वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्याजवळ काय नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे, त्याचा आपण आपल्या विकासाठी कसा वापर करू शकतो हे उचित ठरणार नाही का? एक पर्यटनस्थळ निर्माण करणे म्हणजे किमान 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे होय. हा झाला प्रत्यक्ष रोजगार. यापेक्षाही अप्रत्यक्ष रोजगार तर अमाप असतो.
April 21, 2023
दोन व्यक्तींमधील संभाषण वा व्यवहार दोघांच्या मर्यादां दरम्यान होत असतील तर ते ठीक असते. पण अशी मर्यादा ओलांडली गेली की एकाचे दुसर्याविषयीचे मत बदलते. कारण त्या एकाला धक्का बसलेला असतो. योग्य कारण जाणण्यात जर तो कमी पडला तर गैरसमज वाढतो. धक्का बसल्यानंतर त्यामागचे खरे कारण समजून घेणे म्हणूनच आवश्यक असते. यासाठी मन खुले असावे लागते.
January 2, 2020
ब्रिटिशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी शिक्षण पद्धती मात्र पूर्वीची ब्रिटिशांचीच होती. स्वतंत्र भारताचा कारभार क्षमतेने चालवायचा तर शिक्षण पद्धती भारतीयच हवी, हा विचार पुढे आला. भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यामुळेच प्रत्येक राज्यात माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन झाली. तसेच महाराष्ट्र राज्य शालान्त शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. या मंडळाने ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे पहिली माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) १९४९मध्ये आजच्या दिवशी सुरू झाल्या.
March 22, 2022
आजकाल मुंबईत सगळीकडे उंचच उंच इमारती दिसतात. उंच इमारती बांधायला अनेक गोष्टींचा आधार घ्यायला लागतो. मुख्यत्वे मजबूत खांब आणि तेही इमारतीच्या क्षेत्रफळावर एकसारखे विखुरलेले असे ठेवले तर इमारतीचा भार सगळीकडे सारखा वाटला जातो. अशाने इमारत व्यवस्थित उभी राहू शकते.
January 13, 2023
स्पर्धात्मक परिक्षांमध्ये महत्वाच्या समजल्या जाणार्या मुलाखत फेरीमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची अप्रतिम आणि डोकेबाज उत्तरे
November 21, 2012
विद्यार्थ्यांचा उत्साह अगदी उतू जात होता. शाळेतील रोजच्या रसायन, भौतिक, गणित, इंग्रजी, मराठीऐवजी अगदी वेगळ्या, पण त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयांवरील चर्चेत प्रत्येकाला आपली मते हिरिरीने मांडण्याची इच्छा होती. आई, वडील, शिक्षक, मित्र, मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक या सर्वांबद्दल प्रत्येकाचं स्वत:चं असं खास मत होतं. मी त्यांच्या वयाचा असताना स्वत:चं मत कशाला म्हणतात याची मला कल्पनाही नव्हती. पण आज थोडीही भीड न बाळगता प्रत्येक विषयावर स्वत:ची ठाम मतं व्यक्त करणाऱ्या या पिढीचं कौतुक करण्यासाठी मला शब्द सापडत नव्हते. मात्र या रंगलेल्या चर्चेत कुणालचं गप्प बसणं मला खटकलं. त्याला चर्चेत ओढण्याचा प्रयत्न मी करू लागलो, पण तो मौन सोडण्यास तयार नव्हता. अगदी अबोल असलेल्या मुलामुलींनी सुद्धा उत्साहाने बोलावं, अशा वातावरणात त्याच्या अबोल्यामुळे माझी उत्सुकता चाळवली गेली व त्याच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करू लागलो. थोड्या वेळाने त्याने भीतभीत तोंड उघडले. पाणावलेल्या डोळ्यांनी मला विचारले, ‘मला जे काही वाटतं ते बोलून दाखवलं तर तुम्ही मला रागावणार तर नाही ना?’ त्याच्या तणावग्रस्त चेहऱ्याने त्याच्या पालकांना चर्चेसाठी आमंत्रण देण्यास मला बाध्य केलं.
आठवडा-पंधरा दिवसांत आटोपणाऱ्या एखाद्या उन्हाळी शिबिरात मुलांना पाठवलं, की त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची जबाबदारी संपली असं समजणाऱ्या कुणालच्या पालकांची नाखुशी ते चर्चेसाठी आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे झळकत होती. कुणालच्या अबोल्याचा त्याच्या पालकांच्या वागणुकीशी काही संबंध आहे का, हे चर्चेच्या ओघात पडताळून बघण्याचा मी प्रयत्न करत होतो. थोडा वेळ काही हलक्याफुलक्या विषयांवर गप्पा झाल्यानंतर त्याचे पिताश्री जरा मोकळेपणाने बोलू लागले. मुलांना जर आपल्या वडिलांचा धाक नसेल तर ती बिघडतात असे त्यांचे अगदी ठाम मत होते. मुलं सतत आपल्या धाकाखाली राहिली पाहिजेत यासाठी त्यांना सतत रागावणं, मारणं, ती कधीही मोकळेपणाने त्यांच्यासमोर वावरणार नाहीत याची काळजी घेणं हे वडिलांचे आद्यकर्तव्य आहे असा त्यांचा समज होता. मुलांशी सुसंवाद साधणे म्हणजे नक्की काय हे त्यांच्या गावीही नव्हतं. वडिलांशी केव्हाही बोलायची वेळ आली, की कुणाल प्रचंड तणावाखाली वावरत असल्यामुळे काहीही बोलण्याऐवजी गप्प राहणेच पसंत करू लागला. ‘वडील’ नावाच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या त्या प्रतिनिधीने केवळ स्वत:च्या मुलांनाच नव्हे तर पत्नीलाही प्रचंड धाकात ठेवले होते व त्याबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटत असे. कुणालच्या अबोल्याचा उगम सापडल्यामुळे आता त्यावर इलाज करण्याचं काम माझ्यासाठी सोपं झालं.
असे आम्ही कसे? आपल्यामुळे या जगात अस्तित्वात आलेल्या आपल्या मुलांशी सुसंवाद साधून त्यांचे आपण सर्वात जवळचे मित्र का होऊ शकत नाही? मुलांना त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेताना सख्ख्या जन्मदात्यांपेक्षा मित्र जवळचे का वाटतात? ज्या दिवशी आईवडिलांची आपल्या मुलांशी मैत्री होईल तो दिवस खऱ्या अर्थाने ‘फ्रेंडशिप डे’ असेल !
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
August 7, 2016
गेल्या काही दिवसांत अनेकजणांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने येथे एक साधी-सोपी टिप देतोय. आपल्या वेबसाईटवरच्या पानांची नावं कशी असावीत त्याबाबत.
April 19, 2015
न बोलता, न तक्रार करता निघून जायचे, हा आजकाल नव्या पिढीचा दस्तूर बनलाय. आणि कामावर येत असतील तरीही किमान काम ( भावनारहित, फक्त वेळेची नोंद) आणि महिनाखेरीचा पे चेक ! माझे एक वरिष्ठ सहकारी म्हणायचे-
March 8, 2023
आपल्या देशात काय चालले आहे? काश्मीरमधील पूंछ या सीमावर्ती भागात पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार चालु आहे. भारताने शस्त्रसंधी तोडल्याचा आव आणून त्याचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानी संसदेमध्ये संमत झाला. १६ ऑगस्टला तब्बल १० वर्षांनंतर पाकिस्तानी सैन्याकडून कारगिल व द्रास भागामध्ये शस्त्रसंधीचा भंग केला.
August 27, 2013
नव्हे चेटकी चाळकू दःव्यभोंदू | नव्हे निंदकू मत्सरू भक्तीमंदू |
नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू | जनी ज्ञानिया तोचि साधू अगाधू ||181||
नव्हे वाउगी चाऊटी काम पोटी | किःयेवीण वाचाळता तेचि मोठी |
मुखी बोलिल्यासारिखे चालताहे | मना सदगुरू तोचि शोधूनि पाहे ||182||
जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी | कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी |
प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे | तयाचेन योगे समाधान बाणे ||183||
नव्हे तेचि जाले नसे तेचि आले | कळो लागले सज्जनाचेनि बोले |
अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे | मना संत आनंत शोधीत जावे ||184||
लपावे अती आदरे रामरूपी | भयातीत निश्र्चीत ये सस्वरूपी |
कदा तो जनी पाहताही दिसेना | सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ||185||
सदा सर्वदा राम सन्नीध आहे | मना सज्जना सत्य शोधून पाहे |
अखंडीत भेटी रघूराजयोगू | मना सांडि रे मीपणाचा वियोगु ||186||
भुते पिंड ब्रम्हांड हे ऐक्य आहे | परी सर्वही सस्वरूपी न साहे |
मना भासले सर्व कांही पहावे | परी संग सोडूनि सूखी राहावे ||187||
देहेभान हे ज्ञानशास्त्रे खुडावे | विदेहीपणे भक्तीमार्गेचि जावे |
विरक्तीबळे निंध सर्वे त्यजावे | परी संग सोडूनि सूखे रहावे ||188||
मही निर्मिली देव तो ओळखावा | जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा |
तया निर्गुणालागि गूणी पहावे | परी संग सोडूनि सूखे रहावे ||189||
नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता | परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता |
तया निर्विकल्पासि कल्पीत जावे | परी संग सोडूनि सूखे राहावे ||190||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 26, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti