(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री गणपतिस्तोत्रम् – भाग १

    गाणपत्य संप्रदायात स्वानंद नामक गणेशाच्या लोकात तथा साधकाच्या ब्रह्मरंघ्रातील सहस्त्रदल कमलात भगवान गणेशांचे आसन वर्णिले आहे. त्या सिंधुरानन अर्थात गजमुखी भगवान गणेशांचे मी भजन करतो.

      January 7, 2020


  • गुडखाद्य

    उसाच्या रसापासून साखर तयार करतात तसा गूळ आणि काकवीही तयार केली जाते. गूळ उघड्यावर उकळलेला रस गाळण्यांमधून गाळून तयार केला जातो. उघड्यावर असल्यामुळं त्या रसावरचा हवेचा दाब जास्ती असतो.

      April 21, 2011


  • सिर सलामत तो ‘हेल्मेट’ पचास !

    मोडेन पण वाकणार नाही या उक्तीप्रमाणे देहाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोके (शीर) जे आपण सहजासहजी कोणापुढे झुकवत नाही. देव, सद्गुरू किंवा आपल्या आई-वडिलांच्या समोर वाकून नमस्कार करण्यासाठी वापरतो. म्हणजे याचे महत्व नक्की जास्त आहे ते जपलं पाहिजे आणि त्यासाठी त्याची योग्यती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

      February 29, 2016


  • गौरीदशकम् – ९

    नानाकारैः शक्तिकदम्बैर्भुवनानि
    व्याप्य स्वैरं क्रीडति येयं स्वयमेका ।
    कल्याणीं तां कल्पलतामानतिभाजां
    गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ९॥

    या जगाच्या अंतर्गत प्रवाहित मूलशक्ती स्वरूपात विश्वसंचालन करणाऱ्या आई जगदंबेच्या लीलेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,

    नानाकारैः शक्तिकदम्बैर्भुवनानि
    व्याप्य स्वैरं क्रीडति येयं स्वयमेका ।

    विविध आकार धारण करून या विश्वाची केंद्रीभूत असणारी ही आई जगदंबा संपूर्ण विश्‍वाला व्यापून मुक्तपणे स्वतःच्या इच्छेनुसार एकटीच क्रीडा करीत असते.

    भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांचे हे वचन ऐकल्यानंतर आदिशक्तीचा महानतम ग्रंथ असणाऱ्या सप्तशती ची आठवण होते. तेथे दशम अध्यायात हा विषय आलेला आहे.

    शुंभ आणि निशुंभ यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी आई जगदंबेने आपल्या अनेक रूपांना प्रकट केले. ज्या देवतेचे जसजसे स्वरूप आहे तशा तशा स्वरूपात त्यांची शक्ती प्रगट झाली. अशा त्या सगळ्या शक्तीकडे पाहून शुंभ आदिशक्तीला म्हणतो की तू इतरांच्या भरवशावर पराक्रम करतेस. यावेळी आदीशक्ती आपल्या सर्व रुपांना आपल्यात सामावते आणि त्याला म्हणते येथे मी एकटीच आहे. दुसरे आहेच कोण?

    येथे आचार्यश्री नेमकी तीच भूमिका सांगत आहेत. या संपूर्ण विश्वातील चराचर सृष्टीत एकटी जगदंबाच सामावलेली आहे. सर्व रूपात ती एकटीच लीला करीत आहे.

    कल्याणीं तां- संपूर्ण विश्वाचे कल्याण करणाऱ्या त्या, कल्पलतामानतिभाजां- आ म्हणजे पूर्णपणे, नत म्हणजे शरणागत, भाज म्हणजे कृपेला पात्र असलेल्या, उपासकांच्या साठी कल्पलतेप्रमाणे सकल सुख प्रदान करणाऱ्या,

    गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे- कमला प्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 7, 2020


  • निवडणूक मार्गदर्शक तत्त्वे – काय करावे, काय करु नये

    निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत काय करावे आणि काय करु नये याबद्दल माहिती.

      August 8, 2009


  • क’ कावळ्याचा

    (लेखक – प्रतीक मिटकरी ) – पितृपक्ष सुरू झाला आणि वर्षभर अन्नासाठी उकिरड्यावर तसेच घाणिवर फिरणारे कावळे पंधरा दिवसांसाठी आपले पुर्वज झालेत…. पितरांना कावळा शिवला की म्हणे पुर्वजांना मोक्ष मिळतो… पण काय हो या मोक्षाला एक वर्षाचीच Validity असते का?

      September 14, 2019


  • मानवी संबंध, चित्रपट आणि आज …

    आज प्रत्येकाला स्पेस हवी असते. मग नवरा असो , बायको असो किंवा प्रियकर आणि प्रेयसी असो. ही स्पेसची काय भानगड आहे असे तर कुणी ६० प्लस किंवा ६५ प्लस ना विचारले तर निश्चित तोड वाकडे होते का कुणास ठाऊक त्यांच्या मीटर मध्ये स्पेस ही कल्पना बसत नाही. तर कुणी ६० प्लस मध्ये असले तरी मान्य करते.

      August 5, 2023


  • घरातील भिंतींना कोणते रंग लावावेत?

    घरातील भिंतींना रंग लावावा, कारण त्यामुळे १) भिंतीवरील सिमेंट किंवा तत्सम पदार्थांच्या प्लॅस्टरचा टिकाऊपणा वाढतो. २) प्रत्येक खोलीत नैसर्गिक प्रकाश योग्य रीतीने व जास्त प्रमाणात पसरतो. ३) रंगीत भिंतींमुळे खोलीतील वातावरण सुंदर, आकर्षक व आल्हाददायक बनते.

      January 16, 2023


  • आंबा – भारताचे राष्ट्रीय फळ

    भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत शत्रू असले तरी एक अशी वस्तू आहे जी दोघांमध्ये समान आहे. आंबा हे भारत व पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याचं झाड हे बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्हही आहे.

    आंब्यांचा उगम -
    आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक फळ आहे. आंब्यांचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे, परंतु दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षाचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम याच भागात झाला असे मानण्यात येते.

    अवीट गोडीच्या या फळाला कोकणाचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल ते जून हा या फळाचा हंगाम आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीत आंब्याला विशेष महत्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात.

    आंब्याचा मोहर -
    आंब्याच्या फुलांना मोहर असे म्हणतात. त्याला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील ''drupe" या प्रकारातील असते. या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कोय असते.

    आंब्याचा माच -
    कृत्रिमरीत्या आंबा पिकवण्यास आंब्यांचा माच लावणे असे म्हणतात. एखाद्या खोलीत वाळवलेले तणस वा भाताचे वाळवलेले गवत पसरुन त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैर्‍या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे अच्छादन करतात. साधारणत: १०-१५ दिवसांत, झाकल्या गेल्यामूळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.

    आंब्याचे झाड -
    आंब्याचे झाड हे साधारणपणे ३५ ते ४० मीटर एवढा उंच असते. आंब्याची पाने सदाबहार असतात. पानांचा आकार १५ ते ३५ सेंटिमीटर लांब, तर ६ ते १६ सेंटिमीटर रुंद असतो. कोवळे असताना पानांचा रंग काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद होतो. पाने जशी मोठी होतात, तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो.

    आंब्यांचा आकार -
    आंब्यांच्या जातीप्रमाणे त्याच्या फळाच्या आकारात बराच फरक असतो. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार १० ते २५ सेंटिमीटर लांब, तर व्यास ७ ते १२ सेंटिमीटर असतो. फळाचे वजन २.५ किलोग्रॅमपर्यंत असू शकते.

      June 1, 2016


  • लाचार, मुर्दाड की दिशाहीन ?

    जुन्या काळातली राजेशाही असो अथवा आधुनिक काळातील लोकशाही असो, सत्ताधार्‍यांचा धर्म आणि वृत्ती नेहमी सारखीच राहात आली आहे. या सत्ताधार्‍यांना आपली प्रजा मुर्दाड आणि प्रतिकारहीन राहावी असेच वाटत आले आहे. आज २१ व्या शतकातही दुर्दैवाने सत्ताधार्‍यांच्या आणि जनतेच्या एकूण मनोवृत्तीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. तेच बेलगाम सत्ताधीश आणि तीच मुर्दाड, लाचार जनता!

      November 24, 2012