(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्लॅटिनम – एक राजस धातु

    प्लॅटिनम – एक राजस धातु

    सोन्यापेक्षा महाग असणारा पण अलंकारांसाठी अनेकांना आकर्षित करणारा धातू म्हणजे प्लॅटिनम. प्लॅटिनम हा चांदीसारखा पांढरा, अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान धातू आहे. हा सोन्यापेक्षाही अधिक दुर्मीळ आहे असे मानले जाते.
    पृथ्वीच्या पोटात अगदी कमी प्रमाणात सापडणारा हा धातू आहे. त्याच्या स्वत:च्या खनिजामधे तसेच निकेल व तांबं असणाऱ्या खनिजामधे हा धातू मिळतो. याचं ८ टक्के उत्पादन दक्षिण आफ्रिकेत होतं. उत्पादन कमी असल्यानं तो महाग असतो.

      August 28, 2026


  • वजन कमी करताना तुम्ही या चुका टाळा

    वजन कमी करण्यासाठी वाढलेल्या वजनाने हैराण झालेली प्रत्येक व्यक्ती काहीना काही प्रयत्न सतत करीतच असते. काही लोक दुसऱ्यांकडून सल्लाही घेतात. पण जो उपाय समोरच्या व्यक्तीला लागू होतो किंवा फायद्याचा ठरतो तोच आपल्यालाही लागू पडेल असे नाही. आपल्या प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते, त्यामुळे त्यानुसार वजन कमी करण्याचा पर्याय निवडणे हे अत्यंत गरजेचे आहे.

      April 8, 2019


  • ‘येणें वरें ‘नितीनो’ । सुखिया झाला ।।’

    आपण बऱ्याचदा ठरवतो एक आणि होतं वेगळंच. आता बघा ना, अगदी काल-परवाच, म्हणजे ३१ डिसेंबरला मी ‘जरा विसावतो या वळणावर’ हा लेख लिहून नविन वर्षात मी फार लेखन करणार नाही असं मनोगत व्यक्त केलं होतं.

      January 2, 2019


  • लकशाहीचे मढे कुजले आहे !

    लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेल्या लोकांचे सरकार, ही लोकशाहीची व्याख्या किमान आपल्या देशात तरी अतिशय संकुचित झाली आहे. इथे लोकांना फत्त* मतदानाचा किंवा आपले प्रतिनिधी निवडण्याचा हक्क आहे. अर्थात तो हक्कही अनेक मार्गांनी बाधित होत असतो.

      July 27, 2008


  • डीएनए आणि अमिनो आम्ल

    डीऑक्सिरायबोज, एक फॉस्फेट आणि एक नत्रयुक्त घटक यांच्या मिळून बनणाऱ्या एका रेणूला न्युक्लिओटाइड म्हणतात. असा बनतो डीएनए साखळीचा एक मणी. डीएनए हा पेशीतील अतिशय महत्त्वाचा आणि अति कार्यरत असा बहुआयामी रेणू आहे. पेशीतील प्रथिनांच्या बांधणीत याचा मोठा सहभाग असतो.

      October 21, 2023


  • श्रीहरी स्तुति – २१

    शरीरामध्ये कार्य करणा-या चैतन्याला जीवात्मा असे म्हणतात. तर या संपूर्ण सृष्टीचे संचालन करणाऱ्या परम चैतन्याला परमात्मा असे म्हणतात. जीवात्मा हा या परमात्म्याचाच अंश आहे. त्याचाच अपार क्षमतेच्या आधारे आपल्या मर्यादित चैतन्याच्या आधारे जीवात्मा या देहाचे संचालन करीत असतो. या वास्तविकतेला आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत.

      November 9, 2020


  • बाळक्रीडा अभंग क्र.२५

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 5, 2018


  • संस्कृत शिकण्याची तळमळ !

    ‘संस्कृत’ म्हणती देवांची भाषा
    आहे सर्व भाषांची माता !
    लागून राहिली तळमळ जीवा
    आहे शिकायची फार आशा !

    आहेत कठीण शब्द ब्रम्ह
    उलगडण्या नाही बुद्धी प्रगल्भ !
    छोटया मोठया अनेक ‘संधी’
    विग्रह करता कळतं ‘समधि’ !

    व्याकरणाचे प्रकार ते किती
    उभयान्वयी कर्ता आणि कर्मणी !
    फार होते घुसमट विचारांची
    सुटता योजना भावे प्रयोगाची !

    संस्कृत शिकण्याचे पडले कोडे
    मास्तर मिळेना अडले घोडे !
    अभ्यास करावा सुचेना काही
    संस्कृत शिवाय करमत नाही !

    अभ्यासाला सुलभ संस्कृत पुस्तक
    शब्द उच्चारता तोंडचं बोळकं !
    अर्थ मराठीत सांगेल कोणी
    भाषांतर याचे करेल कोणी?

    भाषांतर मालेचा शोध संपला
    संकृतचा सर्च गुगलवर टाकला !
    सर्चच्या दावणीला सर्व भाषा
    परंतू सोडली संस्कृतची आशा !

    जननी प्रसवते बहु भाषा
    तिच्याच नशिबीच का निराशा?
    संकृतला जगात प्रथम स्थान
    भारत मिळवून देईल देशमहान !

    संस्कृतचे सर्व भाषेत भाषांतर
    सहज उपलब्ध नेटकर्यांना साईटवर !
    हाच असेल आमचा नारा
    उद्याच्या येणाऱ्या आमच्या पोरा !

    जगदीश पटवर्धन, दादर

      May 16, 2015


  • चिनी ड्रॅगनचे आव्हान आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर

    गेल्या १५ दिवसात भारत चीन संबंधांवर परिणाम करणार्‍या अनेक घटना घडल्या. त्याचे विश्लेशण करुन पाउले उचलणे महत्वाचे आहे. या घट्ना होत्या,  दक्षिण चीन समुद्राचा मालकी हक्क मिळवण्यासाठी चीनने मागितली भारताची मदत, पाकला चीनने दिलेल्या अणुभट्ट्या,उत्तराखंडमधील चीनी घुसखोरी,प्रचंड यांच्या रूपाने भारताला नेपाळत मिळालेली संधी

      August 14, 2016


  • मुंबईचा ‘फोर्ट’..

    मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला ‘फोर्ट’ एरिया ज्याने पाहिला नाही त्यानं मुंबई पाहिली नाही असं म्हणायला हरकत नाही..किंबहूना, मुंबई हे संबोधन मुख्यत्वेकरून याच विभागाला लागू होतं असं म्हटलं तरी चुकणार नाही..फोर्टातले ते प्रशस्त रस्ते आणि फुटपाथ, त्या ब्रिटीशकालीन भव्य आणि देखण्या इमारती, प्रत्येक इमारतीला असलेला घाटदार घुमट वा उंचं मनोरा याची भुरळ न पडणारा विरळाच..!

      March 10, 2016