(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक पियानो दिवस

    दी चित्रपटांतील सुमधुर संगीतातून ठसा उमटविलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकार जोडगोळीतील शंकर यांचा पियानो पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात तयार करण्यात आलेला हा पियानो सुमारे ९० वर्षांपूर्वीचा आहे. स्कीडमायर कंपनीच्या या अप्राइट पियानोमध्ये साडेसात सप्तकातील ८८ पट्ट्या आहेत. संगीतकार नौशाद हे स्वत: उत्तम पियानोवादक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या अनेक गाण्यांत पियानोचा वापर केला आहे. ‘अनमोल घडी’ या चित्रपटात ‘जवाँ है मुहब्बत हसीं है जमाना..’ या नूरजहाँने गायलेल्या गाण्यात पियानोचे दर्शन घडते.

      March 29, 2022


  • ज्येष्ठांचे आयडियल आरोग्य

    म्हातारपण म्हणजे दुसऱ्यांदा जगण्याचे बालपण. आपले वय जसे जसे वाढत जाईल तसे तसे आपला विचार करण्याचा दर्जा हा वाढतच गेला पाहिजे. म्हातारी माणसं नेहमी म्हणत असतात की आम्ही इतके पावसाळे पाहिले आहेत. पण पावसामुळे तुमच्यात किती पाणी शिरले आणि त्या पाण्याचा तुम्ही किती आणि कसा उपयोग केला यावर तुम्ही अनुभवापासून काय काय शिकला ते ठरत असते.

      December 20, 2024


  • श्री कनकधारा स्तोत्रम् – ११

    श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफल प्रसूत्यै रत्यै नमोऽस्तु रमणीय गुणार्णवायै। शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतानायै पुष्टयै नमोऽस्तु पुरूषोत्तम वल्लभायै।।११।।

    विविध रूपामध्ये भक्त कल्याणाचे कार्य करणाऱ्या श्रीमहालक्ष्मीच्या चार विविध रूपांचे वर्णन आचार्यश्री येथे करीत आहेत. श्रुती, रती, शक्ती आणि पुष्टी अशा चार रूपात आई जगदंबेचे कार्य चालते. त्यांना वंदन करतांना आचार्यश्री त्यांच्या कार्याचे स्वरूपही स्पष्ट करीत आहेत.

    श्रुत्यै नमोऽस्तु- आईच्या श्रुती स्वरूपाला नमस्कार असो. जी,

    शुभकर्मफल प्रसूत्यै- शुभ कर्माचे फळ निर्माण करते.

    शुभ, पवित्र, पुण्यदायक कार्याचे मार्गदर्शन वेदात, शास्त्रात दिलेले असते. याच कारणाने वेदाला श्रुती म्हणतात.

    रत्यै नमोऽस्तु- जगदंबेच्या रती स्वरूपाला नमस्कार असो. रती म्हणजे आवड. मानवाला कशाची आवड असावी? तर रमणीय गुणार्णवायै- रमणीय अर्थात आनंददायक. गुणार्णव म्हणजे गुणांचा सागर. तशी अपार गुणसागर असणारी आई महालक्ष्मी भक्तांच्या मनात रती रूपात कार्य करते.

    शक्त्यै नमोऽस्तु- आईच्या शक्ती स्वरूपाला नमस्कार असो. जी शतपत्रनिकेतानायै- शतपत्र अर्थाची शेकडो पाकळ्यांचे कमळ. त्यामध्ये निवास करणारी. एवढं जसे महालक्ष्मीच्या रूपाचे आहे तसेच मूल बुद्धी स्वरूपाचे आहे. मानवी मेंदू मध्ये असणाऱ्या सहस्त्रार चक्रात निवास करणाऱ्या आदिशक्तीचे ते वर्णन आहे.

    पुष्टयै नमोऽस्तु- भगवती पुष्टीला वंदन असो.जी

    पुरूषोत्तम वल्लभायै- भगवान पुरुषोत्तम अर्थात श्रीविष्णूंची वल्लभा अर्थात प्रियतमा आहे.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 20, 2020


  • अंतर्गत बदल करताना तुळया खांब काढणे कितपत श्रेयस्कर?

    बरेचदा रहिवाशांच्या सोयीसाठी घरातील खोल्यांची, भितींची रचना बदलावी लागते. रहिवासी उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करू इच्छितात. तसेच अंतर्गत सजावट ही रहिवाशांच्या आवडीनिवडीचे प्रतीक असते. मग हे सगळे करताना पुष्कळदा एखादा खांब अगदीच मध्ये येतो. सगळा देखावाच बिघडतो किंवा एखादा खांब काढल्याने खोलीचा एकूण आकार मोठा वाटू लागतो.

      January 7, 2023


  • गाढवांची कहाणी

    गाढवांची कहाणी

    सपाट प्रदेश असो वा डोंगराळ प्रदेश असो, जंगलातला प्रदेश असो वा वैराण प्रदेश असो, उष्ण प्रदेश असो वा थंड प्रदेश असो… कोणत्याही प्रदेशातून निमूटपणे भार वाहून नेण्याचं काम करणारा प्राणी म्हणजे गाढव. घोड्याचा भाऊबंद असणारा हा प्राणी गेली हजारो वर्षं, त्याच्या पाठीवर टाकलेला भार इमानेइतबारे वाहतो आहे. जगात अनेक ठिकाणी आढळणारा हा ‘गरीब बिचारा’ प्राणी उत्क्रांतिशास्त्राच्या अभ्यासकांकडून दुर्लक्षित राहिला आहे.

      November 8, 2022


  • आंदोलन नव्हे, प्रतियोगिता परीक्षांची तैयारी करा

    जन्मापासून दिल्लीत रहात असलो तरी महाराष्ट्रात जावेच लागतेच. एकदा नागपूरला गेलो असताना सहज नाक्यावर उभ्या काही तरुणांशी चर्चा केली.  बहुतेक मराठी तरुण सरकारी परीक्षांची तैयारी करतच नाही. काही तरुण  कालेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सरकारी नौकरीचा विचार करतात. फार्म भरल्यानंतर ३-४  महिन्यांच्या अर्धवट तैयारीवर, परीक्षा पास करण्याचे स्वप्न बघतात, जे संभव नाही. मग सुमार बुद्धीचे इतर भाषिक परीक्षा पास होतात आणि हुशार मराठी तरुण, पूर्ण व नियमित तैयारी नसल्यामुळे, असफल होतात.

      August 25, 2018


  • सुरक्षित गुंतवणूक

    कोविड- १ ९ महामारीचा परिणाम व्यक्तिगत , सामाजिक स्तरावर आणि पर्यायाने विविध संस्थांवर झपाट्याने होत आहे वा झाला आहे . जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा अतिशय विपरीत परिणामही झालेला दिसून येत आहे . सर्वच विस्कळित झाले आहे . एकंदरीत सगळीच अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये .

      October 20, 2022


  • कर्करोगाचा प्रतिबंध

    बहुतांश कर्करोग माणसाची जीवनशैली, आवड-निवड, व्यसन, आहार, वातावरण, व्यवसाय इत्यादीत होणाऱ्या कर्करोगकारक संपर्कामुळे होतो. गेल्या चार दशकात कर्करोग निदानशास्त्र, वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा व इतर उपचारपद्धती यात प्रचंड सुधारणा झाली. रोग प्रथमावस्थेत असताना रोगी प्रचलित प्रभावी उपचार पद्धतींमुळे संपूर्ण बरे होतात. रोगाचे द्वितीय किंवा तृतीय अवस्थेत निदान होते त्यांना आधुनिक उपचाराने काही वर्षे रोगमुक्त सुदृढ आयुष्याचे वरदान लाभते.

      May 28, 2023


  • मौखिक आरोग्य सांभाळा

    दातांची काळजी कशी घ्यावी आणि मौखिक आरोग्य कसे जपावे याचे मार्गदर्शन डॉ. उल्हास वाघ यांनी केले. महान्यूजच्या सौजन्याने ही प्रश्नोत्तरे खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी………

      October 5, 2010


  • राईचा पर्वत!

    राघोबा दादांनी नारायणला ‘धरावे’ असा आदेश गारद्यांना दिला आणि आनंदीबाईंनी ‘ध’चा ‘मा’ करीत पेशव्यांच्या इतिहासातील एका काळ्याकुट्ट प्रकरणाला जन्म दिला. केवळ अक्षर बदलले आणि शनिवारवाड्याच्या भिंती कोवळ्या, निष्पाप नारायणाच्या रक्ताने न्हाऊन निघाल्या. एखादे अक्षर, एखादा शब्द किंवा एखादे वाक्य!

      December 26, 2004