(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चाळीतली दिवाळी

    दसरा झाला की वेध लागायचे ते दिवाळीचे.घराची साफसफाई तर दसर्‍यालाच झालेली आसायची,घर कसल ते दहाबाय दहाची खोलीच ती,वर एक पोटमाळा त्यातच आईने जुन्या कपडयांच बोचक,ताईच्या लग्नात आलेली आहेराची भांडी,वापरात न आलेल सामान अस बरचस काहीबाही सामान कस नीट लावून ठेवलेल आसायच.

      December 5, 2023


  • प्रेरणेचं पाणी

    लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही म्हण हनुमंत केंद्रे यांनी प्रत्याक्षात आणली आहे.भगिरथाने प्रयत्नाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली हे आपण पुराणात ऐकले होते. पण दुष्काळी गावाला सुजलाम सुफलाम करण्याची किमया जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमान केंद्रे यांनी केली आहे.दुष्काळ हा काही काही गावासाठी पाचवीला पुजलेला असतो, पण स्वप्नं बघण्याचा आशावादी दृष्टिकोन ठेवला तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठ हनुमान केंद्रे यांनी सिद्ध करून दाखवला आहे.

      December 30, 2024


  • आंबा – भारताचे राष्ट्रीय फळ

    भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत शत्रू असले तरी एक अशी वस्तू आहे जी दोघांमध्ये समान आहे. आंबा हे भारत व पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याचं झाड हे बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्हही आहे.

    आंब्यांचा उगम -
    आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक फळ आहे. आंब्यांचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे, परंतु दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षाचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम याच भागात झाला असे मानण्यात येते.

    अवीट गोडीच्या या फळाला कोकणाचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल ते जून हा या फळाचा हंगाम आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीत आंब्याला विशेष महत्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात.

    आंब्याचा मोहर -
    आंब्याच्या फुलांना मोहर असे म्हणतात. त्याला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील ''drupe" या प्रकारातील असते. या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कोय असते.

    आंब्याचा माच -
    कृत्रिमरीत्या आंबा पिकवण्यास आंब्यांचा माच लावणे असे म्हणतात. एखाद्या खोलीत वाळवलेले तणस वा भाताचे वाळवलेले गवत पसरुन त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैर्‍या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे अच्छादन करतात. साधारणत: १०-१५ दिवसांत, झाकल्या गेल्यामूळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.

    आंब्याचे झाड -
    आंब्याचे झाड हे साधारणपणे ३५ ते ४० मीटर एवढा उंच असते. आंब्याची पाने सदाबहार असतात. पानांचा आकार १५ ते ३५ सेंटिमीटर लांब, तर ६ ते १६ सेंटिमीटर रुंद असतो. कोवळे असताना पानांचा रंग काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद होतो. पाने जशी मोठी होतात, तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो.

    आंब्यांचा आकार -
    आंब्यांच्या जातीप्रमाणे त्याच्या फळाच्या आकारात बराच फरक असतो. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार १० ते २५ सेंटिमीटर लांब, तर व्यास ७ ते १२ सेंटिमीटर असतो. फळाचे वजन २.५ किलोग्रॅमपर्यंत असू शकते.

      June 1, 2016


  • बकवास नियोजनातील फोलपणा

    गेल्या आठवड्यात पावसाने वऱ्हाडाचा तुरळक भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले. मुंबई आणि कोकण या किनारपट्टीवरील प्रदेशात तर पावसाने विनाशकारी तांडवनृत्य केले. गेल्या 140 वर्षांचा विक्रम मोडणाऱ्या पावसाने मुंबईचे तथाकथित सौंदर्य पार धुऊन काढले.

      July 31, 2005


  • मोबाईल घेऊन ‘बाहेर’ जाणार्‍यांचा देश!

    आज भलेही आपण जागतिक महासत्ता बनण्याचा दावा करीत असलो तरी ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही की आजच्या घडीला या देशात मोबाईल फोनची संख्या स्वच्छतागृहांपेक्षाही अधिक आहे. मोबाईलची संख्या वाढत आहे म्हणजेच देशाचा विकास किंवा आधुनिकीकरण होत आहे, असा दावा आपले सरकार केल्याशिवाय राहणार नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने 2008 साली केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 54.5 कोटी मोबाईलधारकांची नोंद करण्यात आली होती. हे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत 45 टक्के होते. गेल्या दोन वर्षांत त्यात आणखी दहा टक्क्यांची भर नक्कीच पडली असेल. या तुलनेत स्वच्छतागृहे मात्र 36.6 कोटी, म्हणजे लोकसंख्येच्या मानाने फक्त 31 टक्के एवढीच आहेत! याचाच अर्थ स्वच्छतागृहाबाहेर जाणार्‍या लोकांचे प्रमाण आजदेखील खूप अधिक आहे. घरात स्वच्छतागृह नसले तरी चालेल, पण खिशात मोबाईल हवाच असे मानणार्‍यांचे प्रमाण प्रचंड आहे.

      June 9, 2010


  • फिरक्या थरथरन्‌ आणि नावाचा घोळ

    …मुरलीदरनचे सात चेंडू ‘नो-बॉल’ ठरविण्यात आले. त्याच्या मारकतेला प्रतिस्पर्ध्यांनी केलेला हा पहिला सलाम होता! प्रथम 1996 आणि नंतर 1999मध्ये आंक्रिपने त्याची गोलंदाजीची शैली नियमांमध्ये बसत असल्याचे स्पष्ट केले. या वेळपावेतो त्याने ‘दूसरा’ टाकावयास प्रारंभ केलेला नव्हता. ‘दूसर्‍या’शिवायच आपल्या कंदुकाच्या फिरकलीलांवर फलंदाजाला थरथरविण्यास मुरली आता राजरोसपणे तयार झाला.

      August 28, 2010


  • जर्मनीतील निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे….

    दहशतवादी कुठल्याही विशिष्ट आकाराने, वेषाने समोर येत नसतो. दहशतवाद्यांनी स्वत:चे लष्कर, नौदल वा वायुदल उभारलेले ऐकिवात नाही. त्यांचे गट अनेक देशांत अनेक हितसंबंधीच्या मदतीने काम करत असतात. त्यांची अशी लिखित/अलिखित घटना नाही. विचारसरणी नाही.

      November 7, 2016


  • श्री शारदा भुजंगप्रयात – भाग ५

    आई जगदंबेचे स्वरूप अत्यंत शांत आहे. अशांती, हलचाल काही मिळवण्यासाठी असते. ती पूर्णतृप्त असल्याने शांत आहे.

      February 1, 2020


  • श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ११

    श्री शिवपार्वतीच्या एकत्रित स्वरूपाला अभिवादन करताना आचार्य श्री म्हणतात..

      September 29, 2020


  • निरंजन – भाग १८ – निंदा

    एखाद्याने केलेली निंदा ही ऐकणार्‍याने सकारात्मकतेने ऐकली तर बरे… नाहीतर एखादी व्यक्ती आधीच स्वत:च्या विचारांनी व्यापलेली असेल तर्…काही चांगले न होता त्याच्याकडुन बरेच असे वाईट घडुन जाते. म्हणुनच खरेतर ही म्हण “निंदकाचे घर नसावे शेजारी” अशी असायला हवी. 

      July 13, 2020