वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आता तिच्या आणि माझ्या प्रेमाच भविष्य कोणाच्या हातात आहे ? डबक्याच्या, डबक्यातील पाण्याच्या , सूर्याच्या की पावसाच्या ? ती ज्या डबक्यात आहे ते डबकं म्हणजे प्रेम आहे त्या डबक्यातील पाणी म्हणजे जीवन आहे आणि सूर्य म्हणजे जीवनातील समस्या आहेत आणि पाऊस म्हणजे जगण्यातील मोह आहे. या डबक्याच्या बाहेर मी जेथे आहे ती एक पोकळी आहे अर्थशून्य जगण्या मारण्या पलीकडील ! जगाच्या दृष्टीने मी जिवंत आहे पण मी कधीच मेलोय! ज्या दिवशी ती त्या डबक्यातून बाहेर येईल माझ्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यावर तो दिवस तिच्याच काय संपूर्ण स्त्री जातीच्या मुक्तीचा दिवस असेल….स्त्री मुक्तीचा दिवस असेल …
August 18, 2017
सध्या आपल्याकडे “युथफुल” चित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतोय, विशेष म्हणजे अशा कथांना प्रेक्षक ही भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे कारण म्हणजे फर्स्ट लुक मधून केलेलं मनोवेधक मार्केटींग आणि साचेबद्ध पद्धतीच्या बाहेरचे असलेले विषय असल्याचं पटवून देणं, या फंड्यामुळे सध्या बर्यापैकी आपल्या मराठी चित्रपटांना हिट्स मिळत आहेत
August 19, 2013
आमीर खानचा 'दंगल' चित्रपट काल बघीतला.
आमीर खानचा हा चित्रपट कुस्तीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाराच ठरणार आहे. 'म्हारी छोरियाँ छोरो से कम हैं के?' असा प्रश्न पुरुष प्रधान व्यवस्थेला विचारत एक बाप आपल्या मुलींना कुस्तीपटू म्हणून कसं घडवतो आणि त्याच्या पोरीही आखाड्यात कशी 'दंगल' करतात, याची ही कथा मनोरंजक आहेच, व प्रेरणादायी ही आहे. कुस्तीपटू महावीर सिग फोगट यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उतरविण्यासाठी आमीर खान यांनी नेहमी प्रमाणे खूप मेहनत घेतली आहे. आपल्या मुलींनी उत्तम असे कुस्तीपटू बनावे यासाठी एक पिता आपल्या मुलींशी कठोरपणे वागतो, व आपल्या दोन्ही मुलींना कसे घडवतो यांचे सुंदर चित्रण आमीर खान यांनी मांडले आहे. हरियाणातील एका छोट्या गावात राहणाऱ्या महावीर सिंह फोगट (आमीर खान) यांची ही कथा आहे. फोगट हे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेते आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळवून द्यायचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं असतं. परंतु, घरच्या हलाखीमुळे कुस्तीचा आखाडा सोडून त्यांना नोकरी करावी लागते. देशासाठी पदक न जिंकता आल्याची सल त्यांच्या मनाला सतत बोचत असते. त्यामुळे आपल्याला एक मुलगा व्हावा आणि त्यानं आपलं हे स्वप्न पूर्ण करावं, अशी त्यांची तीव्र इच्छा असते. मात्र, त्यांना चौथीही मुलगीच होते. आपलं स्वप्न अधुरंच राहिल्यानं ते काहीसे निराश होतात. अशातच, एक दिवस त्यांच्या दोन मुली - गीता आणि बबिता त्यांची छेड काढणाऱ्या शेजारच्या दोन पोरांची चांगलीच धुलाई करून घरी येतात. त्यांचा हा 'पराक्रम' पाहून महावीर फोगट यांच्या आशा पल्लवित होतात. मुली मुलांपेक्षा कुठेच कमी नसल्याची जाणीव त्यांना होते आणि मग सुरू होतो एक जिगरबाज प्रवास. मुलींना कुस्तीपटू म्हणून घडवण्याचा महावीर फोगट यांचा निर्धार पक्का असतो, मुलीही सज्ज असतात, पण समाज - संस्कृतीचा सामना करत त्या सगळ्या आव्हानांना कसं अस्मान दाखवतात, हे पाहणं नक्कीच रंजक आहे.
पटकथा, संवाद आणि चित्रण सगळंच प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. अनेक दृश्यं पाहताना डोळ्यांच्या कडा पाणावतात. अभिनयाबद्दल बोलायचं तर, आमीर खानने 'मिस्टर परफेक्शनिस्ट' पणा परत सिध्द केला आहे. आमीर खाननं महावीर फोगट यांच्या भूमिकेत कमाल केली आहे. वयाप्रमाणं बदलत जाणारी देहयष्टी आणि देहबोली केवळ आमीरच साकारू शकतो. मुलींवर जिवापाड प्रेम करणारा मात्र आपलं स्वप्न साकार होऊ शकणार नाही म्हणून निराश झालेला बाप व नंतर मुलींमध्येच आपलं स्वप्न पाहात मेहनत घेणारा प्रशिक्षक त्यानं जबरदस्त साकारला आहे. महावीरचे तरुणपणातील कुस्तीचे प्रसंग (सिक्स्पॅक ऍब्ज) ते उतारवयात वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट हे सर्व मोठं आव्हान त्यांनी सहज पेललं आहे. तो सिनेमाभर इतका सहज वावरतो की तो अभिनय करतोय असं वाटतंच नाही. त्याशिवाय, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, जायरा वसीम आणि सुहानी भटनागर या चार मुलींनीही त्याला उत्तम साथ दिली आहे. साक्षी तन्वर आणि अपारशक्ती खुराना आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. ज्यांना कुस्ती म्हणजे काय हे पण माहित नाही, त्यांनाही हा सिनेमा आवडेल, अशी मांडणी दिग्दर्शकाने केलीय. सिनेमा कुठेच कंटाळवाणा होत नाही. उलट, कुस्तीचा थरार सिनेप्रेमींच्या अंगावर रोमांच उभा करणारा आहे. पार्श्वसंगीत त्यात अधिकच भर घालतं. तारे जमिन पर, गजिनी, ३ इडियट्स, धूम ३, पीके यांसारखे चित्रपट देणा-या आमीर खानच्या यशात आता दंगलचा उल्लेख हा कायम उंचावत राहणार आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 5, 2017
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माच्या काही दिवसात “कान टोचणे ” म्हणजेच कर्णवेध संस्कार केले जातात. सोनारकडून कान टोचून घेणे यामागेही धर्मशास्त्रात अनेक कारणं आहेत.
March 5, 2024
हृदयाच्या बाह्य आवरणावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे श्रेय डॉ विल्यम्स यांना जाते. १० जुलै १८९३ रोजी जेम्स कॉर्निश या नावाच्या कृष्णवर्णी रुग्णावर डॉ विल्यम्स यांनी शस्त्रक्रिया केली. डॉ विल्यम्स स्वतः कृष्णवर्णी होते. अमेरिकेत कृष्णवर्णी जनतेला जेव्हा समान हक्क प्राप्त झाले नव्हते तेव्हा एका कृष्णवर्णी रुग्णावर यशस्वी हृद्य शस्त्रक्रिया करून डॉ विल्यम्स यांनी इतिहास घडविला असेच म्हटले पाहिजे.
May 24, 2018
काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी हे नुकतेच महाराष्ट्राच्या धावत्या दौर्यावर येवून गेलेत.
September 11, 2010
भाग - ५
आधुनिक काळात पारंपरिक आरत्या लिहिल्या जातातच, पण इतरही अनेक, भिन्नभिन्न वर्ण्यविषयांवर रचल्या जातात. जसें, शिवरायांसारख्या महापुरुषांवर, ( जसें ‘आरती शिवराया’, ही मी लिहिलेली आरती ). हल्ली, ज्यांना VIPs म्हणतात, अशा व्यक्तींवरही आरत्या लिहिल्या जातात. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर (टागोर) यांचें ‘जनगणमन’ ही एकप्रकारें आरतीच आहे. तें मूळ काव्य तत्कालीन ब्रिटिश राजपुत्र पंचम जॉर्ज याच्या भारतभेटीच्या वेळीं , म्हणजे विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात, लिहिलें गेलेलें आहे. त्याच्या प्रथम पंक्तीचे मूळ शब्द आहेत : ‘जनगणमन-अधिनायक जय हे भारतभाग्यविधाता’ , हा जनगणमनाचा अधिनायक , हा भारताचा भाग्यविधाता म्हणजे पंचम जॉर्जच. बर्याच नंतर, त्या रचनेच्या प्रथम पंक्तीत, शब्द न बदलतां, केवळ थोडासा अन्य बदल करून, अर्थबदल केला गेला, व त्यामुळे त्या रचनेचा वर्ण्यविषय ‘भारतवर्ष’ हा बनवलला गेला ; आणि तिचें प्रथम कडवें हें आपलें राष्ट्रगीत बनलें. ती पहिली पंक्ती आतां अशी आहे, ‘ जनगणमनअधिनायक जय हे भारत भाग्यविधाता’. (‘भारतभाग्य-विधाता’ व ‘भारत भाग्यविधाता’ या दोन शब्दांमधील फरक कृपया ध्यानात घ्यावा). म्हणजेच, आतांच्या संदर्भाप्रमाणें , हा जनगणमन-अधिनायक, हा भाग्यविधाता म्हणजेच आपला ‘भारतवर्ष’ देश , असा अर्थ होतो. पण, त्या काव्यातील ‘वर्ण्यविषय’ पंचम जॉर्ज असो किंवा भारतवर्ष असो, दोन्हीही आधुनिककालीन आरत्याच आहेत, असें म्हणायला हवें. म्हणूनच, हिच्या अंतर्गत पंक्तीत जयकार आहेच, पण अखेरीस ‘जय हे जय हे जय हे, जय जय जय जय हे’ असा multiple जयजयकार आहे.
आझाद-हिंद फौजेत गाइलें जाणारें गीत ‘सब सुख चैन की बरखा बरसे भारत भाग्य है जागा’ हें, जनगणमन या गीतावरूनच रचलेलें उघडच दिसतें. ती वंदना जरूर आहे, पण त्याला आरती म्हणता येणार नाहीं . तसेंच, स्वातंत्र्यपूर्व काळात अतिशय प्रसिद्ध असलेले, व स्वातंत्र्यसैनिकांना स्फूर्ती देणारें गीत ‘वदे मारतम्’ हेंही वंदनागीत आहे, त्याला आरती म्हणता येणार नाहीं .
‘गाऊं त्यांना आरती’ , ‘निरांजन पडलें तबकात’ अशी भावगीतें आहेत, त्यांना जरी ‘आरती’ असें अभिधान देतां येत नसलें तरी, ती आरतीशी संबंधित आहेत, हें विशेष. सिनेमातही, ‘मैं तो आरती उतारूँ रे संतोषी माता की’ अशा आरत्या लिहिल्या व वापरल्या जातात. सिनेमातीलच, ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिड़ाया करती है बसेरा । वो भारत देश है मेरा ।’ ही एकप्रकारें भारताची आरतीच आहे , तिच्यात ‘जय भारती’ असे शब्द वापरलेले आहेत. प्रसिद्ध हिंदी काव्य ‘क्या पूजा क्या अर्चन रे’ यातही पूजा-अर्चा-आरती यांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध आहे. राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांचें ‘भारत-भारती’ हें हिंदी काव्य, आरतीच्या उल्लेखानेंच सुरूं होतें. त्याची पहिली ओळ आहे, ‘मानसभवन में आर्यजन जिस की उतारें आरती’ .
अशा तर्हेनें, आपल्याला आरती फक्त देव्हारा-मंदिर-उत्सवमंडपातच नाहीं, तर इतरत्रही दिसते, व त्यावरून, आरत्यांची लोकप्रियता ध्यानात येते.
काव्याला विषय अनेक असतात. आतां, अभंग, भजन, कीर्तन हें काव्यरूपही वेगवेगळ्या विषयांसाठी वापरलें जात आहे. ‘रिवायती’ (पारंपरिक) गझल ही पूर्वी फक्त ‘महब्बत, इश्क़’ ( प्रीती ) याच्याशी संबंधित विषयांवरच लिहिली जात असे. पण आतां, गझलही वेगवेगळ्या विषयांवर लिहिली जाते. त्याचप्रमाणें, हल्ली, अन्य अनेक वर्ण्यविषयांवर रचलेल्या आरत्या आतां पहायला मिळतात व मिळत रहातील. त्या प्रकारच्या कांहीं माझ्याही आहेत, जसें की ‘आधुनिक विज्ञाना’वर ( ‘आरती नूतन-विज्ञानाची’), ‘जग सोडून गेलेल्या पत्नी’वरील (‘आरती प्राणप्रियेची’), वगैरे. गणपतीवरही, विज्ञानयुगीन अर्थ लावून, ‘स्पेस्-ट्रॅव्हल्’च्या संदर्भानें वैज्ञानिक-आरती मी लिहिलेली आहे. (‘अंतराळयात्रिकासारखा धारुन गणवेश । व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।’ ). ‘व्यंगकाव्य’ म्हणून कां होईना, पण ‘प्रदूषणा’वरही आरती आहे (‘जय जय प्रदूषणा’ ). थोडक्यात काय तर, विषय वेगवेगळे, आरतीचा format, बाज तोच. ( इथें, मी काय लिहिलें आहे, हें महत्वाचें नसून, आरतीतील वैविध्याचा उल्लेख करण्यासाठीची ती उदाहरणें दिलेली आहेत, याची नोंद घ्यावी).
उपास्य / आराध्य / वर्ण्यविषय कांहींही असो, पण, आपण आधी बघितलें आहे की आरत्यांची खरी मजा, त्या मोठ्यानें म्हणण्यातच आहे, आणि इतरांबरोबर एकत्र म्हणण्यातच आहे. एकत्र म्हणण्यानें, घुमणार्या नादाचा ( rasonating sound) परिणाम तर होतोच,पण समूहभावनाही ( Unity as a Group ) वाढीला लागते.
वैदिक ऋचाचेंही समूहपठण होतें; तसेच अथर्वशीर्ष, शतचंडी इत्यादी मंत्रांचें-स्तोत्रांचेंही. भजनांचें व प्रार्थनांचेंही पुष्कळदा सामूहिक गान होते. कीर्तनांमधील जयकारही सामुहिक होतो, जसें, ‘जय जय रामकृष्ण हरी’ चा घोष. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, प्रभातफेर्यांमध्ये व इतरत्र अशी अनेक समूहगानें होत असत व ती लोकांना स्फूर्ती देत; जसें की, ‘.... साथी गाती एका आवाजात । ध्येयाचें हें गीत घुमवूं अवघ्या अवकाशात ।’ . घोषणांचें तर समूहगर्जनच होतें, उदा, ‘भारतमाता की जयऽ’ ही घोषणा. राष्ट्रगीताचेंही समूहगान होतें. समूहभावनेतून सामाजिक उत्थान व राष्ट्रप्रेम चेतवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी १८९३ सालीं सार्वजनिक-गणेशोत्सव सुरूं केला. त्यानंतर तर आरत्या अत्याधिक , व एकत्रितपणें , म्हटल्या जाऊं लागल्या, त्या अधिकच लोकप्रिय झाल्या, अगदी तरुणांमध्येसुद्धा.
माझ्या लहानपणीं, आम्ही घरीं किंवा गणेशोत्सवादि प्रसंगीं मोठमोठ्यानें आरत्या म्हणत असूं. त्याची मजा औरच होती. गेली बरीच दशकें मला आरती म्हणण्याचा प्रसंग आलेला नाहीं, मात्र लहानपणीं म्हणून-म्हणून आपोआप पाठ झालेल्या आरत्या मला अजूनही आठवतात, आणि त्या जुन्या काळाची स्मृती तर अजूनही अगदीऽ ताजी आहे. माझा एक ५० हून अधिक वर्षें अगदी-जवळचा-मित्र असलेला गृहस्थ त्याच्या बालपणीं मुंबईतल्या गिरगांवात रहात असे. तो सांगतो की, त्या काळीं, गणेशोत्सवात, अगदी मोऽठ्ठ्याऽनें , स्वर उंचाऽवूऽऽन , आणि लांबवूऽऽन म्हणण्याची, वाढत्या-वयाच्या मुलांमध्ये व तरुणांमध्ये अहमहमिका लागत असे. अजूनही, तें सर्व सांगतांना त्याचा स्वर हळवा होतो, तें स्मरणरंजन (nostalgia) त्याला आनंदी करतें.
अखेरीस : एक गोष्ट नक्की. ती ही की, आरत्या या श्रद्धेशी संबंधित असल्यानें, जोवर मानव-मनात श्रद्धा कायम राहील, तोंवर आरत्या रचल्या जातील, म्हटल्या जातील, व सश्रद्ध जन त्यांतून आनंद व मन:शांती मिळवत रहातील.
शुभम् भवतु ।
(समाप्त )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
September 8, 2016
२०१४ पर्यंत सायबर सोमवार हा वर्षातील सर्वात व्यस्त दिवस होता, मात्र यावेळी ऑनलाइन डेस्कटॉप विक्री $2 अब्ज पेक्षा जास्त होती आणि त्यात यूएस हा इतिहासातील सर्वात व्यस्त दिवस होता.
November 29, 2021
तेजाब’ मधून एन. चंद्रा यांनी बेरोजगारी, बेकारी, गुन्हेगारी व भ्रष्टाचार यातून निर्माण होणारे नैराश्य व तरूणांपुढे निर्माण झालेला अस्तित्वाचा प्रश्न याची मांडणी केली.
November 11, 2021
तिरुपती बालाजीची महत्त्ती :
या लेखात आपण तिरुपती बालाजी मंदिर बद्दल माहिती पाहणार आहोत, तिरुपतीला भूलोकीचे वैकुंठ म्हणून ओळखले जाते, पृथ्वीवरील विष्णूचे निवासस्थान, तिरु म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती. तेलुगु, तमिळ भाषेत मला /मलई म्हणजे डोंगर पर्वत. बालाजी हे विष्णूचे अवतार
मानले जातात ,डोंगरावर कपिलतीर्थ नावाचे सरोवर आहे. श्रद्धालु येथे भरपूर दान करतात आणि हे,मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरामद्धे एक असे मानले जाते.
तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपती मध्ये स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आहे. दरवर्षी लाखो भक्तगण येथे येतात. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानण्यात येते. ब्राह्मोत्सवम हा येथील मुख्य उत्सव आहे.
समुद्रसपाटीपासून 3200 फूट उंचीवर तिरुमाला टेकड्यांवर बांधलेले श्री वेंकटेश्वर मंदिर इथले सर्वात मोठे आकर्षण आहे. अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुकला आणि कलाकुसरीचे एक अद्भुत उदाहरण आहे.
संगम साहित्यात तिरुपतींना त्रिवेगादम म्हणून संबोधले जाते. तिरुपतीच्या इतिहासाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. परंतु हे स्पष्ट आहे की ५ व्या शतकापर्यंत त्याने स्वतःला एक प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून स्थापित केले होते. असे म्हटले जाते की या मंदिराच्या उभारणीस चोला, होयसला आणी विजयनगर या राजांचे आर्थिकदृष्ट्या योगदान मोलाचे होते.
भगवान वेंकटेश्वर किंवा बालाजी हा भगवान विष्णूचा अवतार आहे. असे मानले जाते की स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठावर भगवान विष्णू काही काळ वास्तव्य करीत होते. हा तलाव तिरुमला जवळ आहे. तिरुमला- तिरुपतीच्या सभोवतालच्या टेकड्या शेषनागच्या सात सपाट्यांच्या पायावर सप्तगिरी म्हणून बांधल्या आहेत. श्री वेंकटेश्वरैयाचे हे मंदिर सप्तगिरीच्या सातव्या टेकडीवर आहे, वेंकटाद्री नावाने प्रसिद्ध आहे.
त्याच वेळी, एका अन्य आख्यायिकेनुसार, ११ व्या शतकात, संत रामानुज तिरुपतीच्या या सातव्या टेकडीवर चढले. भगवान श्रीनिवास (वेंकटेश्वराचे दुसरे नाव) त्याच्यासमोर प्रकट झाले आणि आशीर्वाद दिला. असे मानले जाते की परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर त्यांनी वयाच्या १२० व्या वर्षीपर्यंत जगले आणि एका ठिकाणी फिरून भगवान वेंकटेश्वरची कीर्ती पसरविली.
वैकुंठ एकादशीनिमित्त, लोक येथे भगवानांचे दर्शन घेण्यासाठी येतात, तिथे आल्यानंतर त्यांचे सर्व पाप धुऊन जातात. असा विश्वास आहे की येथे आल्यानंतर एखाद्याला जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्तता मिळते.
तिरुपती बालाजी मंदिरचा इतिहास
या मंदिराचा इतिहास ९व्या शतकापासून सुरू होईल असा विश्वास आहे, जेव्हा कांचीपुरमच्या सत्ताधीश राजवंश पल्लवने या ठिकाणी त्यांचे अधिपत्य स्थापित केले, परंतु विजयनगर घराण्याच्या १५ व्या शतकाच्या शासनानंतरही या मंदिराची ख्याती मर्यादित राहिली. १५ व्या शतकानंतर या मंदिराची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरू लागली. १८९३ ते १९३३ या काळात इंग्रजांच्या राजवटीत या मंदिराचे व्यवस्थापन हतीरामजी मठाच्या महंतांनी केले. हैदराबादच्या मठात
देणगी देखील देण्यात आली आहे. एकोणीसशे तेहतीस मध्ये या मंदिराचे व्यवस्थापन त्यावेळच्या मद्रास सरकारने ताब्यात घेतले आणि तिरुमला-तिरुपती या स्वतंत्र व्यवस्थापन समितीकडे
या मंदिराचे व्यवस्थापन सोपवले. आंध्र प्रदेश राज्य स्थापनेनंतर या समितीची पुनर्रचना करण्यात आली आणि आंध्र प्रदेश सरकारचे प्रतिनिधी म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली.
येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सर्वात मोठी इच्छा म्हणजे भगवान वेंकटेश्वरचे दर्शन घ्यावे. भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहून सहजच्या या मंदिराची कीर्ती किती आहे याचा अंदाज येतो. मुख्य मंदिराखेरीज इतरही मंदिरे आहेत. त्यामद्धे मंदिराचा गोपुरम हा प्रमुख समजला जातो. तिरुमला आणि तिरुपतीचे भक्तिमय वातावरण मनाने श्रद्ध आणि श्रद्धेनेच भरलेले असते. या यात्रेकरूंची काळजी पूर्णपणे टीटीडीच्या संरक्षणाखाली आहे.
तिरुपती बालाजी मंदिर मधील मुख्य मंदिर :
श्री वेंकटेश्वराचे हे पवित्र व प्राचीन मंदिर वेंकटाद्री नामक डोंगराच्या सातव्या शिखरावर आहे, जे श्री स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठावर वसलेले आहे. म्हणूनच येथे बालाजीला भगवान वेंकटेश्वर म्हणून ओळखले जाते. हे भारतातील काही मंदिरांपैकी एक आहे, ज्यांचे दरवाजे सर्व धार्मिक अनुयायांसाठी खुले आहेत.
पुराण आणि अलवर लेखांसारख्या प्राचीन साहित्यिक स्त्रोतानुसार, कलियुगातील भगवान वेंकटेश्वराचा आशीर्वाद मिळाल्यानंतरच भक्तांना मुक्ती मिळते अशी धारणा आहे.
श्री वेंकटेश्वराचे हे प्राचीन मंदिर तिरुपती पर्वताच्या सातव्या शिखरावर (वेंकटाचल) वसलेले आहे. हे श्री स्वामी पुष्करिणीच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. असा विश्वास आहे की व्यंकट टेकडीचा स्वामी असल्यामुळे त्याला वेंकटेश्वर म्हटले जाऊ लागले. त्याला सात पर्वतांचा स्वामी देखील म्हटले जाते. (सप्तगीरी)
भगवान वेंकटेश्वर साक्षात मंदिरातील गर्भगृहात विराजमान आहेत. हे मुख्य मंदिराच्या प्रांगणात आहे. मंदिर कॉम्प्लेक्समध्ये अनेक उत्तम प्रकारे डिझाइन केलेले गेट, मंडपम आणि छोटी मंदिरे आहेत. मंदिर परिसरातील मुख्य आकर्षणे अशी आहेत: पाडी कवळी महाद्वार, संपंगा प्रदक्षिणम, कृष्णा देवराय मंडपम, रंगा मंडपम, तिरुमाला राय मंडपम, आईना महल, ध्वजस्तंभ मंडपम, नादिमी पाडी कवळी, विमान प्रदक्षिणाम, श्री वरदराजस्वामी श्रीमती.
असे म्हणतात की या मंदिराची उत्पत्ती वैष्णव पंथातून झाली आहे. हा पंथ समानता आणि प्रेमाच्या तत्त्वावर विश्वास ठेवतो. या मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते. असे मानले जाते की भगवान वेंकटेश्वरला भेट देणार्या प्रत्येक व्यक्तीस त्याचे विशेष आशीर्वाद मिळतात.
तीरुपती बालाजी मंदिर देशातील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील अनेक बडे उद्योगपती, राष्ट्रपती,पंतप्रधान चित्रपट तारे आणि राजकारणी येथे आपली उपस्थिती देतात.
तिरुपती बालाजी मंदिर बद्दल कांही रहस्ये:
१. मुख्य गेटच्या उजव्या मुलाच्या रुपाने बालाजीला हनुवटीतून रक्त येत होते,
तेव्हापासून बालाजीच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरू झाली.
भगवान बालाजीच्या डोक्यावर रेशमी केस आहेत आणि त्यामध्ये काहीच गाठलेले
नाही आणि तो नेहमीच फ्रेश असतो.
२. मंदिरापासून २३ कि.मी. अंतरावर एक गाव आहे. त्या गावात बाहेरील व्यक्तीला प्रवेश
निषिद्ध आहे. लोक तिथे नियमांनुसार जगतात. तिथूनच आणलेली फुले देवाला अर्पित केली जातात व तेथून इतर वस्तू जसे की दूध, तूप, लोणी इत्यादी अर्पण केल्या जातात.
३. भगवान बालाजी गर्भगृहाच्या मध्यभागी उभे असलेले दिसले आहेत परंतु बाहेरून
दिसल्याप्रमाणे ते उजव्या बाजूला कोपर्यात उभे आहेत.
४. बालाजी खाली धोतर आणि वर साडीने दररोज सजवले जातात.
५. गर्भगृहात घेतलेली कोणतीही वस्तू बाहेर आणली जात नाही, बालाजीच्या पाठीमागील
पाण्याची टाकी आहे, मागे वळून न पाहता तेथेच विसर्जन केले जाते.
तुम्ही किती वेळा बालाजीची पाठ साफ केली तरी तिथे नेहमी ओलेपणा असतो, तुम्ही
कानात कान घातला की समुद्राचा आवाज ऐकू येतो.
६ लक्ष्मीजी बालाजीच्या छातीवर राहतात. भगवान बालाजी दर गुरुवारी निजरूप दर्शनाच्या वेळी चंदनने सजवले जातात, ती चंदन काढून टाकल्यावर त्यावर लक्ष्मीजीची प्रतिमा खाली उतरते.
७. बालाजीच्या पाण्याच्या टाकीमध्ये विसर्जित केलेल्या वस्तू तिरुपतीपासून २० कि.मी.
अंतरावर असलेल्या वरपेडू येथे बाहेर येतात.
८. गर्भगृहात जळणारे दिवे कधी विझत नाहीत, किती हजार वर्षे जळत आहेत हे कोणालाही माहिती नाही.
तिरुपती मंदिरात काय खास आहे?
तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात आदरणीय देवस्थानांपैकी एक आहे. कालीयुगात भगवान विष्णूचे वास्तव्य असलेल्या पृथ्वीच्या बिंदूवर असलेले हे मंदिर धर्म आणि वारसा या दोन्ही दृष्टीने भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे मंदिर विष्णूचे रूप असलेल्या श्री व्यंकटेश्वराला समर्पित आहे.
भगवान विष्णूची ही देवता, भगवान कृष्णाचा विस्तार आहे, याला तिरुपती येथील सात टेकड्यांचा देव व्यंकटेश्वर किंवा बालाजी असेही म्हणतात.
आपल्या भक्तांच्या मनापासून इच्छा पूर्ण करणारा सर्वात शक्तिशाली परमेश्वर म्हणून त्याची मान्यता आहे. असे मानले जाते की तो कलियुगातील भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक आहे ज्यामुळे मानवतेच्या सर्व निराशेतून मुक्तता होते. बहुतेकदा सर्वात श्रीमंत देव, श्रीनिवास किंवा बालाजी म्हणून
संबोधले जाते, त्यांच्या भक्तांना त्यांनी मागितलेल्या इच्छांसह आशीर्वाद देतात.
वेंकटेश्वर मंदिर तिरुमला या डोंगरी गावात वसलेले एक महत्त्वाचे वैष्णव मंदिर आहे. हे मंदिर विष्णूचा अवतार भगवान वेंकटेश्वर यांना समर्पित आहे, जो मानवजातीला कलियुगातील परीक्षा आणि संकटांपासून वाचवण्यासाठी येथे प्रकट झाला असे मानले जाते.
तिरुपती, आंध्र प्रदेशातील तिरुमला टेकडीच्या सातव्या शिखरावर स्थित, हे मंदिर विष्णू, व्यंकटेश्वराच्या अवताराला समर्पित आहे आणि त्याला ‘सात टेकड्यांचे मंदिर’ असेही म्हटले जाते. तिरुपती बालाजी मंदिर हे यात्रेकरूंकडून मिळणाऱ्या देणगीमुळे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरा पैकी एक आहे.
भगवान व्यंकटेश्वर हे वेंकटचलपती श्रीनिवास म्हणूनही ओळखले जातात आणि बालाजी हे हिंदू देव विष्णूचे एक रूप आहे. व्यंकटेश्वर म्हणजे लोकांच्या
पापांचा नाश करणारा परमेश्वर. व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला कलियुग वैकुंठ असेही म्हणतात.
हिंदू मान्यतेनुसार, हे दान देण्यामागचे कारण असे सांगितले जाते की भगवान व्यंकटेश्वर कुबेराकडून घेतलेले कर्ज फेडतात. असे मानले जाते की आपण केसांची जी किंमत देतो, भगवान वेंकटेश्वर आपल्याला त्यापेक्षा दहापट जास्त देतात. चांगली गोष्ट म्हणजे येथील भाविक स्वतःच्या इच्छेने केस दान करतात.
दुसरीही आख्यायिका अशी आहे कि श्री महालक्षमी ही बालाजीची पहिली पत्नी. नंतर त्यांनी पद्मावती बरोबर दुसरा विवाह केला. त्यामुळे श्री महालक्षमी नाराज झाली व कोल्हापूर येथे निघून गेली. तेथे तिने स्वतःचे मंदिर बांधून वेगळे करवीर पीठ स्थापन केले. असे म्हणतात की तिची नाराजी दूर करण्यासाठी श्री बालाजी श्री महालक्ष्मीस तिरुपती वरून कमिटी आजही पाळत आहे.
तिरुपती बालाजी येथील दर्शन माहिती:
येथे दर्शन दोन प्रकारचे आहे. मोफत व पास काढून. पास काढण्यास फी आहे. तसेच अर्जित सेवेचेव इतर सेवेचे पास ही मिळतात. मोफत दर्शनासाठी सुमारे ८ ते १० तास लागतात. दर्शन व्यवस्थेत सर्व प्रकारच्या सोयी आहेत, जसे की चहा, नाश्ता, स्वच्छतागृह इत्यादी. जेष्ठ नागरीका (६५ वर्षे) साठी
वेगळी सोय आहे. गोपुराच्या मागे एक गेट आहे. तेथून रोज दोनदा (सकाळी १० वाजता व दुपारी दोन वाजता) जेष्ठ नागरीकांना सोडले जाते. आधार कार्ड आवश्यक आहे. जेष्ठ नागरीका सोबत (काळजीवाहक) एक भाविक जाऊ शकतो. याची सर्व माहिती तेथे असणाऱ्या माहिती काउंटरवर मिळते. तेथे भक्त निवासात राहण्याची योग्य दरात उत्तम सोय होऊ शकते. कोणतेही पास ऑनलाईन सुद्धा बुक करू शकता. त्यासाठी खालील लिंक वर माहिती मिळेल.
https://tirupatibalaji.ap.gov.in/
तिरुपती तिरुमला देवस्थानची (TTD) ची संपत्ती किती आहे?
बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते.
तिरुपती तिरुमला देवस्थानची (TTD) ची संपत्ती जवळ जवळ दोन लाख करोड रुपये इतकी आहे. (२०२१ ची माहिती)
तिरुमला मंदिराकडे १४ टन सोने आहे. ते सर्व बँकेमद्धे ठेवून त्याचे भरभक्कम व्याज मिळते.
बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर आहे.
परंतु या सर्व मिळालेल्या दानाचा उपयोग टीटीडी देवस्थान कमिटी भाविकांच्या सोयी व सवलती साठीच खर्च करते जसे की १. अन्नदान: रोज जवळपास ३५-४० हजार लोकांना अन्नदान केले जाते. २. भक्तांना राहण्यासाठी भक्त निवास ३. स्वतःचे विश्वेश्वर विद्यापीठ. ४. भक्तांसाठी आधुनिक सुसज्ज हॉस्पिटल व त्यात मोफत उपचार. इ.
श्री वेंकटेश सुप्रभातम :
श्री वेंकटेशा वरील माहितीत जर श्री वेंकटेश सुप्रभातम चा उल्लेख केला नाही तर सर्व माहिती अपूर्णच राहील.
श्रीवेङ्कटेशसुप्रभातम् हे इ. स. १४७३ च्या आसपास स्वामी मानवला मामुनी यांचे पट्ट शिष्य प्रतिवादी भयंकर श्री अनंताचार्य तथा अनंगाचारयार यांनी लिहिले असे मानले जाते.
श्रीवेङ्कटेशसुप्रभातम् हे संस्कृत मद्धे लिहिलेले सर्वात प्रसिद्ध स्तोत्र व श्लोक आहेत.
वेङ्कटेशसुप्रभातम् संहिताचे चार भाग पडतात. १. श्रीवेङ्कटेश सुप्रभातम (२९ श्लोक) २. श्रीवेङ्कटेश स्तोत्रम (११ श्लोक) ३. श्रीवेङ्कटेश प्रपत्ती (१६ श्लोक) व ४. श्रीवेङ्कटेश मंगलशासनम (१४ श्लोक).
जे प्रभातसमयी भगवान श्री विष्णूला उठवण्या करीता गायिले जातात. हे वसंततिलका ह्या छंदांमध्ये (वृत्त) लिहिले आहे. यात प्रत्येक ओळीत चौदा अक्षरे तथा चार छंद असतात.
श्री वेंकटेश सुप्रभातम या स्तोत्रांचे आत्तापर्यंत अचूक व शास्त्र शुद्ध मराठी भाषांतर उपलब्ध नव्हते. परंतु मागील दोन वर्षा मद्धे डॉ. दिलीप कुलकर्णी व श्री.धनंजय बोरकर यांनी ते भाविकांना उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून हे स्तोत्र ऐकताना त्यांना याचा अर्थ अचूकपणे कळण्यास मदत होते. (संदर्भ सूची पहा)
सुप्रभातम हे श्री व्यंकटेश स्तोत्र सर्वदूर लोकप्रिय व जनतेच्या सर्व थरापर्यंत पोहचवण्याचे श्रेय पहिल्या महिला भारत रत्न मिळालेल्या गायिका कै. एम एम सुब्बुलक्ष्मी (१९१६-२००४) यांच्याकडे जाते. इतके की सद्ध्या ते दक्षिण भारतात सर्व घरामद्धे व मंदिरात प्रभातसमयी ऐकावयास येते.
।। वेंकटार्पणम अस्तु ।।
-- डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
संदर्भ:
१. टीटीडी देवस्थानची अधिकृत वेबसाईट
२. मराठी विकिपीडिया
३. गुगल व इतर अनेक लेख
४. सर्व फोटो गूगलच्या सौजन्याने
५. डॉ. दिलीप कुलकर्णी व स्वरूपा फडणीस (२०२१) श्री वेंकटेश सुप्रभातम भाग १. मराठी व हिंदी भाषांतर. स्वानंद प्रकाशन, पुणे
६. स्वरूपा फडणीस व डॉ. दिलीप कुलकर्णी (२०२२) श्री वेंकटेश सुप्रभातम भाग २. मराठी भाषांतर. स्वानंद प्रकाशन, पुणे
७. धनंजय बोरकर (२०२१ व २०२२) https://www.marathisrushti.com/articales/shree-venkatesh suprabhatam-with-mararthi translation- part-1 and 2
January 11, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti