वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ
धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग एक
नवीन अन्न खाणे प्रमेहाचे कारण आहे. नवीन म्हणजे या वर्षी तयार झालेले या वर्षी खाणे.
भारतीय परंपरेमध्ये तांदुळ, कडधान्य वगैरे साठवून, जुने करून खायची पद्धत होती. कोकणामधे भात साठवून ठेवण्यासाठी पाच ते सहा फूट उंचीचे आजच्या भाषेत "ड्रम किंवा बॅरल" तयार करत असत. त्यासाठी पण निसर्गाने दिलेले ( इकोफ्रेंडली ) गवतच वापरले जायचे. बांबूच्या काठ्या आणि गवत यांचा वापर करून धान्य साठवण्याच्या इकोफ्रेंडली टाक्या तयार केल्या जायच्या. आरोग्याला हानीकारक प्लॅस्टिकच्या ड्रमचा वापर, अन्न धान्य टिकवण्यासाठी ? ना रे बाब्बा ना !
धान्य एक वर्ष जुने का करायचे, कसे करायचे, त्याचे फायदे आणि तोटे काय हे प्रश्न ओघाने आलेच. त्याची उत्तरे आपणही शोधण्याचा प्रयत्न करावा.
जुना गुळ, जुने तांदुळ, जुनी कडधान्ये पचायला हलकी असतात. जुनी माणसे मात्र पचायला जरा जडच असतात. संस्कृतमधे सांगायचं तर "गुरू" असतात. "गुरू" असतात, ते पचायला जरा जडच असतात ना !
आयुर्वेदातील काही औषधे जमिनीमधे पुरून ठेवून, धान्याच्या राशीत पुरून ठेवून, नंतर ठराविक कालावधीनंतर बाहेर काढून वापरावीत. असे सांगितलेले आहे. म्हणजे त्यातील चांगल्या गुणांमधे वाढ होते, तर "आमा" सारखे दोष कमी होतात.
फळे पिकल्यानंतरच खावीत, कच्ची खाऊ नयेत. अधमुरे म्हणजे अर्धवट दही खाऊ नये, अर्धवट शिजलेले अन्न खाऊ नये, अर्धवट वैद्याचा सल्ला मानू नये, अर्धवट ज्ञानावर फुशारकी गाजवू नये, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये इ.इ. .... म्हणजेच पक्के फळ खावे, पूर्ण लागलेले दही खावे, पूर्ण शिजलेले अन्न खावे, पूर्णपणे शास्त्रीय ज्ञान घेतलेल्या वैद्याकडूनच सल्ले घ्यावेत, आपला अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच इतरांना सांगावे, ( अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतर झाकोन असावे, प्रकट होवोनी नासावे, हे बरे नव्हे । - इति, समर्थ रामदास स्वामी ) औषधे वापरताना देखील पूर्ण मात्रेतच वापरावीत. तर आणि तरच योग्य आणि चांगला फरक दिसतो, नाहीतर त्रासच होतो. नारळ देखील पूर्ण पिकल्यानंतरच वापरावा, कच्चे शहाळे पचायला जड होते. आरोग्य मिळवण्यासाठी जग किती विचित्र आणि उलटे चालले आहे.
प्रत्येकालाच घाई आहे, पुढे जायची, वेगानं जायची, जमाना पण इन्स्टंटचाच आहे. भाज्या सुद्धा अर्धवट शिजवून तयार विकत मिळतात. टू मिनट नूडल्स सारख्या, फक्त वर गरम पाणी ओता, की भाजी सुद्धा तयार ! तेवढा सुद्धा वेळ नाही आमच्याकडे, असे वर म्हणायचे !
धान्य वापरण्यापूर्वी काही काळ तसाच जाणे अपेक्षित आहे. म्हणजे त्यातील काही दोष काळाच्या प्रभावामुळे आपोआपच कमी होतात. म्हणजेच "काळ" हे पण मोठे प्रभावी औषध आहे.
ठराविक "काळ" निघून गेला की, मनातील राग, घुसमट देखील कमी होत जाते ना, तसेच धान्याचे देखील आहे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.05.2017
May 13, 2017
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाःमातस्त्रिकॊणनिलयॆ त्रिपुरॆ त्रिनॆत्रॆ ।
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः ॥ ५ ॥
कोणत्याही देवतेच्या उपासनेत तंत्र, मंत्र आणि यंत्र अशा तीन गोष्टी असतात. त्या उपासनेचे जे शास्त्रशुद्ध नियम, पद्धती, परंपरा त्यांना तंत्र असे म्हणतात.
या देवतेचे निर्गुण-निराकार स्वरूप ज्याच्या चिंतन-मननातून व्यवस्थित समजून घेता येते त्याला मंत्र असे म्हणतात.
तर त्या देवतेच्या अधिष्ठान स्वरूपात ज्या आकृती तयार केलेल्या असतात, त्यांना यंत्र असे म्हणतात.
आई जगदंबेच्या उपासनेत सर्व श्रेष्ठ यंत्र म्हणजे श्री यंत्र. त्यात सगळ्यात मध्यभागी असतो एक त्रिकोण. त्या त्रिकोणात असणारा जो बिंदू ते आदिशक्तीचे मूळ पीठ.
कोणत्याही देवतेच्या मंत्रात सर्वाधिक प्रभावशाली मंत्र म्हणजे बीजमंत्र. आई जगदंबेच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपां करिता अनुक्रमे ऐं, ह्रीं आणि क्लीं हे बीजमंत्र शास्त्राने सांगितले आहेत.
येथे आचार्य श्री त्या यंत्र आणि बीजमंत्राचा विचार मांडत आहेत. ते म्हणतात,
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाः- हे आई जगदंबे वेद तुझे नाव म्हणून ह्रीं काराचेच कथन करतात. अर्थात तेच तुझे नाव आहे. तोच तुझा सर्वोच्च मंत्र आहे.
मातस्त्रिकॊणनिलयॆ- हे आई श्री यंत्राच्या मध्यभागी असणारा त्रिकोण हे तुझे निवासस्थान आहे.
त्रिपुरॆ- हे त्रि-कोण जणूकाही त्रि-पूर आहेत. अर्थात स्थूल, सूक्ष्म ,कारण आहेत. तू त्यांच्या आत राहून त्यांचे संचालन करणारी चैतन्य शक्ती आहेस.
त्रिनॆत्रॆ - महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपातील तीन गुणांनी काम करणे हे जणू तुझे तीन नेत्र आहेत.
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः - अशा तुझ्या स्वरूपाचे स्मरण करतात, ते यमाचे भट अर्थात दूतांचे भय सोडून नंदनवनामध्ये लोकपाल अर्थात देवतांसह विहार करतात.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 16, 2020
मसाल्यांच्या पदार्थांच्या घटकांचे विश्लेषण बघितले तर पुढील गोष्टी लक्षात येतात. मसाल्याच्या सर्व पदार्थात कॅल्शिअम व फॉस्फरस भरपूर आहेत. हाडांच्या व दातांच्या बळकटीसाठी, स्नायू आकुंचन पावण्यासाठी व मज्जातंतूंच्या कार्यासाठी व रक्त साकळण्यासाठी कॅल्शियम उपयोगी. कॅल्शियम मोठ्या
आतड्याच्या कर्करोगाला प्रतिबंधक. लोह सर्व मसाल्यात विशेषतः हळद, आमचूर, हिंग, जायपत्री व जिरे यात जास्त असते. तांबड्या पेशीतील हिमोग्लोबिनसाठी आवश्यक. पंडुरोग होत नाही. तोंडाच्या, अन्ननलिकेच्या व जठराच्या कर्करोगाला प्रतिबंधक, त्वचेच्या, आतड्याच्या काही पेशींच्या कर्करोगास प्रतिबंधक. मसाल्यात 'अ' जीवनसत्त्व भरपूर असते. शरीराच्या प्रतिकारशक्तीला आवश्यक, अॅण्टिऑक्सिडंट.
कोलीन- हे एकच अमायनो आम्ल मेंदूच्या पेशींमध्ये शिरू शकते. याचा संबंध स्मरणशक्तीशी असतो. अल्झहायमर्स (विस्मृती) या रोगावर प्रतिबंधक म्हणून कोलीनवर प्रयोग चालू आहेत. वेलची, धणे, कोथिंबीर, जिरे, मेथीच्या बिया व मोहरी या पदार्थात कोलीनचे जास्त प्रमाण, जस्त हे अन्ननलिकेच्या कर्करोगाला प्रतिबंधक तर तांबे स्तनाच्या, फुफ्फुसाच्या व थायरॉईडच्या कर्करोगाला प्रतिबंधक, मँगनीज व मॅग्नेशियम ही खनिजे विकरांच्या (एन्झाईम) निर्मितीसाठी व पचनासाठी आवश्यक आहेत व ती मसाल्यात भरपूर आहेत. अन्नाचे पचन नीट झाले की त्यातील अनावश्यक चोथा आतड्यातून पुढे ढकलला जातो व बद्धकोष्ठता टळते. हा चोथा मोठ्या आतड्यात जास्त वेळ न राहिल्यामुळे कर्करोगाचे भय कमी होते. भाज्या, कडधान्ये इत्यादींपेक्षा मसाल्याचे पदार्थ रोजच्या स्वयंपाकात कमी प्रमाणात असले तरी त्यातील खनिजे व सूक्ष्म क्षार यांचे प्रमाण भाज्या वगैरेपेक्षा खूपच जास्त असते; त्यामुळे या खनिजांची रोजची गरज मसाल्यातून भागू शकते. ही द्रव्ये नैसर्गिक असल्यामुळे योग्य प्रमाणात शरीरात शोषली जातात.
या सर्व माहितीवरून अशा या 'बहुरुपी बहुगुणी मसाल्यात दडलंय काय' या प्रश्नाचे उत्तर मिळते. मसाले योग्य प्रमाणात नियमित खाणे प्रकृतीला हितकारक व आवश्यक असते.
आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक व सखोल प्रयोगांती मसाल्याचे निरनिराळे घटक रोजच्या आहारात अंतर्भूत केले आहेत. हा ज्ञानाचा अनमोल ठेवा आपणही पुढच्या पिढ्यांनी जतन केला पाहिजे. मसाले टिकवण्यासाठी किरणोत्सारी प्रक्रिया करतात. ६ ते १४ डॅ८ ची मात्रा देतात. त्यामुळे पोरकिडे व बुरशीपासून संरक्षण मिळते.
March 12, 2023
अलीकडील काळात कुटुंब नियोजन, दारुबंदी, निर्मलग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आणि मुली वाचवा अभियानातील संदेशही जनतेपर्यंत पोहचवला. त्यामुळे आजही हे आंबेडकरी जलशे समाज प्रबोधनात निश्चितच अग्रेसर आहेत यात दुमत नाही.
April 13, 2012

पृथ्वीचा असा खोलपर्यंत घट्ट झालेला हा जाड पृष्ठभाग म्हणजेच आजचं शंभर-दीडशे किलोमीटर जाडीचं पृथ्वीभोवतीचं घन स्वरूपातलं भूपृष्ठ! या भूपृष्ठाच्या निर्मितीच्या वेळी पृथ्वीचं वय होतं जवळजवळ एक अब्ज वर्षं. पृथ्वीवर खनिजांची निर्मिती होऊ लागली पृथ्वीच्या जन्मानंतर सुमारे दहा-पंधरा कोटी वर्षांनी; त्यानंतर आणखी सुमारे ऐंशी कोटी वर्षांनी पृष्ठभागाला आजचं स्वरूप प्राप्त झाल्याचं यावरून दिसून येतं.
January 8, 2022
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
ग्रंथकार म्हणतात, निरोगी राहायचे असेल तर नेहेमीच क्षमावान असावे. काही वेळा प्रश्न पडतो, क्षमावान असण्याचा आरोग्याशी संबंध कसा काय बुवा ?
क्षमाशीलता हे वीराचे भूषण आहे. ज्याच्या मनगटात ताकद आहे, तोच म्हणू शकतो, " जा, तुला क्षमा केली ! "
क्षमा याचना कधी केली जाते ? जेव्हा आपली चुक आपल्याला उमजते तेव्हाच. माझी चुकच नाही तर मी क्षमा कशाला मागू ? आणि क्षमा मीच का मागू ? हा प्रचंड अहंकार पाठी लागतो. एकदा का अहंकाराची कीड आत गेली तर तिला बाहेर काढणे खूप कठीण होते. म्हणून वेळीच सावध होऊन मनाला आवरावे.
I am sorry.
हे तीन शब्द मोठमोठ्या चुका माफ करून जातात. व्यवहारात अशी परिस्थिती अनेक वेळा येत असते. एक शब्दाचा कमीपणा स्विकारायला आपण तयार नसतो आणि काट्याचा नायटा होतो. ठिणगीचे रूपांतर आगीत, आणि आगीचे रुपांतर फुफाट्यात होते. जेव्हा समजते तेव्हा खूप काही गमावलेले असते. परस्परांवरील विश्वास ! मन दुखावते, माणसे दुरावतात. यासाठी हे तीन शब्द उपयोगी पडतात, आय अॅम साॅरी.
जर मनात असूनही हे शब्द जर वेळीच ओठात आले नाहीत, तर वेळ निघून जाते. गैरसमज वाढत जातात. ताण निर्माण होतो. आणि अनेकानेक व्याधी जन्माला येतात.
ज्याची क्षमा त्याच्याकडेच मागावी. तर ती माफ होते. आणि विनाअट मागावी. अट ठेवून माफी मागणे याला क्षमा म्हणत नाहीत, "जर माझ्या शब्दाने, कृतीने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी माफी मागत आहे" ही अशी सशर्त क्षमा मागणे फक्त राजकारण्यांना जमू शकते. तो आपला प्रान्त नाही.
आज व्यवहारात त्याचे परिणाम देखील दिसतात. साध्या पोटदुखीपासून जाडी वाढणे, रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोग, पॅरालेसीस, कॅन्सर, हे शारिरीक. नैराश्य, चंचलता, निद्रानाश, चिडचिड इ. मानसिक तर खोटे बोलणे, चोरी करणे, पापकर्म करणे, व्यसन जडणे, असे आध्यात्मिक व्याधी जन्माला येतात.
क्षमा करणारा मोठा असतोच, पण क्षमा मागायला सुद्धा दिलदारपणा असावा लागतो. मन तेवढं मोठ्ठं असावं लागतं. पण आपल्या मनात नसताना, पटलेलं नसताना, कधीही दुसऱ्याची क्षमा मागू नका, कारण जर मनाला पटलेले नाही आणि पटल्याचे नाटक जर करीत राहिलात तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तुम्ही दुसऱ्याला फसवू शकता, पण स्वतःला नाही.
यातून तणाव जन्माला येतो. म्हणजेच ताण आणि तणाव वाढण्याचे कारण सत्पात्री क्षमा न मागणे आणि कुपात्री क्षमा मागणे हे आहे.
षड्रिपू पैकी सर्वात मोठा जो अहंकार, याचा शत्रू क्षमा आहे. म्हणजेच अहंकाराचा नाश क्षमेने होतो. तेथे सुद्धा भेदभाव नको. समानता हवी.
तुकोबाराया एका ठिकाणी म्हणतात,
क्षमा करणे जे पुत्रांसी,
तेची दासा आणि दासी ।
याचा अर्थ सरळ आणि सोपा आहे.
"तुला म्हणून साॅरी म्हणतो, नायतर...." ही वृत्ती नको, जी क्षमा असमानता दाखवते.
अहो, साधं वाॅटसप गटात जे नियम अॅडमिननी केलेले असतात, ते चुकुन मोडले तर शिक्षा भोगावीच लागते ना ! आणि "साॅरी... चुकुन... " या दोनच शब्दात माफी देखील मिळते, हे तर आपण दररोज पाहातोच. तरीदेखील क्षमा मागायला आपल्याला कमीपणा वाटतो.
वाढत्या रोगांची संख्या लक्षात घेतली तर फक्त तीन शब्दात ती निश्चितपणे कमी करता येईल.
बस्स म्हणायचे.
"आय अॅम साॅरी."
"गलती मेरी है, मुझे माफ करो."
"हं, जरा चुकलंच तेव्हा ! "
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०२.०८.२०१७
August 2, 2017
मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर बुधवारी रात्री ८.३० वा. प्रसारित होणार्या ‘अमृतवेल’ या साहित्यविषयक कार्यक्रमात कथा-कविता विविध साहित्यिकांच्या मुलाखती आणि लेखनविश्वाच्या नव्या-जुन्या प्रवाहांचा वेध घेतला जातो. या या रसिकप्रिय कार्यक्रमाने १५० भागांचा टप्पा नुकताच पार केला. अमृतवेलच्या आगामी कार्यक्रमात ‘काव्यांजली’ हा कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर विशेष कार्यक्रम तीन भागांत लवकरच प्रसारित होणार आहे. २, ९ आणि १६ फेब्रुवारी रोजी या तीन भागांचं प्रसारण होणार आहे. यात ज्येष्ठ कवी शंकर वैद्य आणि डॉ. घनश्याम बोरकर हे सहभागी होणार आहेत.
January 29, 2011
इंग्रजीमधून आफ्रिकन व अन्य भाषेत आलेल्या बालगीतांची यादी जबरदस्त आहे. अगली डकलिंगची मूळ कथा ‘हान्स ख्रिश्चन अॅन्डरसन’ या डेनिश लेखकाने ११ नोव्हेंबर १८४३ या दिवशी प्रसिध्द केली.
January 2, 2025
मेंदूचा सक्रिय हिस्सा जेव्हा रिकामा असतो तेव्हा खूप काही नवं सुचतं, त्रास देणाऱ्या समस्यांची उत्तरे चुटकीसरशी मिळतात, शॉवर खाली असताना काहीतरी भन्नाट सुचून जातं. मानवी मेंदूची क्षमता अफाट असली तरी रोज जो अनावश्यक कचरा(क्लटर) आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांत कोंबत असतो, ती केराची टोपली चालताना अंशतः रिकामी होते.
August 6, 2022
दिल्लीतील बल्लीमारान भाग म्हणजे एक गजबजलेलं उपनगर.तिथे लाला केवलकिशन सिकंद हे एक सिव्हिल इंजिनिअर आपल्या पत्नी रामेश्वरीसह रहात असत.ते मूळचे पंजाबातील होशियारपूरजवळच्या भारोवाल गावचे.सैलाखुर्द स्टेशनवर उतरून ७ किलोमीटर दूरवर हे गाव
July 30, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti