(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दृष्टिहीन मतदारांच्या मतांची पडताळणी करण्यासाठी प्रणाली

    अशी यंत्रणा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे ज्याद्वारे दृष्टिहीन मतदारांना त्यांच्या मतांचे त्वरित ऑडिओ सत्यापन करता येईल. म्हणून, दृष्टिहीन मतदारांना त्यांच्या मतांची पडताळणी करण्यास सक्षम बनविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये “इमेज टेक्स्ट टू स्पीच कन्व्हर्जन” ही प्रणाली समाविष्ट केली पाहिजे.

      June 25, 2021


  • पुरुष – प्रकृती

    सहवासातून, विचारांतून, एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो त्यावेळी मैत्र फुलतं. पती-पत्नीचं मैत्र असलं की संसार कसा नेटका, फुलून आलेला, बहरलेला दिसतो.

      December 21, 2021


  • न वैद्यो प्रभुरायुष:।

    "आजवर कित्येक उपचार घेतले; काही फरक नाही. अगदी IUI चे कित्येक प्रयत्न केले. पाण्यासारखा पैसा खर्च झाला; तरीही रिझल्ट नाही. माझ्या बहिणीने तुमच्या नावाचा आग्रहच धरला म्हणून इथे आले. इतर कशाने फरक पडलेलाच नाही; आता आयुर्वेदाने काही फरक पडतोय का बघूया इतकाच विचार डोक्यात होता. फारशी काही अपेक्षा नव्हतीच. तुमच्या औषधाने मात्र आमचं जीवन बदललं. आधीच तुमच्याकडून उपचार घ्यायला हवे होते."
    लग्न होऊन सहा वर्षे झाली पण गर्भधारणा नाही; अशी तक्रार असलेले जोडपे आपल्या नवजात बालकाला घेऊन आपल्याकडे येऊन ही प्रतिक्रिया देतात तेव्हा 'हा सूर्य हा जयद्रथ' इतकी स्पष्ट स्थिती असते. 'तुमच्या औषधाने' हे शब्द मात्र कानाला थोडेसे खटकले. माझं औषध? माझं असं काय आहे त्यात? जे आहे ते आयुर्वेदाचं; चरक-वाग्भटादि आचार्यांचं, वात्स्ययनादि महर्षींचं. आम्हा वैद्यांचं काम हमालाचं फक्त. 'फोडिले भांडार धन्याचा माल। मी तो हमाल भारवाही।'
    आम्हाला ज्ञान देणारा आयुर्वेद आणि फळ देणारे भगवान धन्वंतरी. आम्ही वैद्यगण केवळ निमित्तमात्र. माझ्यासहच बहुतांशी वैद्य 'तुमच्या औषधाने' या शब्दांवर अडतात; 'माझ्या नाही - आयुर्वेदाच्या' असं तुम्हाला झटकन सुचवतात! शास्त्र हे सर्वोपरि. फार कशाला; काही मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले विद्यार्थीदेखील नमस्कार करण्यासाठी पुढे सरसावतात तेव्हाही मी त्यांना अडवतो आणि माझ्या चिकित्साकक्षातल्या धन्वंतरीप्रतिमेकडे बोट दाखवतो. बहुतांशी वैद्य असेच असतात; निष्काम कर्मयोग्यासारखे. किंबहुना तसेच असण्याचा आयुर्वेदाचा आदेश आहे.
    'न वैद्यो प्रभुरायुष:।'
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      December 28, 2016


  • धनुर्धारी एकलव्य

    धन्य तो एकलव्य, जीवन ज्याचे दिव्य
    इतिहास घडवी भव्य, कौरव पांडवा संगे ।।१।।

    साधा होता भिल्ल, शरीर संपदा मल्ल
    धनुर्विदेचे शल्य, त्याच्या अंगी होते ।।२।।

    जन्मता धनुर्धारी, बनोनी शिकारी
    हिंस्र जनावरे मारी, अचूक नेम मारूनी ।।३।।

    पाहोनी भक्ष्य, होवूनी दक्ष
    देवूनी लक्ष, शिकार करी ।।४।।

    गुरूच्या होता शोधात, तीच त्याची खंत
    पूर्णता नसे ज्ञानात, गुरूविना ।।५।।

    शोधता आला आश्रमी, कौरव पांडवाचे मुक्कामी
    प्रसन्न झाला चित्ती ।।६।।

    गुरू द्रोणाचार्य, महान ते आचार्य
    अद्वितीय त्यांचे कार्य, महाभारतामध्ये ।।७।।

    कौरव पांडवाचे गुरू, धनुर्विद्येत तरबेज करू
    कुणी न त्यांचे हात धरू, ही इच्छा द्रोणाची ।।८।।

    कौरव पांडव मेळाव्यांत, बसता द्रोण मध्यभागांत
    एकलव्य येई तेथ, अभिवादन करी गुरुला ।।९।।

    इच्छा प्रदर्शिली विद्येची, धनुर्धारी बनण्याची
    द्रोणास गुरू करण्याची, एकलव्याने ।।१०।।

    बघूनी एकलव्याची स्फूर्ती, द्रोणास हर्ष होती
    कौतुके आशिर्वाद देती, गुरू द्रोणाचार्य ।।११।।

    विद्या माझी क्षत्रियासी, परी तू भिल्ल असशी
    कसे शिकवू मी तुजसी, द्रोण विचारी ।।१२।।

    गुरुचरणा खालची माती, एकलव्य घेई हाती
    हाच माझा गुरू असती, आशिर्वाद मागी द्रोणासी ।।१३।।

    मानूनी गुरू द्रोणा, घेवूनी त्यांची प्रेरणा
    जाई निघोनी वना, एकलव्य ।।१४।।

    घेवूनी चरणाखालील माती, बनवी तयाची द्रोण मूर्ती
    गुरू त्या प्रतीमे समजती, शिष्य होई एकलव्य ।।१५।।

    नमन करूनी द्रोण प्रतिमेला, धनुर्विद्येचा सराव केला
    मेहनत तो घेवू लागला, रात्रंदिनी ।।१६।।

    करूनी गुरूचे चिंतन, एकाग्र करूनी मन
    धनुर्विद्येचे ज्ञान, घेवू लागला ।।१७।।

    गुरू समजोनी मूर्तीचे ठायी, धनूर्विद्येचे ज्ञान घेई
    शिष्याचे प्रतीक होई, ह्या जगामध्ये ।।१८।।

    नसता गुरू समोरी, ज्ञान संपादन करी
    हीच असामान्यता खरी, एकलव्याची ।।१९।।

    एकाग्र चित्तेचे फळ, हेच यशाचे बळ
    समजोनी घ्यावे सकळ, विद्यार्थी जन हो ।।२०।।

    कौरवा पांडवा संगे, द्रोण जाता त्याच मार्गे
    अघटीत घटना होई गे, एकलव्याच्या वनांत ।।२१।।

    गुरू मूर्ती समोरील चिंतनात, एकलव्याच्या एकाग्रतेत
    अडथळा उत्पन्न होत, श्वानाच्या भूंकण्याने ।।२२।।

    कौरव पांडवांची शिकारी कुत्री, भूंकू लागली एकलव्या वरती
    थांबविण्या त्यांच्या भुंकण्याती, बाण सोडला त्यांचे वर ।।२३।।

    अचूक वेध साधला, इजा न करी श्वानाला
    बंद करी भूंकण्याला, मुखी बाण रोवूनी ।।२४।।

    विस्मयीत झाले द्रोण, बघूनी त्याचे अचूक बाण
    गुरू असावा ह्यांचा कोण, प्रश्न मनी पडला ।।२५।।

    वंदन केले द्रोण चरणी, तुम्हीच माझे गुरू असूनी
    विद्या शिकवली तव मूर्तीनी, चिंतन करिता तुमचे ।।२६।।

    एकलव्याची वेध शक्ती, अर्जुनाहून सरस ठरती
    मात करील त्याचे वरती, एकाग्रता शक्तीमुळे ।।२७।।

    एकाग्रता हीच शक्ती, एकलव्याने जाणली युक्ती
    करूनी गुरू मूर्तीवर भक्ती, साध्य केली धनुर्विद्या ।।२८।।

    जर वाढेल हे तपसाधन, एकलव्य बनेल महान
    धनुर्विद्येतील अजिंक्यपद, प्राप्त होईल त्यासी ।।२९।।

    जाणता हे मर्म, विचार करी अधर्म
    ‘विद्येस बाधा’ हे कर्म, शोधू लागले द्रोण ।।३०।।

    प्रसन्न आहे तूज विद्येवरी, माझे आशिर्वाद तुझेवरी,
    परी तू गुरूदक्षिणा घ्यावी, खरी इच्छा करीती द्रोण ।।३१।।

    उजवा अंगठा छाटूनी, गुरू दक्षिणा समजोनी
    करावी तो मज अर्पूनी, द्रोण बोले ।।३२।।

    निकामी झाला हात जाणून, अर्पण करी धनुष्य बाण
    वंदन करुन गुरुद्रोण, एकलव्य गेला निघूनी ।।३३।।

    एकलव्याची एकाग्रता महान, नियतीसी नव्हते मान्य
    कर्ण अर्जूनासी मात करून, महाभारत बदलले असते ।।३४।।

    एकलव्याचे जीवन, चमकती विज नभातून
    एकाग्र चित्तेचे उदाहरण, देई करूनी जगाते ।।३५।।

    शुभ भवतू

    डॉ. भगवान नागापूरकर
    ५५८ – १६११८३

      January 20, 2018


  • अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ३

    एकोणिसावं शतक सुरू झालं त्यासुमारास अमेरिकेचे स्थूल मानाने तीन विभाग होते. एक म्हणजे पूर्व किनारपट्टी, जी पूर्णपणे प्रस्थापित आणि बहुतांशी सुरक्षित होती, दुसरा म्हणजे ऍपेलेशियन पर्वतराजीपासून पश्चिमेला मिसीसीपी नदीपर्यंतचा प्रदेश, जो गेल्या शे – सव्वाशे वर्षांतल्या धाडसी लोकांच्या मोहीमांमुळे परिचित होऊ लागला होता आणि तिसरा म्हणजे मिसीसीपीच्या पलीकडचा प्रचंड मोठा असा (गोर्‍या लोकांना) पूर्णपणे अनभिज्ञ असा प्रदेश. १८०३ साली राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी फ्रेंच्यांशी करार करून (लुईसीयाना प्रदेशाचा खरेदी करार) हा मिसीसीपीच्या पलीकडचा ८२८,००० चौरस मैलांचा प्रदेश विकत घेतला. या एका घटनेने, एका फटक्यात अमेरिकेचा विस्तार दुपटीने वाढला.

    या धाडसी लोकांमधे बीव्हरच्या केसाळ कातड्याचा धंदा करणारे खूप होते. बीव्हर हा पाण्यात किंवा काठावर रहाणारा मुंगुसासारखा प्राणी आहे. त्याची झुपकेदार शेपटी आणि केसाळ कातड्याच्या टोप्या युरोपात फार प्रचलित होत्या. बीव्हरला पकडण्यासाठी थंडीचा मोसम फलदायी ठरायचा. ह्या मोसमात बीव्हर चिखल, काटक्या गोळा करून आपली पाण्यातली घरं तयार करतात. हे लोक पाणथळी जागी फिरून बीव्हरची अशी घरं धुंडाळून काढायचे. मग संध्याकाळच्या उतरत्या उन्हात या बीव्हरच्या घराच्या आसपास हे लोक सापळे लावायचे आणि मग भल्या पहाटे, उजाडायच्या आधीच त्या जागी परतून सापळ्यात अडकलेले बीव्हर पकडून मारायचे. जागच्या जागीच त्यांची कातडी सोलून काढली जायची. बीव्हरच्या गुबगुबीत शेपट्या खरपूस भाजून त्यावर ताव मारला जायचा. कडाक्याच्या थंडीचे थोडे महिने आणि जून ते सप्टेंबर या उन्हाळ्याच्या महिन्यात (जेंव्हा बीव्हरच्या कातडीची फर कमी व्हायची) तेंव्हा ही बीव्हरची शिकार बंद असायची.

    जूनमधे, जमवलेल्या कातड्यांचा गठ्ठा घेऊन हे लोक एखाद्या साधारण मोठ्या ठिकाणी एकत्र यायचे. या अशा ठिकाणी आठवडाभर जत्रेसारखेच वातावरण असायचे. शहरांतून येतांना व्यापारी आपल्या बरोबर अनेक वस्तू घेऊन यायचे. मग हे फासेपारधी आपल्या जवळच्या बीव्हरच्या वाळवलेल्या कातड्यांच्या बदल्यात या दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत घ्यायचे. हा आठवड्याभराचा काळ भरपूर दारू ढोसण्यात, जुगार खेळण्यात आणि एकंदरीत मौजमजा करण्यात जायचा. ह्या फासेपारध्यांच्या एकाकी आणि खडतर आयुष्यात हेच थोडे दिवस इतर मनुष्यप्राण्यांच्या सहवासात आणि मौजमजा करण्यात जायचे.

    एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या तीन-चार दशकांपर्यंत पश्चिमेचा बराचसा भूभाग धांडोळला गेला होता. रॉकी पर्वतराजी, सिएरा नेवाडाचे वाळवंट, मिसुरी, स्नेक, कोलोरॅडो नद्यांच्या शाखा, उपशाखा छोट्या छोट्या बोटीमधून पालथ्या घातल्या गेल्या होत्या. ग्रॅंड कॅनयनचे भव्य दिव्य रूप, अफाट पसरलेल्या ग्रेट प्लेन्सवरचे लाखालाखांचे कळप, निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेले वरदान गोर्‍या लोकांच्या डोळ्यांपुढे हळूहळू उलगडत जात होते. वेगवेगळ्या इंडीयन जमातींची जान पहेचान होत होती. हळू हळू या धाडसी गोर्‍या लोकांनी चोखाळलेल्या बिकट वाटांच्या वहीवाटा होऊ लागल्या. दिवसेंदिवस पश्चिमेकडे सरकणार्‍या लोकांचा लोंढा वाढू लागला. एकेकाळच्या अनभिज्ञ, अज्ञात प्रदेशात, प्रस्थापित वस्ती होऊ लागली. या शिकारी, फासेपारधी, डोंगरदर्‍या पालथं घालणार्‍या आणि अज्ञाताचा वेध घेण्याच्या ध्यासापायी संकटांना कवळू पाहणार्‍या धाडसी लोकांचं अद्भूत, अनोखं विश्व नाहीसं होऊ लागलं. १८४८ साली कॅलिफोर्नियात सोनं सापडल्यापासून तर या पश्चिमेकडच्या प्रस्थानाला पूर आला. १८६९ साली रेल्वेमार्ग पश्चिमेला पॅसिफिक महासागरापर्यंत पोहोचला. एकेकाळी पायी किंवा घोडागाड्या, बैलगाड्यांतून होणारा पश्चिमेकडचा खडतर प्रवास आता सुकर आणि सुलभ होऊ लागला. पूर्व किनारपट्टीपासून पश्चिमकिनारपट्टीपर्यंतचा हा खंडप्राय देश रेल्वेमार्गाच्या माध्यमातून जवळ आला आणि अमेरिकेच्या जीवनातला आधुनिकतेचा एक नवा अध्याय सुरू झाला.

    क्रमशः ....

    -- डॉ. संजीव चौबळ

      October 19, 2016


  • श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग ३

    समस्तलोकशङ्करंनिरस्तदैत्यकुञ्जरं !
    दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् !!
    कृपाकरं क्षमाकरं
    मुदाकरं यशस्करं !
    मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् !! ३!!

    समस्तलोकशङ्कर- शम् म्हणजे कल्याण. ते कल्याण जे करतात ते शंकर. समस्त लोक अर्थात सर्व लोकांचे किंवा सर्व विश्वाचे कल्याण करतात म्हणून मोरयांना समस्तलोकशङ्कर असे म्हणतात.

    निरस्तदैत्यकुञ्जर- कुंजर म्हणजे हत्ती. दैत्यकुंजर अर्थात हत्तीप्रमाणे अत्यंत बलशाली असणारे दैत्य.
    भगवान श्रीगणेश आणि आपल्या विविध अवतारात देवांतक- नरांतक, सिंधू, सिंदुर, कमलासुर इ. अनेक राक्षसांचा निःपात केला. त्यामुळे त्यांना निरस्तदैत्यकुञ्जर असे म्हणतात.

    दरेतरोदर- दर शब्दाचा अर्थ आहे घट्ट. मजबूत. परिदृढ. त्याचा इतर म्हणजे विपरीत अर्थात लवचिक, परिवर्तनीय ते दरेतर. असे ज्यांचे उदर अर्थात पोट ते दरेतरोदर.

    भगवान श्री गणेशांना लंबोदर असे म्हणतात. त्यांच्या उदराततून ही अनंत कोटीब्रह्मांडे उत्पन्न होतात आणि शेवटी त्यातच लय पावतात. त्यामुळे त्यांना लंबोदर म्हणतात. भगवान गणेश असे लंबोदर असल्याने त्यांचे उदर सगळ्यांना सामावून घेणारे लवचिक आहे म्हणून ते दरेतरोदर.

    वर म्हणजे सर्वश्रेष्ठ.

    वरेभवक्त्रमक्षर- वर म्हणजे श्रेष्ठ. इभ म्हणजे गज अर्थात निर्गुण निराकार. असे निर्गुण-निराकार तत्व आहे ॐ कार ब्रह्म. त्याला अक्षर असे म्हणतात. तेच ज्यांचे वक्त्र अर्थात मुख ते वरेभवक्त्रमक्षर.

    मुख ही आपली ओळख आहे. चेहऱ्यावरूनच आपण एकमेकांना ओळखतो. निर्गुण, निराकार ॐ कार हीच मोरया ची ओळख म्हणून मोरया,वरेभवक्त्रमक्षर.

    कृपाकर अर्थात भक्तांच्या जीवनात कृपेचा अखंड वर्षाव करणारे.

    क्षमाकर अर्थात प्रार्थना करणाऱ्या, क्षमा याचना करणाऱ्या भक्तांच्या चुकांना माफ करणारे.

    मुदाकर अर्थात भक्तांच्या जीवनात सर्वोत्तम आनंद निर्माण करणारे.

    यशस्कर- अर्थात उपासकांना त्यांच्या मन इच्छित कार्यात यश प्रदान करणारे.

    नमस्कृतां मनस्कर- अर्थात धर्म संमत रीतीने वागणाऱ्यांच्या, श्री गणेश चरणावर नत असणाऱ्या सर्व भक्तांच्या मनात येणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करणारे.

    अशा भास्वर अर्थात परम तेजस्वी भगवान गणेशांना मी नमस्कार करतो.

    -- -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      January 3, 2020


  • लाल माकड

    लाल माकड

    एकदा एक शिष्य आपल्या गुरुंना म्हणतो की मला असा एक प्रभावी मंत्र द्या ज्याच्यामुळे आत्मशांती लाभेल. गुरु म्हणतात की रोज तुझ्या आराध्य दैवतेचा नामजप कर आणि दुसरे कोणतेही विचार मनात येणार नाहीत याची काळजी घे. विशेषतः लाल माकडाचा विचार तर अजिबातच करू नकोस. आत्मशांतीचा इतका सोपा मार्ग कळल्यावर शिष्य समाधान पावला. त्याच दिवशी तो जपाला बसला.तेव्हा त्याला आठवले की लाल माकडाचा विचार मनात अजिबात आणायचा नाही.

      June 27, 2025


  • संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पाऊले

    मागच्या आठवड्यात संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे, आता संरक्षण मंत्री पद गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे आले.अरूण जेटली गेले सहा महिने संरक्षण मंत्री आणि अर्थ मंत्री हा कार्यभार सांभाळत होते. संरक्षण मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय ही दोन्ही खाती एकाच व्यक्तीकडे असणे योग्य नव्हते.

      November 20, 2014


  • अर्धसत्य’ चित्रपट

    अर्धसत्य’ चित्रपट

    पोलिस, राजकारणी आणि माफियांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिका-याची कशी ससेहोलपट होते याचे वास्तव दर्शन घडवणा-या ‘अर्धसत्य’ या चित्रपटाने १९८३ मध्ये चांगलीच खळबळ माजवली होती.

      November 18, 2021


  • अहंकार

    अहंकाराचे विश्लेषण एका विचारवंताने फार सुरेख केले आहे. अहंकार म्हणजे Evil Getting Over you नॅथेनल ब्रोनरच्या मते, अहंकार असा एक राक्षस (बकासुर) आहे की, ज्याला जेवढे खाऊ-पिऊ घालावे तितका तो अधिक भुकेला होतो. बरेचदा अहंकार व स्वाभिमान यांत अत्यंत पुसट रेषा असते. अशा या अहंकाराचे मूळ खालील गोष्टींमध्ये असते-
    (१) अज्ञान
    (२) स्वत:बद्दलचा फाजील आत्मविश्वास
    (३) नकार पचवण्याची कला अवगत नसणे
    (४) स्वत:पाशी असलेले अधिकार
    (५)आध्यात्मिक विचारांची वानवा.

    अहंकारामुळे फक्त नुकसान आणि नुकसानच होते. यामुळे मन:शांती बिघडते, सारासार विवेकबुद्धी नष्ट होते व इतरांशी आपले संबंध दुरावतात. मानसिक तज्ज्ञांच्या मते मनुष्य म्हटला की अहंकार आलाच. हा अहंकार हिंस्र श्वापदासारखा असतो. त्यावर नियंत्रण ठेवून त्याला आपल्या आज्ञेत ठेवणे यातच खरी प्रगल्भ माणसाची कसोटी लागते. तेव्हा आज बघू, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अहंकाराचे दमन.

    ० जेव्हा आपल्याला ठाऊक असते की, समोरच्या व्यक्तीपेक्षा आपल्याला अधिक ज्ञान आहे तेव्हा बढाया मारून स्वत:चे गुणगान करणे टाळा. यामुळे अहंकार वाढीला लागत नाही.
    ० एखाद्याच्या छोटय़ा-मोठय़ा चुकीमुळे/ वागणुकीमुळे आपला अहंकार दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. यासाठी क्षमाशील वृत्ती अंगी बाणवा.

    ० जसा आपल्याला दुसऱ्याची चूक दाखवून देण्याचा अधिकार आहे तसा समोरच्यालाही आहे, हे विसरू नका. आपली चूक असल्यास मोठय़ा मनाने मान्य करा. आपल्या उणिवांवर बोट ठेवले गेल्यास अहंकार दुखावून घेऊ नका, उलट ‘निंदकाचे घर असावे शेजारी,’ या न्यायाने चूक सुधारा व यश संपादन करा.

    ० काही लोक खुशमस्करे असतात. आपली खोटी स्तुती करून आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात. अशा लोकांचे खरे मनसुबे ओळखा. कारण वेळ आल्यास हीच मंडळी आपले पाय खेचतात.

    ० अधिकारांमुळे अहंकार वाढीस लागत असेल तर गाढव व येशूख्रिस्ताची गोष्ट आठवा. येशू गाढवावर बसून जात असतो व सर्व लोक येशूला अभिवादन करत असतात. गाढवाला वाटते की, लोक आपल्यालाच अभिवादन करत आहेत. येशू उतरून गेल्यावर त्याच गाढवाला सर्वजण हाडतूड करतात. याचप्रमाणे अधिकारपद असल्यामुळे लोक आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात, पण तेच पद गेल्यावर तेच लोक आपला अपमानही करतात.

    ० मला आता सर्व कळते, असे वाटू लागल्यास, नवीन जे आपण कधीही ऐकलेले / पाहिलेले नाही ते शिकायचा प्रयत्न करा. त्यामुळे ज्ञानसागर किती अपार आहे व आपली ज्ञानाची घागर किती थोटी आहे, हे कळेल. आपसूकच त्यामुळे अहंकाराचे दमन होईल.

    ० उत्तम, देखणे व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून सर्व लोकांवर आपली भुरळ पडेल हा फाजील आत्मविश्वास / अहंकार बाळगू नका. कारण विचारांची श्रीमंतीच आदरास पात्र असते. लक्षात ठेवा, फळांनी लगडलेले झाड नेहमी वाकलेले असते. तद्वत आपल्या ज्ञान, व्यक्तिमत्त्वाला नम्रतेची झालर असावी.

    ० मी-माझे भौतिक सुख या सर्व कल्पनांना तिलांजली द्या. दुसऱ्याचा विचार करा, यामुळे एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीस मिळाल्यास आपला अहंकार दुखावला जाणार नाही.
    ० दुसऱ्यांना शिकविण्यापेक्षा, दुसऱ्यांकडून जास्तीत जास्त शिका. दुसऱ्यांमधील चांगले गुण आत्मसात करा, त्यामुळे आपल्यालाही शेरास सव्वाशेर भेटल्याचे कळेल व आपसूकच आपला अहंकार निवळून जाईल.

    ० निरपेक्ष वृत्तीने दुसऱ्यांना मदत करा. एखादी गोष्ट चांगली घडून आल्यास आपण फक्त निमित्तमात्र आहोत. सगळी मेहनत ज्याचे काम झाले त्यानेच केली आहे व देवाने हे सर्व घडवून आणले आहे, असा आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगा. त्यामुळे अहंकार वाढणार नाही. आठवा- शिवाजी महाराज-रामदास व बेडकीची गोष्ट. जेव्हा महाराजांना अहंकार जडला की आपण रयतेचे पोशिंदे आहोत तेव्हा रामदासांनी खडक फोडून त्यात जिवंत असणारी बेडकी व पाण्याचे खळगे दाखवले. महाराजांना कळून चुकले की, ही सर्व देवाची लीला आहे. मनुष्यमात्र निमित्तापुरता असतो.

    ० दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करणे टाळा. कारण आपण पुढे गेलो तर अहंकार वाढतो व दुसरा पुढे गेला तर अहंकार दुखावतो. त्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करा. चांगले काम केल्यास ते अजून कसे उत्तम करता येईल यासाठी परफेक्शनचा ध्यास घ्या.

    ० सर्वात शेवटी अहंकार हा अनेक प्रयत्नांतीच काबूत येतो, त्यामुळे नेहमी अंतरात्म्याशी संवाद साधा, आपले बोलणे ओठावर येण्यापूर्वीच अहंकाराचा दर्प नाही ना हे अवश्य तपासा, मग बघा- तुम्ही अजातशत्रू तर व्हालच, पण करिअरमध्येपण सर्वोच्च स्थानावर जाल.

      June 15, 2017