वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
…भिती मनाचा दगड झाल्याची नाही, तर हा दगड समाजाचाच कपाळमोक्ष करील याची आहे. ती प्रक्रीया सुरू होण्यापूर्वीच हा दगड फोडला पाहीजे. दगडाच्या आतही जीवन असू शकतं हे रामदासस्वामींनी शिवरायांना दाखवून दिलं होतं. आता मात्र आपल्यालाच आपले रामदास स्वामी बनवून, स्वत:च्याच मनाचा दगड फोडून आतील जीवनाला वर आणायची कधी नव्हती येवढी गरज आज आहे.
July 27, 2017
भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या शोले सिनेमाला आज तब्बल ४६ वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही प्रेक्षकांच्या मनावरचे या सिनेमाचे गारूड कमी झालेले नाही. काय आहे ते गारूड?
१५ ऑगस्ट १९७५ रोजी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा टप्पा ठरलेला ‘शोले’ हा जी.पी. सिप्पी यांचा चित्रपट मुंबईच्या मुंबई सेंट्रल भागातील मिनव्र्हा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात शोले पाच वर्षे दाखवला जात होता. पन्नासच्यावर चित्रपटगृहात त्याचा रौप्यमहोत्सवही साजरा झाला. या चित्रपटाने पूर्वीचे लोकप्रियतेचे बरेच रेकॉर्ड मोडून स्वत:चा असा विक्रम प्रस्थापित केला. आजही अनेकदा शोले एखाद्या चॅनल वर चालुच असतो. आजवर आपल्या बॉलीवूड मध्ये हजारो चित्रपट झाले... पण " शोले" आजही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. शोले मात्र असा आठवणीत राहिलेला पहिल्या क्रमांकाचा चित्रपट आहे.
कारण एकच त्यातील 'टिमवर्क'
शोलेएवढे प्रचंड यश आतापर्यंत एकाही हिंदी किंवा भारतातल्या प्रादेशिक भाषेतल्या चित्रपटाला मिळालेले नाही. शोलेनंतर हजारो हिंदी चित्रपटांची निर्मिती झाली. ते पडद्यावर आले आणि गेले. त्यातल्या फारच थोड्या चित्रपटांची आठवण लोकांना आहे. या चित्रपटाला एवढे प्रचंड यश मिळेल, असे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि चित्रपटात भूमिका केलेल्या अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जया बच्चन यांच्यासह अन्य कलाकारांनाही स्वप्नातही वाटले नव्हते.
दरोडेखोरांचा नायक, त्या दरोडेखोरांच्या वारंवार होणार्याक हल्ल्यांनी संत्रस्त झालेले गाव, त्या दरोडेखोरांच्या म्होरक्याला गब्बर सिंग याला एकदा तुरुंगात डांबणारा माजी पोलीस अधिकारी ठाकूर आणि या दरोडेखोरांना संपवायसाठी आलेले जय आणि विरू, हे दोन तरुण यांच्याभोवती ही कथा संघर्षासह सतत शेवटपर्यंत फिरत राहते. ज्या गब्बरने आपले हात तोडले, त्याचाच सूड ठाकूर कसा घेतो, याचे चित्रीकरण प्रेक्षकांना विलक्षण आवडले होते.
गब्बर सिंगची अमजद खानने केलेली भूमिका तर गाजलीच, पण त्याचे संवादही प्रंचड गाजले. समाजावर प्रभाव टाकणार्याक संवादाचे लेखन जावेद अख्तर आणि सलीम खान या जोडीने केले होते. ग्रामीण भागात घडणारी ही कथा शहरी भागातही लोकप्रिय झाली. शोले का चालला? हे अजूनही कळत नसल्याची कबुली रमेश सिप्पींनी दिली आहे तर या चित्रपटाच्या यशामागचे रहस्य जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या कथेत दडलेले असल्याने, या चित्रपटाचे यशही त्यांनाच माहिती असावे. सगळ्यांना या चित्रपटातले नेमके काय आवडते, हे सांगणे हे खरेच खूप कठीण आहे, अशा शब्दात महानायक अमिताभ बच्चन यांनी शोलेच्या लोकप्रियतेचे रहस्य गवसत नसल्याची कबुली देऊन टाकली.
जपानी चित्रपट निर्माता अकिला कुरोसावा यांच्या सेव्हन समुराई या चित्रपटावरूनच शोले साकारला गेला. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेत्री हेमामालिनी आणि धर्मेन्दचे प्रेम बहरले आणि पुढे हे दोघे विवाहबद्ध झाले. गब्बर आणि त्याच्या डाकू सहकार्याअतले संवाद तर लाखो प्रेक्षकांना तोंडपाठ होते. अरे ओ सांबा, कितने आदमी थे? असे गब्बर आपल्या सहकार्यााला विचारतो. तो सांगतो, दो! आदमी चार और वो दो, फिर भी खाली हाथ चले आए? तेरा क्या होगा कालिया? अरे ओ सांबा, कितना इनाम रख्खा है सरकारने हमपर? हे त्याचे रांगडे संवाद प्रेक्षकांना विशेष आवडले होते.
ये दोस्ती, हम नही तोडेंगे, कोई हसीना जब रुठ जाती है तो, ही या चित्रपटातली गाणीही लोकप्रिय झाली होती. पाण्याच्या टाकीवर चढून विरूने (धर्मेंद्र)ने केलेला तमाशाही प्रेक्षकांना आवडला होता. इतना सन्नाटा क्यूँ है भाई, या चाचाचा प्रश्नर (ए. के. हंगल) प्रेक्षकांनाही सुन्न करून टाकणारा ठरला होता. शोलेच्या संवादाची एलपी निघालेली होती आणि तिचाही खप देशभरात खूपच झालेला होता. यशाचे हे शोले भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरले आहे.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://www.youtube.com/watch?v=0OyJgWmZH0s
August 15, 2021
भगवान श्री वैकुंठनाथांच्या अनुपमेय सौंदर्याचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात..
October 8, 2020
मी एक गोष्ट ऐकली ती अशी,एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडींगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर. ऑफिसर ने विचार केला ऐवीतेवी बायको मरणार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी आणण्यास सांगितले. त्यांनी केळी आणली. एक केळं सोलून फाकवुन त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले. आणि ते केळं त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडींग थांबले आणि दोन दिवसात त्याची बायको घरात काम करू लागली.
गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अॅबसॉर्ब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते.
मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-४ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले.
आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.
कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे. कुंकू शुध्द असणे हे फार महत्वाचे आहे.
शुद्ध कुंकू कसे ओळखावे - १] कुंकवाला हळदीचा वास येतो. २] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते. त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.
अरविंद जोशी
BSc
June 10, 2017
स्वतंत्र भारताच्या इतिहासात आध्यात्मिक क्षेत्रात बहुधा सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळालेले आणि प्रभाव गाजविलेले व्यक्तिमत्व सत्यसाईबाबा यांचे पूर्ण नाव सत्यनारायण राजू होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, १९४० मध्ये त्यांनी आपण शिर्डीच्या साईबाबांचे अवतार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते भारतातील बहुधा सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु बनले. प्रथम त्यांच्याभोवती हवेतून विभूती अथवा शंकराची पिंड काढून देणारे बाबा म्हणून काहीसे संशयाचे अथवा विस्मयाचे वातावरण होते. परंतु त्यानंतर त्यांनी स्थापन केलेली सेवाकार्ये, शिक्षण, आरोग्य, ग्रामसुधार आदी क्षेत्रांमधील कामांमुळे तसेच मोठमोठय़ा दानांमुळे त्यांचे नाव सर्वत्र झाले. आपण शिर्डीच्या श्रीसाईबाबांचे अवतार आहोत, असे जाहीर केलेल्या सत्यसाईबाबांचे अनुयायी अक्षरश: जगभर पसरले होते.
भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस्थ अनुयायी मोठ्या संख्येने होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत होते. सत्यसाईबाबांची बहुतांश सेवाकार्ये आंध्र प्रदेशात आहेत. आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी या गावी सत्य साईबाबांचा आश्रम आहे. त्यांची संपत्ती ४० हजार कोटी ते तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सत्य साईबाबा यांचे निधन २४ एप्रिल २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
November 23, 2018

पृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे.
May 25, 2023
आयुर्वेदानुसार गायीचे दूध आणि त्यापासून मिळणारे दही, ताक, लोणी आणि तूप अमृताचे भांडार आहे. केवळ गायीच्याच पाठीच्या कण्यात 'सूर्यकेतू' नाडी असते. इतर प्राणी व मनुष्य ज्यांना ग्रहण करू शकत नाहीत, त्या सूर्याच्या गो-किरणांना सूर्यकेतू नाडी ग्रहण करते. ही नाडी क्रियाशील होऊन पिवळ्या रंगाचा एक पदार्थ स्रवते, ज्याला 'स्वर्णक्षार' म्हणतात. याच कारणास्तव देशी गायीचे दूध, लोणी आणि तूप सुवर्णकांतीचे असते.
जे आयुष्यभर देशी गायीच्या दुधाचे सेवन करतात, ते निश्चितच निरोगी, वीर्यवान, बुद्धिमान, शक्तिशाली, आणि दीर्घायू होतात तसेच त्यांच्या विचारांमध्येही सात्विकता राहते. फक्त देशी गायीचेच दुध हितकार आहे; जर्सी, होल्सटीन किंवा त्यांच्या संकरीत उपजातींचे नव्हे. डेअरीच्या प्रक्रियेमुळे (उदा. पाश्चुरायझेशन) दुधाचा सात्विक प्रभाव आणि पोषक तत्वे नष्ट होतात.
डोळे दुखणे - उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होत असल्यास रात्री पापण्यांवर दुधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवल्यास डोळ्यांची लाली आणि जळजळ दूर होते.
आम्लपित्त - आम्लपित्ताच्या रुग्णाने दिवसातून दोन-तीनदा गार दुध एकेक घोट पीत त्यासोबत थोडेथोडे पाणी प्यायला पाहिजे. दुध गार केलेले असावे, फ्रिजचे नव्हे !
रक्तपित्त - ( शरीरात निष्कारण कुठूनही रक्तस्राव होऊ लागणे ) : कच्च्या दुधात २ ग्रॅम गोखरू चूर्ण अथवा शतावरी किंवा जेष्ठमध चूर्ण मिसळून प्यायल्याने लाभ होतो.
बद्धकोष्ठ ( मलावरोध ) : गरम दुधाबरोबर इसबगोलची पूड किंवा गुलकंद घेतल्याने मलावरोध तसेच मूळव्याधीत लाभ होतो.
आतड्यांचे रोग - जेवणापूर्वी एक चमचा कोमट दुध घेऊन हळूहळू पोट आणि नाभीवर मालिश करावी. एक तास विश्रांती घेऊन मग जेवण करावे. जेवणानंतर लगेच लघुशंका केल्याने आतड्यांना येणारी सूज आणि इतर आजारही दूर होतात तसेच आतडे मजबूत बनतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 15, 2017
आपण सेवन करत असलेल्या त्रिफळा चुर्णामध्ये देखील हरडा व बेहड्या सोबत आवळा असतो.
आवळ्याचे २०-२५ फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने चिंचेच्या पानांप्रमाणे असतात व ह्याला पिवळी फुले गुच्छ स्वरूपात येतात.फळे गोलाकार,मांसल पिवळसर हिरवी व आत टणक बी असणारी असतात.
ह्याच्यात खारट सोडुन बाकी पाच ही चवी असतात व त्यात आंबट चव प्रमुख असते.हा थंड गुणाचा असून तो तिन्ही दोषांचे शमन करतो.
आता आवळ्याचे घरगुती उपयोग पाहूया:
१)ज्या बायकांना अंगावर पांढरे जाते त्यांनी आवळ्याच्या बिया पाण्यात वाटून त्यात साखर व मध घालून सलग तीन दिवस घ्याव्या.
२)खरूज झाल्यास आवळ्याचे चुर्ण जाळून त्याची राख करावी व ती तीळ अथवा निंब तेलामध्ये कालवून लावावी.
३)घसा बसला असल्यास गाईच्या दुंधात आवळ्याचे चुर्ण मिसळून द्यावे.
४)अम्लपित्तामध्ये आवळ्याचे चुर्ण केळीच्या कांद्याच्या रसामध्ये मिसळून द्यावे.
५)नाकाचा घोळणा फुटून रक्तस्राव होत असल्यास व डोके वारंवार दुखत असल्यास आवळ्याचे चुर्ण तुप व साखर घालून खावे.
६)पित्याच्या विकारामध्ये आवळ्याचे ५ ग्राम चुर्ण कल्हई केलेल्या भांड्यात रात्रभर भिजत ठेवावे व सकाळी हे त्यात ५० मिली गाईचे दुध मिसळून ते प्यावे.
७)१ चमचा आवळा रस+ २ चमचे ओल्या हळदीचा रस सकाळी उपाशी पोटी घेतल्यास मधुमेहामध्ये फायदा होतो.
८)१ चमचा आवळा रस+ ४मोठे चमचे नारळाचे दुध रोज दुपारी जेवणापुर्वी घेतल्यास कृमिंचा त्रास कमी होतो.
९)१ चमचा आवळा रस+२ चमचे केळफूलाचा रस रोज २ महीने घेतल्यास बायकांचे अंगावर पांढरे जाणे,मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होणे ह्या तक्रारी कमी होतात.
१०)१ चमचा आवळा चुर्ण १ कप ताज्या ताकामध्ये मिसळून रोज जेवणानंतर घेतल्यास हाता पायाची आग होणे,संडासच्या जागी होणारी आग ह्या तक्रारी कमी होतात.
आवळा किती ही चांगला असला तरी तो अति खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 24, 2016
प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.
March 20, 2019
आई जगदंबेने आपल्या ललाम अर्थात कपाळावर कुंकुमाची चंद्रकोर रेखाटली आहे. त्यामुळे तिला ललामाङ्कफाला असे म्हणतात.
January 30, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti