जाय फाकोनियां निवडोनी गाई । आपलाले सोयी घराचिये ॥१॥
घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचा जीव गोविंदापे॥२॥
गोविंदे वेधिले तुका म्हणे मन । वियोगे ही ध्यान संयोगाचे ॥३॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Author
Post Views: 85