(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत

    प्रत्येक माणसाला भूक लागणं ही एक सामान्य नैसर्गिक क्रिया आहे. रोजच्या रोज खाल्लेल्या अन्नामुळे आपल्या शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचं कार्य म्हणूनच सुरळीतपणे चालतं. मात्र जर भूकेचे गणित बिघडले असेल तर मात्र हे आपल्या शरीरात काही दोष वाढत असल्याचे लक्षण असू शकते.

      July 10, 2019


  • अन्वर हुसेन

    ५ सप्टेंबर हा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.

    अनेक वर्षं हा दिवस शिक्षक दिवस म्हणून देशभर | साजरा होतो. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनात देशभरातल्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचे गौरव होतात. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. रविवारी झालेल्या कार्यक्रमात ज्या अनेक शिक्षकांचे गौरव राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले, त्यातले एक | अगदी ठळक उठून दिसणारे नाव होते, अन्वर हुसेन यांचे! हुसेन मूळचे बंगालमधले. पश्चिम बंगालमधल्या ज्या १२ शिक्षकांना काल राष्ट्रपती भवनात गौरविण्यात आलं, त्यातले ते एक. बरद्वान जिल्ह्यातला ऑरग्राम छतुसपल्ली बाय मदरसा हे त्यांच्या शाळेचं नाव. तीन दशके, म्हणजे नेमके बोलायचे तर १९७७ सालापासून, ते हा मदरसा चालवताहेत. मदरशाची सुरूवात झाली अवघ्या ३४ विद्यार्थ्यांनिशी. आज ही संख्या वाढतवाढत हजाराच्यावर गेली आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की त्यातले सुमारे ६४ टक्के विद्यार्थी हे जन्माने हिंदू आहेत. अलीकडच्या काळामध्ये मदरशांभोवती एक संशयाचे, गूढतेचे वर्तुळ उभे राहिले होते. या मदरशामधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा संबंध शालेय पाठ्यपुस्तकी शिक्षणाशी लावण्याऐवजी तो दहशतवादी प्रशिक्षणाशीच अधिक लावला जात होता. पण अन्वर हुसेन यांनी मदरशाच्या कामकाजात अधिकाधिक लक्ष घालायला सुरूवात केल्यापासून ही संशयाची, गूढतेची वर्तुळे हळूहळू दूर व्हायला लागली आहेत. हुसेन यांनी शिक्षणाची गंगा त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली, ज्यांना त्यांच्या कौटुंबिक आर्थिक स्थितीमुळे शिक्षण घेणे शक्यच नव्हते. अन्वर हुसेन यांनी पायी जाऊन साद गावोगाव घातली. मुलांना हात धरून शाळेपर्यंत आणले, त्यांच्या पालकांशी संपर्क साधला, त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले, त्यांच्याकरता शिक्षणाची सारी साधने विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली, आणि प्रयत्न फळाला आले. पालक तयार झाले. स्वाभाविकपणेच मदरशातील विद्यार्थी नोंद गुणोत्तराच्या पटीत वाढत गेली. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाला पश्चिम बंगाल सरकारनेही तेवढीच मोलाची साथ दिली. त्यांच्या या प्रयोगाची कहाणी बंगालबाहेरच्या जगाला सर्वप्रथम कळली ती एक्स्प्रेस वृत्तसमूहामुळे. गेल्या जानेवारीतच एक्स्प्रेसने या मदरशाचे वृत्त दिले आणि साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. हुसेन यांचा मदरसा तेव्हा माध्यमिक शालेय शिक्षणाच्या स्तरापुरातच मर्यादित होता. आता त्यात भर पडली आहे उच्च माध्यमिक शिक्षणाच्या तुकड्यांची. तेव्हाच्या ८८३ च्या संख्येत हिंदू विद्यार्थी होते ५५५, आणि आता हजाराचा आकडा ओलांडून १०७८ वर पोचलेल्या विद्यार्थी संख्येत हिंदू विद्यार्थी झाले आहेत जवळपास सातशे. या विद्यार्थ्यांसाठी आता अकरावी-बारावीचे विज्ञान आणि कला शाखेचे पर्याय खुले झाले आहेत. हुसेन एवढ्यावर थांबलेले नाहीत. मदरशात शिकणाऱ्या मुलांनी केवळ उर्दूच शिकावे असा पोथीनिष्ठ विचार त्यांचा नाही, त्यांनी इंग्रजीची दारेही मुलांना खुली केली आहेत आणि संगणक प्रशिक्षणाच्या खिडक्याही मुलांसाठी उघड्या केल्या आहेत. पश्चिम बंगाल सरकारनं याची दखल घेत त्यांचे नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी सुचवले आणि ते राष्ट्रपती सचिवालयाने स्वीकारले हाच हुसेन यांच्या कार्याचा मोठा गौरव आहे.

      July 31, 2015


  • सत्यनारायण पूजा – एक विश्लेषण

    लोकसत्ताच्या ‘चतु:सूत्र’ या सदरातील ‘संस्कृतीच्या वाटाघाटी’ हा प्रा. श्रद्धा  कुंभोलकर यांचा १२नोव्हें. २०२० ला ( पुणे आवृत्तीत ) प्रसिद्ध झालेला लेख आणि त्यानिमित्तानें प्रा, विजय काथरे यांची १३ नोव्हे. ची लोकसत्तामधील ‘लोकमानस’ या सदरातील प्रतिक्रियाही वाचली. सत्यनारायण व्रतावर आणखी माहिती मिळावी अशी इच्छा काथरे यांनी प्रगट केलेली आहे. त्यानुसार माझा हा लेख.

      December 27, 2020


  • दाम करी काम…

    देशात पुरेसा पैसा चलनात असला तर उपभोगासाठी त्याचा वापर करून काही रक्कम बचत केली जाऊ शकते. या बचतीने बँकातील ठेवी वाढतात आणि त्यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतात. उपभोक्ते, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांना अधिक कर्ज मिळाल्याने अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक निर्यात शक्य होते.आणि त्यातू देशाची आर्थिक प्रगती साधता येते.

      January 16, 2023


  • सेल्फी- एक व्यसन…

    तीन तरूणींचं सेल्फीच वेड मुंबईत एका तरुणीचा आणि एका निधड्या छातीच्या तरुणाचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलं. सेल्फीच्या वेडाने सध्या म्हातार्यांीपासून- तारूणांपर्यत सार्यां नाच पछाडलेले आहे. याला अपवाद फक्त ते आहेत जे मोबाईलचा वापर करत नाहीत.

    तंत्रज्ञानापासून दूर राहणारे आज खर्याु अर्थाने सुखी आहेत असं म्ह्णण्याची वेळ आता जवळ आली आहे. सेल्फीच्या नादात हल्ली तरुणमंडळी फक्त स्वतःतील सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांना त्यांच्या सभोवतालच्या निसर्गातील सौंदर्य दिसेनासे झालेले आहे. सेल्फी हे आजचा समाज कसा आत्मकेंद्रीत होत चालला आहे याचे जीवंत उदाहरण आहे. जेंव्हा सेल्फी नव्हता तेंव्हा लोक आपल्या सभोवतालचे सौंदर्य शोधायचे आणि आपले सौंदर्य इतरांच्या डोळ्यात पाहायचे. सेल्फीभ हे सध्याच्या मणुष्याच्या आत लपलेल्या स्वार्थाचेच एक प्रतिबिंब आहे. पण सध्याच्या माणसाचा हा स्वार्थ आता इतरांच्या जीवावरही बेतू शकतो हे लक्षात आल्यानंतर आता सेल्फी हा विनोदाचा, मजा- मस्तिचा विषय राहिला नसून आता चिंतनाचा विषय झालेला आहे. सेल्फी काढण्यासाठी हल्लीचा माणूस स्वतःला अधिका - अधिक उगडा पाडू लागलेला आहे. महिन्यातून दोन- चार सेल्फी काढण्याचा मोह कोणालाही होऊ शकतो. पण दिवसातून दहा-पंदरा सेल्फी काढणारी व्यक्ती बरी आहे असं नाही म्ह्णता येणार. त्या व्यक्तीला सेल्फी काढण्याचा आजार जडलेला आहे असंच म्हणावं लागेल. प्रत्येकाने सेल्फी बाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे.

    सेल्फी काढतानाही काळ, वेळ आणि स्थळ याचे भान प्रत्येकाने ठेवायलाच हवे, त्या तीन तरुणींनी ते ठेवले असते तर त्यांच्यातील एकीला आणि त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात समुद्रात बुडून त्या तरूणाचा नाहक बळी गेला नसता.

    सेल्फी हा आपल्या सौंदर्याच प्रदर्शन मांडण्याचा एक प्रकार झालेला आहे. पण मणुष्य स्वभाव त्याचे काय करणार कालांतराने त्याला तेच ते पाहण्याचा कंटाळा येतो. तेंव्हा आपल्या सेल्फीकडे होणारं लोकांच दुर्लक्ष कित्येकांना मानसिक त्रासही देत असेल ज्यामुळे त्यांचा मनोरुग्ण होण्याच्या दिशेने प्रवास कदाचित जलदही होत असेल, त्यातून त्यांना येणार नैराश्य आणि त्या नैराश्यातून त्यांच्या हातून होणार्याह चूका याचा वाईट परिणाम शेवटी समाजमनावरच होणार. अर्थात लोकांच सेल्फीच वेड नव्हे व्यसन समाजाला घातक आहे हे आता प्रत्येकाने पटवून घ्यायला हवे. एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतो अथवा आपण समुहाने कोठे - कोठे गेलो होतो हे इतरांना दाखविण्याचा अट्टहासही सेल्फीत दिसतो.

    सेल्फीच्या नादात कोणीतरी जीव गमावल्याच्या बातम्या हल्ली वारंवार कानावर येत असतात. सेल्फीसाठी वारंवार नव्याने स्वतःतील सौदर्य शोधण्याचा अट्टहास करण्यापेक्षा आपल्या सभोवतालचे सौंदर्य इतरांपर्यत पोहचविणे अधिक सोप्पे नाही का ? सेल्फीसाठी सेल्फफीश होणे आता थांबायला हवे त्यातच समाजाचे आणि आपलेही खरे हीत आहे नाही का ?

    -- निलेश बामणे,

      January 16, 2016


  • कल्याणवृष्टिस्तव – १३

    कल्पॊपसंहृतिषु कल्पितताण्डवस्य
    दॆवस्य खण्डपरशॊः परभैरवस्य ।
    पाशाङ्कुशैक्षवशरासनपुष्पबाणा
    सा साक्षिणी विजयतॆ तव मूर्तिरॆका ॥ १३ ॥

    आई जगदंबेच्या परांबा, परमेश्वरी स्वरूपाला भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे एका वेगळ्याच पद्धतीने सादर करीत आहेत.

    सत्व ,रज आणि तम या तीन गुणांच्या तीन देवता म्हणजे अनुक्रमे भगवान विष्णु, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकर.

    यापैकी भगवान शंकरांचे कार्य म्हणजे विश्वाचा विलय. ज्यावेळी भगवान हे कार्य करतात त्यावेळी ते रुद्रतांडव नृत्य करतात. त्यामध्ये सर्व चराचर सृष्टीचा विनाश होतो. या भीषण तांडवनृत्याचे अधिष्ठान वापरून आचार्य श्री आई जगदंबेचे वर्णन करतात.

    त्यासाठी आरंभी या नृत्याचे वर्णन करताना ते म्हणतात,

    कल्पॊपसंहृतिषु- कल्पाच्या शेवटी केल्या जाणाऱ्या उपसंहार नृत्याच्या वेळी, कल्पितताण्डवस्य- तसे घडावे अशी कल्पना करून केलेल्या तांडवनृत्य समयी,

    दॆवस्य खण्डपरशॊः परभैरवस्य- पर भैरव अर्थात भगवान महादेवाचा परशु खंड खंड विखंड झाला असताना.
    हा संहार इतका भयानक आहे की त्यात भगवान शंकरांच्या हातातील परशु देखील खंडित होतो. यातून त्याची तीव्रता लक्षात यावी.

    आचार्यश्री म्हणतात हे आई जगदंबे,

    पाश,अंङ्कुश,
    ऐक्षवशरासन- इक्षु म्हणजे ऊस. त्यापासून बनविलेले ते ऐक्षव. शर म्हणजे बाण त्याचे आसन म्हणजे धनुष्य.
    पुष्पबाणा- फुलांचे बाण.

    अशा आयुधांनी सुशोभित असणारी,
    सा साक्षिणी विजयतॆ तव मूर्तिरॆका- तुझी एकच मूर्ती, अर्थात तू एकटीच या सर्व गोष्टींची साक्षीदार असतेस. त्यात तुझा विजय असो.

    भगवान शंकराचा विश्वविलयलीलेची साक्षी असते आई जगदंबा.
    ज्यावेळी काही शिल्लक राहत नाही आणि अन्य कोणीच नसते, त्यावेळी जगदंबे 'असणे' तिचे खरे वैभव आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 24, 2020


  • निसर्गकन्या – बहिणाबाई चौधरी – जन्मदिनी मानाचा मुजरा

    लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्‍या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्‍या संस्‍कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्‍यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्‍यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्‍यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय.

      August 27, 2019


  • तू सुखकर्ता तू दुखहर्ता

    गणपती, त्याची भक्ती, महिमा यावर आधारित ‘अष्टविनायक’ हा मराठी चित्रपट आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर हा चित्रपट दरवर्षी एकदा तरी दाखवला जातोच.

      July 11, 2025


  • ती छडी हरवलीय

    सर्वांनीच आत्मसात करणयासारखा अप्रतिम व उत्कृष्ट लेख....

    ""ती छडी हरवलीय.....""

    पालकसभा संपली.
    मुलाच्या बाईंना प्रत्यक्ष भेटून म्हटलं.........
    गृहपाठ केला नाही वा वर्गात काहीही आगळीक केली तरी त्याला व्यवस्थित शिक्षा करा."
    "कमाल आहे. अहो, साधी एक पट्टी मारली तरी दुसर्‍या दिवशी पालक प्रिन्सिपाॅलना भेटतात. आम्हाला समज दिली जाते. तुम्ही तर शिक्षा करा असं सांगताय !"
    "योग्य वेळी योग्य शिक्षा हा सुध्दा शिक्षणातला भाग आहे असं मला वाटतं. शिक्षकांबद्दल प्रेमाबरोबर धाकही वाटायला हवा."
    मला समर्थ विद्यालयाच्या पहिलीच्या वर्गातली माझी पहिली शिक्षा आठवली. हिशेबाचं उत्तर चोरुन लिहिल्याबद्दल भाटवडेकर बाईंनी केलेली.
    वर्गाबाहेर पायाचे अंगठे धरुन तासभर उभं केलं होतं त्यांनी. अश्रूंची धार लागली होती. शिक्षा संपली न् जवळ घेऊन, थोपटून त्या म्हणाल्या, "अरे, आता हिशेबच काय, कुठलीही चोरी तुझ्या हातून होणार नाही."
    हे आठवलं न् हसू आलं
    '"शिक्षा '" याचा अर्थ फक्त मारहाण, उपासमार, तणावपूर्ण अबोला असा नाही. शिक्षेचे रुपरंगही बदलत जातात. मुळात शिक्षा करणार्‍यामध्ये नैतिकतेचं अधिष्ठान असावं लागतं. तेच नसेल तर त्याच्या शब्दांमध्ये सामर्थ्य प्रकटत नाही.
    शिक्षा म्हणजे क्रोधाचा आविष्कार नव्हे; तर हितचिंतनाचा तो एक प्रकार आहे. आठवतं—अभ्यास सोडून मोठ्यांच्या गप्पा ऐकायच्या नाहीत हा वडीलांनी केलेला उपदेश विसरुन संध्याकाळी पाहुण्या आलेल्या नातेवाईंकाच्या रंगलेल्या गप्पा मी ऐकत असल्याचे पाहताच काही कळायच्या आत त्यांनी गुडघ्याच्या खाली पोटरीवर वेताच्या छडीने विलक्षण वेगाने प्रसाद दिला. दुसर्‍या दिवशी सकाळीच ती छडी बंबात टाकण्याची दक्षता मी घेतली.
    पाच—सहा दिवसांनी बाजारपेठेत फिरायला गेल्यावर छडीच्या दुकानाशी वडील थांबले न् म्हणाले, " बघ, तुला कुठली बरी वाटते ती?"
    आज वेळीच झालेल्या त्या शासनाचा वारंवार उपयोग होतो. आज पालकांच्या हातातली ती छडी हरवलेली दिसते. पालक आणि शिक्षक यांच्या पाच बोटांतली चार बोटे मायेची असावीत, पण एक बोट वेळीच कर्तव्यकठोर होणारं असावं. योग्य शिक्षा हेही वात्सल्यच, हे न कळल्याने, काटछाट न केलेल्या झाडासारखी मुलं कशीही वाढतात. तसं झाड सुंदर दिसेलही, पण मुलांना मात्र आकार द्यावाच लागतो.
    मिठाचं प्रमाण बदलल्यावर पदार्थाचं जे होतं तेच शिक्षेचं प्रमाण अती झाल्यानंही होतं. तेव्हा हा विचार सारासार विवेकानंच घ्यावा.
    भिंतीवर नको तो मजकूर लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून 'श्यामची आई ' मधील दहा पानं लिहून आण म्हटल्यावर त्या विद्यार्थ्यानं पंधरा दिवसानं अख्खं पुस्तकच लिहून आणल्याचा प्रसंग आजही आठवतो. 'श्यामची आई ' चं ते हस्तलिखित बाड पाहून मी चक्रावलो. ' सर, तुम्ही दहाच पानं सांगितलीत. पण मला पुस्तक एवढं आवडलं की लिहावंसंच वाटलं.
    श्यामची आई मरण पावल्यावर जेव्हा ती श्यामच्या स्वप्नात येते, तेव्हा सर खूप रडलो मी ! माझ्या चुका कळल्या. आईला यापुढे त्रास द्यायचा नाही, असा मी निश्चय केलाय सर."
    मी म्हटलं, " आता तुझ्या हातून वाईट लिहिलं जाणं शक्यच नाही. कारण साने गुरूजींनी 'श्यामची आई ' लिहिलं, त्यानंतर तूच लिहिलंस "
    काळ बदलतोय. आता प्रत्येक वर्षी नव्या, अधिक निगरगट्ट मुलांची पिढी वर्गात येताना दिसते. प्रसारमाध्यमांमुळे मुलं एका बाजूला चुणचुणीत, 'जनरल नाॅलेज' ने 'करोडपती' झालेली दिसतात ; पण बिनधास्त, आगाऊ, रगेलही झालेली ही मुलं पाहिली की वाटतं— यामध्ये निदान आपलं मूल तरी नसावं.
    मुलांना शिस्त लावताना आपल्या चारित्र्याकडे लक्ष पाहिजे. कारण शब्दात ' चारित्र्य ' नसेल तर धाक निर्माण होत नाही. घरात आपण कसं वावरतो यातूनच मुलं शिकत असतात. अधिकार 'पदा' त तेव्हाच येतो जेव्हा तो स्वत:च्या आचरणात असतो.
    शाळेच्या सहलीला गोव्याला गेलेल्या मुलीला बाबा जेव्हा 'गोव्याची' घेऊन ये, सांगताना आम्ही शिक्षक ऐकतो, तेव्हा त्या मुलीच्या सैरभर आयुष्याची तयारी घरातूनच होते, हे हताशपणे पाहतो.
    घरात सर्व वस्तु आहेत. चैनीच्या, विलासाच्या......,
    देह अगदी पूर्ण सुखात लोळेल याची काळजी आपल्यात आर्थिक अनुकूलतेनं घेतली आहे.
    आपल्या घरात बघा. काय नाही आपल्या घरात?
    सर्व ...... सर्व आहे!
    फक्त दोन गोष्टी आहेत का, बघा?

    कोपर्‍यातली " छडी ''आणि "देवघरातलं निरांजन" !


    -- संकलन : अमित कुलकर्णी
    मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्‍याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये देऊ शकता.

      June 14, 2017


  • जुळ्यांची’ ऑनलाईन शाळा

    जुळ्यांना वाढवताना एक मंत्र मी कायम जपलाय, तो म्हणजे त्यांना स्वयंभू बनवणं! आणि यापूर्वी देखील इतर मुलांकडे बघताना हे असंच असंलं पाहिजे हे नेहमी वाटायचं.

      December 23, 2021