वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वे’रुळ व एलोरा किंवा अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांची निर्मिती जरी इ. स. १ ते इ. स. १४ च्या दरम्यान झाली असली तरी त्या आपल्याला आता आता म्हणजे ब्रिटिशांचं राज्य हिंदुस्थानवर होतं त्या काळात जगाला वेरुळ कळाल्या. डोंगररांगांमध्ये ही निर्मिती झाली. जळगावजवळ अजिंठा तीन डोंगरांमध्ये अजिंठा लेण्यांत चित्रकला साकारली. या व अशा प्रकारच्या लेण्या या महान राष्ट्रात… ‘महाराष्ट्रात’ सुमारे एक हजारांवर आहेत.
April 29, 2024
पाय मुरगळणे (Ankle sprain) या गोष्टीचा अनुभव प्रत्येकालाच असतो. ‘पाय मुरगळून मी पडलो’ ही अगदी नेहमी आढळणारी रुग्णाची तक्रार असते.
April 6, 2023
अणुभट्टीत अपघाताच्या वेळी होणारे स्फोट हे धोकादायक असले तरी ते अणुबॉम्बसारख्या तीव्रतेचे स्फोट नसतात. तसंच हे स्फोट अनेकदा अणुविखंडनामुळे नव्हे तर इतर कारणांमुळे घडून येतात.
August 16, 2023
नायटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफूलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यात त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य करणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इ. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज, नायटा वाढतात. कडा असलेल्या गोलाकार स्वरुपात त्वचेवर उठणारा नायटा हा एक प्रकारच्या बुरशी, आळब्यासारख्या सुक्ष्म शेवाळामुळे होणारा रोग आहे. चामडीच्या कोणत्याही भागावर गोलाकार चट्टे उठतात. पण विशेषतः काखा, जांघा, बोटांच्या मधील भाग इ. नेहमी ओलसर राहणाऱ्या जागांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
आपल्याकडे डोक्यामध्ये होणाऱ्या नायटाचे प्रमाण त्यामानाने कमीच आहे. कंबर व जननेन्द्रियाजवळील भागाला सुद्धा नायटा होतो. हे चट्टे गोलाकार असल्यामुळे त्यांना रिंग वर्म म्हणतात. त्यांना कमालीची खाज सुटते. जर हा चट्टा केसात झाला तर केस जावून तेवढया ठिकाणी टक्कल पडते आणि नखांवर झाला ते नखे वर उचलली जाऊन खरखरीत व वाकडी होता.
हा आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इ. भागात जास्त करून होतात. खूप खाज सुटते व नायटाची वाढ वेगाने होते. पण कातडीवर बधीरता मात्र नसते. नखे कापावीत.
नायटा झालेला भाग साबण व स्वच्छ पाण्याने रोज धुतला तर हा रोग बरा होतो.
हेक्झाक्लेरोफिन असलेल्या साबणाचा जास्त उपयोग होतो. घामाने भिजलेले सगळे कपडे नेहमी बदलावेत व स्वच्छ धुवून कोरडे असतांना वापरावे. नायटा झालेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून ती सुर्यप्रकाशात राहील असा प्रयत्न करावा. १ भाग सल्फर व १० भाग तेल यांचे मिश्रण करून नायटा झालेल्या जागी लावावे. बाजारात मिळणारी नायटा, गजकर्ण विरोधी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
डोक्यात खवडे झाले असल्यास बाजारात मिळणारी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत. डोक्यातील नायटा पाण्याचा शेक देऊन तेथील केस उपटून वरील औषधांचा उपयोग करावा. नायटा व त्यासारखे चामडीचे बुरशीजन्य इतर विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला चटकन होतात, ते टाळण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.
नायटा झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवावे.
एकच फणी व एकमेकांचे कपडे ( स्वच्छ धुऊन वाळविल्याशिवाय) वापरू नयेत.
नायटा झालेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करावेत.
बाह्य उपचारांबरोबरच पोट सुद्धा साफ असणे गरजेचे आहे. त्वचा नेहमी कोरडी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- - व्हॉटसऍप वरुन
August 29, 2016
गुरूवार दिनांक १३ एप्रिल २०१७ हा दिवस बोरिवलीकरांच्या, विशेषत: प्रबोधनकार ठाकरे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या, कायमचा स्मरणात राहील. या दिवशी या वर्षातल्या सर्वात देखण्या आणि भारदस्त कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचा योग बोरिवलीकरांना आला
April 15, 2017
नॉर्थईस्टमधे, पेनसिल्व्हेनियामधे, झाडांची काही कमतरता नाही. त्यामुळे लाकडाचं कुंपण बर्याच घरांभोवती आढळतं. झाडांचा जळाऊ लाकूड म्हणून देखील सर्रास उपयोग होतो. अनेक अद्ययावत घरांमधे दिवाणखान्यात किंवा फॅमिली रूम मधे एखादी शोभिवंत Fire place असणं हे मोठं कौतुकाचं आणि फॅशनेबल मानलं जातं. अर्थातच ही घरं अद्ययावत पद्धतीने हिवाळ्यात गरम केली जातात आणि Fire place चा उपयोग केवळ शोभेसाठी किंवा मजेसाठी, खास मेजवानी प्रसंगी किंवा मित्रमंडळी जमली असताना केला जातो. गावाकडे मात्र शेतातल्या किंवा वस्त्यांवरच्या घरांत लाकडं जाळून घरं उबदार ठेवावी लागतात. त्यासाठी घराच्या बेसमेंटमधे किंवा घराला लागूनच एखादी भट्टीसारखी चांगली मोठी Fire place असते.
ऍपलेशन पर्वतराजीच्या शाखा उपशाखा सार्या नॉर्थईस्ट, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, व्हर्जिनिया वगैरे भागांत फैलावलेल्या असल्यामुळे बराचसा भाग टेकड्या, डोंगरांनी भरलेला आहे. त्यामुळे दगडा, धोंड्यांची वानवा नाही. या प्रदेशातल्या ग्रामीण भागात त्यामुळे बर्याच घरांभोवती दगडांची कुंपणं आढळतात. कुंपणं पक्की बांधलेली नाहीत, नुसते लहान मोठे दगड, कपच्या एकमेकांवर व्यवस्थित रचून केलेली ही कुंपणं अगदी दापोली, लांजा, देवरुख, संगमेश्वरची आठवण करून देतात. उन्हाळ्यामधे पाऊस पडल्यामुळे या दगडी कुंपणांच्या पायदळी गवतात रानटी फुलं उगवतात. कधी कधी बाजूच्या बिळांमधून बाहेर आलेले ससे त्यांच्या आडोशाने बसलेले दिसतात. हिवाळ्यात हिमवर्षाव झाला की कुंपणांवर रातोरात पांढरे शुभ्र कठडे बांधल्यासारखं वाटतं. परसदारात ठेवलेल्या लाकडांच्या मोळ्यांवर बर्फ पडून राहिलेलं असतं.
छोट्या गावांमधे घरे सहसा कोणी बंद करत नाही. (हा प्रकार मिडवेस्ट मधे अधिक प्रकर्षाने दिसला). गाड्यांमधे देखील चाव्या तशाच ठेवून देण्याची पद्धत असते. विशेषत: हिवाळ्यामधे, दुकानात, बॅंकेत वगैरे जाऊन थोडंस काम करायचं असलं तर फारसं कुणी गाड्या बंद करतच नाहीत, बाहेर गाडी चालूच असते आणि आत माणसं आरामात आपली कामं आटोपत असतात.
बहुतेक शेतकरी आपल्या शेतजमीनीच्या आसपास किंवा डेअरी फार्मच्या जवळपास रहाणं पसंत करतात. त्यामुळे परसदार ओलांडलं की शेतात पाय किंवा घरापासून हाकेच्या अंतरावर डेअरी फार्म अशी परिस्थिती. घरं तशी सुबक आणि नीटनेटकी. त्यांच्या पुढे मागे चांगली हिरवळ आणि फुलझाडं राखलेली. घरांच्या आसपास ट्रॅक्टर्स, अवजारं, गाड्यांची गर्दी. थोड्या अंतरावर जनावरांच्या धान्याच्या उंच कणग्या असतात. शेतकरी, त्याची तरणी ताठी मुलं, नातवंडं, कामगार आपल्या कळकट जीन्स, जाडे भरडे रंगी बेरंगी शर्टस, मळकट डागाळलेल्या हुडीज किंवा जॅकेट्स आणि डोक्यावर बेसबॉल कॅप्स घालून आत बाहेर करत असतात.
सगळ्यांच्या पायात माती चिखलाने भरलेले मोठे फार्म शूज किंवा गमबूट. कुणी भल्या पहाटे तीन चार वाजता उठून लगतच्या आपल्या डेअरी फार्मवर जाऊन गायींचं दूध काढतोय तर कुणी उजाडता उजाडता ट्रॅक्टरवर बसून शेतात जातोय. कुणी गावातून बिघडलेल्या अवजारांची दुरुस्ती करून घेऊन येतोय. कुणी बी-बियाण्यांच्या पोत्यांची थप्पी लावतोय. तर कुणी गवताच्या गंजांच्या राशी लावतोय. सगळे हट्टे कट्टे. आरडा ओरडा नाही की गडबड गोंधळ नाही. प्रत्येकजण आपापलं काम चोखपणे करतोय. मधेच शेतकर्याची बायको किंवा मुलगी देखील घरापासून फार्मवर लगबगीने येरझार्या घालत असते. कुठे वासरांना दूध पाजायचं असतं, कुठे फार्मवर आलेल्या दुधाच्या टँकरच्या ड्रायव्हर बरोबर पैशाचा हिशोब करायचा असतो, कुठे एखाद्या अडलेल्या गायीसाठी डॉक्टरला फोन करायचा असतो, एक ना दोन ! हजारो कामे उभी असतात आणि सारं कुटुंब झटून त्यांचा फडशा पाडत असतं.
कामाच्या रगाड्यातून वेळ काढून जसं ज्याला जमेल तसं न्याहारी, जेवण वगैरे चालू असतं. अंडी, दूध, चीज, बेकन, बीफ असा भरभक्कम आहार असतो. आधीच सर्वसाधारण अमेरिकन्सना भाज्या, कडधान्य या प्रकारांचं वावडं. त्यात गावाकडच्या काबाडकष्टाची काम करणार्या लोकांना तर भाज्या वगैरे दृष्टीसमोर देखील नको असतात.
फार्मवर काम करणार्या या लोकांचं तंबाखूचं व्यसन पाहून मला सुरवातीला आश्चर्य वाटलं होतं. आपल्याकडे तंबाखू मळणारे, दाढेखाली तंबाखूचा बार भरून त्याच्या तारेमधे काम करत रहाणारे, पचापचा थुंकणारे लोकं आपल्या अंगवळणी पडलेले असतात. पण इथे हे गोरे अमेरिकन्स देखील तोंडात तंबाखूचा बार भरत काम करताना पाहून मला अचंबा वाटला. बर्याचजणांच्या दाढेखाली, खालच्या ओठाआड भरलेल्या तंबाखूच्या बारामुळे खालचे ओठ सुजल्यासारखे मोठे झालेले, त्यातून लाळ संभाळत केलेलं संभाषण, शिवराळ भाषा, इथे तिथे पचापचा थुंकणं, काही म्हणता काही फरक नाही. मला तर बरेचदा तळेगावच्या घोड्यांच्या फार्मवर अस्सल मावळी शेतकरी कामकर्यांबरोबर किंवा गुजराथमधल्या आणंद, खेडा, नडीयादच्या खेडूतांबरोबर काम करतोय की काय असा भास व्हायचा.
-- डॉ. संजीव चौबळ
January 30, 2016
मी बसने प्रवास करीत होतो. माझ्या पुढच्या बाजूला एक तरुणी बसलेली होती, तिच्या शेजारची सीट सोडली तर संपूर्ण बस भरलेली होती. पुढच्या स्टाॅपवर एक लठ्ठ स्त्री सामानाने भरलेल्या दोन पिशव्यांसह पुढील दरवाजातून बसमध्ये चढली व त्या मुलीच्या शेजारी रेटून बसली. मी तिला न राहवून विचारले की, ‘तू तिला काहीच कसे बोलली नाहीस?’ तिने स्मितहास्य करुन उत्तर दिले, ‘अनावश्यक वाद घालण्यात काही अर्थ नाही, आपला एकत्र प्रवास हा खूप छोटा आहे.
April 23, 2023
हा देश महान करायचा असेल तर आधी या देशाची अस्मिता जागृत करावी लागेल, ज्या वस्तुंचे, पिकांचे उत्पादन या देशात होते, अशा सगळ्याच वस्तुंच्या आयातीवर बंदी घालावी लागेल, संसदेपासून ते प्राथमिक शाळेपर्यंत सगळीकडे इंग्रजीला कायम तृतीय किंवा त्याही खालचे स्थान द्यावे लागेल, क्रिकेटसहीत सगळ्या विदेशी खेळांची हकालपट्टी करावी लागेल आणि त्यासाठी आधी आपल्या मनात खोलवर रूजलेली गुलामीची पाळेमुळे निखंदून काढावी लागतील.
November 6, 2011
वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाह्यची सवय लहाणपणापासुनच लागलेली आहे, तो दिवाळसण आजपासून सुरु झाला. यंदा गणपती, नववरात्राप्रमाणे दिवाळीवरही पावसाची सावट असल्याने आणि फटाक्यांमुळे होऊ शकणाऱ्या प्रदुषणाचा बागलबोवा उगाचंच उभा केला गेला असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला हे खरं असलं तरी उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही. परिस्थिती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, सणांची राणी असलेल्या दिवाळीचं स्वागत तिच्या इतमामाने, पारंपारीक पद्धतीनेच केलं पाहिजे हे माझं आग्रहाचं मत आहे, मग पाऊस काही करो आणि कायदा काही म्हणो. दिवाळी हा कृषी संस्कृतीतला सण असल्याने या दिवसांत पाऊस हा असायचाच कारण शेतीचा तो अविभाज्य भाग आहे, पण या सणात कायद्याची लुडबूड मात्र अनाकलनीय आहे. असो, आपण आपला सण पारंपारीक पद्धतीनेच साजरा करावा असं मला वाटतं, क गाढव असतो..!
October 16, 2017
…सन १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ठाणे जिल्ह्याचा नकाशा संकोचला.
दमणगंगेच्या ऐलपैल तीराजवळील संजाण, उंबरगाव आदी २७ गावे गुजरात राज्याला जोडली गेली, तरीही आजघडीला ठाणे जिल्ह्यात ५५ गडकिल्ले अवशेष रूपाने आपणास पाहता येतात.
April 29, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti