वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं
तॆजः परं बहुलकुङ्कुमपङ्कशॊणम् ।
भास्वत्किरीटममृतांशुकलावतंसं
मध्यॆ त्रिकॊणनिलयं परमामृतार्द्रम् ॥ १४ ॥
विश्व प्रलयाच्या वेळी भगवान श्री महाकालांना सोबत करीत असणाऱ्या चैतन्यशक्तीच्या स्वरूपाचे वर्णन केल्यावर आचार्य श्री येथे या साहचर्याच्या सातत्याची कामना करीत आहेत.
आई जगदंबेचे साह्य आहे म्हणूनच भगवान शंकर काही कार्य करू शकतात. ती शक्ती दूर झाली तर शिव हे शव आहेत. अमंगल शवाला परममंगल शिव करणारी ही शक्ती. तिचे स्वरूप वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं- आई अर्धनारीनटेश्वर स्वरूपातील तुझे हे अर्धे शरीर, भगवान शंकरांशी सदैव लग्न म्हणजे जुळलेले असो. या एकत्रीकरणाचा कधीही वियोग न होवो.
कसे आहे आईचे हे स्वरूप? तर ते म्हणतात,
तॆजः परं- परम तेजस्वी. बहुलकुङ्कुमपङ्कश- प्रचुर प्रमाणात अर्पण केलेल्या कुंकवाने,
शॊणम्-
लालबुंद दिसणारे. शोण म्हणजे रक्त. पण त्याचा प्राधान्याने विचार आहे गर्भाशयातील रक्ताशी. गर्भाशयाचा संबंध आहे नवनिर्मितीशी. भगवान महाकाल विनाशाची दैवता आहेत. त्यांच्या सोबत असणारी जगदंबा नवनिर्मितीची शक्ती. यातून ते अर्धनारी नटेश्वर स्वरूप परिपूर्ण आहे. केवळ भकास विनाश नव्हे तर नवनिर्मितीसाठी केलेला साफ-सफाई स्वरूप विनाश.
भास्वत्किरीट- तेजस्वी मुकुट धारण केलेले.
अमृतांशुकलावतंसं- अमृत अर्थात शांतता दायक. अंशू म्हणजे किरण. कला म्हणजे भिन्नभिन्न अवस्था. अर्थात चंद्र. त्याला अवतंस म्हणजे मस्तकावर धारण केलेले.
मध्यॆ त्रिकॊणनिलयं- श्री यंत्राच्या त्रिकोणात निवास करणारी. परमामृतार्द्रम्- श्रेष्ठ अशा अमृतमय करूणेने आर्द्र असणारे, हे तुझे अर्धे अंग कायम भगवंताशी जुळलेले असो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 25, 2020
सकाळी आम्ही सर्व अंगणात बसलेलो ,बऱ्याच विषयावर आई आणि माझ्या गप्पा सुरू होत्या. आईला विविध विषयावर चर्चा करायला फार आवडत. आमचे बोलणे चालूच होते तर अंगणामध्ये एक लहान जेमतेम १२-१३वर्षाची मुलगी आली ,तिच्या डोक्यावर झाळूचे भले मोठे गाठोडे बांधलेले. तिच्या निरागस चेहऱ्यावर ते सर्व झाडू विकायची काळजी होती. असे असताना तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होत ,आईकडे पाहून तिने सुंदर हास्य दिले. ती खूप गरीब होती इतक्या लहान वयात तिच्यावर घराची जबाबदारी येऊन ठेपली होती. आईने तिच्या डोक्यावरचे ओझे खाली ठेवले , मला पाणी आणायला सांगितले. मी पं घेऊन आले तिच्या सोललेल्या चेहऱ्यावर भुकेची छबी जाणवत होती आईने तिला जेवणाचे विचारले ,तिने नाही म्हटले पण आईने बेटा खाऊन घे दोन घास असे म्हणताच तिचे डोळे भरून आले. आईने तिला पोटभर जेवायला दिले. जेवताना तिला सजच प्रश्न केले. तू कुठे राहते ?हे काम इतक्या लहान वयात का करते?मग तिने सांगितले ते मूळचे मध्यप्रदेशचे पण तिच्या बाबाचे निधन झाले आणि घरची बेताची परिस्थिती अश्यात पोट कसे भरवे हा मोठा प्रश्न. मी तिला तिच्या शिक्षणाचे विचारले तेव्हा ती म्हणाली आम्हाला पोट भर भाकर मिळणे कठीण आहे तिथे शिक्षणाचा प्रश्न च येत नाही. ते पोटच्या भाकरीसाठी वाटेल ते काम करतात ,गावोगावी फिरून झाडू बनून विकतात तर कधी टिनाच्या डब्ब्या चे काही बनून ते विकून पैसे कमुन आपली उपजीविका भागवतात. आश्याप्रकरे त्यांच्या आयुष्याचे चक्र चालू होते. आईने तिचा वेळ न घेता दोन झाडू विकत घेऊन तिला काही पैसे आणि धान्य दिले. तिने पुन्हा स्मित हास्य देऊन आमचा निरोप घेतला. ती मुलगी गेल्यानंतर मात्र मला अनेक विषयाने घेरले खरचं माणसापेक्षा आज पैसा खूप मोठा झाला आहे ,या पैश्यामुळेच तर बिचाऱ्या त्या लहान मुलीला शिक्षण घेता आले नाही ,अगदी लहान वयात तिच्यावर घरची जबाबदारी आली. खरतर या लाहण्या जीवाला पैश्याची मदत करून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मदत केली पाहिजे कारण आज आपल्या अवतीभोवती आपल्याला असे अनेक उदाहरणे सापडतील ज्यामुळे या निरागस बालकांचे शिक्षण वाया जाऊन त्यांना घरची जबाबदारी पेलावी लागते. तर चला या मुलांना मदत करूया शिक्षण ही आपल्या समाजासाठी खूप परिवर्तनाची लाट आहे ज्यामुळे समाजातील अंधार कमी होतो. पैश्यामुळे कोणाचे शिक्षण न थांबता त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करुया.
अॅड विशाखा समाधान बोरकर
रा पातूर जी अकोला
August 1, 2019
पोरबंदरच्या प्रकरणानंतर ज्याप्रकारचा मजकूर प्रसिद्ध केला जात आहे आणि वाहिन्यांवरून ज्याप्रकारे चर्चा केली जात आहे, विधाने केली जात आहेत, त्या वाचताना-पाहताना अनेक प्रश्न उपस्थित होतात प्रत्येक गोष्टी कायद्याच्या आधारे सिद्ध करण्यासाठी घाई कशाला हवी ? आपल्या सुरक्षा यंत्रणांवर आपण विश्वास ठेवणार आहोत की नाही? ? की आपला पाकिस्तानहून आलेल्या बातमीवर अधिक विश्वास आहे ? आणि जर तसा असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारे शत्रूराष्ट्राच्या बाजूने झुकणार्यावर आणि त्यांची भलामण करणार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटले दाखल करण्याची गरज आहे.
January 16, 2015
वापर चांगल्या कार्यासाठी झाला तर खूप फायदा आहे परंतु बर्याच जणांना आजूनही मोबाईल फोन वरून बोलतांना भान राहत नाही आणि इतरांना त्याचा त्रास होतो. बहुतेक वेळा सार्वजनिक ठिकाणी बोलतांना सावकाश व मुद्याचेच बोलावे हे लक्षात न राहिल्याने त्याचे सार्वजनिक भाषण होते व नाकोत्या (गुप्त) गोष्टी सगळ्यांना समजतात आणि त्याचा गुंड फायदा घेतात मग पास्तावला होते
May 25, 2011
नुकतीच देशात काही पुतळे उखडायची किंवा पुतळ्यांची नासधूस करायच्या काही लहान-मोठ्या घटना घडून गेल्या. जगभरात कधी ना कधी हे होतंच असतं. आता हे चुक की बरोबर, यावर भाष्य करण्याची माझी कुवत नाही आणि माझी ती पात्रताही नाही आणि या लेखाचा तो विषयही नाही.
March 12, 2018
पूर्वीच्या काळात नाडीपरीक्षेवरून रागनिदान केले जात असे. हृदयाचे ठोके ऐकून वैद्यकीय तपासणी करण्याची पद्धत नंतर रूढ झाली. इ.स. १८०० सुरुवातीच्या काळात फ्रान्समध्ये रेने लॅनेक नावाचा एक डॉक्टर होता. तो हृदयाचे स्पंदन ऐकून रोगनिदान करीत असे. त्यासाठी तो रुग्णाच्या छातीला कान लावून हृदयाचा लब-डब हा आवाज ऐकत असे. एकदा त्याच्याकडे एक तरुण स्त्री आली. आता त्याची चांगलीच पंचाईत झाली.
August 29, 2023
सुरक्षा रक्षकाने एका दमात खुलासा केला…… मन अत्यंत बेचैन झाले, दिवसभर कांहि सुचत नव्हते….. इतके वर्ष झाली पण आजोबांचा तो निर्विकार चेहेरा नाही विसरता आला…….
October 9, 2018
February 15, 2022
आपल्या जवळ ज्ञानाचे साधन स्वरूपात असलेल्या पंचज्ञानेंद्रियांनी जरी भगवंताचा अनुभव घेता येणे शक्य नसले तरी त्यासाठी काही वेगळे मार्ग शास्त्राने दिलेले आहेत. हे मार्ग कोणकोणते ? याचे विवेचन करताना आचार्य श्री म्हणतात….
October 23, 2020
सर्व क्षेत्रात वाढत चाललेला भ्रष्ट्राचार चिताजनक ठरत आहे. भ्रष्ट्राचाराची पाळेमुळे खोलवर रुजल्यामुळे वरवरच्या उपायांनी तो आटोक्यात येण्यासारखा नाही. आजवर न्यायसंस्था भ्रष्ट्राचारापासून दूर होती. पण अलीकडेच याही क्षेत्रात भ्रष्ट्राचाराच्या घटना आढळल्याने खळबळ माजली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रकमेच्या अपहार करणार्या न्यायाधिशांवर काय कारवाई केली जाते याकडे सयार्यांचे लक्ष लागले आहे.
August 14, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti