही शकला असता.
‘डिफरंटली एबल्ड’ मुलांसाठी तर पंचवीस-तीस वर्षांपूर्वी फारशा शाळाही नव्हत्या. ज्या थोड्याशा होत्या, त्या होत्या अगदी टोकाच्या मुलांसाठी (उदा. डाऊन सिंड्रोम असलेली, ‘मतिमंद’ म्हटली जाणारी मुले). बॉर्डरलाइन मुलांसाठी काहींच वेगळ्या सोयी नव्हत्या. या मुलांच्या शिक्षणाचे काय ? ती मुले नॉर्मल मुलांच्या शाळेतही ‘फिट्’ होत नव्हती, अन् डाऊन सिंड्रोम असलेल्या वा तत्सम मुलांच्या शाळेतही फिट् होत नव्हती.
आपण एका मुलाचे उदाहरण ‘तारे जमीनपर’ या सिनेमात पाहिले आहे. एरवी अभ्यासात लक्ष नसणारा, ‘ढ’ समजला जाणारा हा मुलगा चित्रकलेत निष्णात असतो. जर त्याला समजून घेणारा योग्य शिक्षक मिळाला नसता, तर त्या बिचार्याचे आणखी काय हाल झाले असते ?
आज ‘डिफरंटली एबल्ड’ मुलांसाठी पहिल्यापेक्षा काहीशा जास्त शाळा आहेत, हे खरे. या शाळांमधे, (शालेय शिक्षणाव्यतिरिक्त), वह्या बनवणे, मेणबत्त्या बनवणे वगैरे व्होकेशनल शिक्षण देतात. अशा शाळांशी संबंधित लोक खरोखरच सेल्फलेस (selfless) सेवाभावी वृत्तीने काम करतात. या शाळांमधील, ‘स्पेशल एज्युकेशन’ या विषयाचे स्वत: शिक्षण घेतलेले शिक्षक-शिक्षिका, अन्य ट्रेनर, संचालक हे सर्व मोठेच सामाजिक कार्य करत आहेत. त्यांना माझा सलाम, माझे वंदन ! पुढील श्लोक अशा गुरुजनांसाठीच लिहिलेला असणार.
गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु: गुरुर् देवो महेश्वर:
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ।
गरूच ब्रह्मदेव आहे, गरूच विष्णु आहे, गुरूच महेश्वर शंकर आहे. गुरू साक्षात् परब्रह्म आहे. त्या गुरूला मी नमन करतो.
या संस्थांमधील कार्यावर कसलीही टीका करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण त्यांच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवूनही मी असे म्हणू इच्छितो की, या शाळांमधे वह्या बनवणे, मेणबत्त्या बनवणे याव्यतिरिक्तही काही अन्य शिक्षण देता येणार नाही का ? उदाहरणार्थ चित्रकला, गायन, वादन, नृत्य ; तसेच, जिथे शक्य असेल तिथे बागकाम-हॉर्टीकल्चर, वगैरे. मल्टिपल इंटेलिजन्सच्या थिअरीप्रमाणे, जर काही मुलांमधे अशा इतर विषयांमधील गुणवत्ता असली, तर ती मुले त्या त्या शिक्षणाचा नक्कीच फायदा उठवू शकतील.
समारोप :
पहिली गोष्ट म्हणजे, शिक्षणपद्धतीत बदल व्हायला हवा, आणि फक्त ‘तार्किक-बुद्धिमता’ व ‘भाषिक-बुद्धिमत्ता’ यांच्यावर जो अतिरिक्त (excessive) जोर दिला जातो, तो कमी केला गेला पाहिजे ; विद्यार्थ्याचा सर्वांगीण, चौफेर विकास कसा होईल हे पहायला हवे. आज अनेकदा असे दिसते की, अगदी डिग्री घेऊनही तरुणांना जगात कसे वावरायचे ते उमगत नाही. त्यासाठी , आज अनेक ‘व्यक्तिमत्व-विकास कार्यक्रम’ खाजगी ट्रेनर्सनी सुरू केले आहेत. त्याचे एकमेव कारण आहे, शिक्षणपद्धतीत या आवश्यक गोष्टीचा समावेशच नाही. विद्यार्थ्यांच्या अशा डेव्हलपमेंटसाठीच्या कार्यक्रमांचा रेग्युलर-शिक्षणपद्धतीत समावेश असलाच पाहिजे. तरच विद्यार्थ्यांना पुढील जीवनात यशस्वी होणे सोपे जाईल.
दुसरी गोष्ट म्हणजे, विद्यार्थी साधारण (नॉर्मल) असो , किंवा ‘नॉर्मलपेक्षा वेगळा’ असो, त्याच्याकडे काही वेगळ्या क्षमता (abilities) असू शकतात, हे शैक्षणिक संस्थांमधील गुरूंनी (शिक्षकांनी) समजून घेतले पाहिजे, व त्या शोधून काढून, त्या वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे, प्रत्येकाला स्वत:च्या क्षमतांचा (एबिलिटीज् चा) शोध लागेल, व त्याला पुढील जीवनात त्याचा नक्कीच उपयोग होईल.
तिसरी गोष्ट म्हणजे, ‘डिफरंटली एबल्ड’ व्यक्तींसाठी ज्या संस्था असतात तिथे, त्या व्यक्तीची दुसर्या एखाद्या, म्हणजे संगीत, चित्रकला, नृत्यकला वगैरे अशा, विषयात अधिक क्षमता आहे काय, याचा शोध घ्यायला हवा ; तसेच तेथील सर्वांनाच वह्या-मेणबत्त्या याव्यतिरिक्त संगीत-चित्रकला-नृत्य अशा गोष्टींचेही ट्रेनिंग द्यायला हवे. अशा ठिकाणी कंप्यूटर-ट्रेनिंगही (विशेषकरून डेटा-एंट्री व ऍनिमेशन) उपयोगी ठरू शकेल.
थोडक्यात काय, तर, शैक्षणिक पद्धतीत बदल होणे हे, विद्यार्थ्यांची यशस्विता वाढविण्यासाठी अतिशय आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. शुभस्य शीघ्रम् .
June 23, 2016
शहरी माओवादी समाजामध्ये आपला प्रभाव वाढविण्या करता वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करतात. यावर लक्ष ठेवून योग्य प्रत्युत्तर देण्याकरता उपाययोजना करणे गरजेचे आहे. आपल्याला माओवाद्यांच्या एक पाऊल पुढे राहण्याची गरज आहे, तरच आपण त्यांची वाढणारा प्रभाव थांबवू शकतो.
May 25, 2019
योगासनांची विविध अंगं आणि प्रकार आहेत. योगाचे अंग आणि प्रकार यामध्ये फरक आहे. प्राचीन ग्रंथामध्ये योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. ज्ञानयोग, हठयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग हे काही योगाचे प्रकार आहेत. तसंच यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही योगाची अंगं आहेत.
आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या योगासनाची सखोल माहिती
योगासनामुळे शरीर लवचिक राहतं तसंच शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी योगासनं उपयुक्त ठरतात. या योगासनाचे काही प्रमुख प्रकार आहेत. सूर्यनमस्कार, पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन, सिद्धासन, पवन मुक्तासन, सर्वागासन, पश्चिमोतानासन, शीर्षासन, श्वसन, सुखासन हे काही प्रमुख प्रकार असून त्यातला पहिला प्रकार कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत
सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतील प्राचीन व्यायाम आहे. सूर्यनमस्काराला सवरेश्रेष्ठ आसन मानलं जातं आणि त्याचे अनेक फायदे आहेत. कोवळ्या किरणात पूर्वेला नमस्कार करून सूर्यनमस्कार घालावेत. तसंच ते शांत आणि स्वच्छ जागेत करावेत. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. सूर्यनमस्काराला सुरुवात करताना सुरुवातीला जमतील तेवढेच सूर्यनमस्कार घालावेत. तसेच ते अनशापोटी केलेले उत्तम. वेळेअभावी ते संध्याकाळी करायचे असतील तर त्यापूर्वी कमीत कमी दोन तास तरी खाऊ नये. सूर्यनमस्कारात बारा क्रिया असतात. त्यातील पहिली क्रिया म्हणजे प्रणामासन.
प्रणामासन प्रणामासन ही सूर्यनमस्कारातली पहिली पायरी आहे.
सरळ उभं राहावं आणि दोन्ही पाय जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या मध्यभागी नमस्काराच्या स्थितीत जोडलेले असावेत. मान ताठ आणि नजर समोर असावी. पाठीचा कणा ताठ असावा. शरीर शांत ठेवून आरामशीर श्वास घ्यावा.
फायदा: मन स्थिर होण्यास मदत मिळते. शरीराचा तोल साधला जातो.
हस्तउत्तासन किंवा उध्र्वनमस्कार यात पहिल्या अवस्थेत उभं राहून मान वर करावी. पाठीचा कणा मागच्या बाजूला वाकवावा. आणि हात वर करावेत. या स्थितीत असताना श्वास आत घेतला जातो. तसंच या स्थितीतून पूर्वावस्थेत येताना पाठीच्या कणावर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
फायदा : या अवस्थेत असताना पोटावरची चरबी खेचली जाते. यामुळे तिथली चरबी कमी होण्यास मदत होते.
पादहस्तासन हस्तउत्तसानाच्या स्थितीत असताना जेव्हा श्वास आत घेतला जातो तो श्वास हळुवारपणे सोडत दोन्ही हाताचे पंजे जमिनीला पूर्णपणे टेकवावेत. यात डोकं गुडघ्याला लावावं. ज्याप्रकारे ओणवं उभं राहतो तसंच राहावं पण या स्थितीत हाताचा पंजा जमिनीला टेकलेला असतो.
फायदा : या स्थितीमुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसंच हृदय आणि फुप्फुसांची क्षमता वाढतेच पण पायांचीही ताकद वाढते. या स्थितीमुळे पोटावर आणि ओटीपोटावर दाब आल्याने स्त्रियांची मासिक पाळीसुद्धा नियमित होते. तसंच पोटावरची आणि कमरेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.
अश्यसंचलनासन तिसरी क्रिया केल्यानंतर आता हात जमिनीला टेकवून एक पाय मागे ताणायचा तर दुसरा पाय गुडघ्यातून वाकवायचा या अवस्थेत असताना मान किंचीत उंचवावी. पुढे ठेवलेला पाय आणि हात समांतर रेषेत नसले तरी चालतील पण पायाचा अंगठा आणि हाताचा पंजा समान रेषेत असावा.
फायदा : मूत्रसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या आरोग्यासाठी ही स्थिती उपयुक्त ठरते.
अधोमुखश्वसनासन पूर्वावस्थेतून बाहेर येण्यासाठी आपले दोन्ही पाय समान रेषेत आणावे आणि हात तसेच ठेवावेत. अधोमुखश्वसनासन करताना श्वास बाहेर सोडायचा असतो. यात कमरेखालचा भाग उंचवायचा म्हणजेच इंग्रजी अक्षराच्या उलटय़ा व्ही सारखी स्थिती असते. या अवस्थेत डोकं खालच्या दिशेला असेल.
फायदा : या अवस्थेमुळे पायांचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्नायू लवचिक होतात. तसंच खांदे मजबूत होतात. पायामध्ये आणि पोट-यांमध्ये गोळे येणं कमी होतं.
अष्टांग नमस्कार : मागील स्थितीतून पुढे जाण्यासाठी हातांवर योग्य प्रमाणात जोर देऊन शरीर जमिनीला टेकवावे. पाय सरळ रेषेतच ठेवून हनुवटीही जमिनीला टेकवावी.
फायदा : हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात आणि ताकद वाढते.
भुजंगासन यात दोन्ही हात सरळ रेषेत ठेवून जमिनीला टेकवावे व संपूर्ण शरीराचे वजन हात व पायांच्या चौडय़ांवर तोललं जाईल अशा अवस्थेत राहावं. या आसनामध्ये श्वास आत घेतला जाईल आणि मान जमेल तितकी मागे घेण्याचा प्रयत्न करावा.
फायदा : हे आसन करण्याचा फायदा म्हणजे गॅस आणि पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. तसंच फुप्फुसांची क्षमता वाढते. पाठीच्या कण्यासाठी खूप लाभदायक ठरतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 31, 2017
जन्मापासून पायात नाही घातली चप्पल, तिसरीतून ड्रॉप आऊट. हलधर नाग या कवीवर पाच Ph.D जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात आपण कसं स्वतःला उमलऊ शकू याचा विचार आपण करायला हवा. अंध मूकबधिर अपंग यांनी हार न मानता अनेक विक्रम केले आहेत जे धडधाकट माणसालाही लाजवतील.काही ही संसाधने नसतांना अनेकांनी यशश्री खेचून आणली आहे. अनेकांनी रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास केला आहे. काही जणांना शाळेत जाण्यासाठी नदी पोहून पार करावी लागत होती. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शाळा उघडण्यासाठी फू्लें दांपत्याने अंगावर शेण झेलत लोकांचा रोष पत्करून त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
July 15, 2026
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंचवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
शब्दाने शब्द वाढवू नये.
अरे म्हटले की, कायरे असे उत्तर येते. आणि अहो म्हटले की, काय हो, असा प्रतिध्वनी येतो.
रामराम म्हटले की, राम राम असेच प्रत्युत्तर मिळेल.
ही जगाची रिती आहे. जगायची नीती आहे.
आणि गरज नसताना शब्दाने शब्द का वाढवावा ? याने भांडण वाढते. भांडण मिटवायचे असेल तर एकाने तलवार काढली तर दुसऱ्याने ढाल स्विकारावी. म्हणजे भांडण मिटते.
उंबऱ्याची मर्यादा ओलांडू नये.
या अशाच वाक्यामुळे शब्दाने शब्द वाढतात.अशावेळी शब्दच्छल न करता भाव लक्षात घ्यायचा असतो. हे वाक्य फक्त मुलींसाठी नाही सांगितले. मुलांसाठी सुद्धा तोच नियम आणि नवऱ्यासाठी पण !
उंबरा हा घराला असतो. उंबरा ही घराची सुरवात आहे.
बाहेरील काही सरपटणारी जनावरे दरवाजा आणि त्याखालील जमिनीच्या फटीतुन आत येऊ नयेत, यासाठी घराच्या पुढील आणि मागील मुख्य दरवाज्यांना उंबरठा असतो. म्हणजेच उंबरा हा घराचे एका अर्थाने संरक्षण करीत असतो.
घर हे सर्वांचेच असते. घरात राहून काम करणाऱ्यांचे आणि घराबाहेर राहून घरासाठी राबणाऱ्यांचे. मग ती स्त्री असो वा पुरूष. आणि हो, घराच्या मर्यादाची काही लिखित संहिता नाही की, उंबरठ्यावर बसून नियम तपासून घरात प्रवेश. घराच्या मानमर्यादांचे उल्लंघन होऊ नये, एवढंच. या मानमर्यादा प्रत्येक घराच्या वेगळ्या असतील. काही जणांच्या कपड्यांच्या, काही जणांच्या सोवळ्याच्या, काही जणांच्या डोक्यावरून पदर घेण्याच्या तर काही जणांच्या चेहेरा सुद्धा झाकून घेण्याच्या या परंपरा त्या त्या घरानुसार पाळल्या गेल्या पाहिजेत. इथे त्या घराचा आत्मसन्मान, समाजातील स्थान, लपलेलं असतं. जसं एखाद्या डाॅक्टरकडे पहाण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन असतो. त्याने नीटनेटके कपडे घालावेत, जरा चांगले दिसावे, त्याच्याकडे बघितल्यावर प्रसन्न वाटतंय, असं बघणाऱ्याला वाटलं पाहिजे. हे चुक नाही. समजा, एखादा डाॅक्टर आडव्या चट्यापट्याचा शर्ट, शर्टची वरची दोन बटणं उघडी, डोळ्यावर मल्टीकलर गाॅगल, पान चघळतोय, केसांचा स्पाईक, खांद्यावर रूमाल आणि स्वतः रिक्शा चालवित, ओपीडी मधे आला तर वेटींगमधे बसलेल्या रुग्णांना कसे वाटेल ? त्यांच्या मनातील डाॅक्टर या प्रतिष्ठेला धक्का बसेल.
अशीच प्रतिष्ठा प्रत्येक घराला जोडलेली असते. घराला म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीला जोडलेली असते. घराची ही प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे.
घराच्या उंबऱ्याचे हे नियम गृहीत धरलेले असतात. आणि तसं बघायला गेलं तर हे नियम कुठे आहेत? घराचा उंबरठा ही घराची प्रतिष्ठा आहे. तुम्ही असं काही करू नका, ज्याने आपल्या प्रतिष्ठेला बाधा पोचेल, असं खरं तर म्हणायचं असतं आईला !
पण आता घराला उंबरेच कुठे दिसतात ? तेच तर गायब झालेत आणि त्याबरोबर घराची प्रतिष्ठा देखील !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१४.०८.२०१७
August 14, 2017
पूर्वी जत्रेमध्ये बायस्कोपवाले असायचे. दहा पैसे देऊन त्या तिकाटण्यावर ठेवलेल्या बाॅक्समधून चित्रं पहायला मिळायची. तशीच चित्रं नव्हे तर दूरदर्शन मालिका व चित्रपट दाखविणारे अनेकजण या सिनेसृष्टीत उदयास आले.
June 22, 2023
भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) आणि राहुलदेव बर्मन (आर. डी. बर्मन उर्फ पंचम दा) या पिता-पुत्राच्या जोडीने जे सुवर्णयुग निर्माण केले, त्याला तोड नाही. वडील पारंपारिक लोकसंगीताचे खंदे पुरस्कर्ते, तर मुलगा पाश्चात्य फ्युजन आणि अतरंगी प्रयोगांचा बादशहा. या पिता-पुत्राच्या नात्यात जसा प्रचंड आदर आणि प्रेम होते, तसेच संगीतावरून घडलेले अनेक रंजक वाद, स्पर्धा आणि किस्सेही होते. संगीतविश्वात अजरामर ठरलेले बर्मन पिता-पुत्राच्या आयुष्यातील १० प्रमुख आणि रंजक किस्से खालीलप्रमाणे आहेत:
July 18, 2026
हे फळ जरी भारतीय नसले तरी त्याने आपल्या स्वयंपाक घरात एक महत्त्वाचे स्थान त्याने प्राप्त केले.असा कुठलाही पदार्थ नाही ज्या मध्ये आपण ह्याचा वापर करत नाही भाजी असो,आमटी असो,उसळ असो किंवा भाजी असो टाॅमेटो घातला की त्या पदार्थांची चव भलताच वाढते.
तसेच आता टाॅमेटो चटणी,सलाड,साॅस,केचअप तसेच बरेच चाटचे पदार्थ ह्यात हा हमखास वापरला जातो.तर असे लाल बुंद टोमॅटो सुप करायला देखील वापरतात.
खरोखरच ही भाजी दिसायला फारच आकर्षक असते.तो कच्चा खायला देखील छान लागतो.आणी मुख्य म्हणजे आपण ह्याची लागवड आपल्या बागेत करू शकतो.कारण ह्याचे झुडूप असते व त्याला हि फळे लागतात.
कच्चा टोमॅटो हिरव्या रंगांचा असतो चवीला आंबट असून थंड गुणाचा व तिन्ही दोष दुषित करणारा असतो.तर पिकलेला टोमॅटो हा लाल रंगांचा व थंड गुणाचा असून वातपित्तनाशक व कफकर असतो.
चला आता ह्याचे औषधी गुणधर्म पाहूयात:
१)मांसाहार केल्यावर त्या सोबत पिकलेला टोमॅटो खावा म्हणजे छातीत होणारी जळजळ,तहान लागणे,पोटातील जड पणा कमी होतो.
२)नीट पथ्य पाळून ज्या व्यक्तीला शरीरातील अनावश्यक चरबी कमी करायची असेल त्यांनी रोज पिकलेला टोमॅटो १००-२०० ग्राम खावा.
३)कोरडा खोकला,दम,थकवा,छातीत दुखणे ह्यात १ कप टोमॅटोचा रस+१ चमचा हळद पुड+ २ चमचे खडीसाखर हे मिश्रण रोज सकाळी प्यावे.
४)अजीर्ण,पोटफुगणे,चिकट पातळ संडास होणे,भुक न लागणे ह्यात १ कप टोमॅटो रस+१/४ चमचा मिरपुड+४ चिमूट हिंग+१/४ चमचा काळे मीठ हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे व दुपारी हलके जेवावे व रात्री उपवास करावा.असे १-३ आठवडे करावे फायदा होतो.
५)मन व शरीराचा थकवा,झोप शांत न येणे,तोंड कडू होणे,उल्टी होईल असे वाटणे ह्यात १ ग्लास टोमॅटो रस त्यात २ चमचे खडी साखर घालून रोज संध्याकाळी ४-५ च्या दरम्यान प्यावा ह्याने शरीर व मन ताजे तवाने व्हायला मदत होते.
६)गर्भवती स्त्रीने रोज खडीसाखर घालून टोमॅटोचा रस प्यावा त्यामुळे पोट साफ रहाते,थकवा कमी होतो व बाळंतपणा नंतर दुध चांगले सुटते.
कच्चा टोमॅटो कधीच खाऊ नये तसेच टोमॅटो वापरावा पण बिया काढुन.कारण जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर तो टोमॅटोच्या बियांनी वाढतो.
अतिमात्रेत टोमॅटो खाल्ल्याने पोट बिघडते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
पोट म्हणजे जणु काही मिक्सरच !
भांडे अर्धे अन्नाने, पाव भाग पाण्याने, असे एकुण पाऊण भरावे. पाव भाग हवेच्या संचरणासाठी मोकळा ठेवावा. आणि झाकण लावावे आणि दीड दोन मिनीटात मिक्सरमध्ये सर्व अन्नाचे पीठ तयार होते, हे आपण बघतोच.
जसं मिक्सरमध्ये तस्संच अगदी पोटामधे सुरू असतं ! फक्त पोटामधे हा मिक्सर दीड दोन मिनिटाऐवजी दीड दोन घंटे सुरू असतो.
जेवायला सुरवात करावी. पोटाला सूचना मिळत जाते. तसे तसे पोटात पाचक स्राव वाढत जातात. ज्या पदार्थाला पचवायला जे घटक आवश्यक आहेत, ते आधी पासूनच तिथे स्वागताला तयार असतात. सहा चवींचे सहा सोहळे आतमधे सुरू होतात. प्रत्येक चव बाहेर वेगळी असली आणि नंतर आतमधे जरी, अवघा रंग एक झाला अशी अवस्था असली तरी, त्यामधे प्रत्येक पदार्थाला जे पचवायला हवंय, ते मिळत जाते. आणि प्रत्येक पदार्थ आपलं रूपांतर करून घेण्यासाठी तयार असतो.
नाटक सुरू करण्यापूर्वी कसं सगळे कलाकार ड्रेसिंग रूममधे नियमित कपड्यांमधे आत जातात. आतमधे रंगभूषाकार एकच असतो, त्याला प्रत्येक जण आपली भूमिका काय आहे ते सांगतो, त्याअनुसार तो सगळ्यांना असं काही रंगाने रंगवतो, त्यात त्याचं मूळ रूप बदलवूनच टाकतो, जेव्हा हे कलाकार रंगमंचावर येतात, तेव्हा स्वत्व विसरून देहभान हरवून त्या भूमिकेत तादात्म्य पावतात. आणि आपल्या वाटेला आलेला कलेचा भाग सादर करत असतात. प्रत्येक जण फक्त आपली भूमिका, आपली एन्ट्रीची वेळ, एक्झिटची वेळ, आपले संवाद लक्षात ठेवतो, कोणत्या वाक्यानंतर, त्या नाटकातली माझी एन्ट्री, माझा सहभाग दाखवायचा आहे हा क्रम लक्षात ठेवलेला असतो. आणि नाटकाचा पूर्ण एकत्रित परिणाम एकदम उठावदार होतो.
अगदी तस्संच या अन्नद्रव्यांच होत असावं.
तेल तूप इ. स्निग्ध पदार्थ पचवणारी यंत्रणा वेगळी, पिष्टमय पदार्थ, आंबटगोड तिखट पचवणारी यंत्रणा वेगळी. जरी वेगवेगळी असली तरी ही सर्व यंत्रणा त्या मोठ्ठ्या रंगभूषाकाराच्या आज्ञेत आपलं काम करत असतात. अगदी यंत्राप्रमाणे.
रंगवाल्यांकडे कसं आता आपल्याला हवी असलेली शेड तयार करण्यासाठी कंप्युटरवर एक निश्चित प्रोग्राम असतो, त्यात आपल्याला हव्या असलेल्या रंगाच्या शेडचा क्रमांक लिहिला की, आतमधे जे बेसिक रंग असतात, त्यातील कोणता रंग किती मिली सोडायचा हे आधी कंप्युटर द्वारे ठरवलेलं असतं, तो तेवढ्याच प्रमाणात सिक्रीट केला जातो.
पण आपल्यासाठी हे सिक्रेट असतं.
आपल्याला काय महत्वाचं?
आपल्याला जो रंग हवा आहे, त्याच शेडनुसार तो मिळणं. बरोबर ना ! त्या सिस्टीममधे बदल करण्याची सूत्र आपल्या हातात घेऊ नये.
आतमधे मिक्सर फिरत असतो, योग्य प्रमाणात वेगवेगळे रंग योग्य प्रमाणात एकत्र होत असतात. फक्त आपल्याला त्याची जाण नसते.
ऐनवेळी प्रोग्राम बदलवणं तर फारच कठीण असतं. म्हणून असे पदार्थ खाऊ नयेत, ज्याची पूर्वकल्पना आतदिली गेली नसेल. म्हणजेच कोटेड फूड. बाहेरून एक चव आत मधे दुसरीच चव. जसं कॅपसुलमधे भरलेलं कडू औषधी. यासाठीच आयुर्वेदीय पद्धतीने जी औषधे दिली जातात, ती विशिष्ट चवींची असतात, त्याची चव तशीच्या तश्शी आतमधे समजणं तेवढंच महत्वाचं असतं. म्हणूनच आयुर्वेदातील चूर्ण, चाटण, उगाळून घ्यायची असतात. कोणत्याही औषधांच्या चवी समजणे खूप महत्वाचे असते. फसवून औषध तर नकोच, पण आहार पण ज्या त्या चवीचा समजून उमजून आत पाठवावा.
जीभेला फसवून केलेलं खाद्यकर्म नंतर त्रासदायक होऊ शकतं. हे लक्षात असावे.
आतमधे फसवाफसवी नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.03.2017
March 27, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti