(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • “सिद्धान्त’ वीर

    ग्रीस देशात फार पूर्वी डेमॉक्रेटस नावाचा अतिशय मोठा तत्त्वज्ञानी व विचारवंत होऊन गेला. एका सायंकाळी तो बाजारात गेला असता त्याला रस्त्याच्या कडेने डोक्यावर वडिलांचा आहे. मात्र लाकडाची अतिशय मोठी मोळी घेऊन जात असलेला एक मुलगा दिसला. मोळीचे ओझे खूप असल्याचे त्या मुलाच्या चेहऱ्यावर दिसत होते. तरीही तो मुलगा ते अवजड ओझे डोक्यावर घेऊन पुढे जात होता. डेमॉक्रेटस त्याच्याजवळ गेला व त्याने त्याला विचारले की, ही एवढी मोठी लाकडाची मोळी तू - घेऊन तू कोठे चालला आहोस? त्यावर तो म्हणाला की, माझ्या वडिलांचा लाकूड-विक्रीचा व्यवसाय आहे. मात्र ते आजारी असल्यामुळे आज बाजारात येऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी मीच ही लाकडाची मोळी घेऊन जात आहे. त्यावर डेमॉक्रेटसने त्या मुलाला विचारले की, अडचणीच्या वेळी वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करणे ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र -त्याखेरीज तू काय करतोस? त्यावर त्या मुलाने उत्तर दिले की, मी इतर वेळी शाळेत तर जातोच, परंतु शाळेव्यतिरिक्त मिळणारा सारा वेळ माझ्या अभ्यासातच जातो. मला खूप अभ्यास करून डेमॉक्रेटसप्रमाणे मोठा विद्वान व्हायचे आहे. त्यावर डेमॉक्रेटस त्या मुलाला म्हणाला की, तू त्या डेमॉक्रेटसला ओळखतोस का? तेंव्हा त्या मुलाने नाही, असेच उत्तर दिले. मात्र नंतर डेमॉक्रेटसने त्या मुलाच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वतःहून स्वीकारली. कठोर परिश्रम घेऊन केलेला अभ्यास आणि डेमॉक्रेटसचे मार्गदर्शन यामुळे हा मुलगा मोठेपणी भूमितीचा तज्ज्ञ झाला. पायथागोरस हे त्याचे नाव. भूमितीमधील 'पायथागोरसचा सिद्धांत' जगप्रसिद्ध आहे.

    -श्रीकांत नारायण

      December 28, 2024


  • नमस्कार – भाग १ – साष्टांग नमस्कार !!

    दोन हात, दोन पाय, शिर, छाती, मन आणि आत्मा यांना अष्टांग अशी संज्ञा आहे. नतमस्तक म्हणजे मस्तक नत करून नमस्कार करावा. मनापासून असावा. देखल्या देवा दंडवत नको. कोणीतरी बघतोय म्हणून नमस्कार नसावा. आणि कोणी बघतच नाहीये मग नमस्कार तरी कशाला हवा ? असे नसावे.

      July 15, 2017


  • मरू/मरवा

    ।।भालचंद्राय नम: मरूपत्रं समर्पयामि।।

    हे गुल्म वितभर उंच वाढते.ह्याची पाने मेथीच्या पानांसारखी असतात व त्यास चांगला वास येतो.ह्याला तुरे येतात.

    ह्याची चव तिखट,कडू असून हा उष्ण गुणाचा असतो व कोरडा आणी तीक्ष्ण असतो.हा शरीरातील कफपित्त कमी करतो.

    मरवाचा उपयोग अरूची,सुज,दमा,कृमी,पोट फुगी,मल बध्दता,त्वचा रोग,भुक न लागणे अशा अनेक तक्रारींवर होतो.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 14, 2017


  • जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ४

    लाळघोटेपणाचे पालन (किंवा हलकीसलकी कामे करण्याची रीत), सततचा खोटारडेपणा, सदैव वितंडवादाची सवय, इतरांबद्दल नित्य वाईट विचार, अशा माझ्या गुणसमुच्चयाची ख्याती ऐकून ऐकून तू सोडून दुसरे कोणी क्षणभर तरी माझे तोंड पाहील काय?

      February 27, 2020


  • आहारातील बदल-शाकाहार भाग १३

    सगळं चाललंय ते टीचभर पोटासाठी.
    काय शाकाहार, काय मांसाहार
    काय असेल ते खाऊन घ्या गपचुप.
    शेवटी पोट भरण्याशी मतलब ना !

    सगळं खरं आहे, पण जी बुद्धी नावाची चीज दिली आहे ती कशासाठी ? त्याचा वापर कधी करणार ?

    हिंदु भारतीय संस्कृती प्रमाणे या बुद्धीचा वापर आपले आयुष्य शतायुषी होण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवायची आहे. त्यासाठी सण साजरे करायचे आहेत, ते सुद्धा संस्कृतीमध्ये सांगितले आहेत तसे, बुद्धी वापरून.
    सणांची रचना ही ऋतुनुसार केली आहे. मराठी महिन्यानुसार केली आहे.

    आद्य शंकराचार्यांनी सर्वसामान्य माणसांना निरोगी जगणे सोपे व्हावे, यासाठी काही कर्मकांडे घालून दिली. या प्रत्येक कर्मकांडाचा थेट संबंध आरोग्याशी आहे. प्रत्येक हिंदु सणामधे काहीनाकाही गोडधोड केले जाते. सर्व पदार्थ शाकाहारीच असतात. अगदी क्वचित ते सुद्धा कुळानुसार, प्रदेशानुसार देवतेनुसार मांसाहाराचा नेवैद्य असेल,

    प्रत्येक सण साजरे करण्यामध्ये जे आरोग्य दडलेले आहे, ते बुद्धीने शोधले को सापडते.

    आता हेच पहा ना, आजच्या नरकचतुर्दशीला दिवसाची सुरवात करायची तीच सातीवण नावाच्या औषधी झाडाच्या सालीचा रस पिऊन.
    चुकलं.
    प्रत्येक झाड हे औषधीच असते. झाडाच्या मागे औषधी असे विशेषण लावण्याची पण आवश्यकता नाही. किंबहुना जगात जे म्हणून द्रव्य स्वरूपात आहे, ते सर्व माणसासाठी, शतायुषी होण्यासाठी, औषधीसाठी वापरता येऊ शकते.

    तर आजच्या दिवशी या सातवीण वृक्षाच्या सालीला फार महत्व आहे. या वृक्षाला नमस्कार करून, दिवा लावून, प्रदक्षिणा घालून, प्रार्थना करून काही साल काढून, वाटून रस काढताना त्यामधे, सैंधव, जिरे, ओवा, मिरी, लिंबाचा रस घालून घ्यायचा प्रघात आहे. यामुळे दिवाळीचा फराळ अघळपघळ झाला तरी फार काळजी नसते. हा फराळ सहज पचून जातो. आज हा रस घ्यावाच !

    "हे, ईश्वरी अंशाने आणि औषधी गुणाने युक्त असलेल्या वृक्षदेवते, आज तुझ्या औषधी गुणाचा आम्हा मनुष्याला फायदा व्हावा, यासाठी तुझ्या सालीचा काही भाग आम्ही निःस्वार्थ भावनेने, औषधी रूपात करणार आहोत, त्यासाठी तू तुझ्या सर्व औषधी गुणांनी युक्त होऊन आमच्यावर कृपा कर. औषधासाठी का होईना, तुझ्या अंगावर आम्हा वैद्यांना शस्त्र वापरावे लागत आहे, यासाठी तू आम्हाला क्षमा कर."

    केवढा अर्थ भरला आहे या प्रार्थनेत !
    प्रार्थनेत शक्ती असते.
    जशी प्रार्थना असते, तसे फळ मिळते.
    प्रार्थना जेवढी भावपूर्ण होते, तेवढा गुण जास्त येतो.

    अखिल मानवाच्या कल्याणासाठी, कोणत्याही अपेक्षांशिवाय, आपल्या औषधी अंगाचा वापर मुक्तपणे करू देणाऱ्या या वृक्षदेवतांप्रती, या निमित्ताने शतशः नमन !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    29.10.2016

      October 29, 2016


  • स्नेहमेळावा – ४७ वर्षांनंतर !

    सुधीर मोघेंच्या गीताच्या ओळी – ” एकाच या जन्मी जणू , फिरुनी नवी जन्मेन मी ! ” खऱ्या अर्थाने लागू पडतात शाळा-महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यांना !

      January 27, 2023


  • मुरुडचे परब कुठे गेले

    साधीभोळी माणसं ही सोलकढी किंवा पेढे असतात. काही दिवस टिकतात आणि नंतर आठवणी मनाच्या कोपऱ्यात ठेवून निघून जातात. अशा माणसांचा पत्ता नसतो, मोबाईल नंबर नसतो, त्यांचा ईमेल आयडी, फेसबुक प्रोफाइल नसतो. पण ते कुठे ना कुठे असतात. असेच एक आहे मुरूडचे परब. त्यांची ओळख करून देत आहेत निरेन आपटे.

      March 19, 2026


  • ब्रेड (Bread)

    पांढरा ब्रेड वाईट आणि ब्राऊन ब्रेड चांगला ही आपली नेहमीची अंधश्रद्धा.

      April 6, 2017


  • अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ८

    अमेरिकेतल्या अस्वलांमधे ग्रीझली बेअर्स आणि ब्लॅक बेअर्स हे दोन प्रकार. ग्रीझली अस्वलं कॅनडामधे आणि अमेरिकेच्या वायव्येकडच्या राज्यांमधे प्रामुख्याने आढळतात. कॅनडा आणि अमेरिकेमधली सीमा रेषा ही उघडीच असल्यामुळे या सीमेलगतच्या भागात ग्रीझलीज मोकळेपणाने दोन्ही देशांमधे ये जा करत असतात. एकंदर ग्रीझलीजची संख्या सुमारे ६०,००० असावी असा अंदाज आहे. त्यांतील बहुतेक कॅनडातच आहेत तर अमेरिकेच्या वायोमींग, मॉंटेना, आयडॅहो, वॉशिंग्टन या राज्यांमधे मिळून १५०० ग्रीझलीज असावेत.

    काळ्या अस्वलांच्या मानाने ग्रीझलीज आकारमानाने खूपच मोठे असतात. ४००-५०० किलो वजनाच्या या ग्रीझलीजना काळ्या अस्वलांप्रमाणे सराईतपणे झाडावर झरझर चढता येत नाही. अशा प्रकारे पलायनाचा मार्ग खुंटल्यामुळे संकटाची थोडीशी जरी शंका आली तरी ग्रीझलीज आक्रमक बनतात. विशेषत: लहान बच्चे बरोबर असले तर मादी फारच आक्रमक बनते. ग्रीझलीजच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडणार्‍या लोकांपैकी सुमारे ६०% मृत्यू हे अशा चवताळलेल्या माद्यांमुळे होतात. ग्रीझलीज शक्यतो माणसांपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतात. ग्रीझलीजच्या परिसरात कॅंपींग करण्यासाठी जाणार्‍या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागते. ग्रीझलीजचे घ्राणेंद्रीय फारच तीक्ष्ण असते, आणि कॅंपच्या जवळपास निष्काळजीपणाने टाकलेलं खाद्य किंवा डबे म्हणजे संकटाला निमंत्रणच ! एकदा का ते कॅंप्सच्या जवळ यायला चटावले की ते धीट बनतात आणि माणसावर हल्ले करायला मागे पुढे पहात नाहीत. बर्‍याचदा अशा ग्रीझलीजना गोळी घालून ठार मारण्याशिवाय पार्क रेंजर्सपुढे काही उपाय रहात नाही. त्यामुळे अशा कॅंपसमधे दोन झाडांच्यामधे उंचावर एक दोरी लावून त्यात शिंकाळ्यासारखं खाद्य बांधून ठेवण्याची पद्धत असते.

    शक्यतो काळी अस्वलं, ग्रीझलीजच्या प्रदेशात फिरकत नाहीत परंतु पाईन नट्स, एकॉर्नस, बेरीज असा काही शाकाहारी आहार दोघांच्याही आवडीचा असल्यामुळे, त्याच्या शोधार्थ ग्रीझलीज कधी कधी काळ्या अस्वलांच्या प्रदेशात प्रवेश करतात. कधी ग्रीझलीज आणि काळ्या अस्वलांची आमने सामने गाठ पडलीच तर ग्रीझलीजच्या मोठ्या आकारमानामुळे आणि आक्रमतेमुळे, काळी अस्वलं घाबरून पळ काढतात. वायोमींग राज्यातल्या यलोस्टोन नॅशनल पार्क या जगप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानामधे ग्रीझलीज आणि लांडगे ह्या कट्टर शत्रूंची अनेकदा एकमेकांशी गाठ पडते. बहुतेक वेळा लांडग्याच्या कळपाने एखाद्या एल्कची शिकार केलेली असते आणि शिकारीच्या वासानं एखादं ग्रीझली ऐनवेळी तिथे येऊन टपकतं. मग लांडग्यांचा कळप आणि ग्रीझलीचा, उंदीर-मांजराचा खेळ चालतो. ग्रीझलीच्या मोठ्या आकारमानामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे, लांडगे ग्रीझलीवर समोरासमोर हल्ला करण्याचं धाडस करत नाही. कधी गनिमी कावा करून एखादा लांडगा ग्रीझलीचं लक्ष विचलीत करतो आणि तोवर बाकीचे लांडगे भक्षाचे लचके तोडून पळ काढतात. तर कधी कधी दोन तीन लांडगे एकत्र येऊन ग्रीझलीच्या पुठ्ठ्यावर पाठीमागून हल्ले करून त्याला बेजार करून सोडतात. ग्रीझलीचा आहार शाकाहारी, मांसाहारी असा संमिश्र असतो. मूस, हरीण, एल्क, बायसन, करीबू अशा प्राण्यांची शिकार करण्यात ग्रीझलीचा हातखंडा असतो. कधी कधी काळ्या अस्वलांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडायला देखील ते मागे पुढे पहात नाहीत. ग्रीझलीजना मासे देखील फार आवडतात, त्यामुळे नद्या, ओढ्यांच्या उथळ भागात उभं राहून, पंजाच्या फटक्याने सामन, ट्राउट, बास जातीचे मासे मारून ते खातात. ग्रीझलीजना मेलेल्या प्राण्यांचं मांस खाण्याचं देखील वावडं नसतं.

    थंडीचा मोसम जवळ येऊ लागला की ग्रीझलीज भरपूर खाऊन शरीरामधे चरबीचा संचय करून घेतात. थंडीच्या ऐन कडाक्यात ६००० फुटांवर, उत्तरेकडच्या डोंगर उतारांवर, खोबणी, बीळांमधे जाऊन ग्रीझलीज झोपी जातात (hibernation). थंडीचे हे काही महिने ते पूर्णपणे झोपूनच काढतात. परंतु काही ठिकाणी मात्र जिथे वर्षभर अन्न मिळतं, तिथे ग्रीझलीजना असं थंडीमधे झोपी जावं लागत नाही.

    ग्रीझलीजचा संचार कॅनडा आणि अमेरिकेच्या उत्तरेकडच्या राज्यांपुरता सिमीत असला तर त्यामानानं काळी अस्वलं सर्वत्र आढळतात. अलास्कापासून खाली मेक्सिकोपर्यंत आणि अटलांटिक पासून पॅसिफिकपर्यंत सर्वत्र त्यांचा संचार असतो. तपकिरी रंगाची अस्वलं (त्यात ग्रीझलीज देखील आले) ही युरेशियातून आलेली तर काळ्या अस्वलांचा उगम सुमारे २ दशलक्ष वर्षांपूर्वी अमेरिकेतच झाला. काळी नर अस्वलं १५०-१७५ किलो वजनाची असतात (काही थोराड नर चक्क ३००-३५० किलो वजनाचे असतात) तर माद्या १००-१५० किलो वजनाच्या असतात. काळी अस्वलं साधारणपणे जंगलात आणि झाडाझुडपांच्या गर्दीमधे रहाणं पसंत करतात. परंतु कधी कधी शेतांच्या कडेला, माळरानात देखील ही आढळतात.

    हिवाळ्यात, झाडांच्या मोठ्या ढोल्यांमधे, मोठ्या दगडांच्या किंवा ओंडक्यांच्या खाली, नद्यांच्या सुकलेल्या पात्रांमधे तयार झालेल्या खबदाडीमधे, बीळांमधे, ती झोपी जातात. पेनसिल्व्हेनियामधे डोंगराळ, दाट झाडींच्या भागामधे काळी अस्वलं खूप आहेत. काही वेळा स्थानिक वर्तमानपत्रांमधे त्यांच्या बातम्या यायच्या. काही वेळा या डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमधे, एखाद्या घराच्या डेक खाली, अडगळीमधे जागा शोधून, एखादं काळ अस्वल झोपी गेलेलं हिवाळ्यात आढळून यायचं. मग वनखात्याचे लोक येऊन त्याला गुंगीचं औषध देऊन पकडायचे आणि दूर जंगलात सोडून यायचे. कधीतरी कोणाच्यातरी आवारामधे अस्वलांचे ठसे दिसणं, बागेच्या कुंपणांच्या खांबांवर, झाडांच्या बुंध्यांवर त्यांच्या नखांचे ओरखाडे दिसणं हे देखील बरेचदा व्हायचं. आडवाटेच्या रस्त्यानं जाताना तर बरेचदा एखादं एकांड अस्वल किंवा मादी आणि एखाद दुसरं पिल्लू दुडक्या चालीने रस्त्याच्या कडेच्या गवतातून चालताना दिसायचे.

    स्प्रिंग सीझनमधे नव्यानेच जन्मलेले बछडे बिळांतून, ढोल्यांतून बाहेर पडून हिंडा फिरायला लागतात. बछड्यांच्या जवळपासच त्यांची आई देखील असते आणि संकटाची चाहूल लागताच ती बछड्यांना झाडावर चढायला लावते. पहिला हिवाळा संपेपर्यंत बछडे सततच आई बरोबर असतात आणि साधारणपणे दीड वर्षांचे झाले की स्वतंत्रपणे हिंडू लागतात. काळ्या अस्वलांचा आहार देखील संमिश्र असतो. छोटी फळं, बिया, यांच्याच बरोबरीने कीटक, वाळवी, मुंग्या, मधमाश्या वगैरे देखील त्यांच्या आहारात असतात. खारी, उंदीर सश्यांसारख्या छोट्या प्राण्यांबरोबरच हरणाची छोटी शावकं देखील ते मारतात. मरून पडलेल्या प्राण्यांचं मांस देखील त्यांना वर्ज्य नसते. ग्रीझलीज प्रमाणे काळ्या अस्वलांना देखील सामन, ट्राउट हे मासे पकडून खायला आवडतं. ग्रीझलीजच्या मानाने काळी अस्वलं मनुष्यवस्तीच्या बरीच जवळ येतात. कॅंप साईट्सवर येऊन तंबूंच्या आसपास पडलेलं खाणं धुंडाळणं हा त्यांचा आवडता उद्योग असतो. गावांमधे येऊन कचर्‍यांचे डबे शोधायला किंवा शेळ्या, मेंढ्या, वासरांवर हल्ले करायला देखील हे मागे पुढे पहात नाहीत.


    अमेरिकेतल्या वन्यप्राणी जीवनाच्या मानाने भारतातले वन्यप्राणीजीवन कैकपटींनी अधिक वैविध्यपूर्ण आणि रोमांचक आहे, यात काही वाद नाही. गीरच्या जंगलात उरलेले थोडेफार एशियन वंशाचे सिंह, एशियन हत्ती, वाघ, काझीरंगाच्या जंगलातले गेंडे, उडत्या घारी, कच्छच्या वाळवंटातली वन्य गाढवे, हिमालयात आढळणारे स्नो लेपर्डस, नाना प्रकारचे पक्षी, साप, ….. किती नावे घ्यावीत? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या अद्भूत नैसर्गिक ठेव्याची आपण अक्षम्य अशी हेळसांड करत आहोत. जंगले नष्ट होत चालली आहेत. कित्येक पशूपक्षांच्या जाती नष्ट झाल्या आहेत, होत आहेत. जंगलांच्या आसपास रहाणार्‍या खेडुतांची जीवनप्रणाली आणि वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने यांच्यातील संघर्ष वाढतच जात आहे. शेती, नागरी वस्त्या आणि तथाकथित आधुनिकता आपले पाश फैलावून, निसर्गाचा आणि त्याच्याशी निगडीत नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करत आहे.

    अमेरिकेची इतर अनेक बाबतीत नक्कल करण्याचा प्रयत्न करणारे आपण, त्यांच्याकडून, निसर्ग आणि वन्यप्राणीजीवनाच्या संवर्धनाच्या बाबतीत काहीतरी शिकणार आहोत का?

    -- डॉ. संजीव चौबळ

      December 24, 2016


  • माझी चेन्नई सफर

    माझा हा चेन्नई प्रवास साधारणपणे २७ तासांचा होता व गेली कित्येक वर्षे मी इतक्या लांबवरचा प्रवास केलेला नसल्यामुळे हे २७ तास कसे पार पडणार याबद्दल शंकाच होती. त्यात हा दक्षिणेकडचा प्रदेश अगोदरच मिळालेल्या ब-या-वाईट अशा ब-याच मत-मतांतरांमुळे मनात उगीचच घर करून बसलेला. परंतु चिरंजीवांना भेटण्याच्या निमित्ताने व आनंदात नवीन प्रदेश पहावयास मिळणार असल्यामुळे दुःखापेक्षा सुखच अधिक वाटत होते

      January 31, 2012