(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • द्वादशलिंग स्तोत्रम् – ४

    देवांचे खजिनदार असणाऱ्या भगवान कुबेरांनी भगवान श्री शंकराची उपासना केल्यानंतर त्यांच्या आनंदा करता भगवान शंकरांनी निर्माण केलेला जलप्रवाह म्हणजे नर्मदेची उपनदी कावेरी.

      September 7, 2020


  • बुद्धीजिवी नागरिकांना आवाहन

    पण मध्यमवर्गीय बुध्दीजीवी लोकांनी आपली विचारसरणी बदलली नाही तर लवकरच पुन्हा परकिय राजवट किंवा असामाजिक विचारांचे लोक सत्ता बळकावून देशाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत.

      July 16, 2017


  • पुण्यातील ‘राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचा’ वर्धापनदिन

    ‘चित्रपट संग्रहालय’ ही संकल्पना आपल्या देशात सिनेमाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला तरी अस्तित्वात आली नव्हती. १९५१ च्या पाटील कमिटीच्या शिफारसीनंतर, चित्रपटाच्या आगमनाच्या ६०-६५ वर्षांनंतर- म्हणजे फेब्रुवारी १९६४ मध्ये भारतात राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचे कार्य पुण्यात सुरू झाले. प्रथम फिल्म इन्स्टिटय़ूटच्या आवारात ‘फिल्म लायब्ररी’ म्हणून तिचे अस्तित्व होते.

      February 1, 2022


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तेरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग चार

    काही वेळा चिकित्सा पत्रके पाहून असे वाटते की, रोग परवडला पण औषधे आवर. एका औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे, तिसरे... चौदा चौदा औषधे दिवसभरात. एखादा रूग्ण सकाळ दुपार रात्रीच्या फेऱ्यात कमीत कमी वीस वेळा तरी औषधं घेत असेल ! परत एवढ्या वेळा पाणी प्यायचे. बरं पाणी कमी प्यायले तर अंगाचा भडका होईल, एवढी उष्णता वाढते. करायचे तरी काय ? आणि जेवायचे तरी कधी ?

    बरं औषध बंद करायची पण भीती वाटते, न जाणो चुकुन काही झाले तर ? कोणतातरी रिपोर्ट वाढला, कमी झाला तर ? रोगाविषयी एवढी भीती निर्माण करून ठेवली जाते की, औषधांचे दुष्परिणाम झाले तरी चालतील, किंबहुना ते गृहीतच धरले जातात.

    भारत सरकारने जीवनावश्यक म्हणून अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांची जी यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्यात फक्त दीडशे ते दोनशे औषधे प्रकारची औषधे असतील. पण मार्केटमधे आज किमान पन्नास साठ हजार प्रकारची मिश्र औषधे विकली जात आहेत. ब्रुफेन सारखी काही औषधे तर प्रगत राष्ट्रामधे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच बॅन झालेली आहेत. पण भारतात मात्र ही औषधे आज भी धडल्ले से बेची जा रही है. डाॅक्टरांच्या चिठीशिवाय काऊंटरवर सुद्धा विकली जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. सावध आपणच रहायला हवे. सरकार तरी किती ठिकाणी लक्ष ठेवणार ना ?

    औषधकंपन्याचा प्रचंड नफा हे या मागील खरे राजकारण आहे. जेनेरीक मेडीसीन आणि कंपन्यांनी बनवलेल्या औषधांच्या दरामधे असलेला फरक लक्षात घेतला, की समजेल किती नफा कंपन्या मिळवतात ते !

    येनकेण प्रकारे औषधे विकायची त्यासाठी वाट्टेल ते प्रकार अवलंबायचे, हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षडयंत्र गेली कित्येक वर्षे सुरू आहे.

    असो.

    एक विनोद म्हणून सांगावासे वाटते. आजारी पडलो की, डाॅक्टरांकडे जायचे, त्यांची जी फी असेल ती फी कुरकुर न करता द्यायची, कारण डाॅक्टर जगला पाहिजे. सांगितलेल्या सर्व तपासण्या करायच्या, कारण पॅथाॅलाॅजिस्ट जगला पाहिजे. परत डाॅक्टरांकडे जाऊन जी औषधे लिहून दिली जातात, ती केमिस्ट कडून विकत आणायची, कारण केमिस्ट जगला पाहिजे.
    आणि...
    ....... आणलेली सर्व औषधं तशीच ठेवून द्यायची कारण........
    .....
    ....
    ...
    ..
    .
    आपण जगलो पाहिजे.

    विनोदाचा भाग सोडला तर परिस्थिती फार गंभीर आहे. नवीन औषधे शोधून शोधणार तरी किती ? मुळ द्रव्ये तर तेवढीच आहेत. त्यातील मुलद्रव्यांमधे, थोडाफार तर तम भावात फरक करून नवीन औषध करण्या पलीकडे गाडी पुढे जात नाहीये. मंदी येऊ नये, यासाठी सुद्धा काही वेळा विशिष्ट रोगाविषयी "हॅवाॅक" निर्माण केला जातो. याच्यामागे देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे भीती निर्माण करायची आणि आपला माल खपवायचा !

    हे लिहिलेलं सुद्धा काहीजणांना "अति" कॅटेगरीमधील वाटेल. पण शेवटी सत्य कटू असते. कुठेतरी कोणाला तरी बोचणारच !
    इलाज नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.04.2017

      April 22, 2017


  • महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी

    राष्ट्रनिमिर्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या तीन द्रष्ट्या व्यक्तींनी राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

      November 19, 2021


  • मालवून टाक दीप

    परवा खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं. शृंगार रस सुद्धा इतका विभोर करणारा असू शकतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे हे गाणं. किती हळुवार प्रेमाचे एकएक पदर उलगडत जातात ह्या गाण्यात. लताबाईंचा आवाज आणि हृदयनाथांचे स्वर्गीय संगीत केवळ वर्णनातीत. शृंगार रसाचे हे गाणे आपण अगदी चार चौघात बसून ऐकू शकतो. मी तर हे गाणे माझ्या मुलीबरोबर पण ऐकले आहे. आम्ही बोललो आहे ह्या गाण्यावर. कधीच लाज नाही वाटली ह्या वर बोलतांना.

    हल्ली सगळेच खुल्लमखुल्ला जगण्याचे पुरस्कर्ते झाले आहेत. त्यात काय एवढं? म्हणत हि पिढी आपल्यालाच नाकं मुरडते. पण प्रेम खरच चार लोकांना दाखवण्यासाठी आहे का हो? का चार लोकात करण्यासाठी? अगदी दुसऱ्याच्या भानगडीत आपण कशाला नाक खुपसा म्हंटल तरी मग चार लोकात नसते उद्योग करू नका ना, असं म्हणायची वेळ येते. आमच्या घराच्या मागे नदी आहे, नदी पलीकडे एक छान रस्ता आहे, दुपारी कधीतरी चुकून त्या रस्त्यावर गेलं तर खरंच सांगते तुम्हीच लाजाल इतके प्रेमाचे थेरं चालतात तिथे. थेरच... ते प्रेम नाहीच मुळी. घरा मागेच नदी असल्यामुळे पावसाळ्यात आम्हाला जरा टेंशन असतं पाण्याची पातळी वाढली की. मग काय पाण्याची पातळी किती झाली हे पाहण्यासाठी आम्ही दोघे गेलो त्या रस्त्यावर, दोन मिनिटंसुद्धा तिकडे उभे राहता आले नाही. 'कामातुराणां न भयं न लज्जा'. भर रस्त्यावर, अगदी दिवसा-ढवळ्या मिठ्या काय, चुंबन काय आणि काय काय? मला खरंच असं झालं की दोन मिनिटं थांबून त्या प्रेमवीरांना विचारावे, काय करताय बाबांनो? शिकता ? प्रेम म्हणजे काय हे तरी कळतंय का? असे किती दिवस एकमेकांना ओळखता? आणि तुमच्या प्रेमाची ओळख पटायला काय केलंत तुम्ही? का तुम्हला असा एकटा रस्ता निवडावासा वाटला? का एखाद्या कॅफेत गेल्यावर जे परिवार बरोबर येतात त्यांना तिथे बसवत सुद्धा नाही? इतकी कसली घाई आहे तुम्हाला ? प्रेम म्हणजे फक्त असे स्पर्श? बाकी काहीच नाही ? तो स्पर्श सुद्धा इतका वासनेने बरबटलेला? त्या स्पर्शाची सगळी गम्मतच घालवूं बसलात रे तुम्ही, असं ओरडून सांगावस वाटत होतं, पण ह्यातलं काहीच न बोलता आम्ही दोघेही मान खाली घालून तिथून माघारी फिरलो.

    पण डोकं शांत बसे ना. असं वाटलं काय करून आपण ह्या नव्या पिढीशी संवाद साधू शकू? मग लक्षात आलं हा संवाद फक्त नव्या पिढीशीच नाही तर अगदी माझ्या वयाच्या पिढीशी पण तेवढाच गरजेचा आहे. आमच्या पिढीतही हे अनेक प्रकाराने दिसून येतं, विवाह बाह्य संबंध ह्याचेच परिणाम आहेत. आम्ही जसे मोठे होतं गेलो त्यावेळी आमच्या आई-वडिलांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली, जी गोष्ट करतांना तुम्हाला चार-चौघात सांगायची लाज वाटेल, भीती वाटेल, आमच्या समोर आमच्या नजरेत नजर मिळवून तुम्ही त्या गोष्टीची चर्चा करू शकणार नाही ती गोष्ट नक्कीच वाईट/चुकीची असणार.

    मला सिनेमा बघायला फारच आवडतं. पण सिनेमा बघतांना सुद्धा आपली विवेक बुद्धी जागृत असावी असा माझा अट्टाहास आहे. हल्लीच प्रदर्शित झालेला मुंबई पुणे मुंबई २ बघतांना मला जाणवलं का हा सिनेमा प्री मॅरेज कॉन्सेलिंग साठी एक उत्तम उदाहरण ठरू शकतो. नातं हळू हळू उलगडण्यात जी मजा आहे , ती ओरबाडून घेतलेल्या क्षणिक स्पर्शात नक्कीच नाही. ओरबाडून घेतलेल्या म्हणतेय मी कारण अगदी दोघेही समजदार असले आणि समजून घडलेलं असलं तरी ते ओरबाडलेलं एवढ्या साठी की वेळेची गरज नव्हती, ती फक्त शरीराची गरज होती. आणि प्रेम शरीराच्या फार वर आहे.

    स्पर्श किती हिम्मत देतो आपल्या जगण्याला. अगदी मायेने ओथंबलेला आईचा स्पर्श, शाबासकी म्हणून बाबांची पाठीवर थाप, भावा बहिणींचा एकमेकांना होणार मारामारीच्या वेळेचा स्पर्श, मित्रत्वाने भरलेला आश्वासक स्पर्श, बाळाचा आईला होणार गोड स्पर्श आणिकही कितीतरी. प्रत्येक स्पर्श भावानेच परिमाण घेऊन येतात आणि आपलं नातं अणिकच घट्ट विणत जातात. मग ह्या स्पर्शातले बदल आपली नवी पिढी समजू शकली नाही, की आपण पालक म्हणून ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवू शकलो नाही, हा प्रश्न उरतोच.

    प्रियकर-प्रियसी, पती-पत्नी ह्या नात्यातले काही स्पर्श तर फार फार सुंदर असतात. प्रेमाची ग्वाही देणारे असतात. त्या स्पर्शात केवढी तरी ताकद असते, येणारे कितीतरी कठीण क्षण पचवण्याची, नात्यात आलेले चढ-उतार सहज पार करण्याची. त्या पहिल्या स्पर्शाच्या आठवणी किती तरल असतात, त्यात एकाच वेळी किती तरी भावना दडलेल्या असतात, ही स्पर्शची एकरूपता आपल्या अध्यात्मातल्या समाधी इतकी खोल आहे. त्याचा असा बाजार मांडून काय मिळणार?

    "काय हा तुझा श्वास, दरवळे इथे सुवास
    बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग"

    आपल्या बोलण्याने, जे फक्त आपल्या दोघांचेच आहे, ज्याची दखल त्या चांदण्यांनी सुद्धा घेता कामा नये, इतकं हे पर्सनल आहे. इतकं हे त्या दोघांचेच आहे. मी नवीन पिढीला दोष देण्या आधी पालक म्हणून स्वतःला तपासून बघते. आम्ही आमच्या पुढच्या पिढी पर्यंत ह्या स्पर्शाची ताकद पोचवू शकण्यात कुठेतरी कमी पडलो म्हणून आमची मुलं तो स्पर्श आणि त्याचे न समजलेले अर्थ घेऊन वाहवत जातांना दिसतात.

    मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
    राजसा किती दिसात, लाभला निवांत संग

    © सोनाली तेलंग
    २४/०७/२०१८

      October 14, 2018


  • मलेरिया रोगाची लक्षणे व चिन्हे

    मलेरियाचे मुख्य लक्षण म्हणजे ताप येणे असून त्यासोबत इतर अनेक लक्षणे रुग्णात आढळतात , जी रोगाचे निदान करण्यास उपयुक्त ठरतात . बरेच वेळा रोगाची सुरवात सामान्यपणे आढळणारा फ्लू अथवा Viral Fever असावा त्याप्रमाणेच होते . डोके दुखणे , थकवा वाटणे , पोटात बारिकसे दुखणे , स्नायू व सांधे दुखणे , भूक मंदावणे व अन्नावरील वासना उडणे , उलट्या होणे आणि शरीर गलितगात्र होणे अशा प्रकारच्या लक्षणांनी सुरवात होते .

    मलेरियाच्या तापामध्ये साधारणत : एक विशिष्ट पद्धत दिसून येते . अ ) अंगात कणकण वाटणे व अंग थंड पडणे - ही परिस्थिती २० मिनिटे ते १ तासापर्यंत टिकते ब ) नंतर प्रचंड हुडहुडी भरते जी दोन , तीन ब्लॅन्केटस् अंगावर घेऊनसुद्धा थांबत नाही . मलेरियामध्ये हुडहुडी हे फार महत्त्वाचे लक्षण आहे . यात थंडी भरून येताना रुग्णाची जी दमणूक होते तो अनुभव विलक्षण असतो . तो आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतो . या बरोबर ताप वाढत जाऊन अगदी १०४ ° ते १०५ ° पर्यंत चढू शकतो . याचा काळ १ ते ४ तास टिकतो . अकस्मात होणारी तापामधील वाढ बरेचदा रात्रीपेक्षा दुपारी माध्यान्हीच्या कालानंतर जास्त असते . क ) नंतर दरदरून घाम येण्यास सुरवात होते . हा काळ साधारण २ ते ३ तास राहतो . एकूण तापाचा कालावधी ६ ते १२ तास असतो .

    मलेरिया परोपजीवींच्या गटानुसार उदा . P. Vivax व P. Falciparum यामध्ये तापाची पद्धत वेगवेगळी असते . तापाचे कालचक्र ४८ किंवा ७२ तासानंतर पुन्हा परत सुरू होऊ शकते . त्यावरुन कोणत्या पद्धतीचा मलेरिया आहे याचे ढोबळ निदान करता येते .

    Plasmodium Vivax Malaria ( Benign )
    बहुतेक वेळा या प्रकारच्या परोपजीवांमुळे होणारा मलेरिया तुलनेने कमी
    धोकादायक असतो . गंभीर स्वरूपाचे परिणाम सहसा आढळत नाहीत . परंतु Vivax गटाचे परोपजीवी ( Schizonts ) या स्थितीत असताना यकृतामध्ये ( Liver ) सुप्तावस्थेत राहतात . योग्य संधी मिळताच ते रक्तात शिरतात व पुन्हा मलेरियाचा ताप येऊन सोबत लक्षणेही दिसू लागतात . तो केव्हाही पुन्हा उद्भवू शकतो . याला ( Relapse ) परत येणारा ताप म्हणतात . त्यावेळी मात्र डास न चावताच हा ताप रुग्णाला परत आलेला असतो .

    Plasmodium Falciparum Malaria
    बरेच वेळा ताप येण्याची पद्धत वरील वर्णन केलेल्या पद्धतीप्रमाणे अजिबात नसते . या ठिकाणी काही वेळा रुग्णाला ताप १०० ° ते १०१ ° एवढाच असतो . काही वेळा सातत्याने दोन दिवस सतत ताप अंगात राहतो . थंडी किंवा हुडहुडी वाजण्याचे प्रमाण कमी जास्त होत असते . परंतु अशा रुग्णात मलेरियाच्या परोपजीवांचे प्रमाण जास्त असेल वा निदान बरोबर न झाल्याने औषधोपचार उशीरा चाल झाले असतील तर , किंवा हे परोपजीवी मलेरिया विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या नेहमीच्या औषधांना प्रतिसाद न देणारे असतील तर मात्र हा रोग गंभीर स्वरूप धारण करू शकतो . खेदाची गोष्ट अशी की काही वेळा रुग्ण दगावूही शकतो .

    Falciparum मुळे घातक स्वरूपातील होणारे मलेरियाचे ( Pernicious Malaria ) मुख्य तीन प्रकार आढळतात .

    १ ) मेंदूत पसरणारा मलेरिया : ( Cerebral Malaria )
    मेंदूमधील रक्ताच्या केशवाहिन्यातील ( Blood Capillaries ) तांबड्या रक्तपेशीत मलेरियाचे परोपजीवी पसरतात त्यामुळे मेंदूतील पेशींवर जबरदस्त आघात होतो . अशा रुग्णांना गुंगी वा सुस्ती येणे अशा लक्षणाने सुरवात होते . काही तासात रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत जातो . मानेच्या तसेच हातापायांच्या वेड्यावाकड्या हालचाली होतात . लहान मुलांमध्ये आकडी येते . काही वेळा लकव्यासारखी लक्षणे दिसू लागतात . ( Paralysis ) मलमूत्रावरील ताबा जाऊ शकतो . मेंदूमधील Hypothalamus भागावर परिणाम झाला तर ताप १०६ ° ते १०७ ° पर्यंत जाऊ शकतो . मृत्यूची शक्यता अशा वेळी जास्त असते .

    २ ) Algid Malaria : शरीरातील सर्व रक्तवाहिन्या अशक्त झाल्याने रक्तप्रवाह हळूहळू थांबतो . नाडी मंद चालते व रक्तदाब कमी होत जातो . काही वेळा कॉलरा सारखे रेच ( हगवण सुरू होते , व त्यातून रक्त पडते .

    ३ ) Septicaemic Malaria : यामध्ये हृदय , रक्तवाहिन्या , फुप्फुसे , मुत्रपिंड इत्यादी सर्व अवयव हळूहळू निकामी होत जातात .

    ४ ) Black Water Fever : ( काळपट पिंगट रंगाची लघवी होणारा ताप ) रक्तातील हिमोग्लोबिन पासून बनलेले haemozoin हे काळपट रंगाचे कण व तांबड्या रक्तपेशींचे झालेले तुकडे हे सर्व लघवीमार्फत शरीराबाहेर पडू लागतात . अशा वेळी लघवीचा रंग Port wine किंवा कोकाकोलासारखा दिसत असतो. अनेकदा हे असे होण्याचे नक्की कारण उमजत नाही . काही वेळा मलेरियाच्या तापामुळे वाजणारी प्रचंड थंडी अथवा औषधांचा होणारा विचित्र परिणाम यामुळे हे घडून येत असावे . रुग्णास ताप असूनसूद्धा परोपजीवी रक्तात दिसत नाहीत . त्यामुळे रोगाचे निदान करणे कठीण जाते . कधी कधी मुत्रपिंडे निकामी झाल्यास रोग गंभीर स्वरूप धारण करतो .

    मलेरियाचे रुग्ण तपासताना मुख्यतः खालील गोष्टी आढळतात .

    १ ) फिकेपणा ( Anaemia )
    रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते . ते काही वेळा धोकादायक पातळी पर्यंत कमी होते . ( Hb - 4G % or less ) प्रचंड थकवा वाटणे . काम करण्याची शक्ती अजिबात नसणे यामुळे रुग्ण निपचीत पडतो .

    २ ) कावीळ : ( Jaundice )
    काही रुग्णात मलेरिया बरोबर रक्तातील कावीळीची ( Bilirubin ) पातळी अधिक झालेली आढळते .

    ३ ) प्लीहा वाढणे : ( Enlarged Spleen )
    ज्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन मलेरियाची लक्षणे असतात , अशी रुग्णांमध्ये प्लीहा वाढलेली आढळते व त्यामुळे पोटही सुजलेले दिसते . क्वचित प्रसंगी अशा वाढलेल्या प्लीहेस इजा झाल्यास ती फाटते व पोटाच्या आत रक्तस्राव होऊन रुग्ण दगावतो.

    या वैद्यकीय ज्ञानाचा गैरफायदा भारताच्या स्वातंत्र्यपूर्व कालात काही ब्रिटीश अधिकारी घेत असत . कामावर घेतलेले मजूर अनेकदा अशक्त असत . त्यांना नीट काम न केल्यास लाथा बुक्के मारून तुडवले जाई . अशा परिस्थितीत जर एखादा मजूर दगावला , तर खुनाचा आळ येऊ नये यासाठी ते अधिकारी बेलाशकपणे असे कारण सांगत , ' मजूराला मलेरियाचा त्रास होता . तो प्लीहा फुटल्याने मरण पावला ' .

    ४ ) काही रोग्यांमध्ये प्लीहा व यकृत दोन्हीमध्ये वाढ होते .

    माणसाच्या शरीरात मलेरिया परोपजीवी शिरण्याचे विविध मार्ग

    १ ) अॅनॉफेलीस मादी डास मनुष्याला चावल्यानंतर त्यामुळे होणारा मलेरियाचा रोग हा एक नेहमीचा व महत्त्वाचा मार्ग आहे .

    २ ) ज्या अॅनॉफेलीस मादी डासाच्या लाळेत Sporozoites अवस्थेतील परोपजीवी आहेत , अशा डासांमधील लाळ सशक्त माणसांना टोचून त्यांच्यात मलेरियाचा रोग निर्माण केला जातो काही ठिकाणी संशोधनाच्या दृष्टिकोनातून प्रयोग म्हणून असा प्रयत्न केला गेला आहे .

    ३ ) रक्तपेढीत अनेक लोकांचे रक्त घेतले जाते . त्यापैकी एखादा रक्तदाता मलेरियाचा रुग्ण असू शकतो . त्यावेळी त्याच्या रक्तात असणाऱ्या परोपजीवींचा प्रवेश तेथून पुढे ज्या रुग्णाला ते रक्त दिले जाईल त्याच्या शरीरात सरळपणे होतो व तेथे ते वाढून नंतर रुग्णाला नाहकपणे मलेरियाचा त्रास भोगावा लागतो . या कारणास्तव रक्तदात्याचे रक्त हे मलेरियाच्या परोपजीवांपासून मुक्त असल्याची खात्री रक्ताची तपासणी करून ठरविणे हे बंधनकारक आहे.

    ४ ) आईच्या गर्भाशयात बाळाची वाढ होत असते . या गर्भाशयाला जोडून लागूनच Placenta म्हणजे वार असते ज्यातून बाळाचे पोषण केले जाते . सामान्यपणे आईच्या रक्तात जर कोणतेही जंतू किंवा इतर प्रकारचे परोपजीवी असतील तरी त्यांना थोपविण्याची क्षमता वारेमध्ये असते , अशा प्रकारे बाळाचा बचाव केला जातो . परंतु वारेच्या वाढीच्या प्रक्रियेत काही दोष निर्माण झाला असेल व अशा वेळी आईला मलेरियाचा रोग झाल्यास त्याचे परोपजीवी बाळाच्या रक्तात शिरून त्या बाळाला मलेरिया होऊ शकतो .

    ५ ) व्यसनाधीन लोकांच्या एकत्रित गटामध्ये एखाद्याला मलेरियाचा रोग झालेला असेल तर धुंदी येण्याकरिता तेथे वापरल्या जाणाऱ्या एकाच इंजेक्शनच्या सुईमधून मलेरियाचे परोपजीवी इतरांमध्ये पसरू शकतात .

    वरील नमूद केलेल्या २ ते ५ या मार्गांनी पसरणारा मलेरियाचा रोग फार क्वचितच आढळतो .

    औषधी उपाय म्हणून मलेरियाच्या परोपजीवींचा उपयोग ८० ते ९ ० वर्षांपूर्वी वैद्यकीय शास्त्रात केल्याची उदाहरणे आहेत . त्याचा मनोरंजक इतिहास थोडक्यात असा आहे .

    Syphilis ( गुप्तरोग ) या रोगाचे रुग्ण त्याकाळी फार मोठ्या संख्येने आढळून येत . या रोगामध्ये काही रुग्णांना मेंदूत बाधा होत असे . त्याला Neurosyphilis वा general Paralysis of Insane असे म्हणत . असे लक्षात आले होते की या रोग्यांना जर नंतर मलेरिया झाला असेल तर ताप गेल्यानंतर Neurosyphilis मुळे होणारी लक्षणे नाहिशी होत व रोगी त्यामधून बाहेर येत असे . या निरीक्षणाचा उपयोग एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जात असे .

    Neurosyphilis असलेल्या रुग्णांना मच्छरदाणीत झोपवीत . ज्या मादी डासांच्या लाळेत मलेरियाचे परोपजीवी आहेत अशांना आत सोडीत . हे डास त्यांना चावल्यावर ह्या रूग्णांना मलेरियाचा ताप येत असे . ताप येण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यत रुग्णाला वेगळे झोपविण्यात येत असे . त्यावेळी रोग्याला मलेरियासाठी वापरले जाणारे कोणतेही औषध देण्यात येत नसे . ताप उतरल्यानंतर काही दिवसात Neurosyphilis मुळे होणाऱ्या लक्षणात बराच उतार पडत असे हा प्रकार काट्याने काटा काढावा यासारखा होता.

    मलेरियाच्या परोपजीवांमुळे शरीरात निर्माण होणारी घातक विषारी द्रव्ये ( Malarial Toxins )

    रुग्णामध्ये मलेरियाचा ताप वाढत असताना मलेरियाच्या परोपजीवींविरुद्ध रक्तातील तांबड्या व पांढऱ्या रक्तपेशी , तसेच अभयत्व देणाऱ्या पेशी ( immune cells ) यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू होते . त्यावेळी अनेक विषारी द्रव्ये निर्माण होतात या द्रव्यांमुळे शरीरातील विविध संस्थांवर कमी जास्त स्वरूपाचे परिणाम घडतात . ही रासायनिक प्रक्रियेची शृंखला नियमबद्धपणे घडत असते .

    शरीरात तयार होणारी प्रमुख विषारी द्रव्ये
    १ ) Cytokinine २ ) Tumor Necrosis Factor ( TNF ) 3 ) Phospholipids and Phosphoglycans

    शरीरात घडून येणारे महत्त्वाचे परिणाम
    १ ) हिमोग्लोबिन ( Hb ) व तांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्णाला धोक्याच्या पातळीपर्यंत नेणारा Anaemia होतो .
    २ ) तापामध्ये अचानक होणारा चढ उतार
    ३ ) Plasmodium Falciparum मुळे मेंदूच्या पेशींमध्ये होणारे बदल .
    ४ ) शरीरातील संपूर्ण रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होऊन त्यांचे कार्य मंदावते व शक्तीपात होतो . ( Endotoxin Vascular Shock )
    ५ ) अचानकपणे जास्त प्रमाणात स्रवणाऱ्या Insulin मुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत कमी होते .

    वारंवार होणारा मलेरिया
    मलेरियाचा ताप एकदा येऊन गेल्यानंतर त्याने पुन्हा पुन्हा आपला प्रताप त्याच रुग्णाला दाखविला नसता तर कदाचित मलेरिया या रोगाची समस्या ऐवढ्या तीव्रतेने जाणवली नसती . परंतु एकदा होऊन गेलेला मलेरिया पुढील ३ ते ४ वर्षांत एकदाच नव्हे तर चार ते पाच वेळा पुन्हा होण्याची शक्यता असते . वैद्यकीय इतिहासात काही रुग्णांत ४ ते ५ वर्षांच्या कालावधीत ३० ते ३५ वेळा मलेरिया झाल्याचे आढळून आल्याची नोंद आहे . हा रोग होण्याच्या आपत्तीची टांगती तलवार काही रुग्णांवर कायम असते . त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम घडून येतात . या वारंवार होणाऱ्या मलेरियाच्या रोगाची मुख्य कारणमिमांसा अशाप्रकारे आहे .

    १ ) मानवी शरीरात साधारणपणे जंतू , परोपजीवी , विषाणू यांची लागण झाल्यानंतर कायम स्वरूपाची प्रतिबंधकारक शक्ती तयार होत असते . त्यामुळे त्या रोगांचा वारंवार उपसर्ग होण्याची शक्यता फार कमी असते . परंतु मलेरियाच्या परोपजीवांच्या बाबतीत मात्र पहिल्या तापानंतर शरीरात तयार होणाऱ्या प्रतिबंधकारक शक्तीची पातळी फारच कमी असल्याने यानंतर पुन्हा होणाऱ्या मलेरियाच्या तापाला रोखण्यास ती असमर्थ ठरते .

    परोपजीवांच्या प्रत्येक अवस्थेची प्रतिजने ( Antigens ) भिन्न असल्यामुळे त्याला प्रतिबंधक ठरणारी प्रतिपिंडे ( Antibodies ) पुरेशा संख्येने तयार होत नाहीत . अर्थातच पुन्हा होणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांशी मुकाबला करणे प्रतिपिंडांना कठीण जाते आणि परोपजीवी मग शरीराचा ताबा घेतात .
    २ ) काही काही रुग्णांनाच डास परत परत चावा घेतात . त्यामुळे तो रुग्ण पहिल्या तापातून बरा होतो न होतो तोच नवीन परोपजीवांची फौज त्याच्या शरीरात शिरते .
    ३ ) काही कारणाने औषधाचा डोस पूर्ण न करता उपचार अर्धवटच सोडून दिले जातात . तर अशा वेळी पहिलाच ताप उलटण्याची शक्यता असते .
    ४ ) Plasmodium Vivax या प्रकारच्या मलेरियाच्या तापामध्ये यकृतामध्ये ( Liver ) सुप्तपणे राहणारे परोपजीवी ६० ते १८० दिवसात परत आपले डोके वर काढतात व अशावेळी डास परत न चावताही मलेरियाचा ताप येण्यास सुरवात होते .
    ५ ) सामान्यत : Plasmodium Falciparum उलटण्याची शक्यता नसते . परंतु पहिल्याच तापातील रक्तात फिरणारे Falciparum चे प्रतिसाद न देणारे काही परोपजीवी औषधांना पूर्णपणे दाद न देणारे असतील तर अगदी २५ ते ३० दिवसात पुन्हा ताप येण्यास सुरवात होते . एखाद्या घरातील काहीच लोकांना वारंवार मलेरिया होतो , तर काही जणांना या रोगाची लागण कधीच होत नाही असे का या जटील प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड आहे .

    मलेरियाची लक्षणे व चिन्हे या प्रकरणात मलेरियाचे रुग्ण सामान्यतः कोणत्या प्रकारचे आढळतात याचे विवेचन केले आहे . कित्येकदा रुग्णात दिसणारी लक्षणे डॉक्टरांना बुचकळ्यात टाकणारी असतात . अशा परिस्थितीत प्रयोगशाळेतील रक्ताच्या व लघवीच्या तपासण्या उपयुक्त ठरतात . अशा तऱ्हेच्या केसेस हॉस्पिटल व खाजगी डॉक्टर मंडळींसमोर आल्यावर रुग्णावर त्वरीत उपाययोजना करणे अत्यावश्यक असते . अशा पद्धतीच्या प्रत्यक्ष घडलेल्या केसेस् नाव व जागा बदलून पुढील वेगवेगळ्या प्रकरणात वेळोवेळी समाविष्ट केलेल्या आहेत .

    ह्या सर्व केसेस् वाचल्यानंतर वाचकांना मलेरिया हा रोग प्रसंगी कशा रितीने गंभीर स्वरूप धारण करू शकतो यावर प्रकाश टाकण्याचा लेखकाचा उद्देश आहे .

    केस नंबर १

    श्रीमती निर्मला जोशी वय ५६ , पतीच्या निधनानंतर दादरमध्ये एकट्याच राहत होत्या . नोव्हेंबर महिन्यात दिवाळी निमित्त नाशिकमध्ये १५ दिवस व नंतर १० दिवस मध्यप्रदेश येथील कान्हा जंगल , पंचमढी या भागात फिरून दादरला परतल्या . घरात एकट्याच , आल्यावर प्रवासाचा शीण व पुढे अंगात कणकण , पाठोपाठ १०१ ° पर्यंत ताप चढला . फॅमिली डॉक्टरांनी नेहमीची औषधे दिली . थंडी वाजणे , हुडहुडी भरणे ही लक्षणे नव्हती . ठाण्यात राहणाऱ्या मुलीने आईला आपल्या घरी नेण्याचा आग्रहच धरला . ठाण्यात गेल्यावर ताप व सोबत उलट्या चालू झाल्याने १ दिवसानंतर काविळीची शंका आली . सकाळपासून निर्मलाबाईंची असंबद्ध बडबड मुलीला बुचकळ्यात पाडणारी होती . त्यांना ब्लड प्रेशर , डायबेटीस किंवा इतर कोणताही आजार नव्हता . दुपारनंतर चक्कर आली आणि अर्ध्या तासात त्या बेशुद्ध झाल्या . मुलीची तारांबळ उडाली . डॉक्टरांना घरी बोलावले . निर्मलाबाईंचे ब्लड प्रेशर अतिशय कमी झालेले परंतु ताप जास्त नव्हता . ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले पुढील ४ ते ५ तासात पूर्णपणे शुद्ध हरपली . ( Semi Comatose ) तत्परतेने I.C.U मध्ये हलविण्यात आले . ५ तासात रक्ताच्या तपासणीमधून P. Falciparum Positive असल्याचे समजले हळूहळू काविळीचे प्रमाण वाढत होते . Blood Creatinine धोक्याच्या पातळीकडे वेगाने जात होते . मलेरियावरील अद्ययावत औषधे देण्यात येत होती . ३ दिवसात काहीही फरक नव्हता किंबहुना केस हाताबाहेर जाते की काय अशी शंका वाटू लागली . मुलींना त्याप्रमाणे कल्पनाही देण्यात आली होती जोशीबाईंच्या मूत्रपिंड व यकृतावर गंभीर परिणाम झाला होता . चौथ्या दिवसापासून मात्र मुंगीच्या पावलाने सुधारणा दिसू लागली . १० दिवसांनंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली . अतिशय अशक्तपणा होता . घरी परतल्यावर रक्ताच्या पुन्हा केलेल्या तपासणीत परत P. Falciparum चे परोपजीवी दिसल्याने तज्ञांच्या सल्यानुसार परत एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले . ताबडतोब मलेरियावरील औषधे सुरू करण्यात आली . अशक्तपणा हळूहळू कमी होत महिन्याभरात तब्येत सुधारली . कोणताही दुष्परिणाम राहिला नाही . त्यानंतर आता गेली १० वर्षे आनंदी आयुष्य जगत आहेत . या साऱ्या धक्कादायक अनुभवातून जोशीबाईंना दादर सोडून ठाण्यात वास्तव्यास जाणे सोईस्कर वाटले व त्या ठाणेकर झाल्या . या केसमध्ये डासांपासून मिळालेला प्रसाद हा दादरचा नसून नाशिक किंवा कान्हाच्या जंगलामधून मिळाला असावा अशी दाट शंका घेण्यास वाव आहे .

    केस नं . २

    सौ . मानसी पटवर्धन वय वर्षे ६१ , दादर मध्ये वास्तव्य , आठ दिवसासाठी परदेशी मलेशियाच्या सहलीस गेल्या . पहिले दोन दिवस समुद्रावरील खेळ , गार वारा बाधल्याचे निमित्त होऊन खूप थंडी भरून ताप आला . सोबत उलट्या त्यात अन्नावरची वासनाही गेली . १० वर्षांचा जुना डायबिटीस , खाणे बरोबर जात नसल्याने डायबिटीस वरील औषधे बंद केली . परदेशातील सहलीचे दोन दिवस त्रास तसाच सहन केला . पण अतिशय अशक्तपणा वाटू लागला लघवी कमी होण्यास सुरवात झाली. दुसऱ्या दिवसापासून तांबडी काळपट ( Port wine ) रंगाची लघवी होण्यास सुरवात झाली. दुपारपासून बोलण्यात असंबद्धता व गरगरणे सुरू झाले . बलवत्तर नशीब असल्याने मानसीताईंच्या परिचयातील एक डॉक्टर कोलालंपूर येथेच स्थायिक असल्याने ताबडतोब त्याच्या मदतीने हॉस्पिटलच्या I.C.U. मध्ये हलविले . Blood Pressure एकदम खाली आलेले व रक्तातील साखर ३५० मि . ग्रॅ . झालेली होती . E.C.G. नॉर्मल होता . बोरिवलीमधील मानसीताईंच्या पॅथॉलॉजिस्ट असलेल्या मुलाने मलेशियामधील डॉक्टरांशी संवाद साधला व फॅलसिफेरमची शक्यता व्यक्त केली . आमच्या देशात मलेरिया नाही असे मानणारे मलेशियामधील डॉक्टर ती शक्यता नाकारीत होते . शेवटी तिथेच दुसऱ्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले . त्यांनी भारतातून आलेला रुग्ण ही बाजू लक्षात घेऊन , मलेरियाच्या रक्त तपासणीसाठी ते दुसऱ्या ठिकाणी प्रयोगशाळेत पाठविले . तोपर्यत बोरिवलीचा मानसीताईंचा मुलगा मलेशियात आईजवळ जाऊन पोहोचला . दोन दिवसातच रक्ताचा रिपोर्ट Falciparum Positive असा आला . ताबडतोब योग्य औषधे देण्यात आली . आठ दिवसात तब्येतीला आराम पडला . रक्ताचा रिपोर्ट Negative आला . मानसीताई सुखरुपपणे मुलासोबत मुंबईला पोहोचल्या . या केसमध्ये P. Falciparum मलेरिया मधील Black Water Fever हे निदान केलेले असून यामधे लघवीचा बदललेला Port wine रंग हे महत्त्वाचे लक्षण आहे .

    केस नंबर ३

    श्री . मधुसुदन जोशी वय वर्षे ८२ , मधुमेहाचे गेले ३० वर्षांचे जुने दुखणे औषधांमुळे ताब्यात आहे . वयोमानानुसार प्रोस्टेट ग्रंथीचा वाढता त्रास , त्यामुळे मधून मधून लघवीचे Infection होत असे . दादर मध्ये वास्तव्य होते . घराला लागूनच नवीन ३५ मजली इमारतीचे बांधकाम गेली दोन वर्षे चालूच आहे . आजूबाजूला प्रचंड धूळ व डासांचा उपद्रव . त्यामुळे वारंवार खोकला , दम्याचा त्रास व तापही येत असे . लघवी व छातीचे Infection यावरच Antibiotics दिली जात होती . एकदा हुडहुडी भरुन ताप चढत असताना रक्त घेतले . त्यात Plasmodium Vivax चे परोपजीवी आढळले . लघवीचा रिपोर्ट नॉर्मल होता . Lung Infection मुळे रक्तातील पांढऱ्या पेशींच्या Polymorphs मध्ये वाढ झाली होती . आता पूर्वीच्या औषधांबरोबर मलेरिया विरुद्धची औषधेही देण्यास सुरवात केली . आठ दिवसात आराम पडला . ३ महिन्यानंतर पुन्हा तसाच ताप येण्यास सुरवात झाली . रक्ततपासणीत परत P. Vivax चे परोपजीवी मिळाले . परत मलेरिया विरुद्ध औषधांचा मारा करावा लागला . गेल्या दीड वर्षात ४ वेळा अशाच प्रकारे ताप येत आहे व मलेरियाचे रक्तातून निदान झाल्यावर पुन्हा पुन्हा त्यावरील औषधे द्यावी लागत आहेत . वाढत्या वयोमानामुळे व Antibiotics च्या वारंवार लागणाऱ्या वापरामुळे आता जोशीबुवांच्या शरीरातील प्रतिबंधक शक्ती कमी झालेली आहे . वारंवार होणारा Vivax मलेरिया जोशी आजोबांना खचितच त्रासदायक होत आहे.

    --डॉ. अविनाश वैद्य

      October 19, 2022


  • महिमा ॐ चा

    “ॐ” हे अक्षर हिंदू धर्मियांकरीता अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक बाब असली तरीही एवढ्यापुरताच ह्या अक्षराचे महत्व मर्यादित नाही. ॐ नामाचा नियमित जप आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय फायदेशीर ठरू शकतो.

      January 23, 2015


  • गाभारा 

    पुस्तकाच्या सुंदरशा पण स्वप्नाळू अशा जगात जगणे म्हणजे स्वप्न पाहण्याचे सार्थकच. कधी कधी जिवलग माणसाजवळ सुध्दा ज्या गोष्टी मन उघड करून बोलता येत नाहीत. त्या या स्वप्नातील जगात अगदी सहजच उलगड़ल्या जातात.

      February 12, 2019


  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग चार

    आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे.

    यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हणावे, बीएस्सी करून काय होणारे, बीएस्सी करत असलेल्यांनी म्हणावे आर्टस् शिकण्याची काही आवश्यकताच नाही. हे योग्य नव्हे.

    मधुमेहा सारख्या आजारात रुग्णाला नेमकेपणाने काय होते आहे, त्याला काय हवेय हे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. भविष्यात अमुक होईल म्हणून आत्ता असे वागले पाहिजे ही भीती अवाजवी आहे.

    नखाला भविष्यात चुकुन होणारे नखुर्डे हे कॅन्सरमधे रूपांतरीत होऊ शकते, हो किंवा नाही. या दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायला सांगितला तर दुर्दैवाने याचे उत्तर हो असेच द्यावे लागते, असे आजचे वैद्यक शास्त्र सांगते. नियमावर बोट ठेवले तर भविष्यात होणारा नखाचा कॅन्सर टाळण्यासाठी आपण नखच काढून टाकूया, असा विचार करणे योग्य होईल का ? जे अस्तित्वातच नाही, त्याची भीती निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची ? प्रत्येकाची आळीमिळी गुपचिळी. प्रत्येकाचा बिझनेस. प्रत्येकाला स्वतःची काळजी.

    रक्तातली साखर वाढली तर किडनी, डोळे इ. अवयवांवर विपरीत परिणाम होतात, असे एक वैद्यक शाखा म्हणते. अवयवांवर विपरीत परिणाम होतो तो, रक्तातली साखर वाढली म्हणून की, त्यासाठी कायमस्वरूपी घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे ते दुष्परिणाम आहेत, यावर अजूनही संशोधन सुरूच आहे. शिवाय मनात निर्माण झालेली भीती देखील हाॅर्मोन्स मधे बदल घडवित असतेच.

    मधुमेहामधे रक्तातली साखर तपासणी, किंवा तत्सम रासायनिक तपासण्या करणे, हाच एकमेव योग्य निकष आहे, असे म्हणण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या वैद्यकामधे अजूनही संशोधन सुरूच आहे. त्याचे निकष अजूनही बदलत आहेत.

    आणि रक्तातल्या साखरेचा निकष खरं सांगायचं तर आयुर्वेदात सांगितलेलाच नाही. त्यामुळे मधुमेहामधे रक्तातली साखर नाॅर्मल करणे हा आयुर्वेदीय चिकित्सेचा उद्देश असूच शकत नाही. हे वैद्यांच्याच अजून ध्यानात येत नाही तर सामान्य लोकांनी तशी अपेक्षा करणे चुक नव्हे.

    हा विचार समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने निदान केले जाते, त्याच पद्धतीने चिकित्सा, पथ्य अपथ्य, योग, प्राणायाम यांचा विचार केला तर चिकित्सा पूर्णत्वाला जाईल. जे सिद्धांत आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, ते अन्य पॅथीमधे कसे बसवता येतील ? असे करणे म्हणजे गोल भोकात चौकोनी पाचर ठोकण्यासारखे आहे. कृपया असा विचार सुद्धा करू नये. नाहीतर जे पाहिजे ते (आरोग्य ) आपल्याला कधीही पूर्णत्वाने मिळणार नाही. आणि औषधे मात्र कायमस्वरूपी पूर्णपणे घ्यावी लागतील.

    जर आपल्याला घोडा बनवायचा असेल तर त्याचे डोके, पोट, आयाळ तोंड आणि अगदी शेपूट देखील घोड्याचीच बनवली पाहिजे. तरच त्या कलाकृतीला घोडा असे म्हणता येईल. नाहीतर तोंड करायचे घोड्याचे, आयाळ करायची सिंहाची, पोट करायचे वाघाचे, आणि शेपूट लावायचे शेळीचे. कसा दिसेल हा प्राणी ? त्याला पूर्णत्व येणार नाही.

    प्रत्येक शास्त्राची स्वतःची एक परिभाषा असते. त्याच परिभाषेत ते सिद्धांत समजून घ्यावे लागतात. तसे केले नाही तर आपल्याला जे पाहिजे ते पूर्ण स्वास्थ्य कदापि मिळणार नाही.

    निदान करायचे अॅलोपॅथीनुसार, तपासण्या करून घ्यायच्या रसायनशास्त्राप्रमाणे, चिकित्सा ठरवायची आयुर्वेदानुसार, पथ्य करायचे निसर्गोपचारानुसार, आणि औषध घ्यायचे होमियो पद्धतीनुसारच्या !
    याशिवाय पुष्पादिदिचे सल्ले, स्वामीजीनी सांगितलेले उपाय, वाॅटसप महाराजांचे नुस्खे आहेतच.

    अशा भीतीच्या पायावर उभारलेल्या विचारसरणीने रोग कसा बरा होईल ? हे रुग्णांनी लक्षात ठेवले पाहिजे.
    .....आणि वैद्यांनी सुद्धा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.02.2017

      February 14, 2017